My Authors
Read all threads
#चीन
#वाईल्डलाईफट्रेड
#म

2002 ला सार्स नावाचा रोग जगभर पसरला होता. त्याचा उगम चीन मधील गॉनडाँग या प्रांतांत झाला होता. आता जो कोरोना जगभर पसरला आहे त्याचा उगम चीन मधील वुहान मधून झाला. सार्स, कोरोना किंवा इबोला हे झोनोटिक म्हणजे प्राण्यांकडून माणसाकडे संक्रमित होणारे रोग आहेत.
WHO नुसार सार्स हा civet cat ह्या मांजरा पासुन माणसाकडे संक्रमित झाला होता. कोरोनाच्या संक्रमणाच्या बाबतीत अजुन ठोस माहिती मिळाली नसली तरी प्राथमिक अंदाज असा आहे कि कोरोना वटवाघूळ पासून पँगोलिनकडे आणि तिथून माणसाकडे संक्रमित झाला आहे.
चीन मधे कालांतराने जे असे साथीचे रोग येत आहेत याला कारण तिथला बेकायदेशीर वन्यप्राण्यांची व्यवसाय, राजरोस त्यांची विक्री, तिथले वेट मार्केट्स हे दिसून येत आहेत. कोरोना वुहान मधल्या वेट मार्केट मधून सुरू झाला होता. हे मार्केट वन्यप्राण्यांसाठी प्रसिद्ध होतं.
चीन मधील वन्यप्राण्यांचा व्यवसाय, त्यांचा खाद्य म्हणून वापर याला एक मोठा इतिहास आहे. 1958 ला तत्कालीन चीन चा अध्यक्ष माओ झेडोंग याने चीनला बदलण्यासाठी धडाक्याचे उपक्रम हाती घेतले. चीनला धान्य आणि धातू उद्योग यात अग्रेसर बनवणे हे ध्येय होते. यासाठी सगळ्या शेतजमिनी सरकारकडे...
हस्तांतरित करण्यात आल्या. लोकांचे कम्युन म्हणजे समूह बनवण्यात आले व हि लोकं समूहात शेती करायचे, समूहात रहायचे, खायचे. मोठ्या प्रमाणात लोकांना धातू उद्योगात जुंपण्यात आलं. धान्याचे उत्त्पन्न वाढवण्यासाठी जवळ जवळ रोपे लावणे,जमीनीत खोलवर बीज लावणे, मोठ्या प्रमाणावर चिमण्या,उंदीर...
मारणे असे प्रकार केले गेले. ह्याचे रूपांतर वातावरण बदलात झाले. 1959 साली चीनमधल्या एका मोठ्या नदीला पूर आला, 1960 साली 60% प्रदेशावर पाऊसच पडला नाही. परिणामी धान्य उत्त्पन्न वाढण्याऐवजी प्रचंड कमी झाले. उपासमारीची वेळ आली. असंख्य लोकं भुकेने मेली. चार वर्षाच्या काळात अंदाजे...
चार कोटी लोक मृत्युमुखी पडले. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर चीन सरकारने 1978 साली चीन सरकारने प्रायव्हेट शेती करण्यास परवानगी दिली. तेव्हा बऱ्यापैकी सदन असलेले लोक पोल्ट्री,डेअरी यांच्या संबंधीत प्राण्यांचे व्यवसाय करायचे तर गरीब लोक साप, वटवाघुळ, कासव यासारखे वन्यप्राणी...
व्यवसाय करायचे.चीन सरकारने याला पाठिंबा दिला कारण कसेही करून लोकांनी स्वतःचे पालनपोषण करावे हे धोरण होते. जसे जसे परिस्थिती सुधारत गेली तसे तसे ह्या व्यवसायातले प्राणी वाढत गेले. याची लोकांना गरिबीतून बाहेर येण्यास मदत होत होते असे दिसल्यावर चीन सरकारने यासाठी....
कायदाच आणला. 1988 साली चीन सरकारने कायदा आणला Law of People's republic of china on the protection of wildlife.कायद्यानुसार यात वन्यप्राणी हे स्टेट रिसोर्स असल्याचे डिफाईन करण्यात आले आणि त्यांच्या व्यापारात असलेल्या लोकांना सरंक्षण देण्यात आले. लोकांनी आपल्या घरात, शेतात छोट्या-
मध्यम स्केल वर हे प्राणी पाळायला सुरुवात केली. हळूहळू तिथल्या मार्केट्स मधे चिकन,पोर्क ई सोबत इतर वन्यप्राणी हि येऊ लागले. आणि अशाप्रकारे एक मोठी इंडस्ट्रीच यातून उभी राहिली. यासोबतच जगातल्या अनेक देशातून बंदी असलेले प्राणी देखील चीन च्या मार्केट्स मधे बेकायदेशीर रीत्या आणले जाऊ
लागले. हे वेट मार्केट्स अतिशय गलिच्छ वातावरणात असतात,इथे जगभरातील प्राणी आणले जातात,ते वाईट पद्धतीने सांभाळले जातात,अनेक प्राणी आजारी असतात तरी ते तसेच ठेवले जातात, त्यामुळे जगातून कुठून कुठून आलेल्या या प्राण्यांसोबत वायरस येऊन तो वेट मार्केट्स मधून संक्रमित होतो असा अंदाज आहे..
सार्स पण अश्याच एका वेट मार्केट मधून पसरला होता. तेव्हा चीनने त्या भागातले मार्केट सहा महिन्यासाठी बंद केले होते. नंतर पुन्हा सुरू केले. कोरोना प्रादुर्भाव झाल्यानंतर वूहान येथील मार्केट बंद करण्यात आले आहे व तिथले सर्व प्राणी-मांस यांची तपासणी सुरू आहे.
चीनमधे पारंपरिक औषधी बनवण्यासाठी वन्यप्राण्यांच्या मोठ्या प्रमाणावर वापर होतो. 2017 मधे चीन मधली Wildlife trade and consumption इंडस्ट्री मधे 74 बिलयन डॉलर इतका व्यवसाय होता तर 14 मिलियन लोकं या इंडस्ट्रीमधे सहभागी होते. यावरून याचा एकूणच आवाका लक्षात येतो.
कोरोनाचा मोठया प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यानंतर चीन ने अनेक वेट मार्केट्स बंद केले आहेत व वन्यप्राण्यांसंबंधी नियम कडक केले आहेत. या ईलीगल वेट मार्केट्स आणि ईलीगल ट्रेड चा कायमचा बंदोबस्त करावा म्हणून चीनवर दबाव वाढत आहे !

(वरील माहिती या व्हिडीओत आहे 👇🏻
)
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Enjoying this thread?

Keep Current with Gajanan Gaikwad

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just three indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!