My Authors
Read all threads
चांडाळणी तू पळण्यात कसूर केलीस!!!

०३ एप्रिल १६८० ची प्रातःकाळ होती

ऐन उमेदीतील तो तरणाबांड; धिप्पाड शरीरयष्टी, तेजस्वी आरक्त सूर्यबिंबासी तुलना करणारे ज्यांचे मुखकमल होते असा तो वीर आपल्या लाडक्या सांडणीवर स्वार होऊन आपल्या ५ अंगरक्षकासह किल्ले पन्हाळगडावरून गडउतार झाला.
ती छोटीशी टोळी मालकापूरच्या वाटेला लागली. त्या वीराच्या सांडणीबरोबर आपले घोडे दौडविताना त्या ५ अंगरक्षकांची तारांबळ उडत होती.
एक प्रहराभरात तो वीर आपल्या अनुयायांसह मलकापूर मागे टाकून आंबाघाटाच्या माथ्यावर पोहोचला.
त्या सांडणीस बांधून पायउतार होऊन दूरवर दिसणाऱ्या मावळतीकडील कोकणावर त्या वीराने आपली नजर स्थिरावत जवळच्या शिलाखंडावर बैठक घेतली. बाकीचे ५ जनही आपल्या घोड्यावरून उतरून त्या वीराच्या मागे जाऊन कमरेवरील समशेरीला धरून पुढील आदेशाची वाट पाहत उभे राहिले.
इतक्यात ज्याच्या मुखातून फेस निथळतो आहे, ज्याने सतत दीर्घ घोडदौड करावी लागल्यामुळे आपल्या डोईवरील मुंडासे शेल्याने घट्ट आवळून हनुवटीखाली गाठ मारली आहे. ज्याच्या कमरेच्या कस्यात ठेवलेल्या खलित्याचे भेंडोळे आकारले आहे. असा तो एक रांगडा काशीद म्हणजे पत्रवाहक;
आंबाघाटच्या त्या शेवटच्या वळणावरून घाटमाथ्यावर आला. समोर शिलाखंडावर बसलेल्या त्या वीराला पाहून त्या काशीद ने त्या वीराला ओळखले आणि अचंबित झाला.
आपल्या घोड्याची लगाम खेचून पायउतार झाला व त्या वीराला मुजरा करून पाच पाऊले तसंच पाठ न वळविता मागे सारला.
शिलेवर बसलेल्या त्या वीराने त्या काशिदला ओळखून विचारले, " रंभाजी, काय खबर आहे? "

होय! तो किल्ले रायगड ते किल्ले पन्हाळगड या मार्गावर पात्रांच्या थैल्यांची ने आन करणारा रंभा काशीद म्हणजे पत्रवाहक रंभाजी होता. रंभाजीने कमरेस खोवलेला कसा काढून अदबीने एका अंगरक्षाकडे दिला,
त्याने थैलीतून लखोटा बाहेर काढला आणि मस्तकी लावला कारण तो लखोटा राजधानी रायगडावरून आला होता. वीराच्या आज्ञेने त्या अंगरक्षकाने तो खलिता वाचण्यास घेतला. लखोट्याचा मजकूर ऐकून त्या वीराच्या काळजात धडकी भरली. तो वीर शिलाखंडावरून ताडकन उभा राहिला.
त्याने बसलेल्या सांडणीवर मांड टाकली आणि तिच्या पुट्ठ्यावर इशारा करताच ती सांडणी उभी राहिली. सोबतच्या सहकार्याना माघारी किल्ले पन्हाळगडाकडे वळण्याचा हुकूम दिला व आंबाघाट उतरण्याच्या इराद्याने त्या वीराने सांडणी पिटाळली. तो वीर बेभान होऊन काही अवधीतच त्याने घाट पार केला.
हा हा म्हणता साखरपा मागे पडले, सांडणी आता देवरुखच्या रोखाने दौडत होती. मार्गात लाल धुळीचे लोट उडवीत सांडणी किल्ले रायगडाच्या दिशेने दौडत होती. एखाद्या सहचारिणीप्रमाणे अतिजलद चालण्याविषयी सांडणीला तो वीर विनवत होता. सव्य-अपसव्य हाताची गावामागून गावे मागे पडत होती.
संगमेश्वर त्या वीराने कधीच मागे टाकले. नद्यांमागून नद्या ओलांडल्या, ओढ्यांमागून ओढे पार केले. मार्गातील चढ उतार संपता संपता संपत न्हवते आणि रस्ता सरता सरता सारत न्हवता.
उडालेल्या धुळीच्या लोटामुळे तो वीर लाल मातीने माखला होता.
छत्रपती श्री शिवरायांच्या आजारपणाची लखोट्यातील बातमी कानावर पडल्यापासून तो वीर आपले भान हरवून बसला होता. हातात कवड्यांची माळ पकडून पलंगावर झोपलेले शिवराय त्या वीराला दिसत होते. शिवरायांच्या मुखातून जगदंब!! जगदंब!! हे स्वर त्याच्या कानावर आदळत होते.
आजार इतपत बळावेपर्यंत त्या वीराला खबर कशी आली नाही ह्या गोष्टीचा विचार त्याला सतावत होता. कदाचित आजारपण अचानक बळावला असावा आणि कारभाऱ्यानी लखोटा पन्हाळगडावर पाठवला असावा. ह्याच विचारात कशेडीचा घाटमाथा गाठला आणि दूरवर नजर टाकताच लक्षात आले कि मध्यानीचा सूर्य मावळतीकडे कलतो आहे
आणि आपल्याला रायगड गाठायला हवा.
वेळ सरताच किल्ले रायगडावर एक तेजस्वी सूर्य अस्तास गेला आणि दुसरा सूर्य त्या वीराच्या माथ्यावरूनहि ढळला. परंतु त्या अशुभाची जाणीव त्या वीराला होणे शक्य न्हवते. सांडणीस्वार वीर आता पोरका झाला होता. शिवतेज त्याला गवसणार न्हवते. सूर्य पश्चिम क्षितिजावर
पोहोचला, क्षितिजावर लाल रेष उमटली होती. पाखरे घरट्याकडे परतत होती. रानातील गुरे गोठ्याकडे वळत होती. असाच एक #गरुड शिवरायांच्या दर्शनासाठी रायगडाकडे झेपावत होता. सांडणी काळ नदी ओलांडून " टकमक " खालच्या रहाळातून गर्दझाडीतून रायगडाच्या पोटाखालून रहदारीचा मार्ग निवडला.
थेट ' नाणे दरवाजा ' गाठला आणि दरवाजावर पसरलेली शोककाळ पाहून काय समजायचे ते तो वीर समजला. त्याच्या इशाऱ्यावरून ती सांडणी पाय दडपून खाली बसली आणि फेसाळलेल्या मुखाने धापा टाकू लागली. तो नृसिंह पायउतार झाला आणि कमरेचा शेला सोडून पाणावलेले डोळे पुसले.
त्याच्या मुखातून एक आर्त हुंदका निघून दुःखाची वाट मोकळी झाली आणि आणि ......
दुसऱ्याच क्षणी माघारी वळला, कमरेची समशेर उपसली आणि कडाडला,
" चांडाळणी! जर तू आणखी वेगाने धावली असतीस तर आज माझी आणि शिवरायांची भेट झाली असती. तू पळण्यात कुसूर केलास. हे घे त्याचे बक्षीस "
असे बोलून त्या वीराने समशेरीच्या एकाच घावाने बसलेल्या त्या #उंटिणीचे शीर धडावेगळे केले. त्या वीराचे हे रौद्र रूप पाहून दरवाजावरील द्वारपाळ थरथरू लागले. उंटिणीच्या रक्ताने माखलेली तरवार त्या रौद्राने आपल्या शेल्याने कोरडी केली आणि म्यान केली.
अशा परिस्तिथीत गडावर जाणे धोक्याचे ठरेल असे जाणून तो वीर रायगडवाडीकडे गेला आणि तेथून एक घोडा घेऊन तात्काळ पुनःश्च किल्ले पन्हाळगडाकडे गेला.
कुणी म्हणतो तो वीर शिवरायांचा जिवलग मित्र होता; कुणी म्हणतो तो शिवपुत्र संभाजीराजे होते. इतिहास ह्या घटनेबद्दल मुकाच राहिला. या घटनेची साक्ष राहिली ती त्या उंटिणीची शिरकमलाची दगडी प्रतिकृती आणि तो नाणे दरवाजा.
कालपर्यंत ती प्रतिकृती दरवाजाजवळच होती, पण पर्जन्यकाळी धो धो वाहणाऱ्या जलप्रवाहात ती प्रतिकृती आसमंतात असेल का???

किल्ले रायगड आणि पंचवीस कथेतील एक कथा

#जय_शिवराय
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Enjoying this thread?

Keep Current with द लायन किंग 🦁 👑 🤺🥇

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!