My Authors
Read all threads
१/ कोणाला वाटली पाहिजे लाज???

प्रत्येक हलगर्जीपणाचे खापर इतरांवर फोडणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे,

लोकांना घरातुन उचलून, कायदा हाती घेऊन मारहाण करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे,

३० दिवसानंतर सुद्धा,अजूनही एकट्या मुंबईतील गर्दी न हाताळत्या येणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे,
#Palghar #मराठी
२/
जनतेला धारेवर धरून, पैसेवाल्यांना VIP treatment वाटत फिरणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे,

सपशेल यंत्रणा तोंडघशी पडताना, प्रत्येक गोष्टीत केंद्राच्या नावाने बोंब ठोकणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे,

गुंड मंत्र्यांवर कारवाई न करता, व्हाट्सअप्प वर ठराविक मेसेज केला म्हणून अटक करणाऱ्यांना
३/
लाज वाटली पाहिजे,

४० दिवस सुध्दा लोकांना सांभाळता येत नाही म्हणून निधीच्या नावाने बोंब मारणार्यांना लाज वाटली पाहिजे,

जनतेला विश्वासात कमी अन दहशतीत जास्त ठेवणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे,

५ किलो तांदूळ घेण्यासाठी मरमर करणाऱ्यांवर, AC त बसून भाष्य करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे,
४/
डबा पोचवणाऱ्या शेतकरी पुत्रावर नाहक हात उचलणार्यांना लाज वाटली पाहिजे,

Lockdown मध्ये हजारो लोकं गोळा होईपर्यंत, थांगपत्ता नसणाऱ्या अधिकाऱ्यांना लाज वाटली पाहिजे,

अफवांचे खापर रिपोर्टर वर फोडून, संपादकांना पाठीशी घालणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे
#पालघर_के_गुनहगार #palgharpolice
५/
सामाजिक संस्थांचे, संघटनांचे, कार्यकर्त्यांचे श्रेय लाटणाऱ्या यंत्रणेला लाज वाटली पाहिजे,

स्वतः तोंडघशी पडताना, फक्त वायफळ बडबड करणाऱ्या वाचाळवीरांना लाज वाटली पाहिजे,

बुडाखालचा अंधार दिसत नसताना, शेजारी राज्यावर टीका करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे,

#PalgharMobLynching #मराठी
६/
छत्रपतींच्या राज्यात जनतेची मुस्कटदाबी करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे,

दिवसेंदिवस वाढणारी अस्थिरता, अराजकता मार्केटिंग मधून झाकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे,

जनतेच्या रक्ताने भरलेले, मद्याचे प्याले रिते करणार्‍या मद्यांध मंत्र्यांना लाज वाटली पाहिजे,
७/
डॉकटरवर, पोलिसांवर, हल्ले करणाऱ्यांना, पाठीशी घालणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे,

आयुष्यभर डोक्यावर घेऊन नाचणार्‍या कार्यकर्त्यांना, लाथाडणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे,

आयुष्यभर घराणेशाहीवर टीका करून, स्वतःच घराणेशाही चालवणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे,

#पालघर #Palghar
८/
"बळीचं राज्य येऊ दे" च्या जागी
"बळाचं राज्य" मांडून, थयथयाट घालणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे,

सत्तेच्या मस्तीत, महाराष्ट्राची हस्ती राष्ट्रीय पातळीवर मलीन करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे,

एका वर्षात बाजार उठवणाऱ्यांनी, पाच वर्षे सांभाळणार्यांवर भाष्य करणार्यांना, लाज वाटली पाहिजे,
९/
जमलेल्या जमावाने, पोलिसांच्या समोर कत्तल करताना, लॉक डाऊन मध्ये फसलेल्या यंत्रणेला लाज वाटली पाहिजे,

घडलेल्या घटनेची जबाबदारी न घेता, त्याला धार्मिक रंग देणाऱ्या (सर्वच) राज्यकर्त्यांना लाज वाटली पाहिजे,

गरिबांना मदतीचे थोतांड करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे,
१०/
खुर्चीची खाज आणि सत्तेचा माज असणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे,

अरे दुसऱ्याच्या जीवावर सत्तेत येणार्‍यांना लाज वाटली पाहिजे !!!

दोषी कोणीही असो, कुठल्याही पक्षाचा असो, तात्काळ शासन करा, कमकुवत यंत्रणा इतरांच्या माथी मारणार्यांना लाज वाटली पाहिजे !

#पालघर #Palghar
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Enjoying this thread?

Keep Current with Sidhant !

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!