My Authors
Read all threads
#थ्रेड
टोमॅटो प्रक्रिया उद्योग - नव संजीवनी
१. महाराष्ट्रातील प्रमुख फळभाज्यांच्या पिकांत टोमॅटोचा समावेश होतो. टोमॅटोचे मूळ स्थान पेरू व मेक्सिको, तर भारतात त्याला आणले पोर्तुगीजांनी.
टोमॅटो सर्वसाधाणपणे भारतीयांच्या परिचयाचा आहे. भारतात बारमाही उत्पन्न येणारा फळ म्हणजे टोमॅटो.
२. भारतीय बाजारपेठा मध्ये शेतकऱ्यांना नेहमीच त्याने कष्टाने कमावलेले पीक कवडी मोलात विकताना पाहतो ह्याचे कारण म्हणजे कोणतीही ठोस उपाययोजना नसणे.
परंतु ह्याच कवडी मोलाने विकलेल्या पिकावर मोठ्या कंपन्या भला मोठ्ठा नफा कमावतात.
३. आपण शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला तर नक्कीच चांगला बदल दिसून येईन. आज आपण टोमॅटो, त्यांच्या पासून प्रक्रिया करून कवडी मोल टोमॅटो ना चांगला भाव मिळवून देऊ शकतो.टोमॅटो उत्पादनात जगात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. चीन नेहमी प्रमाणे प्रथम आहे.
४. भारतातील सर्वाधिक टोमॅटो उत्पादक राज्यांमध्ये आंध्र प्रदेश पहिल्या क्रमांकावर असून, त्यानंतर बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश इ. ठिकाणी उत्पादन होते. उत्पादन केलेल्या टोमॅटो पैकी १% टोमॅटो वर प्रक्रिया होते.
५. इतके उत्पन्न होऊन सुद्धा टोमॅटो वर प्रक्रिया केलेले पदार्थ आज आपण चीन मधून आयात करतो. टोमॅटो प्रक्रिया उद्योगाची बाजारपेठ १२००-१५०० कोटींच्या घरात आहे. प्रतिवर्ष २०% वाढ होईल असा अंदाज आहे.
इतकी मोठी बाजारपेठ उपलब्ध असताना आपण कुठे कमी पडतो ह्याचा सारासार विचार करायला हवा.
६. ह्या बाजारपेठेत परदेशी कंपन्यांनी मक्तेदारी केली आहे. त्यामध्ये मॅगी, किसान, डेल मोंटे, हेंझ, कागोमे फुड्स, आणि
भारतीय कंपन्या मध्ये क्रिमिका कंपनीचं नाव घेता येईल. वरील पैकी मॅगी आणि किसान ह्या दोघांनी ७५-८०% बाजार त्यांच्याकडे आहे.
७. पाश्चिमात्य देशांमधील राहणीमानाचा परिणाम शहरी भागात पोहचला आहे. त्याचाच परिणाम म्हणून QSR( quick service Restaurant)
Domino's, McDonald's, Pizza Hut
सारखे आंतरराष्ट्रीय ब्रँड आणि काही भारतीय ब्रँड ह्यांनी चांगला जोर पकडला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात टोमॅटो सॉस, केचप, आणि
८. आणि जाम ह्याची मागणी वाढणार आहे ह्यात शंका नाही ,त्याला सोबत आहे ती जाहिरात करणाऱ्या मीडिया ची. आकर्षक जाहिरातींनी लहान मुलं तर आकर्षित होतातच, गृहिणींना सुद्धा मोह आवरत नाही. आज प्रत्येक रेस्टॉरंट मध्ये, छोट्या मोठ्या कॅफे मध्ये टोमॅटो सॉस वापरला जातो.
९. टोमॅटो उत्पादनाचे प्रमाण भरपूर जरी असले तरी प्रक्रिया करण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. टोमॅटो मध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे काढणीनंतर कमी कालावधीत खराब होते परिणामी लागलीच विकावे लागते त्यामुळे शेतकऱ्यांना शास्वत किंमत मिळत नाही.
१०. वास्तविक गावपातळीवर छोटे छोटे टोमॅटो प्रक्रिया उद्योग शक्य आहे, त्यासाठी ग्रुप शेती करून अथवा करार पद्धतीने शेती चा मार्ग अवलंबून हा उद्योग यशस्वी करता येऊ शकतो. टोमॅटो प्रक्रिया केल्यानंतर तयार होणारे पदार्थ हे साधारण ४ महिने टिकतात.
११. सध्या २०१८-१९ मधील भारतातील टोमॅटोचे उत्पादन १९.३९ दशलक्ष असून, ते २०१७-१८ च्या (१९.७५९ दशलक्ष टन) तुलनेमध्ये कमी आहे. भारतामध्ये उत्पादित होत असलेल्या टोमॅटोच्या ९० टोमॅटो हे ताज्या स्वरूपात वापरले जातात. आपणाला १.२ लाख टन गर लागते त्यापैकी ६०-६५ हजार टन टोमॅटो गर आपण बनवतो.
१२. बाकीचं चीन वरून आयात होते.त्यावर आयात कर ३०%असूनही आयात करतो.
टोमॅटोच्या बियांकडे आपलं लक्षही जात नाही. संपूर्ण वाळवलेल्या टोमॅटोमध्ये बियांचे वजनी प्रमाण ३ते५ टक्के असते.बियांमध्ये ३ टक्के तेल,२७ टक्के प्रथिने असतात.या बियांमध्ये लोह, मँगेनीज,जस्त ताम्रचे लक्षणीय प्रमाण आहे.
१३. अल्ट्रा व्हायोलेट (अतिनील किरण) शोषून घ्यायची क्षमता या तेलात आहे. तीव्र सूर्यकिरणांपासून संरक्षण करणाऱ्या क्रीममध्ये एक घटक म्हणून त्याचा उपयोग होऊ शकतो. सुगंधी तेलात व शेव्हिंग क्रीमसारख्या सौंदर्यप्रसाधनात हे तेल वापरता येते.
१४. One guy’s trash can be another guy’s treasure ह्या उक्ती प्रमाणे Tomato is becoming "Tom-AUTO".हो हे शक्य आहे कारण टोमॅटो प्रक्रिया उद्योगातील मोठी
Heinz आणि मोटर क्षेत्रातील फोर्ड ह्या दोघां मध्ये झालेल्या करारानुसार, टोमॅटो च्या सुकलेल्या सालीपासून पॉलिमर तयार करत आहेत.
१५. त्यास ग्रीन-पॉलिमर composite
म्हणतात.त्यापासून येणाऱ्या काळात फोर्ड कार मध्ये वायरिंग brackets , storages bins बनविण्यासाठी ह्या पॉलिमर चा उपयोग करणार आहेत. फोर्ड मोटर टाकाऊ पासून टिकाऊ ह्यावर खूप भर देते.
१६. याआधी फोर्ड ने नारळाच्या आणि कापसाच्या
टाकाऊ पासून कारपेंटिंग, सीट फॅब्रिक, soy foam seat cushions and head restraints.
बनवत आहे. त्यामुळे आपण Tomato is becoming "Tom-AUTO" म्हणू शकतो.
१७. Meals into Wheels"
उक्ती प्रमाणे ओहियो स्टेट युनिव्हर्सिटीतील वैज्ञानिकांनी टोमॅटो साल, आणि अंड्याचे टरफल यापासून टायर निर्मिती
केली आहे.
टोमॅटो ची साल आणि अंड्याचे टरफल ह्यांचं मिश्रण टायर मध्ये कार्बन फिलर च काम करते,हे टायर्स जास्त टिकाऊ आहेत असं त्यांचं म्हणणं आहे.
१८. आपल्याकडे हा उद्योग दुर्लक्षित का आहे त्याचे कारण म्हणजे टोमॅटो प्रक्रिया साठी लागणारी प्रजातीची लागवड न करणे त्याचा परिणाम आपल्या कडील प्रक्रिया उद्योगावर होतो.टोमॅटो प्रक्रिया साठी नवीन प्रजातीच संशोधन बेंगळुरू येथील भारतीय उद्यानविद्या संशोधन संस्थेने विकसित केल्या आहेत.
१९. या जातींचे हेक्टरी उत्पादन ५० टनांपर्यंत आहे. त्यांचे नाव अर्का विशेष (एच-३०९) आणि अर्का अपेक्षा (एच -३८५) असे आहे. ह्यामध्ये टोटल सोलबल सॉलिड आणि लायकोपेन चे प्रमाण अधिक आहे त्यामुळे लागवडीस येणारा खर्च कमी आहे.
२०. टोमॅटो हा दैनंदिन जीवनात लागणारे फळ आहे.सूप
सूप, केचप, चटणी, सांबर, वरण इ. मधे तिचा वापर होतो.
टोमॅटो पासून कोणते पदार्थ तयार होतात ते पाहूया.
२१.
१. टोमॅटो प्यूरी
बी व सालविरहित टोमॅटोचा आटवलाला रस त्यात कमीत कमी 8.5% घन घटक असतात. त्या पदार्थाला ‘टोमॅटो प्युरी’ असे म्हणतात. टोमॅटो प्यूरी हवा बंद बाटली मध्ये ठेवली की ६ महिने टिकते. पुढे याचा वापर केच अप, हॉटेल्स मध्ये वेग वेगळ्या भाज्या बनविण्यासाठी होतो.
२२.
२. टोमॅटो सॉस
टोमॅटो सॉस आणि टोमॅटो पेस्ट मध्ये फरक आहे. टोमॅटो सॉस हे प्यूरी पासून त्यामध्ये लसूण, मीठ, हर्ब्ज, फ्लेवरिंग पदार्थ घालून बनविला जातो.
२३. ३. टोमॅटो केच अप
बदलत्या जीवनशैली मुळे आपल्याकडे फास्ट फूड सेंटर ची मागणी वाढलेली आहे.त्याचा परिणाम हा थेट केेच अप वर होतो. केच्अप हे टोमॅटो पेस्ट किंवा प्यूरी पासून बनते. त्यामध्ये वेगवेगळी मसाले, preservetive, साखर टाकून बनविले जाते. टोमॅटो सॉस आणि केचप ह्यामध्ये फरक आहे.
२४.
४. टोमॅटो पेस्ट
बी व सालविरहित टोमॅटोचा आटवलेला रस ज्यात कमीत कमी 25% टोमॅटो घन घटक असतात अशा पदार्थास टोमॅटो पेस्ट म्हणतात. टोमॅटो जास्त आंबट असल्यास त्यात आवश्यकतेपुसार खाण्याचा सोडा वापरून त्याची आम्लता कमी केली जाते. टोमॅटो पेस्ट आणि टोमॅटो प्यूरी यामध्ये फरक आहे.
२५. टोमॅटो पेस्ट तीन पद्धतीने बनवतात.
१. Hot Break -
टोमॅटो १०० अंश सेल्सिअस ला तापवून क्रश करून पेस्ट बनविली जाते. ह्यामध्ये preservative टाकून ठेवतात. ही पेस्ट अधिक घट्ट असते. ह्याचा उपयोग केचअप साठी केला जातो.
२६.२. Warm break
टोमॅटो ७९ अंश सेल्सिअस ला तापवून क्रश करून पेस्ट बनविली जाते. ह्यामध्ये पेस्ट चा कलर जातो, फ्लेवर राहतो.
३. Cold break
टोमॅटो ६५ अंश सेल्सिअस ला तापवून क्रश करून पेस्ट बनविली जाते. ह्यामध्ये पेस्ट चा कलर आणि फ्लेवर दोन्ही टिकून राहतात.
२७. इथे प्रत्येका कडे शेती आहे, त्याच शेतीचा ग्रुप शेती मध्ये रूपांतर करून एक लघु उद्योग उभारू शकता. सरकार कडून नेहमी अन्न प्रक्रिया उद्योगाला मदत केली जाते.
धन्यवाद 🙏
सचिन सुरवसे
१८ मे 2020.
#म #मराठी_उद्योजक @anil010374 @prash_dhumal @TUSHARKHARE14 @gpekmaratha
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Enjoying this thread?

Keep Current with Sachin Survase

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!