आजी आणि बापाची हत्या झाली. दोन्ही हत्येची कारणं वैयक्तिक नव्हती,तर या देशाशी संबंधित होती.आजी आणि बापाची हत्या झाल्यानंतर अर्थात सुरक्षेचं कवच अधिक कडक केलं जाणार होतं. तसं झालंही.कधी नाव बदलून शिक्षण,तर कधी नाव बदलून नोकरी.स्वत:ची खरी ओळख सांगणं सुद्धा जीवाला धोका होता.👇
राहुल गांधी असेच जगले. लोकांमध्ये बिनदिक्कीतपणे मिसळता येत नव्हतं किंवा कुठेही खऱ्या ओळखीने जाता येत नव्हतं. बरं या सर्व गोष्टी तुमच्या-आमच्यामुळेच. कारण त्यांच्या जीवाला भीती असण्याची कारणं वैयक्तिक नव्हती, 👇
कदाचित लहानपणापासून सर्वसाधारण मुलांसारखं मुक्तपणे बागडायला मिळालं नाही म्हणून किंवा अत्यंत संवेदनशील स्थितीत जीवन जगल्याने असेल, राहुलना तळागाळात पोहोचता आलं नाही. म्हणून अनेकदा भाषणात-वागण्यात कृत्रिमपणा जाणवतो. पण त्यामागील भावना खरी वाटते. 👇
जीवाला असलेला धोका आजही कमी झालेला नाही. आजही 'आपरेशन ब्ल्यू स्टार'ची भीती कमी झालेली नाही. अशा एकंदरीत भयावह वातावरणात जगणं, हे तुम्ही आम्ही फक्त इमॅजिन करु शकतो. किंवा तेही नाही. 👇
संस्काराची टिमकी मिरवणारे जेव्हा राहुल यांच्यावर दर्जाहीन टीका करतात, तेव्हा हसूच येतं. 👇
जर तुम्हाला राहुल यांची संस्कृती काय आहे, हे पाहायचं असेल तर उत्तर प्रदेश विधानसभेच्या प्रचारादरम्यानची सभा आठवा. राहुल गांधी भाषणाला उभे राहिले आणि काँग्रेस कार्यकर्ते ओरडू लागले, 👇
👇
👇
ही उदाहरणं सांगण्याचं कारण असं की, संस्कार मिरवणं वेगळी गोष्ट असते अन् ते संस्कार आचरणात आणणं वेगळी गोष्ट असते. 👇
👇
लेखन - नामदेव अंजना ( @NamdevAnjana )
( namdevanjana.com ) या ब्लाँगवर नक्की भेट द्या. अनेक लेख आहेत वाचल्यानंतर डोक्यात जरासा प्रकाश नक्कीच पडतो.
🙏