त्याला बघुन मुकादम
--काय सखाराम..! आज इकडे कसा
-- काही नाही तुमच्याकडेच आलतो
-- हं बोल काय म्हणतोस
-- काम मिळेल का
👇
-- नाही मी खडी फोडायचच म्हणतोय
-- तुला कधी पासुन खडी फोडता यायला लागली.
-- बघा.. आता हाताला काम न्हाई. पोटापाण्यासाठी शिकावच लागेल.
-- बर चालेल. उद्या सकाळी ६ वाजता चौकात ट्रॅक्टर येईल.
👇
-- बर अस म्हणतोस.. हे घे दोन हजार रुपये आहेत. आणि घन,हातोडी तुझे तु आणशील. आणि सकाळी वेळेवर आवरायचस
-- हो एकदम वेळेवर
सखाराम पैसे घेऊन घरी गेला बायकोला किराणा आणायला पैसे दिले. व घन,हातोडी विकत घ्यायला तालुक्याला गेला.
👇
दुसऱ्या दिवशी सकाळी सखाराम उठला. बायकोने डबा तयार करुन दिला.खांद्यावर घन,हातोडी घेऊन ट्रॅक्टरची वाट पाहत बसला..
पहिल्या दिवशी इतर मजुरांसोबत थोडीशी अधिक ओळख झाली. 👇
-- पहिलाच दिवस ना रे तुझा. मग हळु काम कर की.. आणि आता आराम कर बाकीच उद्या कर
तो खुप धकला होता. रडायची खुप इच्छा होत होती. पण डोळ्यातून अश्रू काढता येणार नव्हत..
👇
त्याने बघितल की, इतर मजुर काम करताय आणि मी बसलोय. मला तर पैशाची अधिक गरज..
सखा मनातच म्हणला. उठ सखा तुला हे काम करावच लागेल. संपुर्ण कुटुंब त्याच्या डोळ्यासमोर येऊ लागल. तसाच तो ताडकन उठला व परत आत्मविश्वासाने कामाला लागला. 👇
-- पायाला लागल ना रे तुझ्या, मग उद्या कर की..
-- नाही नाही.. मी एवढ काम आजच पुर्ण करणार
सखाराम तश्याच अवस्थेत जोरात कामाला लागला. दगडावर दणादण हातोडी आदळायला लागला
व पहिल्याच दिवशी एक ट्रक्टर भरुन दगड फोटायची करामत त्याने करुन दाखवली होती..
👇
सखाराम खुपच दमला होता. जोराची भूक लागली होती. संध्याकाळी तो घरी आला. बायकोने आधीच स्वयंपाक करुन ठेवला होता..
सखारामने आल्याआल्या हातपाय धुतले. पहिलाच दिवस होता त्यात पायाला लागलय म्हणून बायको भरपुर प्रश्न विचारत होती. पण 👇
-- काही नाही जरासच लागलय. चांगल आहे सर्व.. मला भुक लागली आधी जेवणाची तयारी कर अस बोलुन अधिक बोलायच टाळल..
जेवायला बसल्यावर सखारामला जेवता येत नव्हत.. स्वता: सखारामलाच कळाल नव्हत की, माझ्या दोन्ही हाताला मोठमोठी फोड आलेली आहे..हे सर्व बायकोने बघितल 👇
आज कितीतरी दिवसानंतर सखारामची बायको स्वता:च्या हाताने सखाला प्रेमाने घास भरवत होती..
🙏