मला माझ्या वाढत्या वयाची
जाणीव दे. बडबडण्याची माझी
सवय कमी कर
आणि प्रत्येक प्रसंगी मी
बोललंच पाहिजे ही माझ्यातली
अनिवार्य इच्छा कमी कर.
दुसर्यांना सरळ करण्याची
जबाबदारी फक्त माझीच व
त्यांच्या खाजगी प्रश्नांची
दखल घेऊन ते मीच
सोडवले पाहिजेत 👇#म #पुलंस्मृती
प्रामाणिक समजूत माझी
होऊ देऊ नकोस.
टाळता येणारा फाफटपसारा
व जरुर नसलेल्या तपशिलाचा
पाल्हाळ न लावता
शक्य तितक्या लवकर मूळ
मुद्यावर येण्याची माझ्यात
सवय निर्माण कर.
इतरांची दुःख व वेदना
शांतपणे ऐकण्यास मला
मदत करच पण त्यावेळी
माझ तोंड शिवल्यासारखे
बंद राहु दे. 👇
माझ्याच निराशा, वैफल्यांचे
रडगाणे ऐकवण्याची माझी
सवय कमी कर.
केंव्हा तरी माझीही चूक
होऊ शकते, कधीतरी माझाही
घोटाळा होऊ शकतो,
गैरसमजुत होऊ शकते
ह्याची जाणीव माझ्यात ठेव.
परमेश्वरा,
अगदी शेवटपर्यंत माझ्यात
प्रेमाचा ओलावा, गोडवा,
लाघवीपणा राहू दे.
👇
हे मला माहीत आहेच,
पण एक बिलंदर बेरकी
खडूस माणूस म्हणून मी
मरू नये अशी माझी
प्रामाणिक इच्छा आहे.
विचारवंत होण्यास माझी
ना नाही पण मला लहरी
करू नकोस. दुसर्याला
मदत करण्याची इच्छा
आणि बुद्धी जरूर मला
दे पण 👇