My Authors
Read all threads
थोड्याच वेळात लाईव्ह: @GST_Council च्या 40 व्या बैठकीबाबत केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman यांची व्हर्चुअल वार्ताहर परिषद

थेट पहा या लिंकवर :

( पत्रकार परिषदेच्या लाइव tweets (मराठी) ची 🧵 )

@gstindia @askGST_GoI @cbic_india @FinMinIndia
@GST_Council ची 40 वी बैठक थोड्याच वेळात संपणार आहे, केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman लवकरच वार्ताहर परिषदेला संबोधित करतील.

थेट पहा ➡️
आता थेट पाहाः @GST_Council च्या 40 व्या बैठकीनंतर केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman यांची व्हर्चुअल वार्ताहर परिषद

@GST_Council च्या 40 व्या बैठकीतील पहिल्या निर्णयाची अर्थमंत्री @nsitharaman यांच्याकडून घोषणा.
ज्यांचा कराचा भरणा बाकी नाही, मात्र ज्यांनी जुलै 2017 ते जानेवारी 2020(#COVID19 कालावधीपूर्वी) या कालावधीसाठी जीएसटी विवरणपत्र दाखल केलेले नाही, त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची विलंब शुल्काची आकारणी केली जाणार नाही.
जीएसटी थकबाकीदार करदात्यांसाठी, जुलै 2017 ते जानेवारी 2020 या कालावधीत जीएसटीआर-3बी परतावे न भरल्याबद्दलाचे कमाल शुल्क 500 रुपयांपर्यंत मर्यादित करण्यात आले आहे. ही सुविधा केवळ 1 जुलै 2020 ते 30 सप्टेंबर 2020 या कालावधीत कर भरणाऱ्या सर्वांना लागू असेल-अर्थमंत्री @nsitharaman
जीएसटी विवरणपत्र दाखल न केल्याबद्दल विलंब शुल्काची आकारणी करण्याबाबत, @GST_Council कडून प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी दोन निर्णय घेण्यात आले आहेत. - केंद्रीय अर्थमंत्री #NirmalaSitharaman

थेट पहा :

फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल 2020 साठी (#COVID19 कालावधी) उशीरा विवरणपत्र दाखल करणाऱ्या लहान करदात्यांना आणखी दिलासा देण्यात येत आहे.
- अर्थमंत्री @nsitharaman
छोटे करदाते ज्यांची सरासरी वार्षिक उलाढाल पाच कोटी रुपयांपर्यंत आहे त्यांनी फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल2020 मध्ये जीएसटी विवरणपत्र विलंबाने म्हणजे 6 जुलै 2020 नंतर भरले असल्यास त्यावर व्याजदर द्यावा लागेल: हा व्याजदर 18% वरुन 9% पर्यंत कमी करण्यात आला आहे. -अर्थमंत्री
लहान करदात्यांना जीएसटी विवरणपत्र उशिरा दाखल केल्याबद्दल 6 जुलै 2020 पर्यंत कोणतेही व्याज भरावे लागणार नाही, त्यानंतर 9% इतक्या कमी केलेल्या दराने 30 सप्टेंबर 2020 पर्यंत व्याज आकारले जाईल.

- केंद्रीय अर्थमंत्री #NirmalaSitharaman
छोटे करदाते ज्यांची वार्षिक उलाढाल 5 कोटी रुपयांपर्यंत आहे त्यांनी जर मे, जून आणि जुलै 2020मध्ये पुरवठ्यावर झालेल्या परिणामांविषयीचा GSTR-3B फॉर्म सप्टेंबर2020 पर्यंत भरल्यास त्यांना विलंब शुल्क आणि व्याजमाफी दिली जाईल.त्यांना विलंब शुल्क किंवा व्याज आकारले जाणार नाही-अर्थमंत्री
ज्या करदात्यांना रद्द झालेली जीएसटी नोंदणी वेळेत पूर्ववत करून मिळाली नाही त्यांना 30 सप्टेंबर 2020 पर्यंत रद्द झालेली नोंदणी पूर्ववत करण्यासाठी अर्ज करण्याची एक संधी दिली जात आहे. 12 जून 2020 पर्यंत रद्द झालेल्या सर्व नोंदणींसाठी हे लागू असेल. - केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman
.@GST_Council ची विशेष एकल-अजेंडा बैठक जुलै 2020 मध्ये होणार असून, त्यात नुकसानभरपाई उपकरावर चर्चा केली जाईल,जो उपकर राज्यांना दिला जाईल. तसेच, गरज पडल्यास, कर्जाची रक्कम कोणी भरायची यावरही चर्चा होईल.- अर्थमंत्री #NirmalaSitharaman

@gstindia @askGST_GoI
@FinMinIndia
आजच्या बैठकीत शुल्क आकारणीतील तफावत आणि सुधारणांबाबतही चर्चा झाली. शुल्क आकारणीतील तफावतीमुळे महसूल निर्मितीच्या समस्या निर्माण होतात आणि अनपेक्षित परतावे द्यावे लागतात याबाबत सर्वांचे एकमत झाले. यामध्ये सुधारणा कधी करायची असा प्रश्न होता. - केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman
करांच्या क्रमात अदलाबदल करण्याच्या दुरुस्तीविषयक प्रस्तावाला सर्वांनी मान्यता दिली असली तरीही ही दुरुस्ती नेमकी केव्हा केली जावी हा प्रश्न अनुत्तरितच राहिला त्यामुळे याबद्दलचा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. - केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman

@GST_Council

वस्त्रोद्योग क्षेत्राशी संबंधित मालावरील शुल्क आकारणीतील तफावत दूर करण्यासाठीच्या सुधारणांबाबत प्रदीर्घ चर्चा झाली.

- केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman

@GST_Council
@TexMinIndia @smritiirani
IGST च्या केंद्र आणि राज्यातील वाट्याबाबत एक सूत्रबद्ध मांडणी लागू होण्यापूर्वी,2017-18 पासून मोठ्या प्रमाणात IGST जमा झाला होता. त्यातूनच हा जमा झालेला IGST दोन भागात विभाजित करण्याचा तात्पुरता निर्णय घेण्यात आला होता.आता ही त्रुटी दुरुस्त केली जाणार आहे-अर्थमंत्री @nsitharaman
राज्यांच्या हाती पैसा असण्याची गरज लक्षात घेऊन आम्ही एका टोकाला असलेली विसंगती दुरुस्त केली ज्यामुळे केंद्राकडून निधी उपलब्ध करणे शक्य होईल आणि राज्यांना कोणताही फेरफार केल्याविना तो देता येईल. - केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman

यामुळे आम्हाला डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीची जीएसटी भरपाईची प्रलंबित असलेली देयके चुकती करणे शक्य झाले आहे, या प्रकरणाचा निपटारा केल्याबद्दल राज्यांनी प्रशंसा केली आहे.

- केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman

.@GST_Council च्या 40 व्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती देण्यासाठी अर्थमंत्री @nsitharaman यांनी घेतलेल्या आभासी पत्रकार परिषदेत सहभागी झाल्याबद्दल आपले आभार

या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

📙pib.gov.in/PressReleasePa…

#GSTCouncilMeet
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Keep Current with PIB in Maharashtra 🇮🇳

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!