२४ सप्टेंबर १८७३ रोजी ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. आज १४७ वर्षे झालीत.
सत्यशोधक समजाचा संपूर्ण भारताच्या जडणघणीमध्ये महत्त्वाचा वाटा आहे त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया (1/19)
👇👇👇
भारतीय सुधारणा चळवळी मध्ये महात्मा फुले यांच महत्त्वपूर्ण स्थान आहे. त्यांनी स्त्री, शुद्रादी, अतिशुद्रांना सन्मानाचे व समतेचे जीवन जगता यावे, यासाठी पुरूष प्रधान संस्कृती व जातीभेद यांच्यावर कठोर प्रहार केले. संपूर्ण सामाजिक संरचना क्रांतिकारक रित्या बदलल्याशिवाय स्त्रियांची(2)
बंधमुक्तता, जातीभेदाचे निमूर्लन व समता निर्माण होण्याची मुळीच शक्यता दिसत नव्हती. ही गोष्ट एकटयाने होणे शक्य नव्हते. निश्चित अशी विचारसरणी, तत्त्वज्ञान निश्चित करून संघटना निर्माण करण्याची आवश्यकता होती. (3/19)
महात्मा फुले यांचे जुना गंज, पुणे. येथे बाणेकराचे तालमीच्या जवळ जोतीबाचे मुशी विकण्याचे दुकान होते तेथे महात्मा फुले यांची मित्र मंडळी जमत असत. तेथे 'बीजक' सारख्या ग्रंथावर चर्चा, विनिमय होत असे. परंतु त्यांची मनोवृत्ती स्वस्थ राहिली नाही ते नेहमी म्हणत की, ब्राम्हणांनी (4/19)
ब्राम्हणेत्तरांचे अतिशय नुकसान केले आहे. त्यातूनच ब्राम्हणांपासून ब्राम्हणेत्तरांची सुटका कशी होईल हे विचार त्यांच्या मनात खेळू लागले. ते म्हणत की, माझ्या एकटयाने सुटका होणार नाही. मला इतर मंडळी सहाय्य होईल तर काही करता येईल. त्यावरून सोबत (5/19)
असलेल्या मंडळीने त्यास सहाय्य करण्याचे आश्वासन दिले. नंतर मंडळ स्थापन करून त्या मंडळास एक नाव द्यावे असे सर्वानुमते ठरविले. या मंडळास कोणते नाव द्यायचे याबद्दल मंडळीत बरीच वाटाघाट झाली. (6/19)
शेवटी सत्-खरे, शोधक-तपास करणारा, मंडळ-समाज, म्हणजे सत्याचा तपास करणारा समाज असे नाव देण्याचे ठरून तारीख २४ माहे सप्टेंबर १८७३ रोजी 'सत्यशोधक समाज' स्थापन झाला
त्यामुळे महाराष्ट्राच्या सामाजिक पुर्नजागरण चळवळीला गती मिळाली. (7/19)
*सत्यशोधक समाजाचा उद्देश*
'ब्राम्हण, भट, जोशी, उपाध्ये इत्यादी लोकांच्या दास्यत्वापासून शूद्र लोकांना मुक्त करण्याकरीता व आपल्या मतलबी ग्रंथाच्या आधारे आज हजारो वर्षे ते शूद्र लोकांस नीच मानून गफलतीने लुटीत आले आहेत. यास्तव सदउपदेश व विद्याद्वारे त्यास त्यांचे वास्तविक (8/19)
अधिकार समजून देण्याकरीता म्हणजे धर्म व व्यवहारासंबधी बनावट व कार्यसाधक ग्रंथापासून त्यांस मुक्त करणे.
महात्मा फुले यांनी प्रथम जो हल्ला केला तो सर्व पुरोहित वर्गावर केला. कारण यावेळी ब्राम्हणांच्या सर्व किल्ल्या पुरोहित वर्गाच्या हातात होत्या. पुरोहित (9/19)
वर्गाच्या हातून हया किल्ल्या हिसकावून घेतल्याखेरीज आपल्या चळवळीला जोर नाही. हे लक्षात आणून पुरोहित वर्गच नको देव आणि भक्त यांच्यामध्ये हा दलाल हवाच कशाला. असा आपला विचार समाजापुढे मांडून महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाचा उद्देश स्पष्ट केला. (10/19)
*सत्यशोधक समाजाचे नियम*
परिवर्तनीय, सर्वसमावेशक व लोकशाहीस पोषक नियम सत्यशोधक समाजाचे होते. यातील बहुतांश नियम आजही आपल्याला सामाजिक संस्थांमध्ये पाहायला मिळतात. (11/19)
सत्यशोधक समाजाचे तत्त्वज्ञान*
सत्यशोधक चळवळ ही काही शाश्वत मूल्यावर आधारलेली होती. मानवतावाद,बुध्दीप्रमाण्यवाद आणि व्यक्तिस्वातंत्र्य या थोर मानवी मूल्याची जोपासना या चळवळीने केली. मानव तेवढा एक त्यांच्यातील जातिभेद, धर्मभेद, राष्ट्रभेद किंवा खंडभेद हे खोटे आहेत. यावर (12/19)
महात्मा फुले यांचा अखंड विश्वास होता.
याबाबत ते आपल्या 'सार्वजनिक सत्यधर्म' पुस्तकामध्ये म्हणतात,
"आपल्या सर्वाच्या निर्माणकर्त्याने एकंदर सर्व स्त्रियांस अगर पुरुषास एकंदर सर्व मानवी हक्कासंबंधी आपले पाहिजेत तसे विचार, आपली पाहिजेत तशी मते बोलून दाखविण्यास, लिहण्यास (13/19)
आणि प्रसिध्द करण्यास स्वतंत्रता दिली आहे. स्त्री अथवा पुरुष जे एकंदर सर्व गावच्या, प्रांताच्या, देशाच्या व खंडाच्या संबंधाने अथवा कोणत्याही धर्मातील मतांच्या संबंधाने कोणत्याच प्रकारची आवडनिवड न करता या सर्व स्त्री पुरूषांनी या भूगोलावर आपले एक कुटुंब समजून एकमताने, एकजुटीने(14)
व एकमेकांशी सत्यवर्तन करुन वागावे. इतकेच काय, एकाच घरात बौध्दधर्मी बायको, ख्रिस्त धर्मी नवरा, इस्लाम धर्मी कन्या व सार्वजनिक सत्यधर्मी पुत्र यांना प्रेमाने नांदायला लावील तोच खरा धर्म."
*सत्यशोधकी जलसे*
सत्यशोधक चळवळीच्या प्रचार व प्रसारासाठी वेगवेगळी माध्यमे वापरली गेली. (15)
त्यामध्ये 'जलसा' हे महत्त्वपूर्ण साधन बनले. संपूर्ण महाराष्ट्रात लहानमोठया गावात सत्यशोधक जलसाकार जात असत. रात्रभर लोकांचे प्रबोधन करून सत्यशोधक ब्राम्हणेत्तर मतांचा प्रसार आणि प्रबोधन असा कार्यक्रम असायचा. अस्पृश्यतेला विरोध, शिक्षण महत्त्व, जातीविरोध व (16/19)
अंधश्रध्दा इत्यादी विषयांना हात घातला जात असे.
सत्यशोधकी विचार आत्मसात करण्याची मानसिक तयारी बहुजन समाजाची झाली नव्हती. मात्र महात्मा फुले यांचे विचार खेडयापाडयापर्यंत पोहचविण्याचे कार्य जलस्यांनी केले. सत्यशोधक समाज आणि महात्मा फुले यांच्या विचारांचे खऱ्या अर्थाने स्मरण झाले 17
ते जलस्यामुळे! सर्वत्र अडाणी समाज असल्यामुळे लिहीता वाचता येण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे महात्मा फुले यांनी लिहिलेल्या 'गुलामगिरी', 'बाम्हणांचे कसब', 'सार्वजनिक सत्यधर्म', 'अखंड काव्यरचना', 'तृतीयरत्न नाटक' आदी ग्रंथात काय लिहिले हे त्यांना कसे कळणार? म्हणून हे विचार (18)
जलश्यातून सांगितल्या गेल्याने त्यांचा प्रभाव अधिक पडत गेला. जलस्यातील गाणी अत्यंत साधीसुधी अडाणी लोकांना कळेल अशीच होती. ढोलकी तुणतुणेच्या तालावर ती गायली गेल्याने मराठमोळया जनतेला ती समजत होती. त्यामुळे महात्मा फुले यांचा संदेश लोकांपर्यंत पोहचविणे त्यामुळे सोपे झाले. (19/19)
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
अर्बन नक्सल, देशद्रोही, लुटियन गॅंग, सुडो लिबरल, खान मार्केट गॅंग, हिंदू विरोधी, धर्म विरोधी, कटमुल्ले, अॕन्टी नॅशनल, तुकडे तुकडे गॅंग, अवाॅर्ड वापसी गॅंग, इत्यादी ते आता खलीस्थानी...
हक्कासाठी उठणार्या प्रत्येक आवाजाचं दमन करण्यासाठी वापरली गेलेली ही हत्यार आहेत.
पण कुणा कुणाला बदनाम करणार, किती लोकांचा आवाज दाबणार आहात.
काल विद्यार्थी शिक्षणाच्या मुलभूत हक्का साठी संघर्ष करत होते, त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला तिथं यशस्वीही झालात पण ती लढाई ते आजही करत आहेत.
नामांकित विचारवंतांना देशाची धोरणे आधीच लक्षात आली त्यांनी त्यांच्या
पध्दतीने त्यांचा विरोध दर्शविला तुम्ही त्याची दखल घेणं सोडाच तुम्ही त्यांनाही टॅग लावून त्यांचा आवाज दाबला.
सगळी सरकारी संपत्ती उद्योगपतींच्या घशात घालत आहात त्यांना हवे तशे कामगार कायद्यात बदल केलेत आज देशभर कामगार वर्षात असंतोष आहे, त्यांनाही दाबण्याचे प्रयत्न चालू आहे
#thread
३१ आॕक्टोंबर १९८४ रोजी #इंदिरागांधी ची त्यांच्याच सुरक्षा रक्षकांनी गोळ्या झाडून हत्त्या केली होती. त्यामागील कारण काय होते ? Operation blue Star काय होतं ? दमदमी टकसाल संघटना काय आहे ? हे सगळं आपण जाणून घेणार आहोत..
१९७० साली पंजाबमध्ये एक संघटना उभारीस आली "दमदमी टकसाल" यांचे अध्यक्ष होते "जनरल सिंग भिंडरावाले" सुरवातीला यांच्या ५ मागण्या होत्या
१) यमुना - सतलज नदींना जोडणार्या कॅनल ला विरोध
२) पंजाबांचे वेगळे राज्य
३) चंदिगड हे फक्त पंजाबची राजधानी व्हावी (2/n)
४) कॅनलचे मुख्यालय पंजाबमध्ये व्हावे
५) रक्षा, विदेश, संचार, मुद्रा हे केंद्र सरकार ने सांभाळावे बाकीचे सगळे अधिकार राज्यांना द्यावे.
पुढे चालून या संघटनेनं उग्र रूप धारण केलं, जनरल सिंघ आपल्या उग्र भाषाणाद्वारे सिख लोकांना चिथवण्याचे कार्य केले बघता बघता संघटनेनं हजारो
(3/N)
छत्रपती शिवरायांची समाधी शोधून काढणारे महात्मा फुले
शिवरायांच्या राजधानीचे दर्शन घ्यावे ज्योतिबाला फार दिवसांपासून वाटत असे, त्या काळी आजच्या सारखी वाहनांची सोय नव्हती, पायी किंवा घोडा गाडीशिवाय प्रवासाला अन्य मार्ग नव्हता, इच्छा असूनही त्यांनी आपले जाणे लांबणीवर 👇(1/n)#म#रिम
टाकलेपण मनाची रूरत थांबेना, त्यासाठी १८६९ त्यांनी शिवाजी महाराजांचा एक सुंदर पोवाडा लिहून प्रसिद्ध केळ पण एव्हळ्यानेही शिवरायावरील निष्ठा स्वस्थ बसू देईना म्हणून त्यांनी रायगडाला प्रयाण केले. रायगडावर पोहचले त्यावेळी त्यांनी शिवाजी महाराजांची समाधी दिसली नाही, किल्ल्यावर 👇(2/n)
सगळीकडे गवत व झाडे झुडुपांचे जंगल माजलेले, धड रस्ता नाही, की मनुष्यवस्तीची चिन्हे नाही. ज्योतिबांनी चारही बाजूला पाहिले, काही दगड विस्कटलेले दिसले. ज्योतिबा त्या दिशेने आधाशासारखे धावत गेले. ती शिवरायाची समाधी होती. तिची ही दुर्दशा पाहून त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले. 👇(3/n)
तसं प्रत्येक सरकार कमी, जास्त दमनकारी असतंच पण उ.प्र. मध्ये दमनकारीकतेचा कळसच
१८ आॕगस्ट रोजी प्रशांत च्या पत्नी जगीशाचा @jagishaarora वाढदिवस होता आणि त्याच दिवशी प्रंशातला अरेस्ट करण्यात आलं. बरं त्याचा गुन्हा तरी काय तर एक 👇+
फोटो ट्विट केला.
१. खरा फोटो असा होता की UPSC मधून अभ्यासक्रम काढून वैदिक करावा
२. प्रशांत ने ट्विट केलेल्या फोटोत होत की SC,ST, OBC नां राम मंदिरात प्रवेश नाकारला जावा
हे इडिटेड फोटो आहे हे लक्षात येताच प्रशांतने ट्विट डिलीट केलं 👇+
मोदींनी सहा वर्षात घेतलेल्या निर्णयांची आणि केलेल्या इव्हेंट्सची यादी तयार केली आहे कोणीतरी, वाचा
● एअरपोर्ट विकले
● रेल्वेचे खासगीकरण
● BSNL मोडीत काढली
● बँकांचे एकत्रीकरण करून रोजगार घटवला
👇👇
● ONGC करीत असलेले 95%काम रिलायन्सला दिले
● फेल गेलेल्या नोटबंदीत 139लोकांना जीव गमवावा लागला
● निरव मोदीला 456कोटी रु रोख रक्कम आणि सोन्याची बिस्किटे घेऊन पळवाट करून दिली
● स्वतःच्या मतदारसंघात 40लाख एकूण लोकसंख्या असताना 42.5लाख टेस्ट केल्याचे सांगितले
👇👇
● काँग्रेसवर खोटे आरोप करीत राहिले , पण सिद्ध एक ही केले नाही
● नोटबंदीच्या इव्हेंटसाठी स्वतःच्या 87 वर्षाच्या आईला ATM च्या लाईनमध्ये लावून इव्हेंटद्वारे सहानुभूती मिळवली
● राफेल घोटाळ्याबाबत संयुक्त संसदीय समिती द्वारे चौकशी होऊ दिली नाही
👇👇
एकोणिसाव्या शतकातील वृत्तपत्रे ही मतपत्रे होती. त्यांनी लोकजागृती व लोकमत तयार करण्याचे काम केले. या काळातील सर्व नियतकालिके उच्चवर्णीय पांढरपेशावर्गातील उच्चशिक्षितांनी सुरु केलेली होती.
ती शुद्रातिशुद्रांचे खरे प्रतिनिधीत्व करीत नाहीत, असा महात्मा फुले यांचा आक्षेप होता. 'निबंधमाला', 'विविध ज्ञानविस्तार' या सारख्या वृत्तपत्रांनी महात्मा फुले व सत्यशोधक मताचा विचार आणि कार्याचा विपर्यास करून निंदामूलक व गैरसमज पसरविणारी बेताल टीका केली. त्यामुळे सत्यशोधक
समाजाच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी व विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी एखादे पत्रक असावे असे सत्यशोधक मंडळीना वाटू लागले. या पार्श्वभूमीवर कृष्णराव भालेकर यांनी ध्येयवादाने प्रेरीत होऊन दिनांक १ जानेवारी १८७७ रोजी 'दीनबंधू' हे सत्यशोधक चळवळीचे पहिले नियतकालिक सुरु केले.