गोष्ट भाऊच्या धक्क्याची .....सर्वांनी RT करावी अशी माहिती !!

एकेकाळी कोकणी आणि गोंयकार प्रवाशांनी गजबजणाऱ्या मुंबईतील भाऊच्या धक्क्य़ाला यंदा दीडशे र्वष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने भाऊच्या धक्क्य़ाच्या इतिहासाची ही सफर
बंदरापलीकडील रेवसहून अखेरची बोट सातवाजता भाऊच्या धक्क्य़ाला लागली आणि दिवसभर गजबजलेला तो कोकणी माणसाचा सखा- भाऊचा धक्का सुस्तावला.
गेली दीडशे वर्षे अव्याहतपणे मुंबईत कोकण्यांची आणि गोवेकरांची सेवा करणाऱ्या या धक्क्य़ाच्या प्रत्येक चिऱ्याला मग वाचा!
फुटली.
कारण अलिबागहून आलेल्या एका नवश्रीमंत फार्महाऊसवाल्याने ‘ये कौन भाऊ है जी?’
टर्मिनस को जिसका नाम दिया है वो?’ असे कुत्सित उद्गार काढले. गेली दीड शतके या धक्क्य़ावर गरीब कोकणवासी मुंबईत मिसळून जाण्यासाठी उतरत असत.
त्यांना हा प्रश्न कधी पडला नाही.
उलटअभिमान असा की, ‘भाऊ’ हे घरगुती बिरुद जलवाहतुकीच्या टर्मिनसला दिले आहे आणि ते अनेक बेस्ट बसेसवर मराठीत झळकत आहे! कारण याचा जन्मदाता भाऊ अजिंक्य हा पक्का मुंबईकर! पाठारे प्रभू या मुंबईच्या आद्य रहिवाशांपैकी एक बांधकाम कंत्राटदार.स्वधन मुंबईच्या हितासाठी खर्चिणारा.
ब्रिटिश राजवटीत कुलाब्याच्या गन फॅक्टरीत हा भाऊ कारकून होता. कॅप्टन रसेल हा तोफखाना विभागातील नामांकित अधिकारी.
त्याच्या विभागात एकदा एका मराठी माणसाने चोरी केली. त्याला लष्करी शिस्तीनुसार फटक्यांची शिक्षा सुनावण्यात आली.
एका गरीब मराठी तरुणाला सर्वासमक्ष फटके मिळूनत्याची बदनामी होणार, त्यामुळे लक्ष्मण अजिंक्य अस्वस्थ झाला.त्याने रसेलसाहेबाकडे कामगाराच्या वतीने क्षमायाचना केली.स्वत: देशाभिमानी असलेल्या कॅ. रसेलला, स्वदेशाचा विचार करून एका कामगाराचे फटके वाचविणाऱ्या हेडक्लार्क अजिंक्य या
क्षुल्लक कामगाराविषयी आदर निर्माण झाला.
कॅ . रसेलने लक्ष्मणला मिठी मारून ‘यू आर माय ब्रदर!’ असे उद्गार काढून त्याची पाठ थोपटली.
या उद्गारांमुळे लक्ष्मण अजिंक्यला ‘भाऊ’ हे नाव पडले ते कायमचे!
कॅ. रसेलने या भाऊला व्यापारीक्षेत्रात शिरण्यास उद्युक्त केले.
मुंबईत असलेली डबकी आणि सांडपाणी तलाव, मुंबईच्याच कचऱ्याने बुजविण्याचे काम त्या काळी सुरू झालेहोते. भाऊला हे कंत्राट मिळाले. कॅ. रसेलसंबंधी कृतज्ञता म्हणून त्याने आपल्या कंपनीचे नाव ‘भाऊ रसेल आणि कंपनी’ असे दिले.मुंबईच्या पूर्वकिनाऱ्यावर भरणी घालून
कारनॅक बंदर आणि क्लेअर बंदर उभारणीचे कामहीही कंपनी करीत होती.तेव्हा आपल्या मराठी माणसांचा जलप्रवास सुखकर व्हावा, यासाठी एक धक्का असावा, असा विचार भाऊ अजिंक्यच्या मनात बळावला. ईस्ट इंडिया कंपनी आणि पोर्ट ट्रस्ट यांची अनुमती मिळवून त्याने तो स्वखर्चाने अमलात आणला.
कोकणच्या जलवाहतुकीसाठी पुढे दीडशे वर्षे वापरात असलेला ‘भाऊचा धक्का!’ भाऊ रसेल म्हणजेच लक्ष्मण अजिंक्यचे जिवंत स्मारक!रस्ता वाहतुकीसाठी एसटीचा जन्म झाला नव्हता, त्या काळी अध्र्याअधिक मुंबईकरांचे मूळ कोकणात होते. बेशिस्तीच्या खासगी बस वाहतुकीपेक्षाही त्या काळी कोकणातून
मुंबईकडे प्रवास जलमार्गानेच व्हायचा. १८६२ साली भाऊ रसेलने हा धक्का बांधण्यापूर्वी उतारूंचे बोटीतून जमिनीवर पाय टेकेपर्यंत खूप हाल व्हायचे. रात्रभर प्रवास करून आलेली बोट समुद्रात लांब कोठे तरी नांगर टाकायची.मग मोठय़ा हिंदकळणाऱ्या होडय़ांमधून प्रवासी खच्चून भरून, चिखलाने भरलेल्या
मुंबईच्या पूर्व किनाऱ्यावर पाऊल ठेवायचे. गोदीत कंत्राटदारी करणारा भाऊ हे दृश्य पाहून रोज हळहळत असे. ब्रिटिश सरकार हे हाल निवारण्यासाठी काही करणार नाही, हे लक्षात आल्यानंतरत्यांच्याच पैशावर गडगंज झालेल्या कंत्राटदार भाऊ अजिंक्यने धक्का स्वत:च उभारण्याचे ठरवले आणि
अल्पावधीतच कोकणी माणसांच्या हक्काचा धक्का तयार झाला.कालांतराने कोकण आणि गोव्याकडे जाणारी जलवाहतूक बंद पडली तरी १९७० पर्यंत भाऊचा धक्का दिवसभर प्रवाशांनी गजबजलेला असे.सकाळी साडेसहा वाजता रेवस-धरमतरकडे जाणारी छोटी बोट सुटली की, आठ वाजता दाभोळ बंदरापर्यंतची मोठी बोट सुटत असे.
लागोपाठ रत्नागिरी, विजयदुर्ग, गोवा या लाइनीवरील अगडबंब बोट सुटत असे. याबोटी निघून गेल्या तरी आदल्या दिवशी कोकण-गोव्याकडे गेलेल्या बोटी परतण्याची वेळ झाल्यामुळे दुपारपर्यंत भाऊच्य धक्क्य़ाला उसंत नसेच.या काळात भाऊच्या धक्क्य़ाचा अवतार. रेल्वेच्या कुठल्याही टर्मिनसवर न दिसणारा
असा बेंगरुळ.बोट धक्क्य़ाला टेकण्याच्या सुमारास, लाल डगलेवाल्याहमालांचा जथा.
एक गलेलठ्ठ जाडीचा दोरखंड घेऊन तो डेकवर फेकण्यासाठी सज्ज दिसे. मुख्य डेकवर तोंडात चिरूट धरलेला शुभ्र वस्त्रातील गोवेकर कॅप्टन ‘..आऽऽरी माऽऽर, आऽरीऽमाऽऽर’ अशी अनाकलनीय ऑर्डर
देऊन बोट धक्क्य़ाला समांतर आणीत असे.
बोटीवरून खेचून घेतलेला जाड दोरखंड धक्क्य़ावरील दगडी मनोऱ्याला (कॅपस्टन) बांधला की, हमालांचा जथ्था बोट खेचून धक्क्य़ाला अंगलट करीत असत. सशक्त, चपळ हमाल बोट आणि धक्का यांना जोडणारा सेतू लागण्याच्या अगोदरच कठडय़ावरून हनुमानउडी मारून आत घुसून
प्रवाशांचा कब्जा घेऊ पाहत.कोकणी प्रवासी वैतागलेल्या गबाळ्या अवतारात, लाल मातीने रापलेल्या कपडय़ात, एकदा भूमीवर केव्हा पाऊल ठेवतो, यासाठी आतुर असे. वांत्या करून थकलेले चेहरे, ढीगभर वळकटय़ा आणि आंबा-फणसाची पोती उचलण्याची करामत करताना तो केविलवाणा होई.
तरीही आपल्या गावच्या मातीची ऊब घेतलेला कोकणी माणूस नव्या उत्साहाने गजबजलेल्या मुंबईत धनार्जनासाठी मिसळून जात असे.
एके काळी दिवसभर गजबजलेला भाऊचा धक्का आता वयस्कर माणसासारखा सुस्त झाला आहे.
आधुनिक कोकण रेल्वे त्याला वाकुल्या दाखवीत असली तरी स्थितप्रज्ञ ज्येष्ठाच्या नात्याने तो निनादत असतो,
‘मीच खरा कोकणी माणसाचा जिवाचा सखा

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with कट्टर हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व

कट्टर हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @MilindG11975687

9 Oct
हाथरस पहुँचनेवालों में से एक भी कभी पालघर नहीं पहुँचा.! क्यों? दिल्ली में जिन र्लोगों का संहार ताहिर ने कर उनके शव नाले में फेंके थे, क्या उन पीड़ितों के घर संजय सिंह गए थे ? BJP अब पार्टी नहीं बल्कि हिंदू आस्था का वह मंदिर बन चुकी है जिस पर सौकरोड़ हिंदुओं का विश्वास है
कोई शक
काँग्रेस की नीति रही है बाटो और राज करो। इस नीति और सोच को तोड़ना होगा सब हिन्दू भाइयो को एकजुट होकर जात पात का त्याग कर सिर्फ हिन्दू बने तभी इस हिंदुस्तान में हिन्दुओ का अस्तित्व बच पायेगा वरना सत्ता के भूखे भेड़िये गिद्ध जयचन्द दलाल मीडिया के सहयोग से पारी पारी करके
सबको नोच खायेंगे।
आँखे खोलो मेरे भाई दुश्मन को पहचानो
काँग्रेस सत्ता के लिये इस कदर इतनी नीचे गिर जाएगी पता नही था पहले गँगस्टर विकास दुबे के नाम पर सवर्णो को आपस में लड़ाया और बाटा ब्राह्मण ठाकुर के नाम पर। अब दलितों को भड़काकर सवर्णो को नीचा दिखाने का प्रयास कर रही है।
Read 7 tweets
9 Oct
*संघ संस्थापक*
*डॉ. केशव बळीराम हेडगेवार*

*एप्रिल १, १८८९*
जून २१, १९४०

हे भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या हिंदुत्ववादी-राष्ट्रवादी संघटनेचे संस्थापक होते.
डाँ. केशव बळीराम हेडगेवार यांचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेला एप्रिल १ सन इ.स. १८८९ मध्ये महाराष्ट्र आणि
आंध्र प्रदेश च्या मधल्या बोधाण तालुक्यातील कुंदाकृती गावात झाला.
हेडगेवारांचे शिक्षण त्यांच्या मोठ्या भावाने केले.मॅट्रिक पास झाल्या नंतर, इ.स. १९१० साली ते चिकित्सा शिक्षण घेण्या साठी ते कोलकात्ताला गेले. तरुणपणात सशस्त्र क्रांतीत सहभाग घेतलेला. शाळेत असताना त्यांनी
व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाला ६० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल वाटण्यात आलेली मिठाई रागाने फेकून दिली होती. तसेच पुढे ‘वंदे मातरम्‌’ चा घोष केल्याबद्दल त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले होते. बंगालमधील प्रत्यक्ष क्रांतिकार्यात सहभाग घेता यावा यासाठी त्यांनी आपले उच्चशिक्षण
Read 18 tweets
7 Oct
इतिहास का पुनर्लेखन किया जाय ताकी हमारी अगली पिढी अपने महान इतिहास और अपने महान शासको के बारे मे विस्तृत जान सके
@narendramodi @smritiirani @AmitShah
*अफगानिस्तान का हिंदू वैदिक अतीत*
*भारत का अजेय सम्राट ललितादित्य मुक्तापीड़*
वीर सावरकर जी हिंदुओं की दिग्विजय के विषय में कहते हैं कि :--
" साधारणत: सन 550 के बाद हिंदू राजाओं ने सिंधु नदी को विभिन्न मार्गों से लांघकर आज जिन्हें बलूचिस्तान , अफगानिस्तान , इराक,हिंदूकुश ,
गिलगित , कश्मीर इत्यादि कहा जाता है , और जो प्रदेश सम्राट अशोक के पश्चात वैदिक हिंदुओं के हाथ से यवन , शक , हूण आदि म्लेच्छों ने छीन कर लगभग 500 वर्ष तक अपने अधिकार में ले रखे थे ,
वे सिंधु नदी के पार के समस्त भारतीय साम्राज्य के प्रदेश उन सभी म्लेच्छ शत्रुओं को ध्वस्त करते
Read 14 tweets
5 Oct
वक्त रहते सुधर जावो मित्रो
यूपी के सीएम योगी जी का वो सच, जो बहुत कम लोग जानते हैं???
भयंकर रुप, जिसने पूरी भाजपा को हिलकर रख दिया????
बात अक्टूबर 2005 की है, एक UP का माफिया था। जिसका नाम मुख़्तार अंसारी था।वो खुली जीप में हथियार लहराते.महू में साम्प्रदायिक दंगा करवा रहा था।
3 दिन तक मौत का तांडव महू में मुख्तार करता रहा,उस वक़्त UP का CM मुलायम सिंह यादव था।और वो कई दफ़ा ये भी बोल चुका था कि
"मुझसे बड़ा गुंडा इस UP में नही है..." ये बात वो सिंर्फ़ योगी जी के लिये बोलता था।
जब दंगे को का तीसरा दिन था तो प्रशासन
Read 18 tweets
5 Oct
काँग्रेस सत्तेवर आली की कृषीविषयक कायदे केराच्या टोपलीत टाकू..राहुल गांधी..

याला निवडणूक जिंकायचीच नाहीये. इतका बिनडोक माणूस काँग्रेसचा नंबर वन नेता आहे ही देशाच्या दृष्टीने खूप चांगली गोष्ट आहे.
त्याहूनही चांगली गोष्ट ही आहे की इतर विरोधी पक्ष दरवर्षी हा सुधारेल म्हणून लाळ गाळत याच्या मागे फिरत असतात.त्यात आता शिवसेनेची भर पडली आहे ही महाराष्ट्रातील जनतेच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक गोष्ट आहे. चार चोंगे उठून सोशल मीडियावर दंगा करतात म्हणून परसेप्शन तयार होत नसते.
फायदा झालेले शेतकरी निवडणुकीत कोणाला मत देणार ते मोदींना माहितीय. गरीब जनतेची नस कळते त्यांना.२०१९ च्या निवडणुकीतसुद्धा हेच घडले होते...लोकांना चक्कर आली जेंव्हा भाजपला ३०३ सीट्स मिळाल्या..@sachin_inc
Read 4 tweets
5 Oct
गेल्या काही दिवसापासुन हाथरस मधील मुलीची धिंड ह्या मुर्ख मिडियावाल्यांनी व गाणी गात हसत खेळत राजकिय पर्यटन करणाऱ्या नेत्यांनी काढली आहे. व ही लाजिरवाणी दृष्य जबरदस्ती पहावी लागत आहेत.
हे येवढे मोठे पत्रकार आहेत पण FIR दाखल करायला गेलेली
मुलगी व तिच्या भावाने लिहुन दिलेली जबानी पाहायचे कष्ट कोणी घेतले नाहीत. तेथुन अलीगड येथील हॉस्पिटलचा मेडिकल रिपोर्ट कोणी पाहिला नाही. पाहिला नाही हे खरे नाही ह्यांना पहिल्या दिवसापासुन हे माहित होते पण तेंव्हा ती मुलगी चांगली होती त्यामुळे घटना घडली
ती 14 तारखे पासुन ती मुलगी क्रिटिकल झाली नाही तो पर्यंत हे सगळे गप्प बसले होते.
अलिगडहुन मुलगी जास्त क्रिटिकल झाली म्हणुन तिला सफदरजंग हॉस्पिटल दिल्ली येथे हलवले. तेंव्हा रक्ताचा वास यावा तसा ह्या राजकारणी लोकांना वास आला. व हल्ली सगळी मिडिया ही पक्षीय पातळीवर पोहचली आहे.
Read 28 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!