एकदा एक राजा त्याच्या प्रधान, सेनापती आणि सैनिकांसह शिकारीला निघाला वाटेत अरण्यात पुढे त्यांची ताटातूट झाली. मग प्रधानाने राजाच्या शोधार्थ सैनिकाला पाठवले अरण्याच्या मध्यभागी एका साधूची झोपडी होती.
साधू झोपडीच्या बाहेर झाडाखाली बसलेला असतो. पण तो साधू आंधळा असतो. सैनिक साधूच्या जवळ येतो आणि घोड्यावरूनच विचारतो,
काय रे गोसावड्या आमच्या महाराजांना हिथून जाताना पाहिलेस काय?
त्यावर तो साधू त्याला सांगतो, बाबा रे मी दोन्ही डोळ्यांनी आंधळा आहे, मला कस काय दिसणार. सैनिक म्हणला अरे आंधळा आहेस म्हणून काय झालं पण बहिरा तर नाहीस ना?
घोड्याच्या टापाचा काही आवाज वगैरे ऐकला असशील. साधू म्हणतो नाही तस काही मी ऐकल नाही.
सैनिक तिथून कोणाला तरी शिव्या देत निघून जातो.
मग थोड्या वेळाने तिथे सैनिकांचा नाईक तिथे पोहचला तो म्हणाला, काय हो साधूबुवा ईथून आमचे महाराज गेलेत काय? साधू म्हणतो, नाही रे बाबा तुमचे महाराज नाही आले इकडे,
पण एक शिपाई मात्र राजेसाहेबांचा शोध करीत आला होता तो उत्तरेच्या दिशेने गेलाय.
थोड्या वेळाने तिथे सेनापती आला तो म्हणाला. साधू महाराज इथून आमचे राजेसाहेब गेले असल्याचे आपणांस काही कळले काय. साधूने त्यालाही वरील प्रमाणे उत्तर दिले.
थोड्या वेळाने तिथे स्वतः प्रधान आला, आणि तो म्हणाला सूरदासजी महाराज आम्ही शिकारीला आलेल्या आमच्या राजेसाहेबांच्या शोधात आहोत. ते इकडे आल्याचे आपणाला काही कळाले का?
साधूने प्रधानालाही नकारार्थी उत्तर दिले.
आणखी थोड्या वेळाने तिथे स्वतः राजाच आला. त्याने त्या साधूबुवांना प्रणाम केला आणि विचारले, महाराज आपल्या चरणी माझे प्रणाम असावेत. मी तहानेने व्याकुळ झालोय, भगवन् आपली अनुमती असेल तर आपल्या आश्रमातील थोडेसे पाणी मी पिऊ इच्छितो.
त्यावर साधू म्हणाला राजा तुझे स्वागत असो पण तू थकून-भागून आला आहेस, त्यामुळे तू एकदम पाणी पिऊ नकोस, मी तुला काही फळ खायला देतो ती खा आणि मग पाणी पी. राजा म्हणाला, प्रज्ञाचक्षु भगवान् मी राजा आहे हे आपण कसे ओळखले?
माझ्या शोधार्थ इथे कोणी आले होते काय? साधू म्हणाला होय महाराज, तुझा शोध करीत प्रथम एक शिपाई आला होता, मग शिपायांचा नाईक आला, त्यानंतर सेनापती, मग प्रधानजी आले होते.
राजा म्हणाला महाराज आपण त्यांचे अधिकार कसे काय ओळखलेत?
साधू म्हणाला त्यांच्या बोलण्याच्या शैलीवरून. जो जितका श्रेष्ठ असेल तितकी त्याची भाषा नम्र आणि मृदूअसते.शिपायाने मला गोसावड्या असे म्हटले. तर नाईकाने साधूबुवा असा माझा उल्लेख केला.त्यानंतर सेनापती आला त्याने मला साधू महाराज असा आवाज दिला.प्रधानाने मला सूरदासजी महाराज असे संबोधले.
आणि तू जेव्हा माझा भगवन् म्हणून माझा गौरव केलास, तेव्हाच मी ओळखले हा राजाच असला पाहिजे.
कारण राजा नम्र, मृदू आणि शिलाने श्रेष्ठ असतो.उलट हीन लोक नेहमी कठोर आणि कर्कश बोलतात. दुसऱ्याला दुखावतात.
उदार आणि परोपकारी मनाचे लोक नम्र असतात त्यांचे बोलणे आणि वागणे मृदू आणि मनोहर असते.
चंद्र किरणात स्नान करावे, केशर-कस्तुरी मिश्रीत जलाचे सिंचन व्हावे, पुष्पपरागांचा वर्षाव व्हावा.
अथवा मलयनिलांच्या मंद मंद लहरी याव्यात, असे उदार मनाच्या माणसाचे बोलणे आणि वागणे असते. ज्यांच्या अंतःकरणात सर्वांच्या विषयी परमेश्वराचा भाव असतो त्यांची वागणूक देखील नम्र असते.
“नम्र झाला भूता | तेणे कोंडिले अनंता ||”
अस संत तुकोबाराय सांगतात, आम्हीही विनम्र व्हावं आणि त्यापद्धतीने आमचं जगणं बोलणं व्हावं. जे आमच जगणं प्रतिबिंबित करेल. समृध्दीच्या काळात विनम्रता आणि संकटाच्या काळात सहनशिलता असावी. मानवाचा सर्वश्रेष्ठ गुण म्हणजे कृतज्ञता.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
थोड्याच दिवसांनी नवरात्र सुरू होतील
देवीच्या नऊ रूपाची पूजा केली जाते.
पण आपण जर आजूबाजूला शोधले तर ही देवीची नऊ रूपे आपल्या घरातच सापडतील ते असे
‘रूप पाहता लोचनी'
आपण बालपणापासून देवीची विविध रूपे पदोपदी पाहत आलोय.
पहिली माळ - ‘मातृदेवतेची'.
जी आपल्यासाठी कष्ट उपसताना दिवस-रात्र, आजारपण, थकवा, तहान-भूक कशाचीही पर्वा करत नाही.
आपल्या कल्याणासाठी अथक प्रयत्न करणे सोडत नाही.
मातृदेवते, तुला शतशः प्रणाम !
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
दुसरी माळ - ‘आजी' नामक 'मायेच्या सागराला'.
जिच्याजवळ आपल्या दुधावरच्या सायीसाठी प्रेम, माया, ममता, आशीर्वाद यांचा जादूचा खजिनाच दडलेला असतो.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अत्री ऋषी आणि अनुसूया एकदा महादेव आणि पार्वती कडे जेवणाचं आमंत्रणं घेऊन जातात. सर्वांना जेवायला बोलावतात. कार्तिक घरी नसतो पण गणपती असतो. छोट्या गणपती ला घेऊन यायचा ते आग्रह करतात.
पण पार्वती ला गणेशाची क्षुधा माहीत असते म्हणून ती त्यांना सांगते की ती व महादेव येतील आणि कार्तिक परत आला की पुन्हा एकदा सगळे येतील. पण अत्री पुन्हा त्यांना गणपतीला घेऊन यायचा आग्रह करतात आणि पार्वतीचा नाईलाज होतो.
महादेव, पार्वती आणि गणपती तिघे ठरलेल्या दिवशी अत्री ऋषींकडे जेवायला जातात पण पार्वतीला चिंता असते ती गणपतीच्या भुकेची आणि अनुसूये कडील सगळं जेवण संपलं तरी याची भूक शमणार नाही हे तिला माहीत असते.
जेवण सुरू होतं आणि अनुसूया एकेक पदार्थ वाढायला सुरू करते.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आदिशक्ती ही वर्षातून २१ दिवस निद्रा घेते. उरलेले ३४४ दिवस देवी अष्टौप्रहर जाग्रृत असते. निद्रा समयी देवीला १०८ साड्यांचे वेष्टन (दंड नेसवने)केले जाते व विधिवत् पलंगावर निद्रेसाठी ठेवले जाते.
असे असणारे तुळजाभवानी शक्तीपिठ एकमावाद्वितीय आहे
मंचकी निद्रा:-
देवीची मंचकी निद्रा २१ दिवसात विभागलेली आहे
सर्व प्रथम मंचक म्हणजे काय ?
मंचक याचा अर्थ पलंग असा आहे.
देवी भवानीची निद्रा तीन प्रकारात विभागली आहे ती अशी👇🏼
१)घोर निद्रा :-
नवरात्रीच्या आधी देवी योगनिद्रेत होती म्हणजे महिषासुराशी युध्द करण्यापूर्वीदेवी ही निद्रा घेत होती पण महिषासुराचे देवतांवरचे वाढते अत्याचार पाहून ब्रह्म-विष्णू आणि महेश देवीला आठ दिवसानंतर योग निद्रेतून उठवून देवदेवतांचे रक्षण करण्याची विनवणी करतात.
ग. दि. मा.
1 ऑक्टोबर,आजचाच दिवस, साल 1919. माणदेशातील एक दुर्गम, दुष्काळी व दारिद्र्याने पिचलेले एक खेडेगाव शेटफळ.
गावच्या कुलकर्ण्यांची सून घरीबाळंतपणासाठी आलेली.गावात कुठलीच वैद्यकीय सुविधा असण्याचा प्रश्नच नव्हता.संध्याकाळी गावच्या सुईणीने मोठ्या मुश्किलीने सुनेची सुटका केली.
मुलगा झाला म्हणून सर्वांना आनंदही झाला. पण बाळ काही रडेना. सर्वांच्याच चेहऱ्यावर काळजी. कितीतरी वेळ ते बाळ निपचित पडून होते. अनुभवी बायका अनेक प्रकार करून त्या बाळाला जागे करण्याचा प्रयत्न करीत होत्या पण ते बाळ कोणताच प्रतिसाद देत नव्हते. अशा स्थितीतच काही तास गेले.
कुणीतरी जवळच्या गावातील वैद्यांना बोलावून आणले. त्यांनी नाडी पाहिली. बाळाचा श्वासोश्वासही त्यांना जाणवेना. त्यांनी त्या दुर्दैवी बालकाला मृत घोषित केले. त्या घरावर दुःखाचा डोंगरच कोसळला. घरामागच्या परसात खड्डा काढला गेला. आई काही आपल्या बाळाला सोडायला तयार नव्हती.
#आजचा थ्रेड 28-09-20
आपले किती Account Closed झाले
कसे आहात..??"
एवढा एकच प्रश्न तिने विचारला..
आणि रोज दिसणाऱ्या पण परिचय नसणाऱ्या त्या बाईसमोर मी मनसोक्त रडलो..
ती म्हणाली.."भरपूर रडून घ्या..मला वेळ आहे.आजच रडायचं आणि नंतर डोळ्यांतून पाणी काढायचं नाही.."
त्या नंतर तिने जे काही सांगितलं..त्यानंतर कायापालट.
"तिनं काय सांगितलं..??" म्हणाली.."की आपण हा जो जन्म घेतलाय तो अपेक्षापूर्तींकरिता नाही.आपल्या दुसऱ्यांकडूनच अपेक्षा असतात असे नाही तर आपल्या स्वतःकडूनही अपेक्षा असतात.त्या पूर्ण होत नाहीत.उरतात त्या फक्त जाळणाऱ्या व्यथा..!"
"माझ्या मते हा जन्म अपेक्षापूर्तींकरिता नाहीच आहे हा आहे परतफेडीसाठी आहे.."
तुमच्या सौभाग्यवती गेल्या तुम्ही त्यांचा संसार पूर्ण केलात.तुम्ही त्यांचा संसार पूर्ण करण्याकरिता हा जन्म घेतला.ह्याचा अर्थ कोणत्यातरी एका जन्माची परतफेड झाली..तो अकाउंट संपला..!
#आजचा थ्रेड 26-09-20
सुख म्हणजे नक्की काय असत ?
एखादी लहानशी घटना आठवून चेहऱ्यावर एका क्षणात हसू येते त्यालाच सुख म्हणतात . “आमटी छान झाली आहे ग ” असे आपल्या ह्यांनी म्हणणे, “आमच्या सुनेची भाजणी छानच होते”, हे सासुबाईंचे वाक्य कानी पडते ,तेव्हा मनास जो आनंद होतो ते सुख असते.1/1
आपल्याला अगदी हवी तशीच साडी खरेदी होते ते सुख असते .
घराच्या भिंतीना साजेसे पडदे मिळणे हेही सुखच असते. मनासारखा स्वयंपाक होणे, आपल्या जवळच्या मित्र मैत्रिणींमध्ये मनसोक्त रमणे, गप्पा मारणे हेहि आनंदच देवून जाते. मुलांना भरभरून मार्क्स मिळालेले प्रगतीपुस्तक 1/2
आणि त्यावर सही करताना पालक म्हणून आपली ताठ झालेली कॉलर हे सुखाचे क्षण जपुन ठेवणे हे सुख कश्यातच मोजता येणार नाही.
लहानसहान गोष्टी अगदी कडधान्याला आलेले मोड , उशीर झालेला असतानाही मिळालेली रोजची लोकल ट्रेन आणि ध्यानीमनी नसतानाही मिळालेली खिडकीजवळची जागा. 1/3