नवरात्रीचा सांगावा..

'जो समाज मांजर आडवी गेली म्हणून कर्मकर्तव्य थांबवतो,त्या समाजाचे भविष्य बोके ठरवतात.'

आपल्या समाजास ज्याला त्याला देवत्व बहाल करण्याची सवय लागली त्यास आता बराच काळ लोटला. अलीकडे तर 'माणसात देव पाहण्यासाठी' रिघच लागलेली दिसते. असो #म #थ्रेड
माणसाला माणूस म्हणून पाहण्यासाठी जी आत्मशक्ती असावी लागते..तिचा तुटवडा हल्ली जास्तच जाणवू लागला आहे.. म्हणून आपण त्या आत्मशक्तीस पर्याय म्हणून ही देवत्वाची ढाल समोर केलीय..एकदा का व्यक्ती किंवा वस्तूला देवत्व दिलं की समाज म्हणून आपली जबाबदारी झटकण्यासाठी आपण मोकळे असतो.
माणसात देव पहा..या संकल्पनेचा बेधडक चुकीचा तेवढा अर्थ आपण घेतला. त्यामुळे देशाच्या लोकसंख्येएवढ्या देवांचाही बाजार इथं भरवला गेला.. ही वस्तुस्थिती आहे. एखादी परंपरा काय? त्यामागे उद्देश काय? आज त्याची उपयुक्तता काय? त्या रूढी परंपरेत बदल हवेत का? असे विचार हल्ली पडत नाहीत.
ते पडत नाहीत कारण आपण आपली वैचारिक जबाबदारी इतर कोणाच्यातरी चरणी वाहिली आहे..खरंतर ही आपली अडचण नाही. अडचण आहे ती म्हणजे आपण त्याविरोधात कधी उत्स्फूर्तपणे व्यक्त होत नाही..कारण,बहुमताची झुंडशाही वृत्ती आपल्याला ते करण्यापासून माईंड गेम द्वारे रोखते. हा रोख सुज्ञांनी मोडायला हवा.
ही सुरवात अगदी वैयक्तिक पातळीवरून का होईना.पण व्हायला हवी..कारण त्यावर बऱ्याच गोष्टी आणि समाजाची प्राथमिकता अवलंबून आहे.
स्त्रीस देव मानून आता आपल्याला बरेच युग लोटले.. आज या देवीवर अत्याचार घडणाऱ्या घटना आपण त्याचा शरमेने रिपोर्ट ही जाहीर करू शकत नाही इतक्या हाताबाहेर गेल्यात.
मग आपलं चुकतंय कुठं? एक समज अशी असते की ती पूर्वापार चालत आलेली असते..आपण ठरवून ही त्यात बदल करू शकत नाही..कारण ही व्यवस्था त्यास अनुकूल झालेली असते..मग कालपरत्वे ती समज अडचणीची जरी ठरत असली तरी बदल सहजासहजी पचनी न पडणे हे आपलं मुख्य दुखणं आहे..आणि समस्या ही त्याची दृश्य लक्षणं.
स्त्री अत्याचार असो की अन्य गुन्हेगारी..आपण सगळा भार पोलीस यंत्रणेवर टाकला..आणि निवांत झालो..
खरंतर या यंत्रणा आपणच बनल्या बनवल्या असल्याने एका व्यक्तीचे जे गुणदोष असतात ते या व्यवस्थेला आहेर म्हणूनच मिळाले. हे आपण लक्षात न घेता एका आदर्श परिस्थितीस स्टँडर्ड मानून त्याभोवती सगळा
ढाचा रचला..त्याने झालं काय तर सामाजिक वास्तव आणि त्या वास्तवाशी नाळ न जुळलेल्या नियंत्रक व्यवस्था कालांतराने उदयास आल्या. त्यामुळेच आपण आज प्रत्येक समस्येचे उपाय हे वरवरची मलमपट्टी टाईप करण्यात मग्न आहोत..ती आपली अपरिहार्यता ही आहे म्हणा..कारण लोकशाहीचे प्रायमर म्हणून आपलं अपयश.
लोकशाहीच्या मूलभूत तत्वातील एक म्हणजे निवडणुका.. आपण आपले लोकप्रतिनिधी पाठवतो..त्यांची कार्यक्षमता आणि कार्यपद्धती आपल्या अंगवळणी पडलेलीच आहे..त्यामुळे त्यातील गंभीरता आपण हरवून बसलोय.. आपल्या लोकसभेत 2009 साली गुन्हेगारी कलमं लागलेले लोकप्रतिनिधी होते 30%..2014 ला झाले 34%
आतातर त्यांची संख्या 43% एवढी वाढलीय..सद्ध स्थितीत महिलांच्या संदर्भात अपराध असणारे लोकप्रतिनिधी आहेत 19..पैकी तिघांवर तर बलात्काराचे गुन्हे आहेत..विशेष म्हणजे हे सगळे लोकप्रतिनिधी करोडपती आहेत. ही आकडेवारी पाहून आपण काय करतोय हे तरी समाजच्या लक्षात येत का? प्रश्नच आहे.
एक लोकशाही व्यवस्था म्हणून आपण आपल्या समस्या आणि त्यावर मागण्या या लोकप्रतिनिधीगृहाकडे करतो.. हे लोक त्यावर सहानुभूतीने विचार करतील का? शक्यच नाही.
त्यामुळेच आज गुन्हेगारी विचारसरणी बळ धरतीय.. त्या विचारसरणीस ज्यांनी जरब बसवायची तेच आज एन्काऊंटर नामक वरातीत नाचण्यात दंग आहेत.
एकूणच समाजास हे वरातीत नाचणे मनोरंजनात्मक वाटणे हे धोक्याचे आहे..कारण या नाचण्याची झिंग उतरल्यानंतर जो बौद्धिक दुष्काळ डोके वर काढील त्यास साक्षात या शारदेसही थांबवता येणार नाही.
आपण वेळीच सावध होऊन त्यावर विचारविनिमय करायला हवा.
माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक स्त्रीस देव मानण्याच्या अगोदर माणूस मानेन आणि तिस सन्मानाने जीवन जगण्यास भाग पाडेन. ही शपथ घ्यायची आणि पाळायची ही वेळ आहे.अन्यथा दरवर्षी उत्सव येतोच.नऊ आहे म्हणून नव म्हणण्याने आपल्यात नवं काही घडेल ही अपेक्षा आत्मघातकी ठरेल हा आहे सांगावा.❤

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with डेडपूल...

डेडपूल... Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @MarathiDeadpool

16 Oct
खूप छान डॉक्टर मॅडम..नाती हे जर झाड असेल तर भावना या त्यासाठीच्या कल्चर आहेत. आपल्याला काहीतरी गोष्ट छळतीय ही गोष्ट लक्षात येऊन नात्यातील व्यक्तीसोबत ती वाटून घेणं महत्वाचं..व.पु चे विचार क्षणिकतेसाठी वाचायचे नसतात..त्याचा वापर आशा काही कामासाठी होईल का पहायला हवं.
व्यक्ती कोणीही असो.ती मायेच्या स्पर्शाची भुकेली असते..तो कनेक्ट वेळेत नाही मिळाला की परिस्थिती गंभीर बनत जाते..EQ वाढवायचे उपाय कसे आमलात आणायचे ज्याची त्याची पद्धत वेगळी असू शकते..फळ मात्र समृद्ध जीवन हेच मिळायला हव..हे प्रत्येकाने लक्षात ठेवा..
कारण,भावभावनांच्या खेळात हार जित नसते..तिथं एकतर असणं किंवा डायरेक्ट नसणं हेच असतं. या स्टेजला पोहचण्याअगोदर एकदा आपल्या मनात आपल्या जीवनाची कल्पना स्पष्ट असावी..म्हणजे भावनांना आवर घालायला सोपे जाते. अन्यथा वाहवत जाऊन शेवटी बुडून अंत होतो. ते टाळायला हवं आपण..
Read 4 tweets
15 Oct
सध्या मी सांगली-सोलापूर बॉर्डरवर नागज या परिसरात आहे.. रात्री मुक्काम येथील डोंगराच्या कुशीत एका शेतकऱ्याच्या घरी होता. काल सगळीकडे दिवसभर पावसाने झोडपून काढलेच होते..इथंही आहेच पाऊस पण तुलनेने थोडासा कमी वाटला. #म #थ्रेड
मी रात्री 11 च्या सुमारास पाहिलं..तेंव्हा वाऱ्याची दशा आणि दिशा..ढगांची घनता..यावरून काहीतरी आक्रीत पाऊस बरसेल याचा अंदाज बांधूनच झोपी गेलो. रात्री 12 ते पहाटे साडेचार वाजेपर्यंत एकसारखा मुसळधार पाऊस ढासळला. परिसरातील तालीची रानं धुवून गेली.. ओढ्यावरील रस्ता धुवून गेला..तो बंद.
ज्या ठिकाणी पाणी यायला..एकसलग खूप मोठा पाऊस पडावा लागतो..त्याठिकाणी ही पाणी पोहचलं.

या शेतकऱ्याच्या द्राक्ष बागेत गेल्यावर्षी इतका पाऊस पडूनही इतकं पाणी लागलं न्हवतं..त्याठिकाणी ही पाण्याचा लोंढा वाहत होता.. आशा परिस्थितीत आजची सकाळ उजडली.. लाईटने अगोदरच जीव सोडला होता..
Read 10 tweets
5 Oct
आपण काय वाचतो? कसं वाचतो? हे महत्त्वाचं आहेच.पण त्याहून महत्वाचं आहे वाचलेलं किती आत्मसात करतो. बरोबर ना?
या सगळ्यांपेक्षा मला वाटतं महत्वाचं आहे आपलं वैचारिक अधिष्ठान निर्माण होण्यात आपण वाचलेला ऐवज किती उपयोगी पडतो ते.
सध्या वाचकांची कमी नाहीय.कमी आहे ती वेगळीच. ती काय? #म 1/n
आपल्या समाजास एकांगी विचार करण्याची सवय लागली त्यास आता बराच काळ लोटला.ती सवय आपल्याला लागलीय हे ही आपल्या लक्षात न येणे ही आपली दुखरी नस.वेगवेगळ्या सामाजिक समस्येसाठी उपाय शोधत असताना या दुखऱ्या नसेवर दाब पडतो ही वस्तुस्थिती आहे..मग कळ लागलेला समाज मूळ समस्येशी फारकत घेतो. 2/n
ही एकांगी विचार करण्याची अंगभूत सवय आता सवय न राहता तीच जगणं झालीय.हे निरीक्षण आहे..मग वाचनाने आपणास फक्त एका प्रचलित विचारांची क्षमता दिलीय का? आपण स्वतःची विचार क्षमता विकसित करण्यात कुठं कमी पडलो? त्यासाठी एखादा ऐवज वाचत असताना मी काय इंटेशन ठेऊन वाचतोय? हे महत्त्वाचं आहे.3/n
Read 12 tweets
3 Oct
परवा गिरीश कुबेर म्हणले तसं.. या देशात अत्याचारांची दखल घेण्यासाठी काही अटींची पूर्तता व्हावी लागते. त्या अटी पूर्ण केल्यासच सदर घटनेची दखल घेऊन व्यवस्था सामाजिक आणि व्यवस्थात्मक दोन्ही आघाड्यावर तुमच्यावर परत अत्याचार करण्यास तयार होते. हे कटू असलं तरी सत्य आहे. #म 1/n
अत्याचारीत व्यक्ती स्त्री की पुरुष,लैंगिक आणि स्त्री अत्याचार असल्यास किती जण,वय,जात ,तीव्रता हे सगळं सनसनाटी निर्माण करण्याइतपत भयाण हवं. महत्वाचे म्हणजे गुन्ह्याचे स्थळ शहरी/ग्रामीण यावरून आपण ठरवतो की गुन्ह्याची दखल (न्याय न्हवे) घ्यायची की नाही ते.युगानुयुगे हेच सुरुय.2/n
निर्भया आणि हाथरस या दोन्हीत समान धागे आहेत.दोन्ही ठिकाणी पीडित मेल्यानंतर समाज जागा झाला.तावातावाने दंगा करू लागला. निर्भयातून आपला समाज काहीच शिकला नाही..हे हाथरस ने सिद्ध केलं असं म्हणण्यास वाव आहे. कारण,मूळ विषय बाजूला पडून आता आपण राजकीय चर्चा आणि हेवेदावे यात रंगलोय.3/n
Read 9 tweets
3 Oct
"फाशी सारख्या उपायांनी बलात्कार थांबणार नाहीत.उलट गुन्हेगारांचा पीडितेला संपवण्याकडे कल राहील." आठवतं का काही? निर्भया केस वर नेहमीप्रमाणे आपण एक समिती नेमली होती.त्या न्या.J.S.वर्मा समितीचे हे बोल आहेत.निर्भया वेळीही आपला संताप अस्मान फाडत होता.आज हाथरसवेळी तर विचारूच नका.#म 1/n
अधिक कठोर आणि जास्त मुदतीच्या शिक्षेची तरतूद हवी अस वर्मा यांचं मत.पण त्याविषयी सुद्धा ते साशंक होते.कारण,इतिहासात त्याने फार काही फरक पडलेला दिसला नाही. दिल्ली घटनेनंतर जनक्षोभ इतका तीव्र होता की लोकांनी आठेक हजार सूचनावजा उपाय सुचवले होते..पण त्यातही आत्ता सारख तर्क आणि 2/n
वस्तुनिष्ठ विचार न्हवता. सध्या असणारे कायदे हे सर्वोत्तम आहेत.पण त्याची अंमलबजावणी विश्वासार्ह आणि कार्यक्षम यंत्रणेकडून व्हायला हवी. हे एक मत वर्मा यांनी मांडले.ते किती योग्य मत होतं ते सध्या पोलीस,न्याय, कायदे यंत्रणा याद्वारे जो खेळ हाथरसमध्ये सुरुय त्यातून कळेल. 3/n
Read 10 tweets
1 Oct
'काँग्रेसला 60 वर्षे दिलीत,मला 60 महिने द्या.' मनमोहन सिंग सरकारचे धोरण 'मर जवान मर किसान आहे' मला सत्ता द्या 'जय जवान,जय किसान' करतो मी.नरेंद्र मोदी नामक व्यक्ती 2014 च्या अगोदर बोलत होते. आज 72 महिने झाले या मोदी नामक सरकारला. परिस्थिती काय आहे पाहतोय आपण. #म 1/n
गुजरात मॉडेल चा डंका बडवला गेला.शेतकऱ्यांना 24 तास वीज आहे तिथं असा.वस्तुतः 8 तास ही वीज तिथं मिळत न्हवती. या असल्या खोट्या हॅमरिंगमध्ये तर्क विसरतो माणूस. जनतेचे तेच झाले. शेतकऱ्यांना उत्पादन खर्च अधिक 50 टक्के नफा इतका दर देतो म्हणाले होते ही लोकं.खरतर 2014-15 च्या हमीभावात 2/n
कुठेही ही बाब दिसली नाही.वरून न्यायालयात असं काही करता येत नाही याचं शपथपत्र दिलं. काही राज्ये या कमी हमीभावावर बोनस देऊन शेतमाल खरेदी करत होती.त्यातून शेतकऱ्यांना चार पै मिळत होते.तर मोदींनी ही बोनस सिस्टीम बंद करा असे पत्र लिहले.भाजपशासित राज्यांनी ते पत्र आमलात ही आणले. 3/n
Read 11 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!