हे आहेत शेअर बाजारातील दहा अवगुण! जोपर्यंत यावर मात करता येणार नाही तोपर्यंत तुमची गुंतवणूक आणि ट्रेडिंग निरर्थक असेल...
👇👇👇
1. टिप्स- आपली गरज आणि रिस्क न ओळखता इतरांच्या सल्ल्यावरून (टिप्स) शेअर्स खरेदी करणे.
2. अंधाधून ट्रेडिंग- हातात मोबाईल आहे, त्यात इंटरनेट आणि ट्रेडिंग app आहे म्हणून मनात येईल तसं अविचारी ट्रेड घेणे.
3. स्वस्त विचार- Qyality शेअर्स घेण्याऐवजी छोटे अर्थात Penny Stocks घेणे.
👇
4. अफवा- आपल्याला त्यातील कळत नसतांनाही दुसऱ्याचं ऐकून विनाकारण पैसे अडकवून ठेवणे.
5. बेशिस्त- गुंतवणूक करताना कसलेही उद्देश नसणे आणि नियोजन न करता गुंतवणूक करणे.
👇
6. भावनिक दृष्टिकोन- मी शेअर घेतला की पडतो आणि विकला की वाढतो किंवा "कधीतरी वाढेल" अशा भावनेवर विसंबून राहणे. आशा आणि भीती या भावनेतून मुक्तता हवी.
👇
7. अहंकार- एखाद्या शेअरमध्ये लॉस झाला तर त्याच्यातुनच प्रॉफिट काढायला बघणे. पैसा ओतून average करणे, stoploss न लावणे हे केंव्हाही घातक.
8. नैराश्य- अतिविचार करणे आणि लॉस झाल्यावर नैराश्यात जाणे टाळावे. जोखीम सर्वच क्षेत्रात असते, इथेही आहे. Buy Right Sit Tight!
👇👇👇
9. कर्ज- अतिहव्यास करत उधारी अथवा कर्ज काढून ट्रेडिंग किंवा गुंतवणूक करणे चूकच. NO Leverage Positions!
10. व्यसन- शेअर बाजार गुंतवणुकीचा मार्ग आहे त्याला व्यसन न होऊ देणे गरजेचे आहे. ट्रेडिंग व गुंतवणूक ही गरजेनुसार आणि माहिती घेऊनच करावी. Avoid Overtrading
#कोरोना_वायरस मुळे भारतात “Work From Home” हा मार्ग अवलंबला जात आहे. या निमित्तानेच आपण शेअर बाजारातील मूलभूत संकल्पना घरबसल्या समजून घेण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी काही लेख मी या थ्रेडमधून पोस्ट करत आहे. फार विचार न करता पेपरमधील लेख निवांतपणे वाचतो तसे हे लेख वाचा. #Thread
येस बँक का बुडाली?
वाचा #thread
बँका का बुडतात हा एक महत्वाचा प्रश्न आहे। त्याआधी बँका काम कशा करतात हा मुद्दा जाणून घेऊयात!
कुठल्याही व्यवसायात काहीतरी भांडवल, रॉ प्रॉडक्ट म्हणजे वस्तू किंवा सर्विस असते। बँकेकडे "पैसा" हेच भांडवल आणि पैसा हेच रॉ मटेरियल आहे। #मराठी_गुंतवणूकदार
बँकेकडे ग्राहक (सामान्य ग्राहक व संस्था) पैसे ठेवतात अन त्या ठेवींवर त्यांना व्याज मिळतं। साधारणपणे FD (Fixed Deposits) वर ते 7% वगैरे असतं आणि बचत खात्यावर 4% वगैरे असतं। यात काही अंशी कमी जास्तही असेल।
दुसरा भाग असतो कर्जाचा। बँकेकडून कर्ज घेणारे असतात। त्यात सामन्य ग्राहक, शेतकरी, उद्योजक ते अगदी मोबाईल घेण्यासाठीही कर्ज दिलं जातं। त्याच्यावर व्याज आकारला जातो। तो वेगवेगळा असतो। पण सरासरी तो 10% च्या अधिक असतो।