आज हुतात्मा दिवस. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्यासाठी प्राणाची पर्वा न करता लढणाऱ्या १०७ हुतात्मे व प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सहभागी असंख्य कार्यकर्त्यांना वंदन.
शिक्षण क्षेत्राचे निर्णय तारतम्य बाळगून घ्या.गेल्या अनेक वर्षांत महाराष्ट्राला क्षेत्राविषयी चाड,आणि जाण असणारा शिक्षण मंत्री मिळाला नाही.ऑनलाईन ऑनलाइन हा धोशा म्हणजे गंमत आहे का?
एका घरात चार मुले असणाऱ्या पालकांनी चार अँड्रॉइड फोन लॅपटॉप घ्यावे का?हे किती कुटुंबाला शक्य आहे?समाजातील गरीब वर्गापासून विचार करायला शिका. सगळ्यांची मुले काही इंटरनॅशनल शाळेत, पटसंख्या 20 ते 30 असणाऱ्या शाळेत शिकत नाहीत.
इथे प्रत्येक वर्गात 70 पटसंख्या असणाऱ्या शाळा 90 टक्क्यांपेक्ष्या जास्त आहेत.किती घरात स्मार्ट फोन लॅपटॉप आहेत?किती घरात वायफाय आहे?ऑनलाइन शाळा रोज किमान 5 तास चालणार. तोवर नेट सुरू. अनेक महिने पगार न मिळाले त्या शिक्षकाचा नेट पॅक एका दिवसात संपेल.
देवगोंडा ज्योतीगोंडा पाटील नावाचा त्यांचा आज्जा. मोठ्ठा घरंदाज आसामी. त्या काळात तो डोक्याला मोठ्ठा रुमाली फटका बांधीत असे म्हणून लोक त्याला "रुमाल गोंडा पाटील" म्हणत.
एकदा न्यायनिवाड्याकरीता नांदणी मठाचे मठाधिपती असणाऱ्या या देवगोंडा पाटलांना बोलवण्यात आले. न्यायनिवाडा झाला.
समेटाची कागदपत्रे तयार झाली. त्या वेळी वडिलधाऱ्या माणसाने देवगोंडा पाटलास सही कराय सांगितले. देवगोंडा मोठा माणूस पण निरक्षर. पाटलाला नामुष्की वाटली. तो घरी आला.
मोठा मुलगा पायगोंडा शेतात काम करत होता. त्याला शेती बंद कराय सांगितलं व आष्ट्याच्या शाळेत शिकायला पाठवलं.
शिकायची ठिणगी पेटली ती इथं.
पायगोंडा जैन चतुर्थ समाजातून सातवी पास होणारा #सातारा जिल्ह्यातला पहिला माणूस ठरला.
तो महसुली खात्यात नोकरीला लागला. नोकरीनिमित्त पायगोंडा कराडात राहू लागला. आपल्या पोरांबरोबर भाड्याच्या ब्राह्मणाच्या घरात तो मांगाच्या पोरांना शिकवत असे.
कोरोना विषाणू आणि कोविड १९ आजाराबद्दल सविस्तर माहिती
कोरोना व्हायरस म्हणजे काय?
कोरोना व्हायरस हा विषाणूंचा एक प्रकार आहे. यामध्ये अनेक विषाणूंचा समावेश होतो. या विषाणूंचा संसर्ग प्राणी आणि माणसांना होतो. विविध प्रकारच्या कोरोना विषाणूंमुळे श्वसनसंस्थेशी संबंधित आजार होतात.
अगदी नेहमीच्या सर्दी- खोकल्यापासून ते २०१२ मध्ये समोर आलेला मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम (मेर्स), सिव्हीर ऍक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम (सार्स) हे कोरोना व्हायरसमुळे उद्भवणारे आजार आहेत.
कोविड १९ म्हणजे काय?
चीनमध्ये शोध लागलेल्या आणि सध्या जगभर पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या आजाराचे नामकरण कोविड १९ असे करण्यात आले आहे. डिसेंबर २०१९ मध्ये साथ सुरू होण्याआधी नवा कोरोना विषाणू आणि त्यासंबंधीच्या साथीची कोणतीही नोंद नव्हती.
नमस्कार..
मी प्राजक्ता आबासाहेब गोडसे.
माझा जन्म 16 जानेवारी चा असून माझं मूळ गाव जेऊर तर सध्या पुणे येथे वास्तव्य.
माझं शिक्षण पुढीलप्रमाणे..
Ph.D Appeared
D.Ed. B.Ed. M.Ed.
Double Graduate
Double Post Graduate
D.S.M.
Both TET and TAIT qualified
CBSE UGC NET qualified
विशेष आवड व विशेष कार्य:-
अन्यायाविरुद्ध संघर्ष करून न्याय मिळविण्यासाठी लढण्याची आवड.
म्हणूनच रखडलेली शिक्षकभरती चालू होण्यासाठी व पूर्ण व्हावी म्हणून 2 वर्षे तीव्र संघर्ष केला.
(अनेकवेळा मुख्यमंत्री..शिक्षणमंत्री.. अनेक आमदार खासदार यांच्या भेटी घेतल्या.
मी पौर्णिमा राजेंद्र पवार. माझा जन्म १७/११/१९९८ चा, डोंबिवलीचा. सध्या मी डोंबिवलीमध्येच राहते.
सध्या मी मेकअप आर्टिस्ट म्हणुन काम करते , लहानपणीपासुन स्वतः च्या नावापुढे कलाकार ( आर्टिस्ट) म्हणून टॅग लावण्याची इच्छा होती . याच इच्छेच्या मार्गाने जात २०१९ मध्ये मी इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट झाले.
गोष्टी शिकत राहणं मला आवडतं. प्रोफेशनल लाईफ मधून वेळ मिळाला तर मॉडेलिंग , अभिनय मधली आवड जपायला आवडतं,मी त्यासाठी वेळ देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते.