आज सकाळी घर वगैरे आवरून जरा टीव्हीसमोर बातम्या पहात बसलो होतो. आई आली. बातमी सुरु होती की कांजूरमार्गवरून राज्यशासनाला त्यांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी एक आठवडा दिलाय. कांजूरमार्ग मध्ये मेट्रो कार शेड हलवण्याचा परस्पर निर्णय कसा घेतला+
ह्यावर मुंबई हायकोर्टात याचिका दाखल झालीये..
मेट्रो प्रकरणात होत असलेला अनाठायी विलंब आणि त्यामुळे होत असलेले हजारो कोटींचे नुकसान ह्याची कल्पना आईला आहे.
तळपायाची आग मस्तकात गेली होती आईच्या. तसं आई राजकारणावर फारसं बोलत नाही. त्यात बाबांच्या आजारपणात किती गोष्टींनी त्रास +
करून घ्यायचा? म्हणून ताणाचे विषयसुद्धा नसतात गप्पा मारताना..
पण आज आई भडकली होती..
"ह्यांचं काय जातंय एवढे मोठे प्रकल्प भिजत ठेवायला? ह्यांच्या मालमत्ता सुरक्षित आहेत. हे उद्योजक होतात. सामान्य माणूस काय करतो? ह्या असल्या मूर्खासारख्या निर्णयामुळे एवढं नुकसान होतं, ते आम्ही +
भरून काढतो. शांत बसतो. गरीबातला गरीब माणूससुद्धा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या शासनाला कर देत असतो.. ह्यांची शासनाला जर जाणीव नसेल तर ह्यांच्या मूर्खासारख्या निर्णयाविरोधात कोणी जनहीत याचिका का दाखल करू शकत नाही? चांगला प्रकल्प केला आणि फेल गेला तर आम्ही समजू शकतो. पण मूळ +
प्रकल्पातच जाणूनबुजून एवढी दिरंगाई? तीही सुडापायी?
तब्बल दोन वर्षे घरी नळाला पाणी नव्हतं. (घराजवळ आड आहे तिथूनच पाणी वापरत होतो) तेंव्हा बार्शी नगरपालिकेच्या सीईओला जाऊन मी प्रश्न विचारला होता. कि तब्बल दोन वर्षे पाणी नाही तर आम्ही पाणीपट्टी का भरायची? सीईओंनी निर्लज्जपणे +
नियमावर बोट ठेवलं. आम्ही जर कर भरला नाही तर दंड वसूल करणारं शासन, आमच्या कररूपी पैश्याचा किती मान ठेवतं?
ह्या आमच्या पैश्याची ही अवाजवी नासधूस केली म्हणून शासनाला काही दंड नको, जो संबंधित नेत्यांच्या खाजगी मालमत्तेमधून वसूल व्हावा? असला एकसुद्धा कायदा नाही? नसेल तर मग +
न्यायालय काय करतंय? तुमच्यासारखे लोक का नाही कोर्टाचे दरवाजे ठोठावत? बार्शीतले खड्डे कोणाच्या अपघाती निधनाची वाट पाहात आहे? ह्या वर्षी भरपूर पाऊस आहे पण अजून नळाला तीन-चार दिवसातून पाणी येतंय. अडचण नाही, पण मग पूर्ण वर्षाची पाणीपट्टी वसूल का केली जाते? त्यात का सूट नाही? +
नेत्यांना आपली चाड नाही. आपल्यात तेवढा दम नाही. ह्यामुळे बातम्या, पेपर पाहू वा वाचूच वाटत नाही..
जाऊ दे.. गच्चीतला रोपांना पाणी घालून येते.. निदान ते तरी जेवढं पाणी, खत मी घालते तेवढं आउटपुट ते देतात.."
असं म्हणून आई गच्चीत गेली..+
सर्वसामान्य लोकांची ह्यापेक्षा वेगळी काय भावना असते? ह्याची खरोखर थोडीतरी जाणीव लादलेल्या सत्ताधारी पक्षांपैकी एकालातरी आहे?
- चेतन दीक्षित
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
भाजप ज्या पद्धतीने ग्रेटर हैद्राबादच्या महापालिकेच्या निवडणुकीत जोर लावतीये ते पाहता भाजपा हे निवडणूक जिंकेलच असं काही भाकीत मी करणार नाही.अर्थात जिंकलं तर भाजपासमर्थकांना आनंद वाटेलच ह्यात शंका नाही. जेथे जेडी-बीजेपी केवळ पाचच जागांवर निवडून आली+
तिथे पाच वर्षात भाजपाचा झेंडा सत्तास्थानी रोवेल हे शक्यता कमीच वाटते.
दक्षिणेत कर्नाटक सोडलं तर भाजपा भक्कम फारशी नाही. कोणत्याही गुंतवणुकीचे शॉर्ट टर्म नाही तर लॉंग टर्म फायदा पाहणारा पक्ष म्हणजे भाजपा. पुर्वांचलात यश मिळण्यामागे दशकांची मेहनत आहे. पश्चिम बंगालातील गेल्या +
निवडणुकीत, ज्या पद्धतीने भाजपचे एकंदरीत मतदानातील टक्केवारीत झेप घेतली, ती ममताच्या उरात धडकी भरवणारी होती. येत्या निवडणुकीत कितीजरी "किशोर" त्यांच्या बाजूला उभे राहिले तरी त्यांचे स्थान धोक्यातच आहे ह्याची ग्वाही कोणताही राजनीतीतज्ञ देऊ शकेल.
फडणवीस चुका मान्य करा..
होय फडणवीस आपण नुसतेच अपयशी मुख्यमंत्री नाही तर अपयशी राजकारणीसुद्धा आहात..
कारण..
● आपण नगरसेवकापासून अगदी मुख्यमंत्रीपदापर्यंत झेप घेतलीत पण कधी कोणाची जात काढली नाहीत कि कोणावर वैयक्तिक टीका केली नाहीत. असं कोणी करतं का?
● नैसर्गिक आपत्तीवेळी आपण +
घरात बसून केंद्राकडून पैसे हवेत असा घोष लावला नाहीत जरी आपल्याच पक्षाचे सरकार केंद्रात असले तरी. उलट कायद्यात बदल करून नुकसानभरपाईची रक्कम वाढवून संबंधितांच्या खात्यात वर्ग केलीत. असं कोण करतं? जनतेला आशेवर झुलत राहायची सवय आहे. तसंच झुलवत ठेवायचं असतं देवेंद्रजी. +
हेच आपल्या राज्याने आत्तापर्यँत पाहिलंय आणि द्यायचं म्हटलंच तर रुपायातले १०-२०पैसे फेकायचे काही जणांच्या तोंडावर उपकार म्हणून.. तेही आपल्याला जमलं नाही.
● मुख्यमंत्री झाल्यावर बायकोला चार भिंतीच्या आडच ठेवायचं असतं. तिचं स्वतंत्र अस्तित्व नाकारायचं असतं, हा ह्या पुरोगामी +
(साहेब झोपेतून उठल्यासारखे वाटत होते.. आज कदाचित दहा ऐवजी नौच्याच आधी झोपतील)
● कितीवेळा संवाद साधला, मला माहित नाही पण तुम्ही खूप सहकार्य केले. (कधी? काय? कोणी? कुठे?)
● महाराष्ट्राने जर काही ठरवलं तर तो काहीही करू शकतो..
● लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण.. +
( आजचा घरकोंबडा, कालचा बाण)
● तुम्ही माझं जे ऐकता त्याला तोड नाही.. (मटकीला मोड नाही)
● अजितदादा म्हणतात तसा कोरोना गर्दीत चेंगरून मरणार नाहीये.. (दादा नाराज होत नसतात)
● योग्य वेळी मी सगळं उघडत आहे..
(सतरा वेळा..किंबहुना)
एवढ्या संपलं? संपलं एवढ्यात? तढ्यावए लंपसं?+
वएढ्यात पलंसं? श्या.. हा धक्का भयंकर आहे.. आहे भयंकर हा धक्का.. धक्का आहे हा भयंकर.. कुठं गेले अभ्यंकर?
काहीसुद्धा मनोरंजन झालं नाही.. फार अपेक्षेने ह्या चिंतेच्या वातावरणात मनावर मनोरंजनाचे फवारे उडतील, म्हणून आज डोळ्यांची पापणी नं लवता फेसबुक लाइव पाहिलं. स्वाती नक्षत्रातले +
वर्ष २००७
शिवसेना - ८३
भाजपा - २८
राष्ट्रवादी - १४
काँग्रेस - ७३
वर्ष २०१२
शिवसेना - ७५
भाजपा - ३१
राष्ट्रवादी - १३
काँग्रेस - ५२
वर्ष २०१७
शिवसेना - ८४
भाजपा - ८२
राष्ट्रवादी - ९
काँग्रेस - ३१
हे आकडेच बोलके आहेत. मुंबईत भाजपा किती आणि कशी वाढत आहे, +
हे कळण्यासाठी ह्यापेक्षा वेगळं काही नकोय.
शिवसेना ७५ - ८४, मध्येच राहिली आहे. भाजपा २८ पासून ८२ पर्यंत गेली आहे. ह्यामध्ये काँग्रेसची चांगलीच पिछेहाट झालीये. आणि नंतर त्यांनी मुसंडी मारली असलं काही झालं नाहीये. त्यांचा आलेख अधोगतीचाच दिसतोय. राष्ट्रवादी मुंबईत फारशी नाही. +
म्हणजे काँग्रेसचा जो परंपरागत मतदार आहे, ज्याला शिवसेना नको होती तो भाजपाला मतदान करतोय. आता शिवसेनेच्या ह्या दगाबाजीमुळे दुखावलेला त्यांचा मतदार नक्कीच भाजपाकडेच खेचला जाईल कारण तो काँग्रेस वा राष्ट्रवादीला मतदान करेल असं वाटत नाही. संपादक कितीही बोंबलले तरीही सेना म्हणजे +
ही थ्रेड आवर्जून वाचा आणि मविआ समर्थकांच्या थोबाडावर फेकून मारा. भलेही तुमच्या नावावर ही थ्रेड खपवा. काहीही अडचण नाही. फक्त जनतेला काही गोष्टी विसरून चालणार नाहीये.. जनतेने ह्या गोष्टी विसरणे जनतेच्या भल्याचे नाही.
माजलेल्या सरकारचे हे एक जुने पाप आहे, जे नवीन स्वरूपात +
आपल्यातल्या बर्याचजणांना भेडसावत आहे..
"जेंव्हा ३५ लाख शेतकऱ्यांना वाढीव बिलं देण्यात आली होती.."
किती? तब्बल ३५ लाख शेतकऱ्यांना...
कोरोनाकाळात सर्वसामान्य जनतेच्या माथी वाढीव बिलं मारून ह्या शासनानं जो काही जिझियाच वसूल करण्याचा सपाटा लावलाय, त्या अनुषंगाने राष्ट्रवादीच्याच +
काळात झालेल्या एक भयंकर घोटाळ्याची आठवण झाली..
निमित्त होतं पवारसाहेबांच्या वाढदिवसाचं..
त्यासाठी महाराष्ट्र भारनियमनमुक्त करायचा होता..
त्यासाठीचा अनुशेष भरून काढणे गरजेचे होते. तोटा कमी झालाय हे दाखवायचं होतं. यासाठी तब्बल ३३ लाख शेतकऱ्यांना वाढीव बिलं पाठवण्यात आली +
माजी मंत्री आणि शिवसेनेचे गुहागर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी पोटापाण्यासाठी दारू विकली तर काय झालं? पोलीस देखील हफ्ता घेत नाहीत का? असे बाणेदार प्रश्न विचारले आहेत..
मी त्यांच्याशी १००% सहमत आहे..
त्यांच्याच तर्कानुसार.. +
● वेळ जात नाही म्हणून मटका खेळणे चुकीचे नाही..
● उठसुठ सामन्यात हागणेही चुकीचे नाही..
● राज्य होरपळत असताना मुख्यमंत्र्यांनी घरकोंबडा होणे हेही चुकीचे नाही..
● हिंदुत्व गांधी-पवारांच्या वेशीवर टांगणेही चुकीचे नाही..
● दगाबाजी तर अजिबात चुकीची नाही..+
● सगळे विकासाचे प्रकल्प थांबवून त्याचा बोजा सर्वसामान्य प्रामाणिक करदात्यांवर टाकणेसुद्धा चुकीचे नाही..
● पैसे नाहीत म्हणून कर्मचाऱ्यांचे पगार थकवताना सूडाच्या राजकारणापोटी बक्कळ पैसे सिब्बलांना देणे तर चुकीचे असूच शकत नाही..
● वीजबिलं भरमसाठ आणि अवाजवी वाढवून ती जनतेवर +