पंचगंगा मंदिर...........
महाबळेश्वर
महाबळेश्वरमधील पवित्र स्थानांपैकी एक पंचगंगा मंदिर आहे. कोयना, कृष्णा, वेण्णा, सावित्री आणि गायत्री या पाच वेगवेगळ्या नद्यांमधून पाणी या ठिकाणी सामील होते.
पाच नद्यांच्या संगमाने पंचगंगा नाव दिले आहे जेथे पंच म्हणजे पाच आणि गंगा म्हणजे नदी. सर्व नद्या दगडांच्या बाहेर कोरलेल्या गायीच्या तोंडातून बाहेर येतात. अशाच जागेला पंचगंगा मंदिर असे म्हणतात.
हे प्रसिद्ध मंदिर राजा सिंघेदेव यांनी बांधले होते. ते 13 व्या शतकात देवगिरीचे यादव यांचे राजा होते. 16 व्या शतकात मराठा सम्राट शिवाजी यांनी मंदिर सुधारले.
महाबळेश्वर मधील या प्राचीन मंदिरातून कृष्णा नदीचा उगम झाला आहे.
महाबळेश्वर म्हणजे भूतलावरील स्वर्गच जणू.
महाराष्ट्राचे नंदनवन व निसर्गाने परिपूर्ण भरलेलं आणि सह्याद्रीच्या उतुंग गिरिशिखरावर वसलेलं एक जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून महाबळेश्वर ला ओळखले जाते. याबरोबरच महाबळेश्वरची एक पवित्र तीर्थक्षेत्र व धार्मिक स्थळ म्हणून देखील पूर्वी पासून ओळख आहे.
महाबळेश्वर पासून 6 किमी अंतरावर अद्वितीय निसर्गसौंदर्याचे देणे लाभलेला परिसर म्हणजे श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे ऐतिहासिक वारसा लाभलेले पंचगंगा मंदिर आहे. या मंदिरात श्रावणी सोमवारी दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागलेल्या असतात.
श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे असलेल्या पंचगंगा मंदिरालाही ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. सुमारे 600 वर्षापूर्वीचे असलेले हे मंदिर पाच नद्यांचे उगमस्थान असून या मंदिरातून कृष्णा, कोयना, सावित्री, गायत्री व वेण्णा या नद्यांचा उगम झाला आहे.
पुरातन कथेनुसार ब्रह्मा, विष्णू, महेश, सावित्री व गायत्री या देवतांचा येथून जलरुपात उगम झाला असल्याचेे म्हटले जाते. श्रावण महिन्यात व महाशिवरात्रीस लाखो भाविक क्षेत्र महाबळेश्वरला भेट देतात.
सर्वांच्या मनोकामना, इच्छा पूर्ण होतात म्हणून आद्य शंकराचार्यांनी पाचही नद्या
व श्री महाबळेश्वर यांच्याकडे खालील प्रार्थना केली.कृष्णा ईच्छित फल प्राप्त करो, वेण्णा आमच्या शत्रूंचा नाश करो व कोयना सुखकारक शंभर पुत्र देवो, सावित्री संपत्ती प्राप्त करून देवो व गायत्री ज्ञान प्राप्त करून देवो. त्याच प्रमाणे श्री महाबळेश्वर देव आमचे नेहमी रक्षण करो.
पंचगंगेचे मंदिर १७व्या शतकात बांधण्यात आले या ठिकाणी पाच नद्यांच्या मूळधारा उगम पावतात.कृष्णेच्या मूर्तीजवळ दर बारा वर्षांनी कन्यागत पर्वात उत्तरेकडून भागीरथी कृष्णेस भेटावयास येते ;तर दर साठ वर्षांनी कपिलाष्टीच्या योगावर सरस्वती नदी गायत्रीस भेटावयास येते
हे पाच नद्यांचे प्रवाह कलाकृतीतून उगम स्थानांना एकत्र करुन ते पाणी गोमुखातून कुंडात सोडलेले आहे त्यास ब्रहकुंड म्हणतात. शेजारी विष्णूकुंडही आहे . याविष्णूकुंडात सात बहिणी गुप्त होऊन पूर्वेच्या श्रीमहाबलेश्वर मंदिरात एकत्र आलेल्या आहेत या ठिकाणी तशी प्रतिकृती आहे.
शिवलिंग स्वयंभूखडकातून असून रुद्राक्षकृती खाचखळग्यातून सतत पाणी वाहत असते. शिवलिंग असला तरी या ठिकाणी पिंड नाही. नैसर्गिक कलाकृती निर्माण झालेली आहे या ठिकाणी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. अनेक भागातील भक्तांचा लोंढा डांबरी रस्त्यातून बाहेर वाहत असतो.
जादा गाड्याही तेवढ्याच आलेल्या असतात तेंव्हा हा रस्ता एकेरी वाहतुकीसाठी केला जातो .
पंचगंगेच्या मंदिराबाहेर अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेले रुद्रेश्वर व रुद्र्तीर्थ मंदिर भग्नावस्थेत आहेत .पंचगंगा व महाबळेश्वर मंदिरादरम्यान अतिबलेश्वर मंदिर आहे त्यासमोर हंसतीर्थ होते असे सांगतात
पंचगंगेच्या मागील बाजूस टेकडीवर १९५६ मध्ये रामदास स्वामींनी बांधलेले शेणाच्या मारुतीचे मंदिर आहे बरोबर अनंत भट्ट व दिवाकर भट्ट होते दासबोधाची हस्तलिखित प्रत त्या दोघांना देऊन त्यांना येथे वास्तव्य करण्यास सांगितले.
एवढेच क्षेत्र महाबळेश्वर हे पौराणीक व एतिहासिक काळात धार्मिक व सामाजिक दृष्टीने महत्वाचे बनले .
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
भोसरीवरून घरी परतत होतो. दुपारपासून कस्टमरच्या कंपनीत ‘पेमेंट टर्म्स’वरून डोकं उठलं होतं. ऑर्डर हातात पडल्यात जमा होती, तोच एक आनंद होता........
‘मॉर्डन कॅफे’च्या चौकात सिग्नलला थांबलेलो असताना एक लहानसा पोरगा गाडीजवळ आला.
मी स्वतः भीक द्यायच्या विरुद्ध आहे. भिकाऱ्यांना कधीच पैसे नाही देत. पण त्या मुलाच्या हातात विकायला पुस्तकं दिसली. अशा गोष्टी या मुलांकडून घ्यायची संधी मात्र मी कधीच सोडत नाही. त्या मुलाला हात दाखवून गाडी बाजूला घेतली. मुलगा आला, ६० रुपयाला ४ पुस्तकं घ्या म्हणाला.
सहज पुस्तकं बघितली तर लहान मुलांची स्केचबुक होती. बरी वाटली. नुकताच जोराचा पाऊस येऊन गेल्यामुळे आणि रात्री नऊची वेळ झाल्यामुळे रस्त्यावर पण अगदीच तुरळक गर्दी होती.
पोरगा वयाने असेल ११-१२ वर्षांचा, पण पक्का सेल्समन होता. शेवटची थोडीच शिल्लक आहेत, घेऊन टाका.
थोड्याच दिवसांनी नवरात्र सुरू होतील
देवीच्या नऊ रूपाची पूजा केली जाते.
पण आपण जर आजूबाजूला शोधले तर ही देवीची नऊ रूपे आपल्या घरातच सापडतील ते असे
‘रूप पाहता लोचनी'
आपण बालपणापासून देवीची विविध रूपे पदोपदी पाहत आलोय.
पहिली माळ - ‘मातृदेवतेची'.
जी आपल्यासाठी कष्ट उपसताना दिवस-रात्र, आजारपण, थकवा, तहान-भूक कशाचीही पर्वा करत नाही.
आपल्या कल्याणासाठी अथक प्रयत्न करणे सोडत नाही.
मातृदेवते, तुला शतशः प्रणाम !
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
दुसरी माळ - ‘आजी' नामक 'मायेच्या सागराला'.
जिच्याजवळ आपल्या दुधावरच्या सायीसाठी प्रेम, माया, ममता, आशीर्वाद यांचा जादूचा खजिनाच दडलेला असतो.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
एकदा एक राजा त्याच्या प्रधान, सेनापती आणि सैनिकांसह शिकारीला निघाला वाटेत अरण्यात पुढे त्यांची ताटातूट झाली. मग प्रधानाने राजाच्या शोधार्थ सैनिकाला पाठवले अरण्याच्या मध्यभागी एका साधूची झोपडी होती.
साधू झोपडीच्या बाहेर झाडाखाली बसलेला असतो. पण तो साधू आंधळा असतो. सैनिक साधूच्या जवळ येतो आणि घोड्यावरूनच विचारतो,
काय रे गोसावड्या आमच्या महाराजांना हिथून जाताना पाहिलेस काय?
त्यावर तो साधू त्याला सांगतो, बाबा रे मी दोन्ही डोळ्यांनी आंधळा आहे, मला कस काय दिसणार. सैनिक म्हणला अरे आंधळा आहेस म्हणून काय झालं पण बहिरा तर नाहीस ना?
घोड्याच्या टापाचा काही आवाज वगैरे ऐकला असशील. साधू म्हणतो नाही तस काही मी ऐकल नाही.
अत्री ऋषी आणि अनुसूया एकदा महादेव आणि पार्वती कडे जेवणाचं आमंत्रणं घेऊन जातात. सर्वांना जेवायला बोलावतात. कार्तिक घरी नसतो पण गणपती असतो. छोट्या गणपती ला घेऊन यायचा ते आग्रह करतात.
पण पार्वती ला गणेशाची क्षुधा माहीत असते म्हणून ती त्यांना सांगते की ती व महादेव येतील आणि कार्तिक परत आला की पुन्हा एकदा सगळे येतील. पण अत्री पुन्हा त्यांना गणपतीला घेऊन यायचा आग्रह करतात आणि पार्वतीचा नाईलाज होतो.
महादेव, पार्वती आणि गणपती तिघे ठरलेल्या दिवशी अत्री ऋषींकडे जेवायला जातात पण पार्वतीला चिंता असते ती गणपतीच्या भुकेची आणि अनुसूये कडील सगळं जेवण संपलं तरी याची भूक शमणार नाही हे तिला माहीत असते.
जेवण सुरू होतं आणि अनुसूया एकेक पदार्थ वाढायला सुरू करते.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आदिशक्ती ही वर्षातून २१ दिवस निद्रा घेते. उरलेले ३४४ दिवस देवी अष्टौप्रहर जाग्रृत असते. निद्रा समयी देवीला १०८ साड्यांचे वेष्टन (दंड नेसवने)केले जाते व विधिवत् पलंगावर निद्रेसाठी ठेवले जाते.
असे असणारे तुळजाभवानी शक्तीपिठ एकमावाद्वितीय आहे
मंचकी निद्रा:-
देवीची मंचकी निद्रा २१ दिवसात विभागलेली आहे
सर्व प्रथम मंचक म्हणजे काय ?
मंचक याचा अर्थ पलंग असा आहे.
देवी भवानीची निद्रा तीन प्रकारात विभागली आहे ती अशी👇🏼
१)घोर निद्रा :-
नवरात्रीच्या आधी देवी योगनिद्रेत होती म्हणजे महिषासुराशी युध्द करण्यापूर्वीदेवी ही निद्रा घेत होती पण महिषासुराचे देवतांवरचे वाढते अत्याचार पाहून ब्रह्म-विष्णू आणि महेश देवीला आठ दिवसानंतर योग निद्रेतून उठवून देवदेवतांचे रक्षण करण्याची विनवणी करतात.
ग. दि. मा.
1 ऑक्टोबर,आजचाच दिवस, साल 1919. माणदेशातील एक दुर्गम, दुष्काळी व दारिद्र्याने पिचलेले एक खेडेगाव शेटफळ.
गावच्या कुलकर्ण्यांची सून घरीबाळंतपणासाठी आलेली.गावात कुठलीच वैद्यकीय सुविधा असण्याचा प्रश्नच नव्हता.संध्याकाळी गावच्या सुईणीने मोठ्या मुश्किलीने सुनेची सुटका केली.
मुलगा झाला म्हणून सर्वांना आनंदही झाला. पण बाळ काही रडेना. सर्वांच्याच चेहऱ्यावर काळजी. कितीतरी वेळ ते बाळ निपचित पडून होते. अनुभवी बायका अनेक प्रकार करून त्या बाळाला जागे करण्याचा प्रयत्न करीत होत्या पण ते बाळ कोणताच प्रतिसाद देत नव्हते. अशा स्थितीतच काही तास गेले.
कुणीतरी जवळच्या गावातील वैद्यांना बोलावून आणले. त्यांनी नाडी पाहिली. बाळाचा श्वासोश्वासही त्यांना जाणवेना. त्यांनी त्या दुर्दैवी बालकाला मृत घोषित केले. त्या घरावर दुःखाचा डोंगरच कोसळला. घरामागच्या परसात खड्डा काढला गेला. आई काही आपल्या बाळाला सोडायला तयार नव्हती.