२०१९च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक दिगग्ज नेते पक्ष सोडून चालले होते तर काही आधीच गेले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भाजपच्या नितीसमोर अगदी खिळखिळा झाला होता. नेते आणि कार्यकर्ते अस्वस्थ झाले होते. पुढे काय होणार हा प्रश्न सर्वांना होता.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभेला अगदीच नगण्य जागा निवडून येतील अशा अंदाज सर्वांनी बांधला होता. अशातही जिद्द न हरता, न थकता, तेवढ्याच ताकदीने, तेवढ्याच उमेदीने ८० वर्षाचा तरुण एकाकी झुंज देत होता. राज्यभर फिरत होता. तरुणांचा तसेच ज्येष्ठांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत होता.
या तरुणाची साताऱ्यातील पावसातली सभा चांगलीच गाजली, एका आदर्श मैत्रीचे उदाहरण या सभेत पाहायला मिळाले. विरोधकांनी जंग जंग पछाडले. कुणी इरा संपला म्हणाले तर कुणी त्यांचेच नेते चोरून त्याने महाराष्ट्रासाठी काय केले हे विचारले. खालच्या पातळीवर बोलण्यापर्यंत अनेकांची मजल गेली.
परंतु तो तरुण मागे हटला नाही, लढत राहिला. अशातच विधानसभेचे निकाल लागले. अगदीच हाताच्या बोटावर जागा येतील असं ग्राह्य धरलेल्या कार्यकर्त्यांना ५४ जागा येऊनही सत्ता आल्यापेक्षा जास्त आनंद झाला. तरीही हा तरुण शांत डोक्याने त्याची चाल खेळत होता. चर्चांना हळूहळू उधाण येत होते.
पण त्या कशा थोपवायच्या हे त्याला चांगलेच माहीत होते. अखेर विरोधकांनी जंग जंग पछाडूनही ते या ८० वर्षाच्या तरुण योद्ध्याला हरवू शकले नाहीत अशी खंत त्यांच्याच मनाला लावून दिली. खिळखिळा झालेला पक्ष प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर त्याने सत्तेत बसवला व अखंड तरुणांचे तो प्रेरणास्थान बनला.
सुदैवाने या तरुणाने इथे औद्योगिक व माहिती तंत्रज्ञान क्षेत्र विकसित करून रोजगारनिर्मितीला हातभार लावून आमच्यावर जे उपकार केले आहेत त्याचीच फळे आम्ही आज खात आहोत. नाहीतर कुठल्यातरी परराज्यात रोजगारासाठी वणवण भटकण्याची वेळ आज आम्हावर आली असती.
अशा या ८० वर्षाच्या तरुण योद्ध्यास, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.❤️
साहेब शतकवीर व्हा..!❣️
शरद पवार यांचं क्रीडाप्रेम खूप जुनं आहे, भारताचे लेगस्पीनर सदू शिंदे यांची मुलगी प्रतिभा यांच्याशी १ ऑगस्ट १९६७ रोजी त्यांचा विवाह झाला, तेव्हापासूनच हे नातं घट्ट जुळल्याचं क्रिकेटविश्वात गमतीने सांगितलं जातं.
पवार साहेब २००१ ते २०११ अशी तब्बल १० वर्षे ते मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. २०११ मध्ये ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. त्यानंतर पुन्हा काही काळ ते मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राहिले.
राज्याचे क्रीडाराज्यमंत्री असताना त्यांनी मुंबईत वानखेडे स्टेडियमच्या उभारणीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात महत्वाची भूमिका निभावली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने आयोजित करणारं हे देशातील महत्वाचं स्टेडियम असून आंतरराष्ट्रीय नकाशावर त्याने आपला नाव आजपर्यंत कायम ठेवले आहे.
शाळेत असताना शरद पवार नावाच्या मुलाने गोवा मुक्ती संग्रामाला समर्थन म्हणून शाळेतल्या मुलांचा मोर्चा काढला आणि आजपासून ६० वर्षांपूर्वी याच तरुणाने पुण्यात महाविद्यालयीन निवडणुकांमध्ये भाग घेऊन आपल्या सामाजिक व राजकीय जीवनाचा श्रीगणेशा केला व त्यात यशही मिळवले.
पुढे सर्व विचारप्रवाहांना समजावून घेत या तरुणाने जनमताचा कौल घेत महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रवेश केला आणि तेव्हापासून आजतागायत श्री. शरद गोविंद पवार हे नाव देशातल्या कोणत्या ना कोणत्या सदनाचं सदस्य म्हणून विनाखंड कायम असून प्रत्येक सदनामध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे.
साध्या आमदारापासून ते मुख्यमंत्रीपद, लोकसभेतील विरोधी पक्षनेते पदापासून संरक्षण खात्यासह विविध खात्यांची जबाबदारी आणि त्यातील चमकदार कामगिरी ही या ५० वर्षांची पुण्याई आहे. आजच्या लोकशाहीतील गैरसमज बाळगणाऱ्या तरुणाईने ही वाटचाल एकदा समजून घ्यायला हवी मग आपलं मत नोंदवायला हवं.
सध्या चालू असलेल्या मंत्र्यांचे दौरे, बातम्या, व्हायरल झालेले व्हिडिओ यावरून सर्वांना लक्षात आलेलेच असेल की सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे हाल काय झालेले आहेत. यापासून वाचण्यासाठी पीकविमा हा कार्यक्रम अतिशय गाजावाजा करून राबविला गेला.
सत्ताधारी, शेतकरी संघटना, प्रवक्ते, मीडिया यांच्याद्वारे तुफान प्रसिद्धी या कार्यक्रमाला देण्यात आली. आता पिकाला विमा भेटणार, मग शेतकऱ्यांचे सगळे नुकसान कमी होणार, बळीराजाचं राज्य येणार असले चित्र रंगवले गेले. मग यासाठी भल्या मोठ्या कंपन्यांना कंत्राटं दिली गेली.
नंतर प्रत्यक्षात पंतप्रधान फसल बिमा योजना आली, मोहीम स्वरूपात कृषी विभागाने राबविली. शेतकऱ्यांना पिकविम्याचे महत्त्व समजावून त्यांना पिकांचा विमा उतरवायला लावला. कृषी विभागाच्या थेट संपर्काने मोठ्या प्रमाणात विमा योजनेत शेतकरी सहभागी झाले.