हिरोला गुंडांनी बेदम मारले आहे... तो जमिनीवर अगदी मरणोन्मुख होऊन पडला आहे.. व्हिलनला वाटते तो मेलाच... आणि अचानक कशाने तरी प्रेरित होऊन तो उभा राहतो आणि सगळ्या गुंडांना मारतो- हे पाहणे आपल्या भारतीयांना जाम आवडते. भारताने दुसऱ्या कसोटीत मिळवलेला विजय यापेक्षा
1
काही वेगळा नव्हता. पण हा विजय केवळ क्रिकेटप्रेमींनी साजरा करावा असाच नाही, तर सगळ्यांनी काही लाईफ लेसन्स घेऊन जावे असा आहे..
त्याआधी तुम्हाला थोडी पार्श्वभूमी समजून घ्यावी लागेल. ह्या जानेवारीमध्ये विरुष्काच्या प्रेमाला गोड फळ येणार हे आधीच डिक्लेअर झाले होते. जानेवारीतच भारत
2
महत्वाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यालाही येणार होता. म्हणजे पहिल्या कसोटीनंतर विराट पितृत्व रजेला जाणार त्यानंतर उपकप्तान अजिंक्य रहाणे कडे नेतृत्वाची धुरा जाणार हे आधी माहित होतेच. बहुतेकांनी याकडे थोडे नाक मुरडूनच पहिले. म्हणजे ठीक आहे की तो कसोटी संघाचा उपकप्तान आहे,
3
टेक्निकली स्ट्रॉंग वगैरे असेल, पण हि इज नॉट हॅपनिंग यार!!
अजिंक्य हा काही तरुणींच्या हृदयाची धडकन, हॉट, मैदानात एग्रेसिव्ह, शिव्या घालणारा वगैरे जी अँग्री यंग मॅन हिरोची इमेज आम्ही करून घेतली आहे तसा नसल्याने त्याचे नेतृत्व आम्हाला 'हॅपनिंग' वगैरे वाटण्याची गरज नव्हती.
4
धोनीचे कुल नेतृत्वही आम्हाला आवडले. पण आमच्या नजरेत धोनी हा देवत्वाला पोचलेला असल्याने (म्हणजे आम्हीच अशी विभागणी करतो- काहींना डोक्यावर घेतो आणि नावडतीचे मीठही अळणी लागते) त्याचे नेतृत्वसुद्धा आम्ही वेगळे पाहिले. आणि अशातच एक मोठा भूकंपच झाला. विराट सहित भारताची टीम पहिल्या
5
कसोटीच्या दुसऱ्या डावात अवघ्या ३६ धावांवर आटोपली. एका तासात गेम वाजला, बाजारच उठला. भारताचा निच्चांक..पहिली कसोटी भारताने गमावली. ऑस्ट्रेलियाने १-० बढत घेतली. आता पुढची बॉक्सिंग डे टेस्ट! त्यामुळे विराट परतला म्हणजे काय जगच बुडाले अशीच समजूत भारतीय क्रिकेट प्रेमींनी करून घेतली.
6
यातुन बाहेर काढायला विराटच पाहिजे होता यार! वगैरे वगैरे.वास्तविक त्याने 2 सामन्यात भारताला विजथोविजय मिळवून दिला होता.पण त्याला फुल प्रुफ मानायला कुणी रेडी नव्हते.थोडक्यात, भारताला सावरण्यासाठी एग्रेसिव्ह नेतृत्वच हवे,अजिंक्य रहाणे सारखे वरणभात नव्हे अशी आम्ही समजूत करून घेतली.
7
तर अशा ऑड्स मध्ये अजिंक्यने टीमची धुरा सांभाळली. तो स्वत: सुद्धा काही सर्वोत्तम अशा फॉर्म मध्ये नव्हता. त्यामुळे रोहित, विराट च्या अनुपस्थितीत एक आणि कप्तान म्हणूनही फलंदाजीची धुरा हाती घेण्याची सगळ्यांची इच्छा होती. तर त्याने ही जबाबदारी उचलावी असे वाटणारे आणि ती तो घेऊ शकला
8
नाही तर ट्रोल करायला उत्सुक अशा दोघांच्याही नजरा त्याच्यावर खिळल्या.
... भारत टॉस हरला आणि शंकची पहिली पाल भारतात चुकचुकली. ऑस्ट्रेलिया ६०० मारणार आणि भारत फॉलोऑन घेउन डावाने हरणार... पण भारतीय गोलंदाज ऐकायला तयार नव्हते... बहुतेक भारतीय डोळे चोळत उठले तोपर्यंत ३५ ला पहिले ३ 9
कान्गारू जंगलात परतले होते. आणि त्यात होता एक स्मिथ. त्याची विकेट पाहिल्यावर शिकार अश्विन आणि कर्णधाराने जाळं लाऊन केली आहे हे सहज समजत होतं... रहाणे काहीतरी वेगळ करतोय हे पहिल्यांदा लोकांना जाणवलं..त्यानंतरची प्रत्येक विकेट ही स्ट्रेटेजी लाऊन केलेली शिकारच होती.
10
भारतीयांनी ग्रुप हंटिंग केले. ऑस्ट्रेलिया १९५ मध्ये पूर्ण शिजली.
पण अजुनही हृदयाची धडधड थांबली नव्हतीच. ३६ चे भूत डोळ्यासमोर नाचत होते. त्यात आकाशात मळभ दाटलेले.आकाशात सुर्य नसेल तर लाल चेंडू सैराट होतो. आणि झाले तसेच... मयांक आणि भरवशाचा पुजारा त्या इनिंगसारखेच आउट झाले, आणि
11
बॉल, पिच आणि ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी पुन्हा आपल्याला नाचवणार असेच वाटले. नाही म्हणायला गिल ने यावेळेला थोडे रन्स स्कोर बोर्ड वर दाखवले असल्याने तो अगदीच मळलेला दिसत नव्हता...पुजारा आउट झाला त्यावेळेस अजिंक्य आला होता. आता सगळं त्याच्याच हातात होत. काही जण असतात त्यांच्यावर
12
तुम्ही अतिरिक्त जबाबदारी दिलीत की ते अधिक बहरतात. तो आला त्याने पाहिलं आणि त्याने जिंकलं.. तब्बल सहा तास खेळपट्टीवर नांगर टाकून तो टिकून राहिला. कसल्याशा निर्धाराने! इथे त्याने क्रिकेटप्रेमी, उरलेसुरले निंदक आणि ड्रेसिंग रम सगळ्यांना जिंकले! रेड बॉल क्रिकेट न खेळलेल्यांना
13
यामागचे श्रम आणि काठीण्य पातळी समजणार नाही.पण असे समजा तुमच्या ऑफिस मधिल टफ दिवसांपेक्षाही ते टफ आहे...कारण तुमचा पर्फोर्मंस करोडो जनता बघत नसते..त्या डावात भारताच्या दोन अर्धशतकी आणि एक शतकी भागिदारी झाल्या. लहान लहान टारगेट घेत भारताने ऑस्ट्रेलियाची धावसंख्या पार केली. आणि
14
सव्वाशेची लिड पण घेतली. त्या डावात तीन गोष्टी लोकांच्या काळजाला हात घालुन गेल्या... एक रहाणेने शतक झाल्यावर दिलेली संयमी प्रतिक्रीया..आणि दुसर्या दिवशी जडेजाच्या मिस जज झालेल्या कॉल मुळे रहाणरहाणे रन आउट झाला तेंव्हा मान खाली घातलेल्या जडेजाला त्याने जो धीर दिला.
15
तिसरी अधिक महत्वाची! रहाणेचे शतक झाल्यावर भारतीय संघ जो बाहेर येऊन बसला होता, ज्यापद्धतीने उभा राहून टाळ्या वाजवत होता- एका नेत्याने आपल्या माणसांची मने जिंकल्याचे ते दर्शन होते.ऑस्ट्रेलिया दुसर्या डावात उतरली तेव्हासुद्धा हा गोलंदाज कर्णधार स्ट्रेतेजीचा खेळ चालू राहिला. आणि
16
ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव अवघ्या २०० धावात आटोपला..यावेळेस अजुन ही गोष्ट विशेष राहिली कारण भारताचा मुख्य वेगवान गोलंदाज उमेश यादव जायबंदी झाला होता. बुम्राह ने याबद्दल नंतर इतके छान सांगितले, की आम्ही ठरवले की एक गोलंदाज कमी आहे याबद्दल आम्ही बोलणारच नाही, एकमेकांना सपोर्ट करु.
17
आणि तो दिलेला सपोर्ट दिसला.
भारताला जिंकायला सत्तर धावा हव्या होत्या. भारतात असते तर निव्वळ सोपस्कर ठरले असते. पण ३६ चा इतिहास अजुन डोक्यावर होताच. कारण पुन्हा दुसरा डाव आला होता. पुन्हा मयांक आणि पुजारा तसेच बाद झाले. हर्षा भोगले ने ट्विट केले ही टेन्स एनीबडी?
18
खरतर प्रत्येक जण टेन्स होता, एक माणुस सोडून... रहाणे.. त्याने आल्यावर पहिला बॉल ज्या आत्मविश्वासाने फॉरवर्ड डीफेन्स केला त्याने लोकांना धीर आला. पण तो पहिला डाव संरक्षक खेळला होता, दुसरा डाव तो तसा खेळणार नव्हता. पुल, कट,कव्हरड्राईव्ह प्रत्येक शॉट सांगत होता 'बॉस इज हियर'..
19
विशेषत: कमिन्स ला त्याने मारलेला खणखणीत कव्हर ड्राईव्ह फोटो काढून घरी लावण्यासारखा आहे..जिंकल्यानंतर सुद्धा पिचवर आणि डग आउट मध्येही अतिशय संयत सेलिब्रेशन झाले. संयत असणे म्हणजे आक्रमक नसणे असे नाही. उलट त्यात अधिक आत्मविश्वास असतो. किंबहुना पहिल्या दिवसापासून भारतीय संघ अधिक
20
शिस्तबद्ध, संयमी आणि मनातून शांत वाटला. म्हणूनच शांतपणे प्लान करून, नियोजन करून, थंड डोक्याने भारत कांगारुंची शिकार करू शकला. हा शांतपणा नेतृत्वाकडून आला होता हे सांगण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञाची गरज नव्हती.
21
भारत आठ गडी राखून जिंकला. ऑस्ट्रेलिया विरुद्ध जिंकणे, तेही ऑस्ट्रेलियात आणि तेही आठ गडी राखून ही गोष्ट लहान नव्हती. एडलेडच्या ३६ च्या जखमा इथे बुजल्या. आणि हे करण्यासाठी कुठल्याही रक्त सळसळवणाऱ्या वातावरणाची गरज नाही लागली, किंवा आई बहिणींवरून शिव्या, हवेत अगणित पंचेस आणि
22
प्रतिस्पर्ध्यांकडे पाहून स्लेजिंगची गरज नाही. पहिल्या दिवसापासून जिंकेपर्यंत भारताने जे 'केरेक्टर' दाखवले त्याचा उल्लेख प्रत्येकानेच आपल्या कौतुकात केला. हे ते केरेक्टर, चारित्र्य- शांत, संयमी, संयत आणि आत्मविश्वासाने भरपूर! एग्रेशन दाखवायचे ते बाउंसरने, योर्करने,
23
खणखणीत कव्हर ड्राइव्ह मधून किंवा पूल शॉट मधून. अश्विन म्हणाला, जिन्क्सच्या (अजिंक्यचे टोपण नाव) शांत स्वभावाने ड्रेसिंग रूमला आत्मविश्वास दिला. कसोटीनंतरचे अजिंक्यचे भाषण म्हणजे ह्या कसोटीत दिसलेल्या केरेक्टरचे शाब्दिक रूप होते. प्रतिस्पर्ध्यांना पूर्ण मान देऊन, नवोदित
24
खेळाडूंचे तोंड बहरून कौतुक करून रहाणेने फार महत्वाची गोष्ट सांगितली- आम्ही छत्तीस बद्दल नंतर कधीच बोललो नाही.
म्हणूनच ही कसोटी केवळ विजयच नाही, लाईफ कोचिंग देऊन गेली. पराभवाला सामोरे जाऊन, पुन्हा राखेतून वर येण्याचे, स्वतःवर विश्वास ठेवण्याचे. आत्मविश्वासाने उभे राहण्याचे.
25
आज भारतीय क्रिकेट प्रेमी, क्रिकेट दिग्गज रहाणेचे तोंड भरून कौतुक करत आहेत. इरफान पठाण बोलला होता राहणे गोलंदाजांचा कर्णधार आहे. त्याने ते सिद्ध केले. सचिन म्हणाला होता, मला अजिंक्य च्या नेतृत्वावर विश्वास आहे, तो विश्वास त्याने सार्थ केला.
26
तो विजय अजिंक्यच आहे. यापुढेही भारत अनेकदा जिंकेल- पण काही विजय भारतीय संघाच्या, समीक्षकांच्या आणि चाहत्यांच्या मनावर कायम कोरले जातात.
27
अजिंक्य भारताला अजिंक्य करून अजिंक्य राहिला. आता पुन्हा तो जेंव्हा तो फलंदाजीला येईल, तेंव्हा प्रेक्षकांच्या टाळ्या घेऊनच! ही त्याने कष्टाने कमावलेली कमाई आहे!
- हर्षद माने
स्मार्ट महाराष्ट्र
28
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
सुशिक्षित कोण आणि अशिक्षित कोण ? या प्रश्नाचा एक नवा वेध घेणे गरजेचे आहे. सध्याची सुशिक्षित लोकांची व्याख्या त्याच्या शिक्षण नावाच्या रचनेशी जोडलेली आहे. अर्थात जो शिकलाय तो सुशिक्षित आणि नाही शिकला तो अशिक्षित . इथे एक प्रश्न जाणीवपूर्वक उभा करायला हवा की,
खरोखरीच शिक्षण घेतलेले " सुशिक्षित " आहेत का ? शिक्षण म्हणजे नेमके काय ? चार पुस्तके आणि शाळा नावाची रचना मनुष्याला सुशिक्षित बनविण्यासाठी पुरेशी आहे का ? सदसदविवेकबुध्दी शाबूत राखून या तीन प्रश्नांची उत्तरे शोधल्यास काही नकारार्थी उत्तर हाती येऊ शकतात. शिक्षण घेतलेल्या
बहुतांशी व्यक्तीचे सामाजिक वर्तन हे अत्यंत मागास दर्जाचे असते. याची उदाहरणे नुसते डोळे उघडून सर्वत्र फिरवले तरी ठायीठायी दिसतील. भ्रष्टाचार , व्यसनासक्त ,जातीयता अंधश्रध्दा अशा बरेच बाबतीत सुशिक्षित मंडळी मागे नाहीत तर पुढेच आहेत हे नाकारता येत नाही .
शेठ जसे सत्तेत आले तस मालकांनी देशातील कोणकोणत्या सरकारी संस्था,कंपन्या यांना विकून टाकले,किंवा त्या कंपन्यांत असणारी सरकारी गुंतवणूक काढून घेतली...यावर एक नजर टाकूयात.
2014-15
1. नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड.
0.29% सरकारी हिस्सा विकण्यात आला.
2. SAIL (Steel Authotiry of india ltd.)
5% सरकारी हिस्सा विकण्यात आला.
3. NALCO (National Aluminium Company Ltd.)
0.13 % सरकारी हिस्सा विकण्यात आला.
4. MMTC (Minerals and Metals trading Company)
0.073% सरकारी हिस्सेदारी विकण्यात आली.
5. CIL (Coal India ltd.)
10% सरकारी हिस्सेदारी विकण्यात आली.
लॅटिन अमेरिका नावाने ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण अमेरिका खंडातील, अर्जेंटीना या देशातील एक तरुण, १९५१ साली आपल्या मित्राबरोबर, मोटरसायकलीवर स्वार होऊन पॅसिफिक किनारपट्टीने, लॅटिन अमेरिकेच्या सफरीवर निघाला. ही सफर त्याच्या जीवनाला कलाटणी देणारी ठरली.
लॅटिन अमेरिका खंड म्हणजे अनेक छोट्यामोठ्या देशांचा समूह. युरोपियन साम्राज्यवादाचे बळी असलेले, हे सर्व देश शोषण, दारिद्र्य, बेरोजगारी आदी समस्यांनी ग्रस्त. शेतकरी, खाण कामगार यांची पूंजीपती वर्गाने चालवलेली भयंकर पिळवणूक बघून तो तरुण कमालीचा अस्वस्थ झाला.
अत्यंत व्यथित मनाने तो सफरीवरुन परतला.
सफरीवरुन परल्यावर त्याने डॉक्टरीचा अभ्यासक्रम पूर्ण करुन डिग्रीही संपादन केली. परंतु लॅटिन अमेरिकन जनतेचं खुणावणारे दु:ख, दैन्य, शोषण त्याला स्वस्थ्य बसू देईना. त्यांच्या या अरिष्टाचं कारण साम्राज्यवाद व भांडवलशाही आहे,
चीनने दिल्लीतील मोदी यांचे सरकार 'छानछोकी'तच मश्गूल असतांना लडाख मधील अत्यंत मोक्याच्या भुभागाचा ताबा मिळवून त्या भागात पर्मनंट स्ट्रक्चर बनवून अत्याधुनिक क्षेपणास्त्रे,रडार, युध्दसज्ज वाहने सैनिक यांचे तळ ही उभारले.
1/15
दोन महिन्यांपासून सरकार बेसुध होते. काही
राष्ट्रप्रेमी सामायिक वार्ताहर,माजी लष्करी अधिकारी आणी विशेषतः मा राहूल गांधी यांनी जबरी टिका सुरू केल्यावर हे 'कुंभकर्ण' ऊठलेत म्हणे .बरं हे असे का झाले यांचे आणी आपला भुभाग परत ताब्यात करण्यासाठी मिळवण्याचे नियोजन करायच्या ऐवजी ही
2/15
पिलावळ राहूल गांधी वरच तुटून पडली आणी १९६२ च्या हरलेल्या युध्दाचे दाखले
देत यांनी 'बेशुधी'तच आत्ता घालवलेल्या भुभागाचे निर्लज्ज समर्थन करत वरून- राजकारण करू नका , सरकारला प्रश्र्न विचारू नका असा भडिमार बिनडोक नेते आणी गोदी मिडीयातून करू लागले आहेत.