#अर्जुन
Terminalia arjuna
Combreteceae
रामायण,महाभारतातील अर्जुन
नक्षत्र-स्वाती
वायूदैवत,
तत्व-आग्नी
नक्षत्र दैवत- राहु
तुळा राशीवाले अर्जुन च्या झाडाची लागवड करण्यासाठी शुभ मानतात.
हे कमी पानगळीचा वृक्ष आहे. उन्हाळ्यात सूरवातीस पाने धारण केलेला दिसुन येतो #औषधीवनस्पती
(१)
.खोडाची साल जाड,गूळगूळीत, पांढरट आसते.हा सुमारे ८० फुटांपर्यंत वाढतो जमिनीकडील बुंधा काहीसा पसरलेला व विशिष्ट उंचीवरन फांद्या पसरलेल्या असतात . पाने साधी , समोरासमोर किंवा एकाआड एक असतात.पानांच्या देठाजवळ एक किंवा दोन ग्रंथी असतात , फुले देठरहित पुष्पगुच्छामध्ये बोटभर
(2)
भागावर एकवटलेली असतात . फळ गर्द बदामी , पाच पाकळया असलेले असते , फुले फेब्रुवारी - मार्चमध्य येतात . त्यानंतर फळे मे पर्यंत परिपक्व होतात ,
नैसर्गीक अधिवास व हवामान हिमालयाच्या पायथ्यापासून ते मध्यदक्षिण भारतातील राज्यामध्ये प्रामुख्याने ही वनस्पती आढळते . समशीतोष्ण
(3)
आर्द्र पर्णझडी , कोरडे , शुष्क पर्णझडी वनामध्ये , विशेषत : पाण्याच्या जागेत , नद्या - नाले यांच्या काठाने ही वनस्पती आढळते . शोभा वाढविण्यासाठी व सावलीसाठी या वृक्षाची लागवड केलेली आढळते. महाराष्ट्रात कोकणपश्चिम - उत्तर महाराष्ट्रातील जिल्हे व विदर्भ इ.ठिकाणी हा वृक्ष आढळतो
(4)
नैसर्गीक पुर्नउत्पादन - नैसर्गिक पुर्नउत्पादन पावसाळयाचे सुरवातीचे काळात नदीपात्रात आढळून येते वळवाचे पावसात नदी नाल्यात जमा झालेल्या पाला - पाचोळयातील बियांचे अकुरण सहज दिसते . एप्रिल - मे महिन्यात परिपक्क फळे गोळा करून काडीकचरा काढून बियाणे चांगले वाळवून साठविले जावे
(5)
शक्यतो ताजी फळे रोपे निर्मितीसाठी वापरावेत.एक किलोत साधारणत : १७५-४५० फळे असतात , प्रक्रिया न करता फळे रोपे निर्मितीसाठी पेरल्यास ५०-६० % तर गरम पाण्यात १२ तास फळे बुडवून पेरल्यास ९ ० % पर्यंत रुजवा मिळतो.
सालींनमध्ये कँल्शिअम भरपूर असल्याने फ्रँक्चर लवकर भरुन येण्यासाठी
(6)
आयूर्वेदिक औषधींनमध्ये याच्या सालीचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो कफ व पित्तदोषावरही याच्या सालीचे पावडर आयूर्वेदिक औषधात वापरतात त्यासाठी झाडे सहा - सात वर्षांची झाल्यानंतर जिवंत साल काढली जाते . साल काढताना ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा काळ निवडणे आवश्यक आहे,यामुळे साल
(7)
काढलेल्या भागाची जखम पावसाळयापूर्वी भरून येते . साल काढतांना चारही बाजूंची साल न काढत एका बाजूची साल प्रथम १०x२० सें.मी.इतक्या भागाची काढावी.त्यानंतर त्या समोरील भागाची साल दोन महिन्यानंतर काढावी . अशा पध्दतीने राहिलेल्या बाजूंची साल काढावी . यापासून वर्षभरात अर्धा किलो
(8)
वाळलेली साल मिळते . बाजारात अर्जुन पावडरला सध्या ३००-४०० रु .प्रति किलो दर आहे . उपयोग : अर्जुन वृक्षांचे लाकूड रंगाने लालसर , कठीण , टीकाऊ असते . इमारत बांधकामासाठी मुख्यत्वेकरुन उपयोग केला जातो . गाभ्याचे लाकूड तपकिरी व खूप कठीण असते . बाहय लाकूड पांढरट - लालसर असते
(9)
लाकडामध्ये वर्षायू वलये नीट दिसत नाहीत . कृषी अवजारे , बोटबांधणी , गाडयांची चाके , प्लायवूड , इत्यादीसाठी वापर केला जातो . कोळसा निर्मितीसाठी ही प्रजाती चांगली मानतात . जळाऊ , इंधन , चारा इ.साठीही वापर करतात
(10)
पाणथळ जागेतील कामासाठी या लाकडाचा उपयोग केला जातो.जून्या काळी विहिरी बांधताना याचा उपयोग करत असत.टसर रेशमाची किडे वाढवण्यासाठी उपयुक्त झाड आहे.
(11/11) @Unrollme@threadreaderapp
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
बार ओपन करतोय आपल्या सर्वांची मदत लागेल..?
😃😃😃😃😃😃😃😃
डोक्यात कधी आणि कोणती कल्पना येईल सांगता येणार नाही, बार ओपन करतोय, ज्यूस बार हं, तो पण पक्ष्यांसाठी,
*कशी वाटली संकल्पना...?*
त्याची franchises हवी आहे का?
(१)
तुम्हासर्वांना माहीत असेलच #पळस वृक्ष पक्ष्यांसाठी ज्युस बार समान आहे, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी त्यातील मकरंद पिण्यासाठी येतात उन्हाळ्यामध्ये या झाडांना फुले येतात आणि या झाडांच्या फुलापासून पक्ष्याना अन्न मिळते. यातून देशी झाडांचे जतन तर होईलच, ऐन उन्हाळ्यात पक्ष्यांना
(२)
अन्नची सोय होईल
त्यामध्ये आपण प्रामुख्याने पक्षांना उपयोगी पडणारी झाडे #काटेसावर, #पांगारा, #पळस या तीन प्रकारचे झाड आपण त्यामध्ये लावू, यातून भरपूर वेगवेळ्या प्रकारचे पक्षी येथे येतील
(३)
अत्यंत विशेष आणि नाविन्यपूर्ण माहिती
वाचनाची,ज्ञानाची आवड असलेल्या सुज्ञ मंडळींनी जरूर वाचावेअसा धागा
रानात भटकायला गेल्यावर अमक्याला‘चकवा’ लागला ‘बाहेरची बाधा’ झाली,अशा गोष्टी कुणाकुणाकडून ऐकायला मिळतात.वनस्पती अभ्यासकांच्या मते या ‘चकव्या’लाही वनस्पतीशास्त्रात काही आधार आहे
१
त्याचा संबंध भुताखेताशी नसून ठरावीक वनस्पतींचं स्वयंसंरक्षणासाठीचं ते एक शस्त्र आहे. नुकत्याच झालेल्या पर्यावरण दिनाच्या (५ जून) निमित्तानं..जंगलातल्या काही जागा मंगल वाटतात. केवढं प्रसन्न आणि रमणीय वाटतं तिथे. याचा अर्थ तिथे सकारात्मक ऊर्जेचे प्रवाह वाहत असतात
(2)
. तर काही जागा गूढ, रहस्यमय शक्तींनी भारलेल्या असतात असं वाटतं, आणि त्या आपल्याला अस्वस्थ करतात. तिथे नकारात्मक ऊर्जेचं प्राबल्य असतं. त्या ऊर्जेच्या संपर्कात माणूस आला, की माणसाचं संतुलन बिघडतं. तो भारलेल्या अवस्थेत जातो. कधी आजारीही पडतो. अशी भारून टाकणारी एक
(3)
#करू #करायागम #कंडोळ #पांढरूक #कढई
Sterculia urens
Sterculiaceae
आज आपण कढई या झाडाची सविस्तर माहिती ह्या धाग्यातुन घेउ.
हा वृक्ष पानझडी प्रकारातील मध्यम आकारचा बाढणारा कदापणी वृक्ष आहे . अनुकूल वातावरणात हा वृक्ष२०मीटर पर्यंत उंच वाढतो.खोड बुंध्याकडे फूगीर
(१) #औषधीवनस्पती
असुन गोलाकार,सरळ वाढणारे साधारण ६मीटर पर्यंत फांदीविरहीत असते.या झाडाची साल पांढऱ्या रंगाची , गुळगुळीत व पातळ असते . प्रामुख्याने उन्हाळयात ही साल चमकत असल्याने सदरचे झाड सर्व झाडोयात उठून दिसते . ( हयामुळेच भूताचे झाड असे नाव पडलेले आहे . ) पाने या झाडाची पाने पंजाकृती
(२)
, एका आड एक असून २० ते ३० सें.मी. लांबीची असतात व प्रामुख्याने प्रत्येक फांदीच्या टोकाला जास्ती प्रमाणात असतात . हे झाड त्याच्या सालीमुळे व पानाच्या विशिष्ट रचनेमुळे ओळखण्यास सोपे जाते . ही पाने जानेवारी महिन्यात झाडावरून गळण्यास सुरवात होते . या झाडाला फुले डिसेंबर
(३)
#पांढराशिरस
Albizzia procera
(leguminoseae mimosaceae)
हे एक उंच वाढणाऱ्या झाडांमधील वनस्पती आहे. साधारणपणे पंधरा वीस मीटर उंचीपर्यंत वाढते.
वृक्षाची ओळख हे झाड पर्णझाडी या सदरात मोडते . झाड उंच आणि सरळ वाढते . झाडाचा बुधा काहीसा चक्रकार असतो . झाडाची साल फिकट #औषधीवनस्पती (1)
पिवळ्या रंगाची किंवा हिरवट पांढरी ते फिकट तपकिरी रंगाची असते . काही ठिकाणी हे झाड जवळ जवळ ३६ मी . इतके उंच वाढलेले आढळले आहे . त्यात झाडाचा बुंधा सरळ १२ मीटर पर्यंत वाढलेला होता आणि लपेटी २ ते ३ मीटर होती . परंतु सर्वसाधारपणे हे झाड १८ ते २४ मीटर उंच वाढते . मध्य प्रदेश
(2)
सातपुडा , तामिळनाडू मधिल काही भागात या झाडाची वेढी १.२ मीटर ते १.५ मीटर वाढलेली दिसून आली आहे . झाडाची साल १ ते २ सें मी . जाडीपर्यंत वाढते व पातळ ढिलप्याचे स्वरुपात गळूनही पडते . त्यामुळे बुंध्यावर आडव्या रेषा दिसतात . पाने द्विपीच्छक असतात . या संयुक्त पानाची मधली शीर जवळ
(3)
#मुचकुंद #कनकचंपा
Pterospermum acerifolium
हे एक मध्यम उंचीचे मुळ भारतीय झाड आहे. ह्या वनस्पतीस कर्णिकार असेही म्हनतात.याच्या फांद्या खालच्या दिशेने लटकत्या असतात.याची पाने साधी असुन एकाआड एक पाने असतात.यास पांढऱ्या रंगाची फूले येतात व ती रात्रीच्या वेळी येतात व सुगंधीत असतात1/4
यापासून चांगल्या प्रकारचे लाकुड मिळते तसेच यापासून,खेळणी,घरातील फर्निचर,बनवतात,हे नरम असल्याने कागद बनवन्यासाठी,प्लायवुड,आगकाडी बनवन्यात वापरतात.ग्रामीण भागात याच्या पानांनवरती जेवनासाठी वापर करतात.हे एक चांगल्या प्रकारचे फुटवे देणारे झाड आहे. याच्या फांद्या जमीनीपासुनच फूटुन2/4
ते एक प्रकारचे झुडुपच तयार होते.याची पाने लंबवर्तुळी थोडीशी मोठी असुन वरच्या बाजुने हिरवी व खालच्या बाजुने पांढरट भुरकट व लहान केस असतात.याचे फळ हे कप्प्यात असते व त्यात बी असुन त्यावर कापसा सारखे मउ चलन चिकटलेले असते त्यामुळे ते वार्यावर उडतात.हे आपल्या राज्यात
3/4
#लहानघोळ
शास्त्रीय नाव -Portulaca quadrifida (पॉरच्युलिका कॉड्रीफिडा)
कुळ - Portulaceae (पॉरच्युलिकेसी)
स्थानिक नावे - रानघोळ, भुईचौली, खाटेचौनाळ, चिवळी, लहान घोळ व छोटी घोळ
संस्कृत नाव - लोनी
हिंदी नाव - छोटा नोनिया
इंग्रजी नाव - चिकन वीड
या वनस्पतीचे बारीक तुकडे ज्वारीच्य1
पिठात मिसळून त्याचे कोंबडी खाद्य म्हणून लहान-लहान गोळे बनवितात. म्हणूनच या वनस्पतीला "चिकन वीड' असे इंग्रजीत म्हणतात.
चिवळ ही वनस्पती ओलसर, पाणथळ जागेत शेतात व बागेत तण म्हणून वाढते. चिवळ कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, खानदेश या ठिकाणी महाराष्ट्रासह संपूर्ण (2)
भारतात वाढते.
ही वर्षायू वनस्पती जमिनीवर पसरत वाढते. ही वनस्पती अगदी नाजूक असते. खोडांचा, फांद्यांचा व पानांचा आकार लहान असतो.