खरंतर १८९६ सालीच शाहू महाराजांनी कोल्हापुरात उच्चशिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राजाराम कॉलेजला जोडून एक वसतिगृह स्थापन केले होते. यात सर्व जातीधर्माच्या विद्यार्थ्यांना प्रवेश होता. या वसतिगृहाचे व्यवस्थापन ब्राम्हण मंडळींकडे होते. शिक्षण ही आपलीच मक्तेदारी आहे 👇
अशी मानसिकता या मंडळींची होती त्यामुळे ब्राह्मणेतर मुलांची संख्या हळूहळू कमी झाली, कालांतराने ते वसतिगृह फक्त ब्राह्मणांचेच बनले. शाहू महाराजांच्या डोक्यात शिक्षण क्षेत्रातील ही मक्तेदारी नाहीशी करण्याबाबत चक्रे फिरत होती. याला वेग आला तो पी.सी.पाटलांमुळे (थोर कृषीतज्ञ).👇
मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पी.सी.पाटलांनी त्यांना आलेल्या समस्या शाहू महाराजांना सांगितल्या. गावाचा राजा समजल्या जाणाऱ्या पाटलांच्या पोरांना अशा समस्यांना सामोरे जावे लागत असेल तर मागासलेल्या जातींची काय अवस्था होत असेल या विचाराने महाराज अस्वस्थ झाले.👇
आणि महाराजांनी तातडीने विचारविनिमय करून मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरु करण्याचा निर्णय घेतला. १८.०४.१९०१ रोजी 'व्हीकटोरिया मराठा बोर्डिंग' हे वसतिगृह चळवळीतील पहिले वसतिगृह कोल्हापुरात स्थापन झाले. याचे पहिले विद्यार्थी म्हणजे पी.सी.पाटील. जरी वसतिगृहाचे नाव मराठा असले👇
तरी येथे अन्य जातींच्या मुलांना आश्रय मिळत होता. व्हीकटोरिया बोर्डिंग साठी महाराजांनी सुरवातीला ५५० रुपयांचे अनुदान मंजूर केले, नंतर २००० रुपये वार्षिक उत्पन्न मिळेल इतका जमीनजुमला आणि ४७००० रुपयांची स्थायी देणगी दिली. यानंतर जैन बोर्डिंग ची स्थापना केली.👇
त्यानंतर लिंगायत, मुस्लिम, अस्पृश्य, सोनार, शिंपी, पांचाळ, गौड सारस्वत, इंडियन ख्रिश्चन, चां.का.प्रभू, वैश्य, ढोर-चांभार, सुतार, नाभिक, सोमवंशीय आर्यक्षत्रिय, कोष्टी अशा विविध जातीधर्माची २० वसतिगृहे स्थापन केली. महाराजांनी प्रत्येक वसतिगृहास इमारती, खुल्या जागा, 👇
कायमस्वरूपी उत्पन्नाची साधने उपलब्ध करून दिली. हे सर्व करत असताना शाहू महाराजांनी त्या त्या जातीचे पुढारी एकत्र येऊन चळवळीत सहभाग कसा घेतील आणि चळवळ कशी वाढवतील यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे वसतिगृह चळवळ ही फक्त कोल्हापूरच्या राजाची चळवळ न राहता ती एक लोकचळवळ म्हणून पुढे आली.👇
अस्पृश्य समाजातील मुलांसाठी एक वसतिगृह असावे असे महाराजांना मनोमन वाटत होते. काही कार्यकर्त्यांना पुढे करून, प्रोत्साहन देऊन अस्पृश्यांसाठीसुद्धा एक वसतिगृह १९०८ साली स्थापन झाले. मुंबईचे गव्हर्नर सर जॉर्ज क्लार्क यांची कन्या मिस व्हायोलेट क्लार्क हिने आपल्या नृत्याचा 👇
एक कार्यक्रम आयोजित करून त्यातून जमलेले ५००० रुपये शाहू महाराजांनी स्थापलेल्या अस्पृश्यांच्या वसतिगृहास भेट दिले. या मानवतावादी दृष्टीचा सन्मान म्हणून महाराजांनी वसतिगृहाचे नाव 'मिस क्लार्क होस्टेल' असे ठेवले. महाराजांचे मुस्लिम समाजावर मोठे प्रेम होते.👇
मुस्लिम समाजात शिक्षणाबद्दल असलेली अनास्था दूर व्हावी यासाठी महाराज अनेक वर्षे प्रयत्न करत होते, त्या प्रयत्नांना यश आले आणि मुस्लिम बोर्डिंगची स्थापना झाली.
महाराजांनी सुरवातीला १० मुले जमवून त्यांना सधन कुटुंबात वार लावून दिले होते. (ठराविक विद्यार्थ्याने, ठराविक दिवशी, 👇
ठराविक कुटुंबात जेवायचे.) हळूहळू अनेक शिक्षणप्रेमी कुटुंबे आपणहून या कार्यात सहभागी होऊ लागली. हळूहळू विद्यार्थ्यांची संख्याही वाढू लागली, मग त्यांच्या जेवणाची सोय करताना कार्यकर्त्यांची दमछाक होऊ लागली. हे महाराजांच्या लक्षात येताच त्यांनी वसतिगृहांवर कृपेचा वर्षाव केला👇
आणि 'कोठीशाळा' नावाची इमारत वसतिगृहासाठी दिली, ७००० रुपयांचा स्थायी निधी ट्रेझरीत ठेवला, शहरात ७ एकर जमीन, रामनाथगिरी मठाच्या देवस्थानच्या १०० एकर जमिनीचे उत्पन्न वसतिगृहास कायमचे लावून दिले. ही वसतिगृहांची चळवळ हळूहळू राज्याबाहेरही पसरू लागली.👇
महाराज अभिमानाने सांगायचे - "ज्याप्रमाणे इंग्रज मोठ्या अभिमानाने ब्रिटिश पार्लमेंटला 'मदर ऑफ पार्लमेंट्स' असे म्हणतात त्याप्रमाणे कोल्हापुरास 'मदर ऑफ बोर्डिंग हाऊसेस' म्हणजेच विद्यार्थी वसतिगृहांची माता असे सार्थ यश मिळाले आहे."
👇
शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानाबाहेरील वसतिगृहांना सुद्धा सढळ हाताने अर्थसहाय्य केले, राजाश्रय दिला.
आता यातून प्रश्न असा उभा राहतो की महाराजांनी जातवार वसतिगृहे का काढली? खरंतर शाहू महाराज आयुष्यभर जातीभेद व अस्पृश्यता नष्ट होण्यासाठी प्रयत्न करत राहिले.👇
तरीपण वसतिगृहे काढताना जातवार काढली याचे कारण समजून घेताना आपल्याला आधी तो काळ समजून घेतला पाहिजे. शेकडो वर्षांची भक्कम जातिव्यवस्थेची उतरंड समाजमनावर होती, प्रत्येक वरची जात आपल्यापेक्षा खालच्या जातीला तुच्छ समजत होती. जातीचा उच्च-नीच भाव फक्त वरच्या स्तरात होता असे नाही.👇
अस्पृश्यांमधील जाती सुद्धा एकमेकांच्या जातींना तुच्छ समजत होत्या. आणि ही मानसिकता एका रात्रीत बदलणे शक्य नव्हते. महाराजांच्या दृष्टीने प्रत्येकाला शिक्षण मिळणे हे अत्यंत महत्वाचे होते. आपापल्या जातीच्या वसतिगृहात राहून का होईना पण ही मुलं शिकली पाहिजेत, शिक्षण घेतल्यावर 👇
यांना जातीभेदातील फोलपणा आपोआप लक्षात येईल असा महाराजांचा आशावाद होता. शिक्षणाची गंगा येनकेन प्रकारे वाहती करण्यासाठी महाराजांनी जातवार वसतिगृहे स्थापली. महात्मा फुलेंनी सुरु केलेल्या शैक्षणिक चळवळीला शाहू महाराजांनी वसतिगृह चळवळीच्या माध्यमातून विराट रूप दिले.👇
आणि याची फलनिष्पत्ती म्हणजे महाराष्ट्रातील उच्चशिक्षणाने विभूषित झालेली ब्राह्मणेतरांची पहिली पिढी घडली. या चळवळीची प्रेरणा घेऊन 'रयत शिक्षण संस्था' उभी राहिली आणि महाराष्ट्रात खेडोपाड्यांतून शिक्षणाची गंगा वाहू लागली. आज आपण सगळे चांगलं शिक्षण घेत आहोत 👇
यामागे शाहू महाराजांचा फार मोठा वाटा आहे. त्यामुळे समाजाला अज्ञानाच्या जोखडातून मुक्त करणारे शाहू महाराज मला #खऱ्या_स्वातंत्र्याचे_शिल्पकार वाटतात.
मासिक पाळीच्या दिवसांत स्त्री खरंच अपवित्र किंवा अशुद्ध असते का?
उत्तर : अजिबात नाही. मासिक पाळीचे चक्र महिन्याच्या पहिल्या दिवसापासून महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत चालूच असते, त्यामुळे रक्तस्राव होण्याच्या ४ दिवसांपुरती स्त्री अपवित्र आणि इतर दिवशी पवित्र असं असूच शकत नाही.👇
ज्याप्रमाणे आपण अन्न खातो, ते पचवतो त्यातून ऊर्जा तयार होते आणि नको असलेल्या गोष्टी आपले शरीर बाहेर फेकते, हे जसे एक चक्र आहे तसेच मासिक पाळी हे देखील एक चक्र आहे. साधारण २८ ते ३२ दिवसांचे हे चक्र असते, ज्यामध्ये स्त्रीबीज तयार होऊन त्याची वाढ होते. 👇
परिपक्व झालेले स्त्रीबीज मासिक पाळीच्या शेवटच्या टप्प्यात रक्तस्रावाच्या स्वरूपात बाहेर फेकले जाते आणि पुन्हा नवीन स्त्रीबीज निर्माण होऊन परिपक्व होण्याची प्रक्रिया सुरु होते. ही सगळी प्रक्रिया का होते? तर गर्भधारणेसाठी होते. गर्भधारणा झाली नाही तर मग ते स्त्रीबीज शरीराबाहेर👇
#राजर्षी_विरुद्ध_लोकमान्य #शत्रुत्व_आणि_ममत्व
गेल्या शतकातील पहिल्या दोन दशकात महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर छत्रपती शाहू महाराज आणि लोकमान्य टिळक या दोन महापुरुषांचा उदय झाला. शाहू महाराजांना राजकीय स्वातंत्र्यापेक्षा मानवमुक्ती करणारे स्वातंत्र्य आणि 👇
सामाजिक सुधारणा जास्त महत्वाच्या वाटत होत्या तर लोकमान्य टिळकांना राजकीय स्वातंत्र्य अधिक गरजेचे वाटत होते. ही दोन्ही स्वातंत्र्ये एकमेकांस पूरक आहेत याची जाणीव या दोन्ही महापुरुषांना होती तरीही एकमेकांच्या हातात हात घालून काम करण्याऐवजी एकमेकांशी दोन हात करण्याची परिस्थिती 👇
त्यांच्यासमोर उभी राहिली हे खरंतर महाराष्ट्राचं दुर्दैव. तसं पाहिलं तर लोकमान्यांच्या मनात कोल्हापूरच्या गादीविषयी प्रचंड आदर होता. या आदरापोटीच त्यांनी व आगरकरांनी चौथ्या शिवाजी महाराजांवर होणाऱ्या अत्याचाराला 'केसरी' मधून वाचा फोडली. यात त्यांना दिवाण बर्व्यांचा रोष 👇
दहावीला जरा बरे मार्क पडले म्हणून विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. काॅलेजच्या पहिल्याच दिवशी केसांत गुलाबाचं फुल माळून तु आली होतीस. तुझ्या देखण्या रूपाला गुलाबाच्या फुलाने साज चढवला होता. साध्या पंजाबी ड्रेस मध्ये तु खूपच भारी दिसायचीस. मी तेव्हाच तुझ्या प्रेमात पडलो होतो. 👇
वर्गात मी चौथ्या बेंचवर बसायचो आणि तिथून मुलींच्या ओळीत पहिल्या बेंचवर बसलेल्या तुला सारखं सारखं बघायचो. जगताप सरांनी तर खूप वेळा मला तुझ्याकडे बघत बसलेलो असताना पकडलंय. तु नेहमी केसांत गुलाबाचं फुल माळायचीस त्यावरून मी ओळखून गेलो की तुला गुलाबाचं फुल आवडतं. 👇
राहूल्याने मला आयडिया दिली आणि तुला गुलाबाचं फुल देऊन प्रपोज करायचं असं मी ठरवलं. बारावीची परिक्षा झाली तरी माझं धाडस काय झालं नाही. खचनाळे काकूंच्या दारातील गुलाबाचं फुल मी रोज चोरून आणायचो पण ते फुलं वहितच राहायचं, तुला देण्याचं धाडस कधी झालं नाही. निकालाची मी वाट बघत होतो. 👇
'क्षत्रीय कुलावतंस हिंदुपदपातशहा' अशी बिरुदावली असणाऱ्या छत्रपतींना एका भटजीने 'शूद्र' म्हणून हिणवले. इथेच वेदोक्ताची ठिणगी पडली आणि छत्रपती शाहू महाराज सामाजिक बंडखोरीस उद्युक्त झाले. १८९९ मध्ये कोल्हापुरात हे प्रकरण सुरु झाले, नंतर एक-दोन वर्षात याचा भडका उडाला आणि 👇
यातून तीव्र सामाजिक संघर्ष उभा राहिला. या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आणि शाहू महाराज हे बहुजन समाजाचे उद्धारक म्हणून जनतेसमोर आले.
हे प्रकरण समजून घेताना आपण आधी वेदोक्ताची पार्श्वभूमी समजून घेऊया.
वेदोक्त म्हणजे काय?
वेदोक्त म्हणजे वेदांत सांगितल्याप्रमाणे.👇
ब्राम्हण श्रेष्ठत्वाचा सिद्धांत समाजाच्या माथी मारण्यासाठी शेकडो वर्षांपासून धर्मशास्त्रांचे ग्रंथ, मनुस्मृती, पुराणे वगैरे निर्माण केली गेली. "ब्राम्हण व्यक्ती अविद्वान असो की विद्वान असो, ते मोठे दैवत आहे" असे मनुस्मृती मध्ये सांगितले गेले.👇
#नोकरी करण्यापेक्षा नोकरी निर्माण करणारे का होऊ नये? कोणताही व्यवसाय मनापासून, प्रामाणिकपणे आणि चिकाटीने केला तर तो नक्कीच चांगला बहरतो, अनेकांच्या हाताला काम मिळवून देतो, शेकडो मध्ये सुरु झालेला प्रवास लाखो-करोडोंच्या उलाढाली करून दाखवतो. आजच्या वाढत्या बेरोजगारीच्या काळात👇
स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय सुरु करून त्याला मेहनीतीची जोड दिल्यास नक्कीच रसाळ फळे खायला मिळतील यात शंका नाही. बारामती तालुक्यातील एका लहानश्या खेड्यातील #सचिन_घाडगे यांनी ७ रुपये रोजंदारीवर सुरु केलेला प्रवास आता वार्षिक ९ कोटीच्या उलाढालीवर आणलाय.👇
त्यांच्याकडून नक्कीच प्रेरणा घेता येईल. आई वडील दोघेही मजूर, वाट्याला फक्त १७ गुंठे शेती, सगळं कुटुंब दुसऱ्याच्या शेतात खुरपायला जायचं. सचिन सकाळी ७ ते १० मजुरी करायचे, तिथून घरी येऊन, आवरून मग शाळेला जायचे. या मजुरीचे ७ रुपये त्यांना मिळायचे. व्यवसाय करण्याची जिद्द मनात होती👇
ज्या काळात मराठ्यांच्या राज्यातील प्रशासनात मराठ्यांनाच काही अधिकार नव्हते, क्षत्रियांची गणती सुद्धा शुद्रांमध्येच केली जात होती त्या काळात शाहू महाराजांनी मराठ्यांना आणि बहुजन समाजाला प्रशासनात जागा दिली, क्षत्रियांना वेदोक्ताचे अधिकार मिळवून दिले आणि ब्राम्हण, युरोपीय आणि 👇
पारशी लोकांच्या मक्तेदारीला सुरुंग लावला. स्वातंत्र्याचा व्यापक अर्थ घेतला तर मला इथे शाहू महाराज #खऱ्या_स्वातंत्र्याचे_शिल्पकार वाटतात.
छत्रपती घराण्याचे ऐतिहासिक महत्व बघता मराठा संस्थानांमध्ये कोल्हापूरचे संस्थान अव्वल दर्जाचे असायला हवे होते, 👇
मात्र अल्पवयीन छत्रपतींच्या कारकिर्दीमुळे ही प्रतिष्ठा खालच्या स्तरावर गेली होती. छत्रपती फक्त नावाचे आणि कारभार ब्रिटिश नोकरशाहीच्या / परकीयांच्या हातात अशी राज्याची परिस्थिती होती. कोल्हापूर दरबारात ७१ सरकारी अधिकाऱ्यांपैकी ६० ब्राम्हण आणि ११ इतर आणि 👇