भारताला शेतकरी आंदोलनाचा फार मोठा इतिहास आहे. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, स्वामी साहजानंद सरस्वती, प्रोफ. एन जी रंगा, सर छोटूराम, चौधरी चरणसिंग, महेंद्रसिंग टिकैत अशा अनेक दिग्गजांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी आंदोलन केलेले आहे. 👇
इंग्रजांपासून ते तत्कालीन काँग्रेस सरकारपर्यंत जेव्हा जेव्हा शेतकरी आंदोलने झाले तेव्हा सरकार शेतकऱ्यांसमोर झुकले, पण कधी आंदोलक शेतकऱ्यांना खलिस्तानी अतिरेकी, लाल बावटे, देशद्रोही, विरोधी पक्षाने प्रेरित ठरवण्याचा प्रयत्न झाला नाही.
१९८७ साली केंद्रात काँग्रेसचे/राजीव गांधी 👇
यांचे बहुमताचे सरकार होते तर उत्तरप्रदेशात काँग्रेस नेते वीरबहादूर सिंग मुख्यमंत्री होते. पश्चिम उत्तरप्रदेशातील मुजफ्फरनगर मधील कर्नूकखेडी गावात शेतीला वीज मिळण्याबाबत काहीतरी समस्या निर्माण झाली. त्याचवेळी विजेचे दर सुद्धा वाढवले गेले होते. 👇
१ एप्रिल १९८७ ला शेतकरी नेते महेंद्रसिंग टिकैत यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी पोलीस आणि शेतकरी यांच्यात संघर्ष उद्भवला आणि यात २ शेतकरी मृत्युमुखी पडले. विरबहादूर सिंग सरकार शेतकऱ्यांपुढे नमले आणि त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या. 👇
Power Station दुरुस्त झाले, शेतकऱ्यांची विजेची समस्या सुटली सोबतच विजेचे दर सुद्धा कमी झाले.
जानेवारी-फेब्रुवारी १९८८ मध्ये शेतमालाच्या किमती ठरवण्यावरून महेंद्रसिंग टिकैत यांच्या नेतृत्वात शेतकरी पुन्हा एकदा आंदोलनात उतरले. हे आंदोलन जवळपास ४४ दिवस चालू होते. 👇
काँग्रेसचे मुख्यमंत्री वीरबहादूर सिंग स्वतः आंदोलन स्थळी शेतकऱ्यांना भेटायला आले, त्यांच्याशी चर्चा केली आणि शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.
स्वतंत्र भारतातील सर्वात मोठे शेतकरी आंदोलन म्हणून ओळखले जाणारे आंदोलन २५ ऑक्टोबर १९८८ रोजी महेंद्रसिंग टिकैत यांच्या नेतृत्वात झाले. 👇
आपल्या ३५ मागण्या घेऊन शेतकऱ्यांचा विराट मोर्चा दिल्लीच्या बोट क्लब वर येऊन धडकला. लोणी बॉर्डरवर हा मोर्चा थांबवण्याचे प्रयत्न झाले, पोलिसांनी गोळीबार केला, यात २ शेतकऱ्यांनी आपला जीव गमावला, पण मोर्चा थांबला नाही. दिल्लीच्या बोट क्लब वर ट्रॅक्टर, ट्रॉली आणि बैलगाड्या 👇
यांची मोठी गर्दी झाली. या आंदोलनात १४ राज्यांतील जवळपास ५ लाख शेतकरी सहभागी झाले. शेतकरी नेत्यांनी राष्ट्रपतींसोबत चर्चा केली, लोकसभा अध्यक्षांसोबत चर्चा केली पण तोडगा निघाला नाही. ३० ऑक्टोबर १९८८ ला शेतकऱ्यांवर लाठीचार्ज झाला पण शेतकरी मागे हटले नाहीत.👇
३१ ऑक्टोबरला इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम बोट क्लब वर होणार होता पण शेतकरी मागे हटायला तयार नव्हते. कार्यक्रमाची जागा बदलण्यात आली. काँग्रेस सरकारमधील सर्वच मोठमोठे नेते आंदोलकांना भेटले आणि राजीव गांधी सरकारने शेतकऱ्यांसमोर नमते घेतले.👇
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या गेल्या आणि हे आंदोलन शांत झाले.
ही शेतकरी आंदोलने काँग्रेसच्या विरोधात झाली, यामध्ये कोणत्याही काँग्रेस नेत्याने किंवा समर्थकाने शेतकऱ्यांना खलिस्तानी, अतिरेकी, लाल बावटे, भाजप समर्थक, संघी, देशद्रोही म्हणून हिनवले नाही. 👇
काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करत त्यांच्यासमोर झुकण्यात कमीपणा मानला नाही.आज शेतकरी आंदोलनाचा ६१वा दिवस असेल, मोदी सरकार हरप्रकारे हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत आहे पण शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करून ३ शेती कायदे मागे घेत नाही. शेतकऱ्यांसमोर नमते घेणे सोडाच,👇
हे शेतकऱ्यांना देशद्रोही म्हणू लागले आहेत.हा सत्तेचा माज म्हणायचं की आणखी काही? ज्या जनतेने निवडून दिले,ज्या जनतेच्या राज्याचे तुम्ही पंतप्रधान आहात,ज्या जनतेच्या राज्याचे प्रधानसेवक म्हणून तुम्ही स्वतःला मिरवता त्या जनतेसमोर झुकण्यात पंतप्रधानांना कमीपणा का वाटावा? #दिग्विजय_004
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
खरंतर १८९६ सालीच शाहू महाराजांनी कोल्हापुरात उच्चशिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राजाराम कॉलेजला जोडून एक वसतिगृह स्थापन केले होते. यात सर्व जातीधर्माच्या विद्यार्थ्यांना प्रवेश होता. या वसतिगृहाचे व्यवस्थापन ब्राम्हण मंडळींकडे होते. शिक्षण ही आपलीच मक्तेदारी आहे 👇
अशी मानसिकता या मंडळींची होती त्यामुळे ब्राह्मणेतर मुलांची संख्या हळूहळू कमी झाली, कालांतराने ते वसतिगृह फक्त ब्राह्मणांचेच बनले. शाहू महाराजांच्या डोक्यात शिक्षण क्षेत्रातील ही मक्तेदारी नाहीशी करण्याबाबत चक्रे फिरत होती. याला वेग आला तो पी.सी.पाटलांमुळे (थोर कृषीतज्ञ).👇
मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पी.सी.पाटलांनी त्यांना आलेल्या समस्या शाहू महाराजांना सांगितल्या. गावाचा राजा समजल्या जाणाऱ्या पाटलांच्या पोरांना अशा समस्यांना सामोरे जावे लागत असेल तर मागासलेल्या जातींची काय अवस्था होत असेल या विचाराने महाराज अस्वस्थ झाले.👇
मासिक पाळीच्या दिवसांत स्त्री खरंच अपवित्र किंवा अशुद्ध असते का?
उत्तर : अजिबात नाही. मासिक पाळीचे चक्र महिन्याच्या पहिल्या दिवसापासून महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत चालूच असते, त्यामुळे रक्तस्राव होण्याच्या ४ दिवसांपुरती स्त्री अपवित्र आणि इतर दिवशी पवित्र असं असूच शकत नाही.👇
ज्याप्रमाणे आपण अन्न खातो, ते पचवतो त्यातून ऊर्जा तयार होते आणि नको असलेल्या गोष्टी आपले शरीर बाहेर फेकते, हे जसे एक चक्र आहे तसेच मासिक पाळी हे देखील एक चक्र आहे. साधारण २८ ते ३२ दिवसांचे हे चक्र असते, ज्यामध्ये स्त्रीबीज तयार होऊन त्याची वाढ होते. 👇
परिपक्व झालेले स्त्रीबीज मासिक पाळीच्या शेवटच्या टप्प्यात रक्तस्रावाच्या स्वरूपात बाहेर फेकले जाते आणि पुन्हा नवीन स्त्रीबीज निर्माण होऊन परिपक्व होण्याची प्रक्रिया सुरु होते. ही सगळी प्रक्रिया का होते? तर गर्भधारणेसाठी होते. गर्भधारणा झाली नाही तर मग ते स्त्रीबीज शरीराबाहेर👇
#राजर्षी_विरुद्ध_लोकमान्य #शत्रुत्व_आणि_ममत्व
गेल्या शतकातील पहिल्या दोन दशकात महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर छत्रपती शाहू महाराज आणि लोकमान्य टिळक या दोन महापुरुषांचा उदय झाला. शाहू महाराजांना राजकीय स्वातंत्र्यापेक्षा मानवमुक्ती करणारे स्वातंत्र्य आणि 👇
सामाजिक सुधारणा जास्त महत्वाच्या वाटत होत्या तर लोकमान्य टिळकांना राजकीय स्वातंत्र्य अधिक गरजेचे वाटत होते. ही दोन्ही स्वातंत्र्ये एकमेकांस पूरक आहेत याची जाणीव या दोन्ही महापुरुषांना होती तरीही एकमेकांच्या हातात हात घालून काम करण्याऐवजी एकमेकांशी दोन हात करण्याची परिस्थिती 👇
त्यांच्यासमोर उभी राहिली हे खरंतर महाराष्ट्राचं दुर्दैव. तसं पाहिलं तर लोकमान्यांच्या मनात कोल्हापूरच्या गादीविषयी प्रचंड आदर होता. या आदरापोटीच त्यांनी व आगरकरांनी चौथ्या शिवाजी महाराजांवर होणाऱ्या अत्याचाराला 'केसरी' मधून वाचा फोडली. यात त्यांना दिवाण बर्व्यांचा रोष 👇
दहावीला जरा बरे मार्क पडले म्हणून विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. काॅलेजच्या पहिल्याच दिवशी केसांत गुलाबाचं फुल माळून तु आली होतीस. तुझ्या देखण्या रूपाला गुलाबाच्या फुलाने साज चढवला होता. साध्या पंजाबी ड्रेस मध्ये तु खूपच भारी दिसायचीस. मी तेव्हाच तुझ्या प्रेमात पडलो होतो. 👇
वर्गात मी चौथ्या बेंचवर बसायचो आणि तिथून मुलींच्या ओळीत पहिल्या बेंचवर बसलेल्या तुला सारखं सारखं बघायचो. जगताप सरांनी तर खूप वेळा मला तुझ्याकडे बघत बसलेलो असताना पकडलंय. तु नेहमी केसांत गुलाबाचं फुल माळायचीस त्यावरून मी ओळखून गेलो की तुला गुलाबाचं फुल आवडतं. 👇
राहूल्याने मला आयडिया दिली आणि तुला गुलाबाचं फुल देऊन प्रपोज करायचं असं मी ठरवलं. बारावीची परिक्षा झाली तरी माझं धाडस काय झालं नाही. खचनाळे काकूंच्या दारातील गुलाबाचं फुल मी रोज चोरून आणायचो पण ते फुलं वहितच राहायचं, तुला देण्याचं धाडस कधी झालं नाही. निकालाची मी वाट बघत होतो. 👇
'क्षत्रीय कुलावतंस हिंदुपदपातशहा' अशी बिरुदावली असणाऱ्या छत्रपतींना एका भटजीने 'शूद्र' म्हणून हिणवले. इथेच वेदोक्ताची ठिणगी पडली आणि छत्रपती शाहू महाराज सामाजिक बंडखोरीस उद्युक्त झाले. १८९९ मध्ये कोल्हापुरात हे प्रकरण सुरु झाले, नंतर एक-दोन वर्षात याचा भडका उडाला आणि 👇
यातून तीव्र सामाजिक संघर्ष उभा राहिला. या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आणि शाहू महाराज हे बहुजन समाजाचे उद्धारक म्हणून जनतेसमोर आले.
हे प्रकरण समजून घेताना आपण आधी वेदोक्ताची पार्श्वभूमी समजून घेऊया.
वेदोक्त म्हणजे काय?
वेदोक्त म्हणजे वेदांत सांगितल्याप्रमाणे.👇
ब्राम्हण श्रेष्ठत्वाचा सिद्धांत समाजाच्या माथी मारण्यासाठी शेकडो वर्षांपासून धर्मशास्त्रांचे ग्रंथ, मनुस्मृती, पुराणे वगैरे निर्माण केली गेली. "ब्राम्हण व्यक्ती अविद्वान असो की विद्वान असो, ते मोठे दैवत आहे" असे मनुस्मृती मध्ये सांगितले गेले.👇
#नोकरी करण्यापेक्षा नोकरी निर्माण करणारे का होऊ नये? कोणताही व्यवसाय मनापासून, प्रामाणिकपणे आणि चिकाटीने केला तर तो नक्कीच चांगला बहरतो, अनेकांच्या हाताला काम मिळवून देतो, शेकडो मध्ये सुरु झालेला प्रवास लाखो-करोडोंच्या उलाढाली करून दाखवतो. आजच्या वाढत्या बेरोजगारीच्या काळात👇
स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय सुरु करून त्याला मेहनीतीची जोड दिल्यास नक्कीच रसाळ फळे खायला मिळतील यात शंका नाही. बारामती तालुक्यातील एका लहानश्या खेड्यातील #सचिन_घाडगे यांनी ७ रुपये रोजंदारीवर सुरु केलेला प्रवास आता वार्षिक ९ कोटीच्या उलाढालीवर आणलाय.👇
त्यांच्याकडून नक्कीच प्रेरणा घेता येईल. आई वडील दोघेही मजूर, वाट्याला फक्त १७ गुंठे शेती, सगळं कुटुंब दुसऱ्याच्या शेतात खुरपायला जायचं. सचिन सकाळी ७ ते १० मजुरी करायचे, तिथून घरी येऊन, आवरून मग शाळेला जायचे. या मजुरीचे ७ रुपये त्यांना मिळायचे. व्यवसाय करण्याची जिद्द मनात होती👇