तुम्ही विचार करत असाल की या शब्दाचा नक्की अर्थ काय होतो? तर या शब्दाचा अर्थ आहे 'स्तन कर/Breast Tax'. आता तुम्ही म्हणाल या विषयावर कोणी का करवसुली करेल?? तर तसंच आहे!
दक्षिण भारतातील त्रावणकोर राज्यातील ही घटना. जे सध्याच्या केरळ राज्यात आहे.
सुमारे १५० वर्षापूर्वी केरळ मधला मोठा क्षेत्रफळाचा भाग असणार्या त्रावणकोर (जे ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होते) राज्याच्या राजाने हा कर लागु केला.
त्याकाळी नाडर, थिया आणि एडवा अश्या क्षुद्र जातीतील स्त्रियांना स्तन झाकून ठेवण्यास बंदी होती.
त्यात जे गुलाम शेतमजूर होते त्यांना हा कर देणं अशक्य होते. पण एडवा आणि नाडर समुदायातील स्त्रिया बेळकाम (बांबू आणि नारळाच्या झावळ्यां पासून बनवल्या जाणाऱ्या वस्तू) आणि शेतमजूरी करून कर भरायचा प्रयत्न तर करायच्या, पण नेहमी कर देणं शक्यच नव्हतं.
स्तनकराचा मुख्य उद्देश्य जातीव्यवस्थेचा साचा कायम ठेवणे हाच होता. माणसांच्या कपड्यांवरून त्यांची जात ओळखली जायची.
तत्कालिन संपूर्ण भारताकडे पाहता, वर्णव्यवस्था/जातीव्यवस्था होती. त्यात पुरोहित ब्राम्हण, क्षत्रिय म्हणजेच त्रावणकोरचे राजे, वैश्य हे लोक राजकीय अधिपत्यात होते.
स्तनकर वसुली करण्यासाठी नेमलेले पुरोहित, मंत्री अथवा अधिकारी हे उच्च वर्णीय लोकंच असायचे.
मुलाकरम् ची रक्कम वसूल करताना हे लबाड आणि कर्मठ अधिकारी लोक सर्व दलित स्त्रियांना एका रांगेत उभं करून स्तनांचे परीक्षण करण्याच्या निमित्ताने निर्लज्जपणे
प्रत्येक स्त्रीच्या स्तनाला कामुक स्पर्श करत दोन्ही स्तनांच्या आकारानूसार आणि वजनानुसार कर आकारत होते.
यात फक्त दलित स्त्रियांनाच नव्हे तर उच्चवर्णीय स्त्रियांना सुद्धा हा कर द्यावा लागत असे. पण उच्चवर्णीयांमध्ये धनाची कमतरता नसल्याने ती गोष्ट बहुदा दिसण्यात येत नसे.
पण धार्मिक स्थळांमध्ये त्यांना देखील अर्धनग्न व्हावंच लागायचे. 'पुरुषसत्ताक संस्कृतीचं भान ठेवता यायला हवं' हा त्यामागचा हेतू.
पण त्याकाळी एडवा समुदायातील "नांगेली" नावाच्या महिलेने कर न भरता स्तन झाकण्याचा निर्णय घेतला. तिचा पती चिरूकंदनने देखील पूर्ण पाठींबा दर्शविला.
हे सर्व तिने स्वतःच्या अब्रू साठी नाही तर धर्म आणि जातीच्या नावाखाली महिलांशी अमानवीय कृत्य करणार्या समाजाच्या विरोधात, अत्याचारी आणि जाचक कायद्याविरुद्ध आवाज उठवला.
दुसर्या दिवसापासून तिने कपड्याने छाती झाकण्यास सुरुवात केली.
हि गोष्ट जेव्हा उच्च वर्णीय समाज कंटकांच्या नजरेत आली तेव्हा त्यांनी तिला विरोध करण्यास सुरूवात केली. तिने कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल 'स्तन कर' भरावा अशी अट घातली. नांगेलीने देखील ही अट मान्य केली.
काही दिवसांनी अधिकारी तिच्या घरी करवसुलीसाठी आले.
तिच्या स्तनांचे परीक्षण करून त्यांच्या आकाराच्या आणि वजनाच्या हिशोबाने कर देण्यास सांगितले. नांगेलीनेही त्यांचा तो किळसवाणा स्पर्श सहन केला. काही वेळातच, एका केळीच्या पानावर तिने आपले स्तन कापून ठेवले आणि कर स्वरुपात अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केले. ही घटना वाचतानाच इतकी भयानक
आणि हृदय पिळवटून टाकणारी आहे. प्रत्यक्षात किती भीषण घडलं असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो.
स्तन कापल्यामुळे नांगेली दारातच रक्ताच्या थारोळ्यात पडली. अति प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
नांगेलीच्या दाह संस्कारावेळी चिरूकंदनने नांगलीच्या जळत्या चितेत उडी घेतली. पुरुषाने सती जाण्याची हि सर्वात पहिली आणि हेलावून टाकणारी घटना होती.
ज्या जागी नांगेलीने हे शौर्य दाखवलं त्या जागेचं "मुलच्छीपुरम- The Land Of The Breasted Woman" असं नाव ठेवण्यात आलं.
ही प्रथा जवळपास १२५ वर्षे सूरू होती. त्रावणकोरच्या राणीनेसुद्धा ही यंत्रणा योग्य असल्याचे मानले.
या अवमानकारक कायद्याच्या विरोधात केरळमधील या जातीतील लोकांनी त्यांचा धर्म बदलला. ख्रिश्चन धर्म स्वीकारला. युरोपियन प्रभावामुळे त्यांची जागरूकता वाढली आणि जेव्हा महिलांनी
स्तनकराला विरोध केला तेव्हा त्यांच्यावर हल्ले होण्यास सुरवात झाली.
१८५९ साली जेव्हा ब्रिटीश गव्हर्नर चार्ल्स ट्रेवलियन यांनी हा कर रद्द करण्याचा आदेश दिला तेव्हा ते त्यानंतरही सुरूच राहिले.
त्यानंतर नादर स्त्रियांनी कपड्यांची शैली विकसित केली जी उच्चवर्गीय महिलांच्या शैलीप्रमाणेच होती. संघर्ष सुरूच होता. तथापि, १८६५ च्या आदेशानुसार प्रत्येकाला वरचे कपडे घालण्याचे स्वातंत्र्य मिळाले. दिवाण जर्मनी दास यांनी आपल्या "महाराणी" या पुस्तकातही या प्रथेचा उल्लेख केला आहे.
जर इथे आपल्या जगाच्या इतिहासाच्या दृष्टीने पाहिलं तर इतिहास नेहमीच पुरुषी मानसिकता लक्षात ठेवून लिहीला गेला आहे असंच दिसून येईल. त्यामुळेच की काय नांगेली नावाच्या महिलेची शौर्य गाथा ना कधी आपण इतिहासाच्या पुस्तकांत वाचली ना इतर कुठे.
इतकंच काय तर केरळ मधील पाठ्यपुस्तकात देखील या घटनेचा उल्लेख अथवा ती घटना अंतर्भूत केली गेली नाही.
पण हि घटना पाहता तुम्ही विचार करा की जातीव्यवस्था आणि तिची पाळंमुळं किती खोलवर रुजलेली होती आणि अजूनही आहेत.
आताही कुठे ना कुठेतरी प्रत्येकाच्या रक्तात किंचीतसा का होईना पण जातीय अहंकार हा दडलेला असतोच हे देखील तितकच सत्य आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर देखील यावर भाष्य करताना म्हणतात की...👇
"दक्षिण भारतामध्ये अस्पृश्यांना त्यांच्या कंबरेच्या वरच्या भागाला वरच्या भागाला झाकून टाकण्यास स्पष्टपणे मनाई करण्यात आली होती आणि अस्पृश्य स्त्रियांच्या बाबतीत त्यांना त्यांच्या शरीराच्या वरच्या भागाबरोबर जाण्यास भाग पाडले गेले होते."
जर अजूनही कोणाला वाटत असेल की जाती द्वेश होत नसेल, तर तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण आणि भारतातील तळागाळात डोकावून पाहण्याची गरज आहे. खालच्या जातीतील लोकांना काय भोग भोगावे लागतात हे त्यांचं त्यांनाच ठाऊक!
या साठी संत तुकारामांनी एक सुंदर असा श्लोक मांडलाय.. 👇
प्रत्येक मनुष्याचं अथवा जीवित प्राण्याचं सुखदुःख त्याच्या स्थितीच्या अनुभवाशिवाय कळत नाही...🙏
पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा।
जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे।।
मुलाकरम् या विषयावर योगेश पगारे यांनी एक लघुपट देखील बनवला आहे. त्या लघुपटाची युट्यूब लींक या थ्रेड सोबत जोडतेय.
👇
दोन दिवसांपूर्वी काही फेक हँडलस् वरून कोकणात धार्मिक द्वेष कसा पसरवता येईल व कशा प्रकारे हिंदू मुसलमान करून भावना भडकवण्याचा प्रयत्न केला गेला. पण आमच्यातीलच काहींनी हा प्रयत्न उधळून लावला.
कोकणात, तळकोकणापासून, राजापूर-रत्नागिरी भागात अनेक धर्मियांची धार्मिक स्थळं आहेत पण केव्हाच लोकांनी अंतर ठेवलं नाही एवढंच काय स्वातंत्र्य काळापासून कोकणातील शांतता कधीच भंग पावली नाही. काही तुटपुंज्या फेक हँडलस् ने द्वेष पसरवून काही घंटा फरक पडणार नाही,
खेडपासून सिंधुदुर्गातील सावंतवाडी पर्यंत हिंदू आणि मुस्लिम धर्मियांची प्रार्थना स्थळं आहेत पण पण तिथं पण लोक हौशीने सण साजरे करतात. एवढच काय सुफी संतांचे दर्गे आहेत लोकं तिथे देखील लोक श्रद्धेने भेट देतात.
दादर म्हटलं की खरेदी ही आलीच. तिथे पदपथावर बरेच विक्रेते असतात. पण त्यातला कोणता #विक्रेता#मराठी आहे कोणता परप्रांतीय कसं कळणार?
आजच आलेला #अनुभव
स्थळ: स्टार मॉलच्या समोरील पदपथ
➡️ एका विक्रेत्याकडे खरेदी करत असताना नेहमीप्रमाणे मराठीत बोलायला सुरुवात केली. 👇🏻
तो विक्रेताही माझ्याशी मराठीत बोलत होता. बाजूचा दुसरा विक्रेता आला आणि ते दोघेही गुजरातीत संवाद करू लागले. त्या दोघांना गुजरातीत संवाद करताना पाहून तिसर्या विक्रेता त्यांना म्हणाला, "तुम्ही दोघे काय बोलताय? आम्हाला समजेल असे हिंदीत बोला." (हे तो त्यांच्याशी हिंदीत बोलला)👇🏻
दुसर्या विक्रेता त्याला हिंदीत म्हणाला "काही नाही आम्ही आमच्या गावच्या वार्ता करतोय." पुन्हा तो ३रा विक्रेता त्यांना म्हणाला "हिंदीत बोला म्हणजे आम्हाला पण समजेल तुमच्या गावच्या वार्ता." गुजराती विक्रेता त्याला म्हणाला "आम्ही दोघे गुजराती मग आम्ही हिंदीत का बोलू? मला नाही येत"👇🏻