आपल्याच देशबांधवांना स्वातंत्र्याचे हक्क नाकारणाऱ्या, पण इंग्रजांकडे स्वातंत्र्याचे हक्क मागणाऱ्या लोकांविषयी
१. स्वामी विवेकानंद म्हणाले होते -
"भारताचा उद्धार करावयास हवा. गरिबांना पोटभर अन्न द्यावयास हवे. शिक्षणाचा प्रसार करायला हवा; आणि पुरोहितगिरी नष्ट करायला हवी. 👇
पुरोहितांचा जुलूम नको. सामाजिक अत्याचार नको..
इंग्रजांकडून अधिक सत्ता मिळावी म्हणून आपल्यातील काही खुळे तरुण सभा भरवतात. त्यांचे हे प्रयत्न पाहून इंग्रज लोक नुसते हसतात. ज्याला इतरांना स्वातंत्र्य देण्याची इच्छा नसते तो स्वतःच स्वातंत्र्याला लायक नसतो..! 👇
कल्पना करा,इंग्रजांनी सारी सत्ता तुम्हाला दिली तर परिणाम काय होईल?जे सत्ताधारी होतील ते बाकीच्यांना दडपून टाकण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्यापर्यंत काही ती सत्ता पोहोचू देणार नाहीत..!अशा गुलामांना सत्ता हवी असते इतरांना गुलाम बनविण्यासाठी."
- स्वामी विवेकानंदांची पत्रे, पृ.२९२.👇
२. राजर्षी शाहू महाराज म्हणाले होते -
"जर हल्लीची जातिव्यवस्थाच कायम राहिली तर ज्या रीतीने हल्ली सुराज्याची अर्थ समजला जातो ते स्वराज्य म्हणजे मूठभर लोकांच्या हाती सत्ता जाणे होय. याचा अर्थ मी स्वराज्याच्या चळवळीच्या विरुद्ध आहे, असे समजावयाचे नाही; हे मी पुन्हा एकवार सांगतो.👇
आम्हाला स्वराज्य पाहिजेच. पण...
इंग्रज अधिकाऱ्यांच्या हातून सत्ता काढून घेऊन ती विद्यासंपन्न अशा अल्पसंख्यांक ब्राम्हण वर्गाच्या हाती देणे मला बिलकुल पसंत नाही. परशुरामाच्या वेळेपासून आजपर्यंतचा इतिहास काय सांगतो?👇
विद्येचा महिमा फक्त आपणाकडे ठेऊन इतरांस विद्येपासून दूर ठेवण्याचा अखंड पद्धतशीर प्रयत्न करून ब्राम्हण ब्युरोक्रसीने या दक्षिणेत इतरांस गुलामांच्या स्थितीस कसे आणिले आहे, ही गोष्ट विसरणे फार कठीण आहे."
- क्रांतीसूक्ते, पृ. ७ व २१.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
राजर्षी शाहू महाराज आणि लोकमान्य टिळक यांचे पराकोटीचे शत्रुत्व जगजाहीर होते मात्र दोघेही एकमेकांचे मोठेपण जाणून होते. त्यामुळे एकमेकांवर प्रखर टीका करताना दोघांनीही कधीच मर्यादा ओलांडली नाही. ना शाहू महाराज टिळकांना कधी 'समाजद्रोही' म्हणाले, 👇
ना लोकमान्य कधी शाहू महाराजांना 'स्वराज्यद्रोही' म्हणाले. परंतु ही नैतिक मर्यादा टिळकांच्या निधनानंतर त्यांच्या शिष्यांना पाळता आली नाही. केळकर, खापर्डे, भोपटकर इत्यादी टिळक अनुयायींनी शाहू महाराजांविरुद्धची विखारी चळवळ कायम धगधगती ठेवण्यासाठी अखंड प्रयत्न केले. 👇
शाहू महाराजांना लोकांच्या नजरेत बदनाम करण्याचे अनेक प्रयत्न केले, १८ मे १९२१ रोजी तासगावात झालेली 'कुलकर्णी परिषद' त्यापैकीच एक.
१७ मे रोजी 'केसरी'चे संपादक केळकर यांनी खास अंक काढून शाहू महाराज आणि ब्रिटिश अधिकारी यांच्यात संस्थानातील दहशतवादी कारवाया निपटून काढण्यासाठी 👇
उत्तर : अजिबात नाही. जातिभेदाविरुद्ध लढणारा व्यक्ती एखाद्या जातीचा द्वेष करू शकेल काय? नक्कीच नाही.
मग ब्राम्हण आणि ब्राह्मणेतर असा संघर्ष का उभा राहिला?
शाहू महाराजांना समाजातील विषमता संपायची होती, 👇
जातीभेद संपवून मागासलेल्या जातींना त्यांचे सामाजिक हक्क मिळवून द्यायचे होते. ब्रिटिशांच्या काळात सर्व प्रशासनयंत्रणा ब्राम्हण समाजाच्या हातात होती कारण सरकारी नोकरी शिकलेल्याला मिळे आणि शिक्षण ही फक्त ब्राह्मणांचीच मक्तेदारी होती. शाहू महाराजांकडे राजसत्ता होती आणि 👇
सत्तेच्या जोरावर त्यांनी खंबीर पावले उचलून ही शिक्षणातली आणि प्रशासनातली ब्राह्मणांची मक्तेदारी मोडून काढली. बहुजन समाजातील मुलांनी शिक्षण घ्यावे यासाठी वसतिगृह चळवळ आणि अनेक शिक्षणविषयक कायदे / आदेश काढून शाहू महाराजांनी ब्राह्मणेतर समाजासाठी शिक्षणाची गंगा वाहती केली.👇
भारताला शेतकरी आंदोलनाचा फार मोठा इतिहास आहे. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, स्वामी साहजानंद सरस्वती, प्रोफ. एन जी रंगा, सर छोटूराम, चौधरी चरणसिंग, महेंद्रसिंग टिकैत अशा अनेक दिग्गजांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी आंदोलन केलेले आहे. 👇
इंग्रजांपासून ते तत्कालीन काँग्रेस सरकारपर्यंत जेव्हा जेव्हा शेतकरी आंदोलने झाले तेव्हा सरकार शेतकऱ्यांसमोर झुकले, पण कधी आंदोलक शेतकऱ्यांना खलिस्तानी अतिरेकी, लाल बावटे, देशद्रोही, विरोधी पक्षाने प्रेरित ठरवण्याचा प्रयत्न झाला नाही.
१९८७ साली केंद्रात काँग्रेसचे/राजीव गांधी 👇
यांचे बहुमताचे सरकार होते तर उत्तरप्रदेशात काँग्रेस नेते वीरबहादूर सिंग मुख्यमंत्री होते. पश्चिम उत्तरप्रदेशातील मुजफ्फरनगर मधील कर्नूकखेडी गावात शेतीला वीज मिळण्याबाबत काहीतरी समस्या निर्माण झाली. त्याचवेळी विजेचे दर सुद्धा वाढवले गेले होते. 👇
खरंतर १८९६ सालीच शाहू महाराजांनी कोल्हापुरात उच्चशिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राजाराम कॉलेजला जोडून एक वसतिगृह स्थापन केले होते. यात सर्व जातीधर्माच्या विद्यार्थ्यांना प्रवेश होता. या वसतिगृहाचे व्यवस्थापन ब्राम्हण मंडळींकडे होते. शिक्षण ही आपलीच मक्तेदारी आहे 👇
अशी मानसिकता या मंडळींची होती त्यामुळे ब्राह्मणेतर मुलांची संख्या हळूहळू कमी झाली, कालांतराने ते वसतिगृह फक्त ब्राह्मणांचेच बनले. शाहू महाराजांच्या डोक्यात शिक्षण क्षेत्रातील ही मक्तेदारी नाहीशी करण्याबाबत चक्रे फिरत होती. याला वेग आला तो पी.सी.पाटलांमुळे (थोर कृषीतज्ञ).👇
मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पी.सी.पाटलांनी त्यांना आलेल्या समस्या शाहू महाराजांना सांगितल्या. गावाचा राजा समजल्या जाणाऱ्या पाटलांच्या पोरांना अशा समस्यांना सामोरे जावे लागत असेल तर मागासलेल्या जातींची काय अवस्था होत असेल या विचाराने महाराज अस्वस्थ झाले.👇
मासिक पाळीच्या दिवसांत स्त्री खरंच अपवित्र किंवा अशुद्ध असते का?
उत्तर : अजिबात नाही. मासिक पाळीचे चक्र महिन्याच्या पहिल्या दिवसापासून महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत चालूच असते, त्यामुळे रक्तस्राव होण्याच्या ४ दिवसांपुरती स्त्री अपवित्र आणि इतर दिवशी पवित्र असं असूच शकत नाही.👇
ज्याप्रमाणे आपण अन्न खातो, ते पचवतो त्यातून ऊर्जा तयार होते आणि नको असलेल्या गोष्टी आपले शरीर बाहेर फेकते, हे जसे एक चक्र आहे तसेच मासिक पाळी हे देखील एक चक्र आहे. साधारण २८ ते ३२ दिवसांचे हे चक्र असते, ज्यामध्ये स्त्रीबीज तयार होऊन त्याची वाढ होते. 👇
परिपक्व झालेले स्त्रीबीज मासिक पाळीच्या शेवटच्या टप्प्यात रक्तस्रावाच्या स्वरूपात बाहेर फेकले जाते आणि पुन्हा नवीन स्त्रीबीज निर्माण होऊन परिपक्व होण्याची प्रक्रिया सुरु होते. ही सगळी प्रक्रिया का होते? तर गर्भधारणेसाठी होते. गर्भधारणा झाली नाही तर मग ते स्त्रीबीज शरीराबाहेर👇
#राजर्षी_विरुद्ध_लोकमान्य #शत्रुत्व_आणि_ममत्व
गेल्या शतकातील पहिल्या दोन दशकात महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर छत्रपती शाहू महाराज आणि लोकमान्य टिळक या दोन महापुरुषांचा उदय झाला. शाहू महाराजांना राजकीय स्वातंत्र्यापेक्षा मानवमुक्ती करणारे स्वातंत्र्य आणि 👇
सामाजिक सुधारणा जास्त महत्वाच्या वाटत होत्या तर लोकमान्य टिळकांना राजकीय स्वातंत्र्य अधिक गरजेचे वाटत होते. ही दोन्ही स्वातंत्र्ये एकमेकांस पूरक आहेत याची जाणीव या दोन्ही महापुरुषांना होती तरीही एकमेकांच्या हातात हात घालून काम करण्याऐवजी एकमेकांशी दोन हात करण्याची परिस्थिती 👇
त्यांच्यासमोर उभी राहिली हे खरंतर महाराष्ट्राचं दुर्दैव. तसं पाहिलं तर लोकमान्यांच्या मनात कोल्हापूरच्या गादीविषयी प्रचंड आदर होता. या आदरापोटीच त्यांनी व आगरकरांनी चौथ्या शिवाजी महाराजांवर होणाऱ्या अत्याचाराला 'केसरी' मधून वाचा फोडली. यात त्यांना दिवाण बर्व्यांचा रोष 👇