मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज नीती आयोगाच्या सहाव्या बैठकीत विविध मुद्दे मांडले. ही बैठक पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडली. राज्यातील विविध प्रकल्पांना केंद्रांकडून साह्य मिळणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. Image
उद्योग व्यवसायांच्या बाबतीत आपली स्पर्धा इतर देशांबरोबर असली पाहिजे,राज्यांमध्ये जीवघेणी स्पर्धा नको. केंद्राने कार्यक्षमता व गुंतवणुकीसाठी आकर्षकता अशा निकषांवर निकोप स्पर्धेला प्रोत्साहन द्यावे. काही राज्ये वीज सवलतीच्या, जागेच्या दराच्या ऑफर्स देतात. बार्गेनिंग केले जाते. Image
राज्यांत स्पर्धा जरूर असावी पण ती सवलती किती देतात अशी आर्थिक नसावी तर प्रशासकीय कार्यक्षमता व उपलब्ध सुविधांवर निकोप व्हावी. केवळ पैशाच्या स्वरूपात गुंतवणुकीचा विचार न करता रोजगार किती मिळेल याचाही विचार व्हावा. असे झाले तर खऱ्या अर्थाने आपण आत्मनिर्भर बनू. Image
आपल्याकडे अतिवृष्टी झाली तरच नुकसान भरपाईला पात्र ठरविले जाते मात्र हे चूक असून सततचा पाऊस किंवा अवकाळी पाऊस हे देखील नुकसान भरपाई मिळण्यासाठी पात्र ठरले पाहिजे. एनडीआरएफचे निकषही २०१५ चे असून ते बदलण्यासाठी केंद्राने पाऊले उचलावीत. Image
बदलत्या वातावरणानुसार शेतीची पद्धतही बदलावी लागेल असे सांगून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील विकेल तेच पिकेल या अभियानाची माहिती दिली. राज्यात विविध संशोधन संस्था तसेच विद्यापीठे आहेत. चांगल्या दर्जाचे व गुणवत्तापूर्ण संशोधन यादृष्टीने केंद्राने त्यांना आर्थिक व तांत्रिक सहाय्य करावे. Image
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत बदल करणे खूपच महत्वाचे आहे कारण पीक विमा कंपन्यांना भरपूर नफा होतो मात्र शेतकऱ्यांना त्या प्रमाणात नुकसान भरपाई मिळत नाही. या कंपन्यांना मिळणारा अतिरिक्त नफा परत सरकारला मिळाला पाहिजे.त्यांच्या नफा आणि नुकसानीचे काहीतरी प्रमाण निश्चित करणे गरजेचे आहे. Image
फळांवर विविध प्रक्रिया उद्योगांची उभारणी अधिक वेगाने व्हायला हवी तसेच उत्पादित मालाला बाजारपेठा उपलब्ध होण्यासाठी प्रत्यक्ष काही प्रयत्न होणे गरजेचे आहे असे सांगून मुख्यमंत्र्यांनी बाजारपेठ संशोधन खूप महत्वाचे आहे असे सांगितले. Image
कोकणात सुंदर निसर्ग संपदा आहे, मात्र विकासाच्या नावाखाली जंगले आणि पर्यावरणाचा ऱ्हास होता कामा नये. कोकणात मत्स्य व्यवसाय, पर्यटन, बंदरे विकास यामध्ये राज्य सरकार करीत असलेल्या प्रयत्नांना केंद्राने अधिक मदत करावी. Image
जंगले तोडून मोठमोठे रस्ते होत आहेत, पण पर्यावरणपूरक विकास झाला पाहिजे असे माझे मत आहे. केंद्राच्या सागरमाला योजनेत राज्याला पुरेशी मदत मिळाली तर बंदरांची शृंखला होऊ शकेल. प्रधानमंत्री मस्त्य संपदा योजनेत ४ मोठे मस्त्य बंदर व १९ फिश लँडिंग सेंटर्सच्या प्रकल्पांना मंजुरी मिळावी. Image
जय जवान, जय किसान यासोबतच जय कामगार अशी घोषणाही महत्वाची आहे. शेतकरी पीक पिकवतो व खाऊ घालतो,जवान देशाचे संरक्षण करतात तसेच कामगार अर्थचक्र चालवतो. त्यांना पुरेसे संरक्षण मिळालेच पाहिजे. उद्योगांतून केवळ किती भांडवल येते हे महत्वाचे नाही तर रोजगार निर्मिती किती झाली हे महत्त्वाचे. Image
कोविडचा लढा संपलेला नाही. आपणही व्हीसी वगैरेंच्या माध्यमातूनच भेटतो आहोत. कार्यालयीन वेळच्या बाबतीतही पारंपरिक १० ते ५ ही मानसिकता बदलून वेगवेगळ्या कार्यालयीन वेळांचे नियोजन करणे गरजेचे आहे त्यासाठी केंद्राने राष्ट्रीय धोरण आखावे असेही मुख्यमंत्री म्हणाले. Image
गेल्या वर्षभरात माहिती तंत्रज्ञानावर भरपूर भर दिला असून इंटरनेट सुविधा सर्व गावांमध्ये पोहचणे आमचे उद्दिष्ट्य आहे.भारतनेटच्या माध्यमातून इंटरनेट सुविधा जाळे पसरवणे सुरू असले तरी अजून दुर्गम भागातील २५०० पेक्षा जास्त गावे व खेड्यांमध्ये इंटरनेट व मोबाईल कनेक्टिव्हीटी पोहचली नाही. Image

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with CMO Maharashtra

CMO Maharashtra Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @CMOMaharashtra

21 Feb
CM Uddhav Balasaheb Thackeray’s address to state today;

We are meeting after several days. You may be aware of the reasons for today’s meeting.
I wanted to meet you for reasons apart from Corona. But you are not at home nowadays. No one wants to sit at home for no reason, including myself. Of course, these restrictions were necessary.
In the first week of March, Maharashtra will complete a year since the first Corona patient was detected.

The other day, someone asked me about my most satisfying moment in those difficult days of the lockdown. I said it was that you all accepted me as a member of your family.
Read 23 tweets
19 Feb
CM Uddhav Balasaheb Thackeray’s welcome address at the @nasscom Technology & Leadership Forum; Image
It gives me immense pleasure that the state of Maharashtra is hosting the 29th Chapter of the Nasscom Technology Leadership Forum. The 3-day forum first time in 30 years is completely virtual. Image
It is a testament to the exponential technology adaption that has helped the world survive the pandemic. The new information technology has propelled both India and Maharashtra as technology hubs poised for growth in 2021 and beyond. Image
Read 18 tweets
19 Feb
शिवनेरी किल्ल्यावरील शिवजन्म सोहळ्याप्रसंगी माननीय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले… Image
शिवराय आणि जिजाऊंचा आशीर्वादाने आणि तुमच्या प्रेमाने यंदा हे दुसरं वर्ष आहे, या सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे भाग्य आम्हाला लाभलेलं आहे. शिवरायांसमोर नतमस्तक व्हायला शिवजयंतीच असली पाहिजे असं काही नाही. आपल्या मनात, हृदयात त्यांचं एक अखंड एक स्थान आहे. Image
कुठेही, कधीही, कोणत्याही कामाला निघताना छत्रपतींचं स्मरण नकळत होतं. कोणतंही चांगलं किंवा पवित्र काम करताना छत्रपती शिवराय आठवतात. ते आपल्या धमन्यांमध्ये, रक्तात आहेत. आपण या मातीची लेकरं आहोत. Image
Read 10 tweets
20 Dec 20
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी पुढीलप्रमाणे मुद्दे मांडले:
मी आजपर्यंत जे जे आपल्याला सांगत आलो, ते ते आपण मनापासून अमलात आणत गेलात आणि म्हणूनच मी म्हणेन की आजच्या परिस्थितीवर आपण पूर्णपणे काबू मिळवला नसला तरी काही प्रमाणात नक्कीच नियंत्रण मिळवलं आहे.
जवळपास सर्व गोष्टी आता उघडलेल्या आहेत. रहदारी सुरू झालेली आहे, कारभार सुरू झालेले आहेत, येणं-जाणं भेटणं याही गोष्टी सुरू झालेल्या आहेत. मात्र आपला कुटुंबप्रमुख म्हणून प्रत्येक पावलावर सावध रहा हे सांगणं माझं कर्तव्य आहे.
Read 31 tweets
22 Nov 20
CM Uddhav Balasaheb Thackeray’s address to the state today;

I would like to thank you all for your cooperation in not bursting crackers during Diwali and celebrating it in a disciplined manner like all other festivals.
Places of worship have reopened but let’s ensure we carry out festivities and celebrations without forming crowds.
With your cooperation, the My Family My Responsibility campaign has been successful and vital in curbing COVID-19 cases. I would like to thank all the doctors, medical staff, officers and all essential staff for their efforts and bravery in making it successful.
Read 10 tweets
22 Nov 20
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी पुढीलप्रमाणे मुद्दे मांडले:
काल मी हुतात्मा चौक येथे गेलो होतो. संयुक्त महाराष्ट्रामध्ये ज्यांनी बलिदान दिले, त्यामुळे ही राजधानी आपल्याला मिळाली. ४ दिवसांनी २६ नोव्हेंबर येतोय. तोही एक वेगळा लढा होता. मुंबईत घुसलेल्या पाकिस्तानी अतिरेक्यांना बहाद्दर पोलिसांनी, NSG कमांडोंनी तिथे जाऊन ठोकून काढले.
ज्या ज्या वेळेला आपण असा लढा दिला त्या, लढ्यात आपण यश मिळवलं. कारण आपली जिद्द! एकदा का महाराष्ट्राने काही करायचं ठरवलं की महाराष्ट्र करून दाखविल्याशिवाय राहत नाही. हा आजपर्यंतचा इतिहास आहे आणि त्याच इतिहासाची पुनरावृत्ती कोरोनाबरोबरच्या लढाईमध्ये करायची आहे.
Read 18 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!