महात्मा फुले - ख्रिस्तीधर्मप्रसारक ही हिंदुत्ववाद्यांची कुजबुज आणि सत्यशोधन #Thread
विद्येविना मती गेली । मतीविना नीती गेली
नीतीविना गती गेली । गतीविना वित्त गेले ।
वित्ताविना शूद्र खचले । इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वरील विवेचनातून
एकोणिसाव्या शतकात बहुजनांच्या परिस्थितीचा अंदाज आपण बांधू शकतो.
महात्मा फुलेंच्या मतानुसार व समकालीन वाङमयानुसार बहुजनांवर झालेल्या ब्राम्हणी अत्याचाराची कल्पना येते.
वेगवेगळ्या ग्रंथाद्वारे व कुप्रथाद्वारे ब्राम्हणांनी बहुजनांना शुद्र ठरविले.
त्याप्रमाणे त्यांना वागणूक दिली. ब्रम्हवृंदाचे उच्चत्व बहुजनांना शुद्र म्हणून खपवले. सरकारी कचेरीत ब्राह्मण कर्मचाऱ्यांनी इंग्रजांना हाताशी धरून शुद्रांवर आत्यंतिक अत्याचार केले.
लग्न,मुंज,वास्तुशांत, पुजा यामध्ये शुद्रांना अक्षरशः लुटले.देवाची भीती घालून खंडणी वसूल केली गेली.
सत्यशोधक पद्धतीने १८८४ साली ओतूरच्या डुमरे पाटलांनी आपल्या मुलांचा विवाह केला होता त्यावेळी ग्रामजोश्याने त्यावर दक्षिणा दिली नाही म्हणून दावा ठोकला. विशेष म्हणजे जुन्नरच्या ब्राह्मण सबजज्ज ने याला मान्यता दिली.
म्हणजे दक्षिणा वसूल करणे हा ग्रामजोश्यांचा हक्क बनला होता.
अशा परिस्थितीत या ब्राम्हणी हिंदु धर्माबद्दल चिकित्सक हिंदूस चीड येणे साहजिकच आहे. यातून महात्मा फुलेंनी चळवळ उभी केली. शुद्रांना जगण्याचा अधिकार ब्राह्मणांच्या मर्जीवर होता. याविरुद्ध आवाज उठविणाऱ्यांना अनेकविध मार्गांनी नडले जाई. मरण्यापेक्षा जीवन वाईट केले जाई.
इंग्रजांनी नेमलेल्या कमेट्यांत मोठ्या प्रमाणात ब्राह्मण असत. वर्तमानपत्रे ब्राह्मण चालवत. मुद्रणालये ब्राह्मण चालवत. शाळेत शुद्रांना प्रवेश नसे. अशाप्रकारे शुद्रांना शिक्षणापासून वंचित ठेवले जाई. भटांच्या मते शुद्रांना अक्षरओळख करून द्यावी. त्यांना विद्या देऊ नये.
कारण त्यांना विद्या मिळाली तर आपल्या लबाड्या उघडकीस येतील याची त्यांना भीती होती. तसेच ते नोकऱ्या घेऊन आपला धिक्कार करतील.
ब्राह्मण, भट, जोशी, उपाध्ये इत्यादी लोकांच्या दास्यत्वापासून शूद्र लोकांस मुक्त करण्याकरिता व आपल्या मतलबी ग्रंथांच्या आधारे आज हजारो
वर्षे ते शूद्र लोकांस नीच मानून गफलतीने लुटीत आले आहेत, यास्तव सदुपदेश व विद्याद्वारे त्यांस त्यांचे वास्तविक अधिकार समजून देण्याकरिता म्हणजे धर्म व व्यावहारासंबंधी ब्राह्मणांचे बनावट व कार्यसाधक ग्रंथांपासून त्यांस मुक्त करण्याकरिता
काही सुज्ञ शूद्र मंडळींनी सत्यशोधक समाज तिथी २४ माहे सप्टेंबर सन १८७३ इसवी रोजी स्थापन केला.
सत्यशोधक समाजाने खालील कार्ये केली.
लग्ने-
लग्न हा भट, ब्राह्मण, जोशींचा पैसे लाटण्याचा कार्यक्रम असे. मांडवखंडणी, लज्जाहोम, कंकण सोडणे यात पैसा काढला जाई. नाहीतर लग्न तसेच ठेवले जाई. ती लग्ने लावण्याचे काम सत्यशोधक समाजाने केले.
शिष्यवृत्ती
शुद्रांनी शिक्षण घ्यावे म्हणून सत्यशोधक समाजातर्फे शिष्यवृत्ती दिली जाई. याचबरोबर पुस्तक वाटप, वर्तमानपत्र यासाठी सत्यशोधक समाजाने खर्च केला आहे.असे असताना आज महात्मा फुलेंना ख्रिस्तसेवक वगैरे म्हंटले जाते.त्याच्यासाठी सत्यशोधक प्रार्थना व लग्नाच्या अक्षदा देत आहे.
महात्मा फुलेंना त्याकाळी देखील नडण्यात आले व आजदेखील नडले जाते. नडणारे तेच आहेत जे पूर्वी होते. महात्मा फुलेंना त्याकाळी देखील फरक पडला नाही आणि आजही त्यांच्या विचारांवर फरक पडत नाही.
शेवटी महाराष्ट्राला त्यांच्या पुरोगामी विचारांचाच वारसा आहे.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
नेहरूंनी स्वत:च स्वत:ला भारतरत्न दिला असे सांगून नेहरूंवर टिका करणारे लेख पसरविण्याचे काम अनेक लोक करत आहेत.
नेहरूंचे स्वातंत्र्यलढ्यातील,संसदीय लोकशाहीच्या यशस्वी कार्यन्वयनातील व राज्यघटनेवर आधारीत जवाबदार राज्यपद्धती निर्मितीतील 👇
देशातील विविध उच्चशिक्षण संस्था,विज्ञानतंत्रज्ञान या क्षेत्रातील योगदान मोठे आहे.म्हणूनच त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणतात.नेहरू भारतरत्न हा सन्मान मिळण्यास नक्कीच पात्र होते.पणतत्पुर्वीच ते जगासमोर निव्वळ भारतीय नेते म्हणून नव्हेतर सबंध आशियाचे म्हणून विख्यात झाले होते. 👇
पुढेतर जगातील दिडशे पेक्षा जास्त राष्ट्रांचे नेते बनले,त्यामुळे ते भारतरत्न होणे ही सहज स्वाभाविक बाब होती.नेहरूंनी स्वातंत्र्यलढ्यात नऊ वर्षापेक्षा जास्त कालावधी कारागृहात व्यतित केला आहे,अशी व्यक्ती राष्ट्रपतींना, मला भारतरत्न प्रदान करा,अशी मागणी करेल काय? याचा विचार जाणकार
अर्णब गोस्वामीच्या लिक झालेल्या चॅटमधील काही ठळक मुद्दे :
- पुलवामा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर सुमारे ५० जवान शहीद झाले. त्या हल्ल्याचा विकृत अर्णब गोस्वामीला आनंद झाला. कारण त्यामुळे 'मोदी सरकार' बहुमताने निवडून येणार होते.
▪️पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्युत्तरादाखल 'एअर स्ट्राईक' होणार हे अर्नबला आधीच माहिती होते. हा तोच एअर स्ट्राईक ज्यात फक्त एक कावळा मेला. दहशतवादी यात मेल्याचे आजवर कुठलाही ठोस पुरावे नाहीत.
-भाजपसाठी जीवाचे रान करुन ट्विटरवर मोदी सरकारची चमची असलेली 'कंगणा रनौत' चवचाल आहे. ह्रितिक रोशन सोबत ती रिलेशन मध्ये होती. कंगणा मानसिकदृष्ट्या 'मनोरुग्ण / मनोविकृत' (Schizophrenic) आहे.
◆20 डिसेंबर 2019 ते 8 जानेवारी 2020 मधे इंडिया टुडेचा एक ओपिनियन पोल येतो त्यात नरेंद्र मोदींची लोकप्रियता प्रचंड घसरलेली दिसते.
◆2017 मधे 65% लोकप्रियता असलेल्या मोदींची लोकप्रियता जानेवारी 2020 मधे 46% वर येते.
◆2017 मधे 10% लोकप्रियता असणाऱ्या राहुल गांधीची लोकप्रियता -
20 जानेवारी 2020 च्या सर्वेमधे 34% पर्यंत येऊन पोहचते.
◆म्हणजे मोदी आणि राहुल गांधीच्या लोकप्रियतेमधे फक्त 12% चा फरक शिल्लक राहतो.
◆निवडणुकीच्या चार महीने आधी हा अंदाज होता म्हणजे निवडणूक जवळ येता-येता,मोदींची लोकप्रियता अजुन कमी होण्याची शक्यता होती.
◆त्याच पोल मधे बीजेपीला- 237 तर कांग्रेस आणि मित्र पक्षांना-166 जागा मिळतील असा अंदाज होता.
◆म्हणजे एकटया बीजेपीला एकहाथी सत्ता मिळणार नाही असा त्या सर्वेचा स्पष्ट अंदाज होता.
◆लोकसभेच्या आधी झालेल्या मध्यप्रदेश,राजस्थान,
छस्तीसगढ़च्या निवडणुकांचा अचूक अंदाज इंडिया टुडेच्या
"सावित्रीबाई किती देखण्या होत्या ना? महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांच्या सहजीवनाबद्दल मला अधिक माहिती सांगा"
- सोनिया गांधी
संसदेच्या प्रांगणात उभारलेल्या महात्मा फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या उद्धाटन समारंभाला देशातील सर्वोच्च पदांवरील अनेक नेते उपस्थित होते. त्यांना या
दांपत्याच्या जीवन, कार्य आणि विचारांचा परिचय करून देणारे एक भव्य प्रदर्शन कार्यक्रमाच्या ठिकाणी उभारलेले होते. त्या प्रदर्शात सोनियाजी सुमारे एक तास रमल्या होत्या. त्यांनी त्यासाठी दिलेला एव्हढा वेळ बघून त्यांच्यासोबत असलेले डॉ.मनमोहन सिंग आणि मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनाही
आश्चर्य वाटले. प्रत्येक छायाचित्र काळजीपुर्वक पाहिल्यानंतर त्या त्याबद्दल अधिक माहिती विचारत होत्या. महात्मा फुले यांचा मूळ फोटो पाहिल्यावर त्यांनी विचारले, "हा फोटो कधी काढलेला आहे? यावेळी जोतीरावांचे वय काय होते?"
मी त्या फोटोची तारीख, वार आणि वेळ सांगताच त्या म्हणाल्या, " ही
आंबेडकरांचे हे भाषण आजच्या स्थितीला अत्यंत चपखल लागु पडतंय.
लोकशाहीच्या संवर्धनात आस्था असणाऱ्या सर्वांना जॉन स्टुअर्ट मिल यांनी दिलेला सावधगिरीचा इशारा आपल्याला लक्षात ठेवावा लागेल.त्यांच्या मते, लोकांनी आपले स्वातंत्र्य कितीही मोठा माणूस असला तरी त्याच्या चरणी अर्पण करता कामा
नये. तसेच त्याच्यावर इतका विश्वास ठेवू नये, की जेणे करुन त्याला प्राप्त अधिकारांचा तो लोकांच्या संस्था उदध्वस्त करण्यासाठी उपयोग करील. संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी व्यतित केलेल्या महापुरुषांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात काहीच गैर नाही.
परंतु कृतज्ञता व्यक्त करण्यालाही मर्यादा असल्या पाहिजेत. आयरीश देशभक्त डॅनियल ओकॉनेल यांनी समर्पकपणे म्हटल्याप्रमाणे, “कोणताही माणूस स्वाभिमानाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करु शकत नाही, कोणतीही स्त्री स्वत:च्या शीलाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करु शकत नाही आणि कोणताही देश
महासागरात उसळतंय स्वत:च्या
धुंदीतलं एक गर्विष्ठ जहाज....
त्याच्या टोकावर सुरक्षित पट्टे बांधून
उभा आहे एक
जहाजाहून अधिक गर्विष्ठ फिडलर...
ज्याला वाटतंय,
त्याच्या हातांच्या लयकारीनेच
समुद्र नाचतोय
त्याला हवा तसा !
ज्याला वाटतंय,
सारा महासागर अंथरलाय
आपल्याच बापानं केवळ
आपल्या जहाजासाठी...
ज्याला वाटतंय,
आपलं या टोकावरील
उभं राहून फिडल वाजवत राहणं
हेच या संस्कृतीचे संचित.
ज्याला वाटतंय,
आपल्या साध्या शिंकेलाही
तळातले करोडो मूर्ख दगड
देवू लागले आहेत
टेन कमान्डमेन्ट्सचा दर्जा..
ज्याला वाटतंय,
आपल्याच लयीच्या भारामुळे
जहाज होत राहतंय वरखाली.
झुलत राहतंय
आपल्याला हवं तसं.
ज्याला वाटतंय,
प्रत्येक तयार होणाऱ्या लाटा
निर्माण करीत आहोत आपण
केवळ काही हातवाऱ्यांतून,
पोषाखातून,
स्वत:लाही न आकळलेल्या भाष्यातून.
आणि
जहाजाच्या काठावर सभोवताल
उभीआहेत या फिडलरच्या
सगळ्या समजुतींना
तितक्याच कर्कश्श सुरात
समूह साथ द्यायला