बुद्धिभेदाचे दिवस संपले जीं - पार्ट २

बरेच दिवस लावले पुरावे गोळा करायला कुलकर्णीजीं?

सर्वात आधी “आपण” एका महत्वाच्या विषयाला भिऊन (सोफिस्टिकेटेड भाषेत फार तर विसरला असं म्हणू !) अगदी स्पर्शही करायचंही धाडस केलं नाही, त्या आपण जाणून बुजून लपवू पाहत असलेल्या आणि
1/n
आपल्या थ्रेड मध्ये मुद्दाम "न उल्लेखिलेल्या" मुद्द्यास एकदा उद्घृत करू

सावरकरांनी शिवरायांवर लिहून ठेवलेले उच्च तत्वज्ञान -
१)शिवरायांनी स्थापिलेले स्वराज्य म्हणजे कावळा फांदीवर बसायला आणि फांदी तुटायला असा "काकतालीय योग" होता
2/n
२)तसेच शत्रूच्या सुनेला आपल्यापुढे पेश केल्यावर तिची तुलना आपल्या "आई" बरोबर करून तिला बाइज्जत सन्मानाने तिच्या घरी सुरक्षेसहीत पोहोचवून संपूर्ण जगास नैतिकतेचा आदर्श मापदंड घालून देणाऱ्या शिवरायांस दिलेला बलात्काराचा निर्लज्ज आणि क्रूर सल्ला !
3/n
हे सगळं सोयीस्कररीत्या कसे विसरून जाता?

आता येऊ मूळ मुद्द्यावर ज्यासाठी हा सगळा लेखनप्रपंच मांडलाय

सर्वप्रथम नेमकं महात्मा जोतिबा फुलेंनी शोधलेल्या शिवरायांच्या समाधीची पार्श्वभूमी, इतिहास आणि योगदान विस्तृतपणे पाहू

याची सुरुवात होते सन १८१६ साली
4/n
ब्रिटिश इतिहास संशोधक जेम्स डग्लस याने शिवरायांप्रती असणाऱ्या उत्सुकतेपोटी रायगडास आणि शिवरायांच्या समाधीस भेट दिली होती ज्या भेटीच्या वृत्तांताचे वर्णन तो त्याने छापलेल्या "मुंबई वृत्तांतावरील पुस्तकात" (बुक ऑफ बाँबे ) अतिशय स्पष्टपणे करतो ते असे👇
5/n
"शिवबाच्या संबंधाची महाराष्ट्रीयांची अनास्था मोठी निंध्य आहे" (इथे महाराष्ट्रीय म्हणजे रायगडाचे तत्कालीन कारभारी)
[आता हा वृत्तांत आहे १८१६ सालचा (समाधीभोवती जंगली झुडपे येण्याआधी), त्यामुळे "समाधीची" चर्चा चालू असताना मधेच "सिंहासनाचा" विषय घुसडून वाचकांचा बुद्धीभेद
6/n
करण्याचे तंत्र थोडे जुनाट झाले आहे हे एव्हाना आपल्या लक्षात आलेच असेल त्यामुळे आता नवीन क्लुप्त्यांना जन्म द्यावा हि विनंती]

यानंतर श्री.विनायक दादाजी नावाचे मुंबईचे एक सत्यशोधक आणि दीनबंधू चे वर्गणीदार दीनबंधूकर्त्यास (केसरी ने छापण्यास नकार दिल्याने) १२ जुलै १ ८८५ मध्ये
7/n
पत्र पाठवून शिवरायांच्या समाधी जीर्णोद्धाराबद्दल तळमळ व्यक्त करतात ज्यामध्ये ते ब्रिटिश इतिहासकार "जेम्स डग्लस" याच्या पुस्तकातील मजकूराचाही (महाराष्ट्रीयांच्या शिवरायांप्रती अनास्थेसंदर्भात - इथे महाराष्ट्रीय म्हणजे रायगडाचे तत्कालीन कारभारी) उल्लेख करतात.
8/n
महात्मा जोतिबा फुलेंच्या उपस्थितीत शिवस्मारकासंबंधीची सभा पुण्यात चाफळकर स्वामींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेचाही उल्लेख आढळतो.
श्री विनायक दादाजी यांचे हे पत्र "दीनबंधू" ने छापल्यानंतर महात्मा फुलेंच्या वाचनात आले आणि ते "शिवसमाधी जीर्णोद्धाराचे" महान सामाजिक कार्य यशस्वी
9/n
करण्याच्या मागी लागले ज्यामधून सर्वप्रथम महात्मा फुले व न. ची. केळकर यांनी सर्वप्रथम "शिवस्मारकाची" कल्पना मांडली आणि त्यांच्या देखरेखीखाली १८८५ ला "शिवसमाधी जीर्णोद्धार आणि शिवस्मारकासंबंधीची" चळवळ महाराष्ट्रात चालू झाली !
यासंदर्भात दीनबंधू मध्ये महात्मा फुले लिहितात,
10/n
"पुण्यास आलो व शिवछत्रपतींच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी रायगडी जाण्यास निघालो, समाधीची जागा शोधण्यास २- ३ दिवस गेले. घाणेरी व इतर जंगली झुडपे कुऱ्हाडीने तोडीत तोडीत रस्ता काढावा लागला. ‘शिवजन्म उत्सव’ साजरा करावा म्हणून समाधीवरील सर्व कचरा धुवून काढून त्यावर फुले वाहिली”
11/n
ही सर्व हकीकत तेथील ग्रामभटास कळताच तो वर आला आणि म्हणाला,
"कुणबट शिवाजीच्या थडग्याचा देव केला मी ग्रामजोशी असता दक्षिणा, शिधा देण्याचे राहिले बाजूला, केवढा माझा अपमान !"
असे म्हणून त्याने लाथेने समाधीवरील फुले उधळून दिली.
12/n
'अरे कुणबटा, शिवाजी काय देव होता म्हणून त्याची पूजा केलीत? तो शूद्रांचा राजा, त्याची मुंजसुद्धा झाली नव्हती'
मी रागाने वेडा झालो. ज्यांच्या जीवावर पेशव्यांना राज्य मिळाले त्या शिवप्रभुंची पूजासामग्री या भटाभिक्षुकांनी पायातील पादत्राणाने लाथाडावी काय?
13/n
मी संतापून वेडा होऊन गेलो.
त्यांचे स्मारक म्हणून मी अल्प काव्य केले आहे, ते त्यांना समर्पित करतो (पोवाडा).
- महात्मा फुले (२७ मे १९३८ चा अंक, दीनबंधू, पुणे)
14/n
संदर्भ :
१)महात्मा फुले गौरव ग्रंथ, माधवराव बगल (महाराष्ट्र शासन)
२)शिवाजी विद्यापीठ, महात्मा फुले पीएचडी प्रबंध,डॉ.विजय गायकवाड
३)समग्र टिळक चरित्र (न. ची. केळकर)
15/n
महात्मा फुलेंचे लिखाण आणि आपण मांडलेल्या इतर “अतार्किक” गाष्टींवर आमचे “तर्क” आम्ही आधीच संदर्भासहित मांडलेले आहेत.
तर मग आता प्रश्न उरतो तो हा की महात्मा फुलेंवर आपण नेमकी आत्ता गरळ का ओकत आहात?
तर आम्ही एकाच निष्कर्षापर्यंत पोहोचतोय
16/n
तो हा की महात्मा फुलेंनी शिवरायांच्या समाधीवर वाहिलेल्या फुलांना पायाच्या पादत्राणाने लाथाडणारा रायगडावरचा ग्रामजोशी आणि आज महात्मा फुलेंवर गरळ ओकणारे आपण, दोहोंच्या मनातली मळमळ “एकच” जी अशापद्धतीने कधी कधी बाहेर पडत असते !
17/n
"फुले दाम्पत्याचं सामाजिक कार्य मोठं आहे, यात कसलीही शंका नाही" अशी सुरुवात करून सेफ साइड पुंगळी सोडायची आणि ओकायची तशी गरळ ओकायची, विषयच मुळात आपण "शिवसमाधी" शोधनावरून सुरु केला आणि सवयीप्रमाणे हळू हळू साहित्य, ज्ञानोबा, रामदास, परशुराम,वैकुंठ,गणपती, वारी, राम असे भारतभ्रमण
18/n
करून हळूच नेहमीच्या हिंदू मुस्लिम अजेंड्यावर घसरत पैगंबरांना चक्क "दानव" म्हणून मोकळे झाला !
बरं हे लिहितांनाही त्यांचं नाव आपण घेत नसता, का बरे? हीच का तुमच्या विचारांची स्पष्टता?
आपण लिहिताना पैगंबरांचा नाव घ्यायचं टाळता कारण आपले विचारच विद्वेषी आहेत जे आपणास हळुवार
19/n
न कळत पेरायचे असतात.
व्वा, "फुलेंना मोठं सामाजिक कार्य करणारे" म्हणत म्हणत तुम्ही पैगंबरांना हळुवार कधी "दानव" केलं हे वाचकांच्याही लक्षात आलं नसेल !
पण हा नालयाकपणा आमच्या नक्की लक्षात येतो बरं कुलकर्णीजीं !!
20/n
आपण अत्यंत खुबीने प्रत्येक चर्चा विनाकारण ब्राह्मणद्वेषावर नेऊन चिटकवता.
याबाबतीत आम्ही आधीच दिलेले मुद्दे अत्यंत सुस्पष्ट असून आपण खेळत असलेले "व्हिक्टिम कार्ड" आता पुरेसे बोथट झाले आहे.
वाचकांनी यासंदर्भातली आमची स्पष्ट मते तपासावीत.
21/n
तर आता मी आपणास काय म्हणू कुलकर्णीजीं?
शिवरायांच्या समाधीवर महात्मा फुलेंनी वाहिलेल्या फुलांना पायातील पादत्राणाने लाथाडणारे रायगडाचे "ग्रामजोशी" की फुलेंवर गरळ ओकणारे बेहरे?
फुलेंवर गरळ ओकणारे "गांगल"की आजकाल इतरांना “दानव”ठरवू पाहणारे "विद्वेषी कुलकर्णी"?
22/n
आता गणपती
सर्वात आधी आपण दिलेला "ओमकार प्रधान" अभंग हा मुळात तुकोबांचा नाहीच (कदाचित त्यामुळेच आपण त्याचा "सार्थ तुकाराम गाथेतील" संदर्भ दिला नसावा) आणि त्याची भाषाही शिवकालीन नाही.
माझ्याकडे उपलब्ध असलेल्या "तुकाराम गाथांमध्ये" अजिबातच नाही
23/n
हा, जर "तुमच्या छापखान्यात" छापल्या गेलेल्या "तुकाराम गाथेत" तो असेल तर त्याला "प्रक्षिप्त अभंग" म्हणतात.
"प्रक्षिप्त अभंग" म्हणजे मुद्दाम खोडसाळपणे घुसडले गेलेले अभंग.
जर आपणास महात्मा फुलेंच्या भाषेचं वावडं असेल तर मग तुम्ही तुकोबांच्या नादाला न लागलेलंच बरं कारण
24/n
तुकोबा तर सरळ सरळ शिव्याच देतात, आपणास नाही झेपायच ते !

…..अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड। काय त्यासी रांड प्रसवली।।
…...महारासी सिवे कोपे ब्राह्मण तो नव्हे। तया प्रायश्चित्त काही देहत्याग करीत नाही।।
…...भले तरी देऊ कासेची लंगोटी। नाठाळाचे माथी हाणू काठी।।
25/n
असे एक ना एक शेकडो अभंग सांगता येतील जे तुकोबांनी खास आपल्यासारख्या “नाठाळांसाठी” लिहिले आहेत !!
तुकोबाराय असोत किंवा फुले, त्यांच्या लिखाणाचा रोख हा ब्राह्मणवादी किंवा सनातनी प्रवृत्तीवरच होता, ब्राह्मणांवर नव्हे !
26/n
"यवन" शब्दावर घसरताना आपण फुलेंनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या तत्वांवर चालणाऱ्या "केळुस्करांचा"च दाखला देता त्यावेळी फुलेंची महत्ता आपणास आठवत नाही? बरं त्यावरही बोलायचं झाल्यास "यवन" सत्ताधीशांविषयी राग मनात होता आणि पुढे जाऊन स्वराज्यातीलच कुटील डाव करणाऱ्या
27/n
अष्टप्रधानमंडळातील आणि मंडळाबाहेरील स्वराज्य नासवणाऱ्या अनेक ब्राह्मण आणि मराठ्यांवर आपण काय बोलाल? त्यावेळी कोणता "यवन" स्वराज्याच्या जीवावर उठलेला?
कोणत्या "यवनांना" शंभूराजेंनी हत्तीच्या पायाखाली दिले?
स्वराज्याच्या जीवावर कधी "मुस्लिम शासक यवन" उठले तर कधी
28/n
अंतर्गत "हिंदू यवन"
एकीकडे ३५० वर्षे शंभूराजेंना "बदफैली, दारूबाज" म्हणून कुत्सितपणे हिणवायचे तर दुसरीकडे आपले अतार्किक मुद्दे सिद्ध करायला त्यांच्याच "बुधभूषण" चा आधार घ्यायचा !
बंद करा हे ढोंग !!
29/n
सत्तेच्या लढायांना आपण हळुवारपणे पांघरत असलेला "हिंदू-मुस्लिम" नावाचा शेला आम्ही चांगलेच जाणून आहोत !

आता शेवटचं
“राम”
वाचकांना आपण सतत "राम" या शब्दावर आमचा आक्षेप असल्याचा खोटा भास घडवता
आमचा राम सामाजिक न्यायाच्या तुकारामातला आहे !
30/n
"तुकाराम" मधला राम आणि "परशुराम" मधला राम हे दोन्ही वेगळे आहेत अध्यक्ष महोदय
आता हे राम नामासाठी खास (हे तुम्ही नाही वाचलं तरी चालेल कुलकर्णीजीं), वाचा
आमच्या २एप्रिल,२०२०रोजीच्या (miyodha.blogspot.com/2020/04/ )रामनामावरील "राम राम ते जय श्री राम - एक प्रवास" या लेखातील काही भाग
31/n
आपल्या भारतीय संस्कृतीत "राम नामाचे" महत्व हे निर्विवाद आहे. आपल्याकडच्या अनेक "हाय-हॅल्लो" मध्ये राम अगदी कम्फरटेबली बसलाय.
आम्ही लहानपानपासून गावाकडे "राम राम" म्हणून बोलायची सुरुवात करायला शिकलो. परगावच्या व्यक्तीला "राम राम पाव्हणं" म्हणायची आपली रीत म्हणजे तर प्रेमाची
32/n
आणि आपुलकीची एक लकेरच !
गावाकडे तर "राम राम" ही हाक अगदी सगळ्या जाती-धर्मातली लोकं प्रेमाने उच्चारतात
मोठा झाल्यावर वेगवेगळ्या राज्यांतील मित्र झाले. त्यांच्याकडेही पुन्हा तीच आपुलकी "राम नामात" वसलेली. त्यांच्या बोली भाषेत रुळलेला "राम" म्हणजे "जय सिया राम", "जय राम जी की"!
33/n
तर असा हा राम नामाचा अद्भुत महिमा भारतीयांच्या अगदी नसानसात भिनलाय .
पण गेल्या काही वर्षांमध्ये आमचा हा प्रिय "राम" कोणीतरी चोरून नेल्याची खंत मनात दाटू लागलीये. "जय श्री राम" नावाच्या "राजकीय" (मुस्लिमद्वेष वाढविण्यासाठी होत चाललेला वापर) घोषणेने आमचा "राम" बदनाम होत चाललाय
34/n
त्याचं नाव घेऊन "जय श्री राम" म्हणत लोकांच्या हत्या करण्याचं षड्यंत्र राजरोस रचलं जातंय, त्याचं नाव "जय श्री राम" नावाच्या घोषणेत वापरून द्वेषाची पेरणी करून जातीय दंगली घडवण्याचे विषारी मनसुबे भारतात सर्रास यशस्वी होत चाललेत.
35/n
एका मित्राचा मेसेज आला, "तुमच्या" गांधींच्याही तोंडात “राम”च असायचा”.
मी उत्तर दिले "मित्रा, बरोबर आहे तुझं, पण गांधींच्या रामाची कधी कोणाला भीती नाही रे वाटली !"
गांधींचा "राम" हाही तोच "राम" होता जो शेकडो वर्षांपासून आमच्या संस्कृतीत रुजलाय, ज्यानं
36/n
संबध भारतीयांना एकत्र बांधलंय आपल्या प्रेमळ हाकेने, त्याच रामाचं "रामराज्य" अपेक्षित होतं गांधींनाही !

पण ज्यावेळी आपली माणसे आपला "खरा राम" विसरून काही जणांनी बनवलेला "विध्वंसक" राम बोलायला लागतात त्यावेळी मात्र त्यांचा पद्धतशीररित्या केलेला बुद्धीभेद अगदी स्पष्ट
37/n
जाणवू लागतो, इतका की भीती वाटू लागते आणि काळजी वाटू लागते आपल्या "त्या" रामाच्या विटंबनेची, माणसं मारायला आणि दंगली घडवायला "राम नाम" वापरून त्याच्या केल्या जाणाऱ्या क्रूर थट्टेची !

तळमळीने सांगू वाटते, बाबांनो हा नाही आपला राम,
38/n
आपला राम तर वसलाय
"राम-राम", "जय सिया राम", "जय राम जी की" मध्ये !

चला त्याची उजळणी करू, चला आपल्या प्रेमळ रामाला पुन्हा न्याय देऊ, चला आपल्या महान संस्कृतीला पुन्हा जिवंत करू, चला पुन्हा प्रवास करू आपल्या "खऱ्या रामाकडे"!!
39/39
तळटीप:
डॉ.विजय गायकवाड यांच्या शिवाजी विद्यापीठ शोधनिबंधात (४/n) म्हटल्याप्रमाणे जेम्स डग्लस याने बघितलेली शिवसमाधीची दुरावस्था ही अगदी तशीच होती जशी १८१६ साली ब्रिटिशांनी रायगड ताब्यात घेतल्यावर होती
इथं अनेक जण इ.स. वर शब्दच्छल करू शकतात.
वाचकांनी बुद्धिभेदापासून सावध राहावे.
जेम्स डग्लस याने रायगडास भेट दिल्यानंतरची आणि इंग्रजांनी १८१६ ला रायगड ताब्यात घेतलेवेळची"दुरावस्था"एकसारखीच असल्याचे नमूद असल्याने ट्विट5/nमध्ये वृत्तान्तसमयीची अवस्था ही सुद्धा"रायगडाचे तत्कालीन कारभारी"यांच्यामुळेच झाली असल्याचे जाणीवपूर्वक लिहिले असल्याची वाचकांनी नोंद घ्यावी

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Kunal Anil Patil

Kunal Anil Patil Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @kunalanilpatil

20 Mar
बुद्धिभेदाचे दिवस संपले जीं
१)शिवरायांच्या मृत्यूनंतर त्यांची समाधी छत्रपती संभाजी महाराजांनी बनवली
१७३३ नंतर रायगड पेशव्यांच्या देखरेखीत असताना शिवरायांची समाधी ही पूर्णपणे भग्नावस्थेत आणि रानटी झुडपांमध्ये का दडली होती? त्याची इतकी वाईट अवस्था का झाली याची कल्पना केली तरी
1/n
उत्तरे आपोआप मिळत जातील
२)महात्मा फुलेंच्या पोवाड्यातील मोजका "यवन" हा शब्द उचलून हळुवार मुस्लिम द्वेषाची पेरणी करताना तुम्ही फुलेंच्याच पोवाड्याचा संदर्भ देता परंतु त्याच पोवाड्यातील आपल्या बापाचे सर्व हक्क मिळविण्यासाठी स्वतःच्या "आई" ची हत्या करणाऱ्या परशुरामाने केलेल्या
2/n
अत्याचारावर आणि त्याने माजविलेल्या गुंडगिरीमुळेच (पुंडाई) "यवनांचे" फावले ही मांडणी करणारा त्याच पोवाड्यातील उतारा मात्र सोयीस्कररीत्या विसरून जाता?
ऐसा कैसे चलेगा कुलकर्णीजी?
३)भगवदगीतेतील दडलेले तत्वज्ञान लोकभाषेत मांडणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी
3/n
Read 20 tweets
18 Mar
#Silent_Poison

Thread 2 : धार्मिक मालिका

शेतकरी आणि भारतीय सणांची व्युत्पत्ती

टीव्हीवरील धार्मिक मालिका चवीनं बघणाऱ्या प्रत्येकासाठी…

झी मराठीवर एका नव्या मालिकेची जाहिरात बघितली "घेतला वसा टाकू नको"
1/n
प्रत्येक सणामागच्या आख्यायिकांवर आधारित असणाऱ्या या मालिकेतील "पाडवा" या सणावरच्या एपिसोडचे ट्रेलर चालू झाले आणि त्यामध्ये हळूच "जय श्री राम" ची राजकीय घोषणा घुसडल्याचं निदर्शनास आलं
लहानपणापासून घरोघरी साजरा होणाऱ्या पाडव्यादिवशी आयुष्यभर कधीही, कोणीही "जय श्री राम" नावाची
2/n
राजकीय आरोळी ठोकल्याचं आमच्या अजिबात ऐकिवात नाही !
मग अचानक ही टूम कोणी आणि का उठवली?
प्रत्येक सणाची आख्यायिका आणि त्याचा धागा पकडून, "घेतला वसा टाकू नको" सारखं इमोशनल वाक्य फेकून लोकांना मनोरंजनाच्या माध्यमांतून सत्यापासून कोसो दूर घेऊन जाणारी यंत्रणा ‘१९२५ ते आजतागायत’
3/n
Read 23 tweets
8 Mar
#Silent_Poison

Thread 1 : Shekhar Gupta

If you are thinking (like me in the past) that Mr. @ShekharGupta is a very knowledgeable and a neutral personality then this thread is just for you…

So, get ready to be surprised
1/n
This guy works so hard to contextualize the hegemony of this government (working so hard cherry picking favourable data points, which is not an easy job!)
I seriously believe (with evidence) that Shekhar Gupta is a more precious asset than even the likes of Arnab or
2/n
even Suresh Chavanke (loose canons, who don't have any sane audiences' trust anymore)
What makes Shekhar Gupta so distinctly lethal is the fact that he cherry picks objective data to contextualize, justify & normalize every Modi-Made Disaster.
3/n
Read 22 tweets
19 Feb
#शिवाजी

कॉ गोविंद पानसरेंच्या "शिवाजी कोण होता" या पुस्तकाचा उल्लेख केला की पोरांना इमोशनल करायला काही दांभिक माणसं शिवरायांचा एकेरी उल्लेख, आदर वगैरेसारख्या पाणचट गप्पा मारतात !
ही तीच लोकं असतात जी पानसरेंचा खून "त्या" एकेरी उल्लेखातून झाला अशी अफवा उठवून
1/n
मूळ कारस्थानी "सनातन संस्थेला" वाचवायचा केविलवाणा प्रयत्न करतात
अशाच काही दांभिक लोकांनी एकदा शिवाजी विद्यापीठाचं नावही बदलायची टूम उठवली
या भामटेपणाचा समाचार घ्यायला आम्ही "शिवाजी विद्यापीठ - एक दर्जेदार नाव" हा ब्लॉग लिहिला होता (लिंक miyodha.blogspot.com/2019/12/blog-p… )
2/n
त्यातला काही भाग आणि आणखी काही उदाहरणे आज आपल्यापुढं मांडतोय...

आपल्या भगिनी हादग्यामध्ये गाणी म्हणतात - "शिवाजी अमुचा राजा, त्याचा तो तोरण किल्ला..."
अनेक वर्षांपासून आपण घोषणा देतोय - "...जय शिवाजी"
3/n
Read 8 tweets
8 Feb
"मार्केट कमिटी" म्हणजे काय? : सोप्या शब्दात

मूळ मेख कुठं आहे?

हमीभाव? बाजार? बंधनं? राजकारण? एमएसपी? एपीएमसी/मार्केट कमिट्या?

चला समजून घेऊ 👇
1/n
मार्केट कमिटीची (बाजार समिती) सोप्या शब्दातली व्याख्या

"शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव व वजन-मापं यावर नियंत्रण ठेवणारी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींची शासन निर्मित संस्था"!

शेतकरी, शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, व्यापारी,खरीददार व राज्य शासन या सर्वांचा मेळ घालून मार्केट कमिट्या चालतात
2/n
यामध्ये मुख्यत्वे २ प्रकारचे व्यापारी असतात : आडते आणि खरीददार
बाजार समित्यांचे लायसन्स असणारे अनेक आडते असतात ज्यांच्याकडे प्रतिनिधी म्हणून शेतकरी आपला शेतमाल लावतो. कोणत्या अडत्याकडे आपला माल द्यायचा हे सर्वस्वी शेतकऱ्यावर अवलंबून असते.
3/n
Read 24 tweets
31 Dec 20
31st special
👇 हे "विषारी पांडे"नं वाचलं नाही तरी चळवळीशी आत्मीयता असणाऱ्यांनी जरूर वाचावे !
हे आहेत "रज्जाक बादशाह मुल्ला", वय वर्षे ५२, रा कासेगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली.
३६ वर्षांपूर्वी (१९८४ साली) कर्मसंयोगानं त्यांनी व्यवसाय निवडला फोटो फ्रेम बनवायचा,
1/n
थोड्याच दिवसात त्यांच्या लक्षात आलं की अत्यंत भक्तिभावाने अनेक हिंदू बांधव त्यांच्याकडून देव-देवतांच्या फोटो फ्रेम बनवून घेऊ लागलेत
रज्जाक यांनी त्याक्षणी तीथूनपुढे आयुष्यभर शाकाहारी राहण्याचा निर्णय घेतला,
2/n
तेंव्हापासून तब्बल ३६ वर्षे कसल्याही मांसाहारी पदार्थाला त्यांनी चक्क साधा स्पर्शही केलेला नाही !
"माझ्या ग्राहकाच्या निगडित भावनांचा आदर एक व्यावसायिक म्हणून मी करायलाच हवा".. केवढा मोठा विचार ! केवढा मोठा त्याग !
3/n
Read 7 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!