25 नोव्हें1949 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत शेवटचं ऐतिहासिक भाषण दिलं होतं
त्यात त्यांनी जी चेतावणी दिली होती, जे इशारे केले होते ते स्वातंत्र्यानंतरच्या काळात अनेकदा सत्य ठरलेत आणि आजही ते सत्य ठरत आहेत 1/n
लोकशाहीचे अस्तित्व टिकविण्यासाठी फक्त एकच गोष्ट पुरेशी आहे ती म्हणजे महामानवाच्या विचारांवर विचार करणे, त्यांचा अंमल करणे कारण त्यांनी त्या भाषणात जे विचार, ज्या गोष्टीं मांडल्या त्या आजही अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. 2/n
डाॅ.बा.आंबेडकरांच्या भाषणातील लोकशाहीविषयी महत्त्वाचे मुद्दे👇
घटना राबविणारे वाईट वृत्तीचे असतील तर एखादी घटना कितीही उत्कृष्ट असली तरी ती वाईट ठरणार त्याप्रमाणे घटना राबविणारे चांगल्या वृत्तीचे असतील तर एखादी घटना कितीही टाकाऊ असली तरी ती उपकारकच ठरेल. 3/n #ThanksDrAmbedkar
भारताच्या लोकशाहीप्रणित घटनेचे काय होणार? भारत ही घटना शाबूत ठेलील की पुन्हा नष्ट करील? ज्या देशात लोकशाहीचा फार उपयोग करण्यात आलेला नाही त्या देशात लोकशाही ही नवीन चीज मानली जाते. अशा देशांपैकी भारत हा एक देश आहे. 4/n #ThanksDrAmbedkar #जयभीम
अशा प्रकारच्या देशातील लोकशाही आपला कारभार चालवीत असताना आपल्या जागेवर अधिष्ठित होण्यास हुकूमशाहीला आमंत्रण देण्याची शक्यता आहे. भारतात नवोदित झालेली लोकशाही आपले बाह्यांग शाबूत राखून ठेवू शकेल परंतु ती व्यवहारात हुकूमशाहीला आपली जागा बळकविण्यास वाव देईल, 5/n #ThanksDrAmbedkar
असा प्रकार घडुन येणे सर्वथैव शक्य आहे. लोकशाहीचे अस्तित्व आपणाला टिकवायचे असेल तर माझ्या मते आपण पहिली जी गोष्ट केली पाहिजे ती हि की आपले सामाजिक आणि आर्थिक उद्देश साध्य करण्यासाठी आपण फक्त सनदशीर मार्गाचाच अवलंब केला पाहिजे. 6/n
लोकशाहीचे अस्तित्व टिकविण्यासाठी आपल्याला दुसरी गोष्ट करायची आहे ती म्हणजे लोकशाहीचा झेंडा सतत उंच ठेवण्यास जे उत्सुक आहेत त्यांच्यासाठी जाॅन स्टुअर्ट याने जो भयसूचक संदेश दिला आहे तो पाळणे👇 7/n
"एखादा माणूस कितीही मोठा असला तरी त्याच्या चरणी आपल्या व्यक्तिस्वातंत्र्याची सुमने वाहु नयेत."
ज्यांनी आयुष्यभर आपल्या मायभूमीची सेवा केलेली आहे अशा थोर व्यक्तींबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे यात काही चूक नाही. परंतु कृतज्ञता व्यक्त करण्यालासुद्धा मर्यादा आहेत. 8/n #ThanksDrAmbedkar
या बाबत आयर्लंडचा देशभक्त डॅनियल ओकोनेल याने मार्मिकपणे म्हटलंय, "स्वाभिमानाचा बळी देऊन कोणताही मनुष्य कृतज्ञता व्यक्त करू शकणार नाही. शीलाला बळी देऊन कोणतीही स्त्री कृतज्ञ राहु शकणार नाही आणि स्वातंत्र्याचा बळी देऊन राष्ट्र कृतज्ञता व्यक्त करू शकणार नाही." #ThanksDrAmbedkar
9/n
या भयसूचक संदेशाची जरूरी इतर कोणत्याही देशापेक्षा भारत देशाला जास्त आहे. याचे कारण असे की, भारताच्या राजकारणात भक्ती किंवा व्यक्ती - महात्म-पूजा ही भावना जितकी थैमान घालते तितकी ती जगातील इतर कोणत्याही देशाच्या राजकारणात घालीत नाही. #ThanksDrAmbedkar #जयभीम
10/n
एखाद्याने राजकारणात भक्ती किंवा व्यक्ती - महात्म-पूजा दाखविली तर ती त्या राजकीय पंथात हुकूमशाहीची सत्ता प्रस्थापित करील.
लोकशाहीचे अस्तित्व अभंग राखण्यासाठी जी तिसरी गोष्ट आपणास करावयाची आहे ती ही की आपण राजकिय लोकशाही निर्माण करण्यासाठी झटले पाहिजे. #ThanksDrAmbedkar
11/n
सामाजिक लोकशाही म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याची जीवनतत्वे होत हे मान्य करणारी पद्धती. ही तत्वे त्रिवेणी संगमात ऐक्य साधून आणतात. ती एकमेकांपासून अलग केली तर लोकशाहीचेजीवनसत्त नष्ट केल्यासारखे होते.
आंबेडकरांच्या भाषणातील एकएक शब्दावर विचार करायची गरज आहे
खरंच आपण देशापेक्षा एखाद्या व्यक्तीला मोठं समजून लोकशाहीच्या ऱ्हासाकडे वाटचाल करत आहे का?व्यक्तीपुजा करताना आम्ही आमची बुद्धी पण गहाण ठेवत नाही ना?एखादा पंथ,धर्म देशापेक्षा वर होऊ पाहत असेल तर देशाचं पतन निश्चित
n/n #जयभीम
पुर्वी समग्र भारतातील कामगारांची स्थिती अत्यंत निराशाजनक होती. मालक- भांडवलदार वर्ग दुर्बल,असंघटित कामगारांना वाट्टेल तसा राबवित. कामगार संघटनासुद्धा मालकधार्जिन्या असल्यामुळे कामगारांचे अस्तित्व गोठवून टाकले #ThanksDrAmbedkar @LetsReadIndia 1/n
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कामगारांबद्दल आस्था होती. जिव्हाळा होता. कामगारांनी स्वाभिमानशून्यतेचे जीवन कंठणे नाकारले पाहिजे. प्रतिकार केला तरच शोषणाचे उच्चाटन होईल. अन्यथा गुलामीचे जीवन जगावे लागेल, असे त्यांचे स्पष्ट मत होते. 2/n #ThanksDrAmbedkar #जयभीम
आंबेडकरांनी १५ऑगस्ट १९३६ ला स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली.पक्षाचे धोरण स्वष्ट करण्यासाठी कर्मचारी परिषद १२,१३फेब्रु १९३८ला मनमाड येथे झाली. त्यावेळी त्यांनी अध्यक्षीय भाषणात म्हटले होते, ‘ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हे भारतीय कामगारांचे दोन शत्रू आहेत.’ 3/n #ThanksDrAmbedkar
पत्र तर नक्कीच लिहिले आहे पण फक्त आणि फक्त परिक्षेत औपचारिक आणि अनौपचारिक...😜
वास्तव जीवनात पत्र लिहिण्यासाठी ना कधी हाती पेन घेतला ना कधी माझ्यासाठी हाती एखादं पत्र पडलं...
हे पहिलं #माझंपत्र#SushantSinghRajpoot सरांसाठी... 1/n
Dear Sir,
'शेवटी का' असा प्रश्न तुम्ही गेल्यावर सर्वांनाच पडला. या प्रश्नांत गुरफटुन अनेकांचे दुःख आणि अश्रुंचे अभिनयही झाले. अनेक जण Hate You म्हणून मोकळे झाले.
तुमची एक्झिट मनाला चटका लावून तर गेलीच पण अशा एक्झिटची कल्पना तुमच्याकडून तरी कुणालाच नव्हती 2/n #माझंपत्र
जगण्याची प्रेरणा देणारे तुम्ही एकदिवस स्वतःचं जीवन संपवता हे कुठंतरी रूचत नाही पण दुसरं मन म्हणतं 'का?' हा एकच प्रश्न शेवटी सोडून गेलात खरं पण कुणी विचार केला नसेल कि तुम्हालापण अशा प्रश्नांनी खुप छळलं असेल ना ज्याचं अनुत्तरीत राहणं तुम्हाला अनुत्तरीत होऊन जाण्यास विवश करतं
3/n