पुर्वी समग्र भारतातील कामगारांची स्थिती अत्यंत निराशाजनक होती. मालक- भांडवलदार वर्ग दुर्बल,असंघटित कामगारांना वाट्टेल तसा राबवित. कामगार संघटनासुद्धा मालकधार्जिन्या असल्यामुळे कामगारांचे अस्तित्व गोठवून टाकले #ThanksDrAmbedkar @LetsReadIndia 1/n
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कामगारांबद्दल आस्था होती. जिव्हाळा होता. कामगारांनी स्वाभिमानशून्यतेचे जीवन कंठणे नाकारले पाहिजे. प्रतिकार केला तरच शोषणाचे उच्चाटन होईल. अन्यथा गुलामीचे जीवन जगावे लागेल, असे त्यांचे स्पष्ट मत होते. 2/n #ThanksDrAmbedkar #जयभीम
आंबेडकरांनी १५ऑगस्ट १९३६ ला स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली.पक्षाचे धोरण स्वष्ट करण्यासाठी कर्मचारी परिषद १२,१३फेब्रु १९३८ला मनमाड येथे झाली. त्यावेळी त्यांनी अध्यक्षीय भाषणात म्हटले होते, ‘ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हे भारतीय कामगारांचे दोन शत्रू आहेत.’ 3/n #ThanksDrAmbedkar
मुंबईच्या १७ मार्च १९३८ पक्षाच्या सर्वधारण सभेत डॉ. आंबेडकर म्हणाले, ‘गरिबांच्या पक्ष गरिबांनी चालविला पाहिजे.’ हा निर्लेप आशावाद क्षितिजापलीकडचा होता यात शंका नाही. सामाजिक अन्याय, अत्याचाराविरूद्ध, आर्थिक विषमतेविरूद्ध कामगारांनी लढा दिला पाहिजे 4/n #ThanksDrAmbedkar
तेव्हाच कामगार संघटनेच्या बळावर प्रश्न सुटतील.तसेच ‘परावलंबी असण्यापेक्षा स्वावलंबी व्हा’ असा संदेश त्यांनी दिला होता.
१५ सप्टें१९३८ट्रेड डिस्प्युट बिलाच्या संदर्भात कौन्सिलमध्ये डॉ.आंबेडकरांनी कामगाराचा अधिकार व मालकाने लादलेली बंधने याचा कडाडून विरोध केला 5/n #ThanksDrAmbedkar
७ नोव्हें १९३८ला स्वतंत्र मजूर पक्ष व गिरणी कामगारांनी १दिवसाचा लाक्षणिक संप केला होता केला. हा संप अयशस्वी व्हावा यासाठी गिरणी मालकाने पोलिस बळाचा वापर केला. त्यात ७२कामगार जखमी व ३५ जणांना अटक झाली पण संप यशस्वी झाला.कामगार संघटनांचा विजय झाला. स्वतंत्र मजूर पक्ष बळकट झाला 6/n
डॉ.आंबेडकर मंजूर मंत्री(१९४२-४६) असताना त्यांनी सेवायोजन कार्यालयाची (एम्ल्पॉयमेंट एक्सचेंज)स्थापना केली. त्याकाळी जे अनुभवी तज्ज्ञ निरनिराळ्या योजनातून तयार होत, त्यांना नोकरीसाठी भटकावे लागू नये,नोकरी मिळविण्याचे मार्ग मोकळे असावे, हा कार्यालय स्थापण्याचा मुख्य उद्देश होता. 7/n
खाणीमध्ये भारतीय कामगारांना काम करण्यास संधी नसे. इंग्लंडमधून कामगार आयात केले जात. डॉ.आंबेडकरांनी या आयातीवर प्रतिबंध लावला. भारतातील कामगारांना खाणीमध्ये कामावर घेतले जाऊ लागले. मजूरमंत्री म्हणून खाण महिला आणि कामगारांसाठी कायद्यात विशेष तरतुदी केल्या. 8/n #ThanksDrAmbedkar
१३ मार्च १९५४ ला कोळसा उत्पादन आणि स्त्री खाण कामगार या दोन्ही बाबींचा विचार मांडून कामगारांचा महागाई भत्ता, नुकसान भरपाई, असमान महागाई भत्त्याला मजूर संघटना जबाबदार, बेकारीच्या काळातील नुकसान भरपाईची पद्धत, कामगाराचा राजीनामा, खाण कामगारांचे वेतन व सवलती, 9/n #ThanksDrAmbedkar
मजूर खात्याचा नोकरवर्ग, कोळशाच्या उत्पादनाचा प्रश्न, स्त्री खाण कामगार आणि महिला परिषद यावर डॉ.आंबेडकरांनी भाष्य केले. ज्याप्रमाणे पुरुष खाण कामगारांबद्दल डॉ. आंबेडकरांनी विचार व्यक्त केले त्याचप्रमाणे स्त्रियांबाबतही २९ मार्च १९४५ला विधेयक आणून चर्चा केली. 10/n #ThanksDrAmbedkar
स्त्री कामगारांचे हित जोपासले. प्रसुतीच्या काळात विश्रांतीची तरतूद,रोख मदत इ. तरतुदी केल्या. किमान ४आठवडे प्रसुती भत्ता मिळावा तसेच कामगार गैरहजर असताना पगारी सुट्ट्या मिळाव्यात त्याचबरोबर कायद्याखाली नियम करण्याचा अधिकार व खाण कामगारांना शॉवर बॉथची योजनासुद्धा अंमलात आणली
11/n
समग्र भारतातील कामगार,कामगार कायदे, स्त्री कामगाराबद्दलची आत्मीयता,त्यांच्या जीवनाचे उत्थान,उन्नतीचा मार्ग केवळ डॉ.आंबेडकरांमुळेच सुकर झाला असे म्हणता येईल.भारताच्या राजकीय क्षितिजावर आंबेडकर नसते तर दलित-शोषित,पीडित, कामगारांचे भवितव्य अंधकारमय झाले असते 12/n #ThanksDrAmbedkar
आज तुम्ही आम्ही जे ८ तास काम करतो, स्त्रिया प्रसूतीसाठी भरपगारी रजा घेऊ शकतो. पुरुषांप्रमाणेच समान काम समान पगार घेतात, महागाई भत्ते, पी. एफ घेतो एवढंच काय आपल्या हक्काधिकाराविरुद्ध कायदेशीर आवाज उठवू शकतो ते फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच शक्य झालंय.
n/n #ThanksDrAmbedkar
महामानव डॉ. बा. आंबेडकरांनी २०जुलै १९४२ रोजी नागपूर येथे आयोजित 'ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस वीमेन्स कॉन्फरन्स'मध्ये महिलांना उद्देशून केलेल्या भाषणातील वरील ओळी म्हणजे या महामानवाच्या महिलांच्या सर्वांगीण प्रगतीविषयक दृष्टिकोनाचा परिचय देतात.
“भारतीय स्त्रीला कायदेशीरदृष्ट्या साक्षर आणि सक्षम बनवणारे बाबा”
एक स्त्री म्हणून मला माझ्या हक्काची जाणीव करून देणाऱ्या आणि माझ्या हक्काना कायदेशीररीत्या संरक्षण देणाऱ्या या महामानवास प्रत्येक स्त्रीने आवर्जून म्हणावंच #ThanksDrAmbedkar
[3]
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 1942 ते 1946 या काळात व्हॉईसरायच्या मंत्रिमंडळात श्रम, जलनियोजन, रोजगार, खनिजनिर्मिती मंत्री असताना आर्थिक योजना राबवून कामगारांच्या हिताचे कायदे केले 1/n #ThanksDrAmbedkar @LetsReadIndia @MarathiBrain #थ्रेड#Thread
पाण्याचा दीर्घकाळ वापर करता यावा म्हणून अनेक धरणे बांधण्यास चालना दिली. ऊर्जा विकासासाठी अनेक धोरणे राबवून मोठ्या प्रमाणात वीज निर्मितीसाठी प्रयत्न केले. कामगार आयोग, जल आयोग, वीज आयोग, नदी खोरे प्राधिकरण, स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला. आपला देश अर्थ, वीज, उद्योग, शेती,
[2]
पाणी या क्षेत्रात परिपूर्ण व्हावा, म्हणून त्यांनी अनेक धोरणे तयार करुन विकासाचा पाया रचला. म्हणूनच डॉ.आंबेडकरांचे या क्षेत्रातील योगदान मोलाचे आहे.
या मंत्रिपदी असताना त्यांनी वीजनिर्मिती आणि जलनियोजनाबाबत घेतलेले निर्णय महत्त्वपूर्ण ठरले आहेत.
25 नोव्हें1949 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत शेवटचं ऐतिहासिक भाषण दिलं होतं
त्यात त्यांनी जी चेतावणी दिली होती, जे इशारे केले होते ते स्वातंत्र्यानंतरच्या काळात अनेकदा सत्य ठरलेत आणि आजही ते सत्य ठरत आहेत 1/n
लोकशाहीचे अस्तित्व टिकविण्यासाठी फक्त एकच गोष्ट पुरेशी आहे ती म्हणजे महामानवाच्या विचारांवर विचार करणे, त्यांचा अंमल करणे कारण त्यांनी त्या भाषणात जे विचार, ज्या गोष्टीं मांडल्या त्या आजही अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. 2/n
डाॅ.बा.आंबेडकरांच्या भाषणातील लोकशाहीविषयी महत्त्वाचे मुद्दे👇
घटना राबविणारे वाईट वृत्तीचे असतील तर एखादी घटना कितीही उत्कृष्ट असली तरी ती वाईट ठरणार त्याप्रमाणे घटना राबविणारे चांगल्या वृत्तीचे असतील तर एखादी घटना कितीही टाकाऊ असली तरी ती उपकारकच ठरेल. 3/n #ThanksDrAmbedkar
पत्र तर नक्कीच लिहिले आहे पण फक्त आणि फक्त परिक्षेत औपचारिक आणि अनौपचारिक...😜
वास्तव जीवनात पत्र लिहिण्यासाठी ना कधी हाती पेन घेतला ना कधी माझ्यासाठी हाती एखादं पत्र पडलं...
हे पहिलं #माझंपत्र#SushantSinghRajpoot सरांसाठी... 1/n
Dear Sir,
'शेवटी का' असा प्रश्न तुम्ही गेल्यावर सर्वांनाच पडला. या प्रश्नांत गुरफटुन अनेकांचे दुःख आणि अश्रुंचे अभिनयही झाले. अनेक जण Hate You म्हणून मोकळे झाले.
तुमची एक्झिट मनाला चटका लावून तर गेलीच पण अशा एक्झिटची कल्पना तुमच्याकडून तरी कुणालाच नव्हती 2/n #माझंपत्र
जगण्याची प्रेरणा देणारे तुम्ही एकदिवस स्वतःचं जीवन संपवता हे कुठंतरी रूचत नाही पण दुसरं मन म्हणतं 'का?' हा एकच प्रश्न शेवटी सोडून गेलात खरं पण कुणी विचार केला नसेल कि तुम्हालापण अशा प्रश्नांनी खुप छळलं असेल ना ज्याचं अनुत्तरीत राहणं तुम्हाला अनुत्तरीत होऊन जाण्यास विवश करतं
3/n