#Thread
-:संभाजी महाराज बलिदान दिवस आणि गुढीपाडवा:-
तारीख होती ११ मार्च १६८९ आणि तिथी होती फाल्गुन वद्य अमावस्या. महाराष्ट्राच्या इतिहासातील दुर्दैवी दिवसांपैकी एक दिवस. स्वतःला आलमगीर म्हणवणाऱ्या क्रूरकर्मा औरंगजेबाने शक्य होईल तेवढे अमानवी अत्याचार करून धर्मवीर छत्रपती
१/
संभाजी महाराजांना मारले. इतके अमानुष अत्याचार केले त्याने की शेवटी छिंदी छिंदी झालेला संभाजी महाराजांचा देह राहिला. पण इतके अत्याचार होऊन सुद्धा संभाजी महाराज आपल्या हिंदू धर्म रक्षक ह्या बिरुदावली पासून परावृत्त झाले नाहीत. मृत्यूला आनंदाने कवटाळले पण धर्मांतरण करण्यास तयार
२/
झाले नाहीत. केवढी ती स्वधर्माविषयीची आत्मीयता.
औरंगजेब मोठा चाणाक्ष माणूस होता. त्याला माहिती होते की उद्या म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा म्हणजेच मराठ्यांचा नूतन वर्षाचा पहिला दिवस. हा हिंदूंचा सन आनंदाने साजरा होऊ नये म्हणून त्याने जाणूनबुजून आधीचा दिवस निवडला.
३/
औरंगजेबाचा तो विचार काही प्रमाणात आजही काही प्रमाणात अस्तित्वात असलेला दिसतो. कारण ह्या गोष्टीत सुद्धा धर्मद्वेष करणाऱ्या लोकांना आपल्या तेढ निर्माण करण्याच्या कार्यक्रमाची पोळी भाजण्याची संधी दिसते. कारण गेले काही वर्ष समाजात अपप्रचार केला जात आहे
४/
की संभाजी महाराजांना मारले ह्याचा आनंद साजरा करण्यासाठी लोकांनी गुढीपाडवा हा सण चालू केला आहे.!
म्हणजे ही लोक किती खालच्या थराला जाऊ शकतात धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी! अहो ज्या संभाजी महाराजांनी हिंदू धर्म रक्षणासाठी प्राण वेचले त्या धर्मातील एखाद्या सणाचा असा अपप्रचार
५/
करून आपण त्यांचाच अपमान करत आहोत ही गोष्ट लक्षात येत नाही का ह्या लोकांना.?
खरतरं गुढीपाडवा आणि संभाजी महाराजांचा काही एक संबंध नाही ये, तो औरंगजेबाने जोडला आणि अजूनही धर्म द्वेष करणारे लोक तो पुढे चालवत आहेत. अहो जर हा सण संभाजी महाराजांच्या बलिदानामुळे चालू झाला असता.
६/
तर हिंदू धर्माच्या सणांची जी पोथी आहे जी की बरीच पुरातन आहे त्यात कशाला ब्रह्मध्वज पूजन या नावाने गुढीपाडव्याचा उल्लेख आला असता?
त्याच बरोबर जर गुढीपाडवा हा सण संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर चालू झालेला सन असता तर मग त्या आधी होऊन गेलेल्या संतांच्या संत साहित्यात त्याचे वर्णन
७/
नको यायला हवे होते. पण तसे होत नाही ज्ञानेश्वर महाराजांपासून ते तुकाराम महाराजांपर्यंत अनेक संतांच्या साहित्यात गुढीचे उल्लेख आढळून येतात. ते आपण पुढे पाहूया त्याआधी गुढी पाडव्यासंबंधी इतिहास थोडा पाहू.
सातवाहन राजा ह्याने शकांचा पराभव करून सातवाहन कुळाचे राज्य चालू केले.
८/
त्यादिवसापासून त्याने शालिवाहन नावाने शक चालू केला अर्थात नवीन वर्ष गणना सुरू केली. अशा प्रकारचे अनेक शक पूर्वीच्या राजांनी चालू केल्याचे उल्लेख आपल्याला इतिहासात सापडतात. काही अजूनही प्रचलित आहेत एक म्हणजे शालिवाहनांचा शक, दुसरा विक्रम शक (संवत) जो की उत्तरेत प्रसिद्ध आहे.
९/
त्यांनतर छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक झाल्यावर शिवशक चालू केला. तर त्या शालिवाहन शकाचा सुरुवातीचा दिवस म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो.
संत साहित्यातील अनेक ठिकाणी आपल्याला गुढीचे वर्णन आलेले दिसते ज्यातील काही निवडक उदाहरणे खाली देत आहे.
१०/
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीत
अध्याय क्रमांक ४ ओवी ५२
अधर्माची अवधी तोडी। दोषांची लिहिली फाडी।
सज्जनांकरवी गुढी। सुखाची उभवी।।
अध्याय क्रमांक ६ ओवी ५२
ऐके संन्यासी तोची योगी। ऐसी एकवाक्यतेची जगी।
गुढी उभविली अनेगी। शास्त्रांतरी।।
अध्याय क्रमांक १४ ओवी ४१०
११/
माझी अवसरी ते फेडी। विजयाची सांगे गुढी।
येरू जीवी म्हणे सांडी। गोवी यिया।।
हे झालं ज्ञानेश्वरीत संत एकनाथ महाराजंच्या रचनेत अनेक ठिकाणी गुढीचा उल्लेख येतो. जसे की श्रीराम चरित्र वर्णन करताना महाराज म्हणतात,
१२/
फेडावया देवाची साकडी। स्वधर्म वाढवावया वाढी।
नामे मोक्षाची उभवावया गुढी। सूर्यवंशा गाढी दशा आली॥
पुढे श्रीकृष्ण चरित्रात महाराज म्हणतात,
गुढीयेसी सांगू आले। कंस चाणुर मर्दिले।।
हर्षे नाचताती भोजे। जिंकियेले यादवराजे।।
गुढी आली वृंदावना। मथुरा दिली उग्रसेना।।
१३/
झाला त्रिभुवनी उल्हास। लळीत गाये भानुदास।।
त्यानंतर तुकाराम महाराजांचे काही अभंग आहेत ज्यात गुढीच वर्णन आहे.
१) ब्रह्मानंदे लोक सकळ नाचती।गुढीया उभविती घरोघरी।।
घरोघरी सुख आनंद सोहळा। सडे रंगमाळा चौकदारी।।
२) गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा।
१४/
बाळकृष्ण नंदाघरी आनंदल्या नरनारी।
गुढिया तोरणे करिती कथा गाती गाणे।
तुका म्हणे छंदे येणे वेधिली गोविंदे।।
३) आली दारा देखे हरूषाची गुढी।
सांगितली पुढे हरूषे माते।
हरूषली माता केले लिंबलोन।
गोपाळा वरून कुरवंडी।।
१५/
संत चोखामेळा यांचा तर गुढीचा उल्लेख असलेला अभंग फार प्रसिद्ध आहे.
टाळी वाजवावी गुढी उभारावी। वाट हे चालावी पंढरीची ॥
पंढरीची हाट कऊलांची पेठ। मिळाले चतुष्ट वारकरी।।
पताकांचे भार मिळाले अपार। होतो जयजयकार भीमातिरीं।।
हरिनाम गर्जतां भय नाहीं चित्ता। ऐसे बोले गीता भागवत।।
१६/
खट नट यावें शुद्ध होउनी जावें । दवंडी पिटी भावें चोखामेळा।।
हे झालं संत साहित्यातील, ऐतिहासिक जर बघायचं झालं तर राजवाडे कृत मराठांच्या इतिहासाची साधने खंड २० मधील लेखांक १७६ मध्ये एक निवाडा आलेला आहे त्यात स्पष्ट उल्लेख येतो.
१७/
"१ शके १५५२ मध्ये कार्तिक पौर्णिमे ग्रामस्त कसबे वाई याणी ग्रहणकाली कडत जोसी को। मा।र यास प्रतिवषी पासोडी एक व गहू व गुढियाचे पाडव्यास कुडव एक देऊ ह्मणोन पत्र लेहून दिल्हे यास वर्षे आज ता। १४८ होतात कलम १."
१८/
एकंदर सांगायचा आशय काय तर संभाजी महाराजांच्या बलिदान दिवसाचा आणि गुढीपाडव्याचा संबंध हा एक निर्माण केलेला भ्रम आहे. त्यामुळे माझी सगळ्या हिंदू बांधवांना विनंती आहे की धर्म विरोधी लोकांच्या भुलथापांना बळी पडू नये.
१९/
आनंदाने आणि शास्त्रोक्त पद्धतीने गुढी पाडवा साजरा करावा आणि हिंदू धर्माची गुढी दिवसेंदिवस अधिक भव्य अधिक उंच कशी होईल याकडे प्रयत्न चालवावे..!
धन्यवाद..!
२०/
संदर्भ:-
१) संत ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी.
२) सकल संत गाथा भाग २ आणि भाग ३
३) मराठांच्या इतिहासाची साधने खंड २०
अजून एक मुख्य विषय जो वरती सांगायचा राहिला तो म्हणजे की तांब्या आणि साडीची प्रथा कशी आली?
तर आपल्या हिंदू धर्मात कुठलीही पूजा जर करायची असेल तर त्या देवतेला मानव रुपात कल्पित करून केली जाते आणि 'यथा देहे तथा देवे' या न्यायाने जे जे म्हणून उपचार मानवी देहास केले जातात ते आपण
ते ते देवतेस करतो. जसं आपण स्नान करतो तस देवालाही अभिषेक घालतो. त्याचप्रमाणे आपण जे जे परिधान करतो, जे जे भक्षण करतो ते देवाला देतो. एवढच काय तर काही मंदिरांमध्ये थंडीच्या दिवसात देवाला स्वेटर ही घातलं जातं आणि हे काही थोतांड नाही ये आपल्या मनातील देवाची भक्ती व्यक्त करण्याचे
माध्यम आहे ते.
श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम्।
अर्चनं वन्दनं दास्यं सख्यं आत्मनिवेदनम्।
हे जे काही नवविधा भक्तीचे प्रकार आहेत त्यातील अर्चन भक्ती म्हणजे देवतेची पूजा करणे, तिला सुशोभित करणे इत्यादी गोष्टी त्यात येतात.त्याच नुसार आपण ज्या ज्या देवतेचे वर्ष भर सण वार करतो
त्या त्या देवेतेंची आपण मूर्त रुपात कल्पना करून पूजन करत असतो. तसेच हे गुढीचे आहे. गुढी हे ब्रम्हध्वजाचे प्रतिक आहे. तिची आपल्याला योग्यरित्या पूजा करता यावी यासाठी तिला साडी घालणे विविध अलंकार घालून सुशोभित करणे या गोष्टी आपण करतो. त्यांनतर काही लोक अपप्रचार असा करत आहेत की
तांब्या गुढीला उलटा ठेवतात तो हिंदू धर्मात अशुभ आहे. तर त्यांना मी सांगू इच्छितो हिंदू धर्मात कुठलीही गोष्ट कायम अशुभ नसते काही गोष्टी काही ठिकाणी शुभ असतात तर त्याच गोष्टी काही ठिकाणी अशुभ असतात जसं की तुळस ही महादेवाला वाहिली तर अशुभ पण तीच जर तुम्ही विष्णूंना वाहिली तर शुभ
तसेच फक्त भस्म लावून संध्या वंदन केले तर ते शुभ पण फक्त भस्म लावून इतर देवतांची पूजा करणे अशुभ. तसेच सुतकात इतर पुराणांच वाचन करणं अशुभ पण गरुड पुराण वाचणे शुभ मानल जात सगळं परिस्थिती प्रमाणे असतं आणि जर उलटा तांब्या अशुभ असेल तर बऱ्याच ठिकाणी
गौरी पूजन करताना मुखवट्याच्या जागी मडके ठेवतात ते पण उलटे म्हणून ते अशुभ थोडी होत.! तर उलटातांब्या ठेवण्याचं कारण म्हणजे गुढीची मूर्तीच्या रुपात कल्पना करायची असेल तर तिला मुख हवं मग ते मुखाचं प्रतिक म्हणून तो तांब्या वर पालथा ठेवला जातो कारण सुलटा तांब्या काठीवर बसणार नाही ना.
जेणेकरून आपण यथाशक्ती गुढीची पूजा करू शकू...!
धन्यवाद..!!
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
#Thread
तुकाराम महाराज - वैकुण्ठगमन की संशयित मृत्यू..?हा थ्रेड चालू करण्यापूर्वी मी माझ्या विषयी थोड सांगू इच्छितो. आमच्या दोन्ही घरात अर्थात माझ्या घरी आणि आजोळी भागवत सांगण्याची किमान ५ पिढ्यांपासून परंपरा आहे. माझे आजोबा हे खूप विद्वान आणि प्रसिद्ध भागवतकार होते.
१/
त्याचप्रमाणे माझ्या आईचे वडील हे एकनाथ महाराजांच्या परंपरेतील प्रसिद्ध भागवतकार व कीर्तनकार आहेत. त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाच वातावरण दोन्ही घरात अगदी ओतप्रोत भरलेलं आहे. सध्या ही परंपरा माझे काका आणि मामा उत्तमरित्या चालवत आहेत. अशा घरात वाढल्यामुळे साहजिकच
२/
अत्यंत विद्वान व थोर अध्यात्मिक विभूतींचा सहवास प्राप्त झाला त्यांना ऐकायला भेटलं.म्हणजे अगदी सध्या वारकरी संप्रदायातील प्रतिष्ठित घर म्हणजे देगलूरकरांच. त्या घरातील प पू चंद्रशेखर महाराज व प पू चैतन्य महाराज ह्यांच्यापासून ते अगदी सर्व सर्व लोकं.
३/
ज्याठिकाणी विकासाच्या,प्रगतीच्या,कामांच्या बातम्या यायला हव्यात त्याठिकाणी दररोज भ्रष्टाचार,बलात्कार,उत्पीडन,कोरोणा काळातील ढिसाळ नियोजन ह्यांच्याच बातम्यांनी गेलं वर्ष गेलं. आणि त्यात मानाचा (अपमानाचा) तुरा म्हणजे आजची बातमी की मुंबई उच्च न्यायालयाने गृहमंत्री अनिल देशमुख
१/
ह्यांच्या विरोधात सीबीआय चौकशीचा आदेश दिला. एका विद्यमान गृहमंत्र्याविरूध्द केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी होणे ही खरचं महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. आरोप पण कसले तर खंडणी वसुलीचे. ज्यावेळी महाराष्ट्र महामारीने त्रासून गेला होता. त्यावेळी ही लोकं स्वतःचे खिसे भरत होते
२/
किती प्रकरण सांगावीत अगदी सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येपासून ते आजच हे प्रकरण इथपर्यंत ह्या सर्व घटनेंनी महाराष्ट्र उध्वस्त झाला. नियोजनशून्य,भावनाशून्य,आत्मस्वार्थीय अशा लोकांचा भरणा ह्या सरकारमध्ये असल्याने महाराष्ट्र आज त्राही त्राही करत आहे..!!
३/
परवा साधकांचे मायबाप जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा सदेह वैकुंठगमन दिवस होता अर्थात तुकाराम बीज. ह्या पवित्र दिवशी सुद्धा अनेक पुरोगामी लोकांकडून तुकाराम महाराजांचं नाव पुढे करून ब्राह्मणांना शिव्या देण्याचे काम झाले. हे पुरोगामी स्वतःला एकीकडे जातपात न मानणारे
१/
दाखवातात आणि दुसरीकडे ब्राम्हणांना शिव्या देण्याशिवाय दुसरं काही काम करत नाहीत.
अहो जे तुकाराम महाराज 'विष्णुमय जग। वैष्णवांचा धर्म। भेदाभेद भ्रम अमंगळ।।' असं सांगतात किंवा जे तुकाराम महाराज 'वर्ण अभिमान विसरली याति। एक एका लोटांगणे जाती।।' हे बोलतात ते तुकाराम महाराज
२/
एखाद्या विशिष्ट जातीला शिव्या कशा देतील.!बर हे लोक आपल्या म्हणण्याला आधार म्हणून गाथेतील काही अर्धवट अभंगांचे पद दाखवतात. ह्या सगळ्या लोकांना आधी माझा हा प्रश्न आहे की बाबांनो तुमची अध्यात्मिक पातळी काय आहे? कारण तुकाराम महाराजांची गाथा म्हणजे काही गाण्याचं किंवा कवितांचं
३/