-:हिंदू परिसंस्थेची (Ecosystem) आवश्यकता:-
तारीख होती १७ एप्रिल २०२०, त्यादिवशी मी सकाळी उठलो व सवयीप्रमाणे ट्विटर चाळत बसलो असता,दोन ट्रेंड्स ने माझं लक्ष वेधले एक म्हणजे पालघर आणि दुसरा म्हणजे साधू लीचींग.त्या ट्रेण्ड मधले ट्विट बघता बघता तो भयानक
१/
व्हिडिओ माझ्यासमोर आला आणि माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं, सगळ्या अंगावर शहारे आले आणि तळपायाची आग मस्तकात गेली.!तुम्हाला वेगळं सांगायला नको की तो व्हिडिओ पालघरमध्ये हत्या झालेल्या साधूंचा होता. किती भयानक आणि हृदयद्रावक होता तो व्हिडिओ.! २ अत्यंत दीन आणि करुण मुखाने इकडे तिकडे
२/
मदतीची याचना करणारे ते साधू आणि त्यांच्यावर अत्यंत क्रूर व त्वेषाने हल्ला करणारे ते नरराक्षस.! होय नरराक्षसच ते त्यांना मानव म्हणणे म्हणजे मानव जातीचा अपमान आहे. त्यात अजून एक धक्का देणारी गोष्ट कुठली होती तर ती ही की त्यातील एक साधू ज्यावेळी याचकभावाने तेथील पोलीसाकडे गेले
३/
तर त्या पोलिसाने ह्यांना अभय देण्याऐवजी थेट गर्दीच्या हवाली केले.ते पाहून प्रश्न पडला की महाराष्ट्र पोलिसांच ब्रीदवाक्य 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' आहे की 'खलरक्षणाय सद्निग्रहणाय' असे आहे?
किती दिवस ह्या शिशुपालांचे शंभर अपराध भरण्याची वाट पहायची? किती दिवस
४/
'अहिंसा परमो धर्मः' ह्या उक्तीचा टेंबा मिरवत फिरायच? ज्याप्रमाणे अर्ध ज्ञान धोकादायक असते त्याप्रमाणे ही वरील अर्धी उक्ती ही हिंदू समाजाला धोकादायक ठरत आहे नव्हे नव्हे ठरलीच आहे. कारण 'अहिंसा परमो धर्मः।' ह्या उक्तीचा नंतरचा भाग 'धर्म हिंसा तथैव च।' हा भाग आपण पूर्णपणे
५/
विसरून गेलो आहोत.युरोपातील एका लेखकाने नाझिंच्या अत्याचारांचे वर्णन करताना एक वाक्य लिहून ठेवले आहे "अमर्याद सहिष्णुता ही सहिष्णू समाजाच्या नाशाचे कारण ठरू शकते."आणि अगदी तीच परिस्थिती हिंदू धर्माची होऊन बसली आहे.
६/
कारण एका असहिष्णू पंथासमोर आपण इतकी सहिष्णुता दाखवत आहोत की भारताची वाटचाल नाशाकडे जात आहे. त्याच उदाहरण म्हणजे १९४७ ची भारताची फाळणी.
ज्यावेळी २०१४ ला केंद्रात भाजपाचं सरकार बहुमताने निवडून आले त्यावेळी माझ्यासारख्या अनेक हिंदू बांधवांनी हिंदू समाजाच्या पुनरुत्थानाचे
७/
कल्पनाचित्र तयार केले होते. पण तसं होतांना तर काही दिसत नाही ये. उलट प्रत्येक दिवशी हे कल्पनाचित्र आमच्याच रक्ताने विद्रूप केले जात आहे.
किती म्हणून उदाहरण द्यायची CAA विरुद्धच्या दंगली त्यानंतर उत्तर प्रदेश मधील हिंदू समाज पार्टीचे नेते कमलेश तिवारी ह्यांच्या हत्येविषयी
८/
सर्वांना ठाऊकच आहे.आता २६ जानेवारीला झालेल्या दंगली अशा सगळ्या उदाहरणांनीचं लेख भरून जाईल एवढी उदाहरणं आहेत. पण नुसतं ह्यावर चर्चा करून ह्या घटना थांबणार आहेत का? ह्यावर काहीतरी ठोस उपाय करणे भाग आहे.सगळ्यात पहिले म्हणजे आपल्या सगळ्या हिंदूंच्या मनात जो भ्रम आहे तो दूर
९/
करणे गरजेचे आहे. तो भ्रम म्हणजे की जे असहिष्णू लोक धार्मिक हिंसेच्या नावाने हिंसा करत आहेत ते त्यांचे विचार आहेत त्यांच्या धर्मात असे काही सांगितलेले नाही ये. हे साफ चुकीचं आहे. त्यांच्या धर्म पुस्तकानेचं असं करण्याची परवानगी त्यांना दिलेली आहे. गजाननराव त्यांच्या
१०/
शिवाजी महाराज झाले नसते' तर ह्या पुस्तकात म्हणतात की 'रोगाचे मूळ एखाद्या व्यक्तीत नव्हते आणि नाही; ते एका असहिष्णू विचारसरणीत आहे' आणि हेच सर्वथा सत्य आहे. ते तस वागतात म्हणजे ते त्यांच्या प्रेषितांच अनुकरणचं करत आहेत.हा भ्रम एकदा दूर झाला की मग 'खटनटासी व्हावे खटनट।
११/
उद्धाटासी व्हावे उद्धट।।' ह्या समर्थ उक्तीप्रमाणे आपले वर्तन ठेवावे.
हे सगळं जर थोपवून धरून आपल्या हिंदू धर्माचं रक्षण करायचं असेल तर आपल्याला आपला शत्रू जसा लढत तसच त्याच्याशी लढण गरजेचं आहे. अर्थात ह्या धर्म द्वेष करणाऱ्या लोकांची एक सुनियोजित इकोसिस्टीम काम करते.
१२/
हे लोक याद्वारे आपले देश विरोधी कारस्थान चालवतात ज्यात वेगवेगळ्या गोष्टी येतात ज्यात अगदी खेड्यापाड्यात जाऊन खोटा इतिहास पसरवणाऱ्या स्वघोषित व्याख्यात्यांपासून ते दिल्लीमध्ये न्यूज रूम मध्ये बसून खोट्या बातम्या सांगणाऱ्या पत्रकारांपर्यंत(?).ही सगळी लोक आपल्या अजेंड्याला धरून
१३/
सतत काम करतात(हा खरतर वेगळ्या लेखाचा विषय होऊ शकतो). तर ह्यानुसार हिंदूंना सुद्धा त्यांची एक इकोसिस्टीम तयार करणं खूप आवश्यक आहे. ज्यात हिंदू धर्मासाठी काम करणाऱ्या थोर विद्वान लोकांपासून ते अगदी गावखेड्याच्या पातळीवर काम करणाऱ्या लोकांपर्यंत ह्यांनी सगळ्यांनी सहभागी होऊन
१४/
काम करणे अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. या बरोबर खालील काही गोष्टी आपण नक्कीच करू शकतो असं वाटतं मला.
हिंदूंनी आपण हिंदू आहोत आपण सहनशील असल पाहिजे ही पुळचट वृत्ती सुरुवातीला बदलायला हवी. कारण सहनशील होण्याच्या नादात हिंदू समाजाची भेकड समाज अशी प्रतिमा होत चालली आहे.
१५/
त्यांनतर प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलास हिंदू धर्माचे महत्व वेळोवेळी पटवून द्यावे व धार्मिक शिक्षण काही ना काही मुलाला मिळेल अशी तजवीज करावी. प्रत्येक हिंदू तरुणाने आपल्या स्वरक्षणासाठी 'सामर्थ्याची उपासना आणि उपासनेच सामर्थ्य' याचा अवलंब आपल्या जीवनात करावा.
१६/
व्यायाम हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवावा. त्याबरोबरच शक्य झाल्यास इतरही शस्त्रकलांचा अभ्यास करावा.त्याचप्रमाणे हिंदू धर्मातील अनेक विद्वान साधू संत जे आजही आपल्या धर्म रक्षणार्थ अखंड काम करत आहेत त्यांना या कार्यात यथाशक्ती साथ द्यावी.त्याचप्रमाणे बऱ्याच सोशल मीडिया
१७/
साधनांवर अनेक विद्वान व अभ्यासक लोकं आपल्या धर्म रक्षणार्थ कार्य करीत आहेत. अशा लोकांना सतत ऐकावं, त्यांनी लिहलेले ग्रंथ,लेख वाचवेत. त्याचप्रमाणे या गोष्टी केवळ आपल्या पर्यंत न ठेवता आपल्या संपर्कातील लोकांत त्याचा प्रसार करावा. आपल्या धर्मातील गोष्टी करताना लाज बाळगू नये
१८/
जसं की सण साजरे करणे, पूजा करणे,गंध लावणे,माळ घालणे इत्यादी. ह्या गोष्टींचं योग्य महत्व जाणून त्या गोष्टी कटाक्षाने पाळाव्यात.
तसेच प्रत्येक हिंदू तरुणाने आपल्या धर्माचा, आपल्या संस्कृतीचा, आपल्या ग्रंथांचा, आपल्या महापुरुषांचा यथायोग्य सन्मान ठेवावाच ठेवावा.
१९/
कारण आपणच जर ह्यांचा मान नाही ठेवला तर बाहेरचे की ठेवतील व आपल्या धर्माविषयी, आपल्या इतिहासाविषयी काही ना काही अभ्यास करावा. मला त्याची काय गरज आहे? मला त्याचा माझ्या करिअर मध्ये काय उपयोग? आहे पोकळ प्रश्न विचारणाऱ्या लोकांचा यथाशक्ती सन्मान बाकी लोकांनी करावा.
२०/
अहो जर संस्कृतीचा अभ्यासच केला नाही तर त्या विषयी अभिमान कसा जागृत होईल? आणि अभिमान नाही जागृत झाला, तर हिंदू धर्माचे रक्षण कसे होईल?
सगळ्यात म्हणजे अतिजास्त महत्वाचं म्हणजे धर्म हा जातीपेक्षा वर आहे ही गोष्ट गाठ बांधून ठेवा.
२१/
मित्रांनो "धर्मो रक्षति रक्षितः।"अर्थात आपण जर धर्माचे रक्षण केले तर धर्म आपले रक्षण करील. त्यामुळे ह्या लाखो वर्षांपासून चालत आलेल्या सनातन हिंदू धर्माचे रक्षण करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. चला तर मग एकसंध होऊन ह्या आपल्या धर्माविरुद्ध चाललेल्या कारस्थानविरुद्ध उभे राहू.!
२२/
#Thread
-:संभाजी महाराज बलिदान दिवस आणि गुढीपाडवा:-
तारीख होती ११ मार्च १६८९ आणि तिथी होती फाल्गुन वद्य अमावस्या. महाराष्ट्राच्या इतिहासातील दुर्दैवी दिवसांपैकी एक दिवस. स्वतःला आलमगीर म्हणवणाऱ्या क्रूरकर्मा औरंगजेबाने शक्य होईल तेवढे अमानवी अत्याचार करून धर्मवीर छत्रपती
१/
संभाजी महाराजांना मारले. इतके अमानुष अत्याचार केले त्याने की शेवटी छिंदी छिंदी झालेला संभाजी महाराजांचा देह राहिला. पण इतके अत्याचार होऊन सुद्धा संभाजी महाराज आपल्या हिंदू धर्म रक्षक ह्या बिरुदावली पासून परावृत्त झाले नाहीत. मृत्यूला आनंदाने कवटाळले पण धर्मांतरण करण्यास तयार
२/
झाले नाहीत. केवढी ती स्वधर्माविषयीची आत्मीयता.
औरंगजेब मोठा चाणाक्ष माणूस होता. त्याला माहिती होते की उद्या म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा म्हणजेच मराठ्यांचा नूतन वर्षाचा पहिला दिवस. हा हिंदूंचा सन आनंदाने साजरा होऊ नये म्हणून त्याने जाणूनबुजून आधीचा दिवस निवडला.
३/
#Thread
तुकाराम महाराज - वैकुण्ठगमन की संशयित मृत्यू..?हा थ्रेड चालू करण्यापूर्वी मी माझ्या विषयी थोड सांगू इच्छितो. आमच्या दोन्ही घरात अर्थात माझ्या घरी आणि आजोळी भागवत सांगण्याची किमान ५ पिढ्यांपासून परंपरा आहे. माझे आजोबा हे खूप विद्वान आणि प्रसिद्ध भागवतकार होते.
१/
त्याचप्रमाणे माझ्या आईचे वडील हे एकनाथ महाराजांच्या परंपरेतील प्रसिद्ध भागवतकार व कीर्तनकार आहेत. त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाच वातावरण दोन्ही घरात अगदी ओतप्रोत भरलेलं आहे. सध्या ही परंपरा माझे काका आणि मामा उत्तमरित्या चालवत आहेत. अशा घरात वाढल्यामुळे साहजिकच
२/
अत्यंत विद्वान व थोर अध्यात्मिक विभूतींचा सहवास प्राप्त झाला त्यांना ऐकायला भेटलं.म्हणजे अगदी सध्या वारकरी संप्रदायातील प्रतिष्ठित घर म्हणजे देगलूरकरांच. त्या घरातील प पू चंद्रशेखर महाराज व प पू चैतन्य महाराज ह्यांच्यापासून ते अगदी सर्व सर्व लोकं.
३/
ज्याठिकाणी विकासाच्या,प्रगतीच्या,कामांच्या बातम्या यायला हव्यात त्याठिकाणी दररोज भ्रष्टाचार,बलात्कार,उत्पीडन,कोरोणा काळातील ढिसाळ नियोजन ह्यांच्याच बातम्यांनी गेलं वर्ष गेलं. आणि त्यात मानाचा (अपमानाचा) तुरा म्हणजे आजची बातमी की मुंबई उच्च न्यायालयाने गृहमंत्री अनिल देशमुख
१/
ह्यांच्या विरोधात सीबीआय चौकशीचा आदेश दिला. एका विद्यमान गृहमंत्र्याविरूध्द केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी होणे ही खरचं महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. आरोप पण कसले तर खंडणी वसुलीचे. ज्यावेळी महाराष्ट्र महामारीने त्रासून गेला होता. त्यावेळी ही लोकं स्वतःचे खिसे भरत होते
२/
किती प्रकरण सांगावीत अगदी सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येपासून ते आजच हे प्रकरण इथपर्यंत ह्या सर्व घटनेंनी महाराष्ट्र उध्वस्त झाला. नियोजनशून्य,भावनाशून्य,आत्मस्वार्थीय अशा लोकांचा भरणा ह्या सरकारमध्ये असल्याने महाराष्ट्र आज त्राही त्राही करत आहे..!!
३/
परवा साधकांचे मायबाप जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा सदेह वैकुंठगमन दिवस होता अर्थात तुकाराम बीज. ह्या पवित्र दिवशी सुद्धा अनेक पुरोगामी लोकांकडून तुकाराम महाराजांचं नाव पुढे करून ब्राह्मणांना शिव्या देण्याचे काम झाले. हे पुरोगामी स्वतःला एकीकडे जातपात न मानणारे
१/
दाखवातात आणि दुसरीकडे ब्राम्हणांना शिव्या देण्याशिवाय दुसरं काही काम करत नाहीत.
अहो जे तुकाराम महाराज 'विष्णुमय जग। वैष्णवांचा धर्म। भेदाभेद भ्रम अमंगळ।।' असं सांगतात किंवा जे तुकाराम महाराज 'वर्ण अभिमान विसरली याति। एक एका लोटांगणे जाती।।' हे बोलतात ते तुकाराम महाराज
२/
एखाद्या विशिष्ट जातीला शिव्या कशा देतील.!बर हे लोक आपल्या म्हणण्याला आधार म्हणून गाथेतील काही अर्धवट अभंगांचे पद दाखवतात. ह्या सगळ्या लोकांना आधी माझा हा प्रश्न आहे की बाबांनो तुमची अध्यात्मिक पातळी काय आहे? कारण तुकाराम महाराजांची गाथा म्हणजे काही गाण्याचं किंवा कवितांचं
३/