गोल्डमन सॅक्स या जगातील आघाडीच्या वित्तसंस्थेने नुकताच कमोडिटीवर आधारित एक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात त्यांनी 'कॉपर इज द न्यू ऑइल' असे म्हणत येणाऱ्या काही वर्षांत कॉपरला आणखी चांगले दिवस येऊ शकतात असे संकेत दिले आहेत. #म#मराठी
या अहवालातील काही महत्वाच्या गोष्टी मांडण्याचा हा प्रयत्न.
गेल्या काही वर्षात अनेक देश नेट झिरो इमिशनकडे पाऊल टाकताना दिसत आहेत. या नेट झिरो इमिशन या संकल्पनेचा बराच मोठा, सकारात्मक परिणाम ग्रीन मेटल्स आणि त्यातही कॉपरवर होणार आहे. #म#मराठी
नेट झिरो इमिशन म्हणजे अपारंपारिक ऊर्जा स्रोतांचा वापर येणाऱ्या काळात वाढत जाणार. या ऊर्जा स्रोतांपासून निर्माण केली जाणारी ऊर्जा साठवणे आणि तिचे वहन करणे यासाठी कॉपर हा सर्वाधिक योग्य धातू आहे. केबल्स, बॅटरीज, ट्रान्झिस्टर्स, इन्व्हर्टर्स #म#मराठी
या सगळ्या गोष्टींमध्ये कॉपरचा वापर केला जातो. कॉपरचे गुणधर्म त्याला यासाठी पहिला पर्याय बनवतात.
१. डक्टिलिटी - कॉपरचे शीट्स बनवता येतात आणि ताराही बनवता येतात.
२. कंडक्टिव्हिटी - कॉपरमधून विजेचे वहन सहजरित्या होते. #म#मराठी
३. रीऍक्टिव्हिटी - कॉपरची रीऍक्टिव्हिटी अतिशय कमी आहे. त्यामुळे कॉपरवर गंज कमी लागतो स्टेनलेस स्टीलमध्ये असेच गुणधर्म असतात मात्र त्याची थर्मल कंडक्टिव्हिटी कॉपरपेक्षा ३० पट कमी असते.
गोल्डमन सॅक्सच्या अहवालानुसार २०३० पर्यंत कॉपरची मागणी ६०० ते ९००% एवढी वाढू शकते. #म#मराठी
या वाढत्या मागणीला पुरवठा करण्याची कॉपर मार्केटची क्षमता आहे का? तर नाही. गेल्या १२ महिन्यांत कॉपरच्या किमती जवळपास ८०% नी वाढल्या. मात्र कॉपरचा सप्लाय मात्र त्या प्रमाणात वाढलेला नाही. कॉपर मायनिंगसाठी कोणत्याही मोठ्या ग्रीनफिल्ड प्रोजेक्ट्सला मान्यता मिळालेली नाही. #म#मराठी
त्यामुळे २०३० पर्यंत कॉपरचा पुरवठा ८.२ मिलियन टनांनी कमी पडू शकते असे भाकीत गोल्डमन सॅक्सने वर्तवले आहे. यातूनच कॉपरमध्ये आणखी मोठी बुल रन बघायला मिळू शकते.
कॉपरची सध्याची किंमत ९००० डॉलर पर टन एवढी आहे. गोल्डमन सॅक्सच्या मते ही किंमत खूपच कमी आहे. #म#मराठी
जरी ही किंमत पुढची २-३ वर्षे कायम राहिली तरी २०२३ पर्यंत कॉपरची सध्याची इन्व्हेंटरी संपून जाईल. मात्र ही किंमत स्थिर राहणे शक्यच नाही. मागणी वाढतेय म्हणजे किंमत वाढतच जाणार. #म#मराठी
गोल्डमनच्या मते कॉपरची पर टन किंमत २०२१ मध्ये ९६७५, २२ मध्ये ११८७५ , २३ मध्ये १२०००, २४ मध्ये १४००० आणि २०२५ मध्ये १५००० डॉलर एवढी वाढू शकते. येणाऱ्या १२ महिन्यांत ही रक्कम ११००० डॉलर पर्यंत जाऊ शकते. #म#मराठी
कॉपरला कोणत्या क्षेत्रातून मागणी वाढू शकते?
१. विंड टर्बाइन्स
२. इलेक्ट्रिक व्हेईकल्स
३. सोलर पॅनेल्स
४. बॅटरीज
५. चार्जिंग स्टेशनसाठी लागणारे केबलिंग
इलेक्ट्रिक व्हेइकल्सच्या संख्येत येणाऱ्या दशकांत मोठ्या संख्येने वाढ होणार आहे. #म#मराठी
गोल्डमनच्या अहवालानुसार ही संख्या २०३० पर्यंत ३ कोटींपर्यंत वाढू शकते. यासाठी लागणाऱ्या चार्जिंग स्टेशन्सची संख्या तेवढीच वाढू शकते. फक्त इव्ही मार्केटसाठी वापरल्या जाणाऱ्या कॉपरची मागणी येणाऱ्या दशकात प्रत्येक वर्षी ३१% वाढू शकते असे गोल्डमनचा अहवाल म्हणतो. #म#मराठी
विशेष म्हणजे युरोप, चीन आणि अमेरिका हे खंड या मागणीला पूरक अशी इव्ही धोरणे राबविताना दिसत आहेत.
सोलर पॉवर सेक्टरमध्येही कॉपरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आणि तो वाढत जाणार आहे. गोल्डमनच्या अहवालानुसार सोलर सेक्टरमधील कॉपरची मागणी २०३० पर्यंत #म#मराठी
१.६ ते ३.३ मिलियन मेट्रिक टन्स एवढी वाढू शकते. विंड एनर्जी सेक्टरमधील हीच मागणी २०३० पर्यंत १.३ ते २.१ मिलियन मेट्रिक टन्स इतकी वाढू शकते. स्क्रॅप कॉपर सप्लाय हाही एक मुद्दा या अहवालात मांडला आहे. कॉपरच्या वाढत्या मागणीमुळे स्क्रॅप कॉपरला सुद्धा मागणी वाढेल. #म#मराठी
मात्र हा सेक्टर तुलनेने अजूनही तितकासा विकसित झालेला नाही. त्यामुळे जरी स्क्रॅप कॉपरचा सप्लाय असला तरी नवीन ग्रीनफिल्ड प्रोजेक्ट्स सुरु केल्याशिवाय कॉपरची वाढती मागणी पूर्ण करणे शक्य होणार नाही. #म#मराठी
येणाऱ्या काळात कॉपर प्रॉडक्शनमध्ये एखादी नवी टेक्नॉलॉजी येऊन कॉपर प्रॉडक्शनची संपूर्ण पध्दतच जर बदलली तर कदाचित कॉपरचा सप्लाय वाढून त्याचा परिणाम किमतीवर होऊ शकतो. मात्र सध्यातरी अशी टेक्नॉलिजी उपलब्ध नाही. #म#मराठी
जरी अशी काही टेक्नॉलॉजी आली तरी ती सबंध स्वीकारली जाणे, तिचा वापर केला जाणे यासाठी या दशकाचा उत्तरार्ध उजाडावा लागेल. #म#मराठी
कॉपरच्या वाढत्या मागणीचा सकारात्मक परिणाम होऊ शकेल अशा भारतीय कंपन्या
१.हिंदुस्थान कॉपर - १४० रुपये
२.भाग्यनगर इंडिया - ४७ रुपये
३.हिंदाल्को - ३५८ रुपये #म#मराठी
टीप - हा फक्त या अहवालाचा गोषवारा आहे. सुचवलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायची की नाही हा निर्णय आपापल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून घ्यावा. #म#मराठी
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
यह बीटा बीटा क्या है?
स्टॉक घेताना ज्या स्टॉकचा बीटा १ पेक्षा कमी आहे असे स्टॉक घ्या असे आपण बऱ्याच ठिकाणी वाचले असेल, किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराने तसे सांगितले असेल. हा बीटा म्हणजे नक्की काय? बीटाची व्हॅल्यू नक्की काय दर्शवते? हे सोप्या भाषेत जाणून घेण्याचा प्रयत्न #म#मराठी
अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर बीटा हे एखाद्या शेअरची मार्केटच्या तुलनेत असलेली व्होलाटीलिटी म्हणजेच अस्थिरता मोजण्याचे प्रमाण आहे. मार्केटचा बीटा १ धरला जातो आणि प्रत्येक स्टॉकची बीटा व्हॅल्यू ही मार्केटच्या तुलनेत ते किती वर खाली जाऊ शकतात यावरून ठरवली जाते. #म#मराठी
मार्केटच्या तुलनेत शेअरची मुव्हमेंट जास्त होत असेल तर बीटा १ पेक्षा जास्त असतो. हीच मुव्हमेंट मार्केटच्या तुलनेत कमी असेल तर बीटा १ पेक्षा कमी असतो. सर्वसाधारणपणे सगळेच सल्लागार लो बीटा कंपन्यांच्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करा असा सल्ला देतात. #म#मराठी
भारत सरकारचे हे नवरत्न इन्व्हेस्टर्ससाठी रत्न ठरणार का?
NMDC म्हणजे National Mineral Development Corporation हा एक पीएसयू स्टॉक सध्या चर्चेत आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्यात झालेल्या पडझडीत हा स्टॉक ६१ रुपयांपर्यंत पडला होता. #म#मराठी#NMDC
तिथून आजपर्यंत या स्टॉकने १००% हून अधिक परतावा दिला आहे.शुक्रवारी हा स्टॉक १३८ रुपयांवर बंद झाला. सध्या पीएसयू स्टॉक बरेच चर्चेत आहेत. मध्यंतरी पीएसयू बँकांनी चांगली रॅली दिली होती. त्यानंतर इतर पीएसयू स्टॉक्सनेही चांगली वाढ दिली. #म#मराठी
यातही NMDC चा उल्लेख यासाठी की या कंपनीचे प्रॉडक्ट हे आयर्न ओर म्हणजे लोखंड हे आहे.लोखंड, स्टील, साखर यांचा समावेश कमोडिटीमध्ये होतो. मार्केटमध्ये आता पुन्हा एकदा कमोडिटी सायकल सुरू झाल्याची चर्चा आहे. #म#मराठी
आयटीसी – झोपलेला कुंभकर्ण जागा होणार का?
आयटीसीच्या शेअरबद्दल चर्चा केली नाही असा इन्व्हेस्टर तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. गेले अनेक महिने अनेक विश्लेषक, अनेक टीव्ही चॅनेल्सवाल्यांनी हा शेअर सुचवला आहे. #म#मराठी#ITC
अनेक रिटेल इन्व्हेस्टर्स हा शेअर चांगला आहे म्हणून छोट्या मोठ्या संख्येने हा शेअर घेऊन बसले आहेत.शेअर मात्र वाढता वाढेना!! सोशल मीडियावर तर हा शेअर मीम मटेरियल झाला आहे. आयटीसीचा शेअर ०.५% टक्के वाढला तरी सोशल मीडियावर मिम्जचा पूर येतो. #म#मराठी
या शेअरची खिल्ली उडवणारे आहेत तसेच या शेअरचे पाठीराखेसुद्धा मोठ्या संख्येने आहेत. हा शेअर येणाऱ्या काळात ‘वेल्थ क्रिएटर’ ठरणार अशी आशा मनात ठेवून हे सगळे आयटीसी पाठीराखे आपले शेअर्स धरून बसले आहेत. पण नक्की परिस्थिती काय आहे? हे शेअर खरोखर इव्हेस्टर्ससाठी खरोखर चांगला आहे का? #म
क्रेडिट कार्डाची सुरुवात नक्की कशी आणि कुठे?
आजकाल प्रत्येकाकडे क्रेडिट कार्ड असते. एखादी बँक आपल्याला क्रेडिट कार्ड देते म्हणजे एक प्रकारचे कर्जच देते. बँकेच्या मते आपली पत किती आहे यावर या कर्जाची रक्कम म्हणजे आपलं ‘क्रेडिट लिमिट’ ठरतं. #म#मराठी
जसंजसं आपण कार्ड वापरत जाऊ तशी आपली क्रेडिट लिमिट कमी होत जाते. महिन्याच्या अखेरीस बँक या खर्चाचं बिल आपल्याला पाठवते. ते बिल भरलं की पुन्हा आपलं क्रेडिट लिमिट पूर्वी आहे तेवढं होतं. बिल नाही भरलं तर बँका जबर दराने व्याजआकारणी करतात. #म#मराठी
म्हणूनच लोकांनी क्रेडिट कार्ड घ्यावे यासाठी बँका प्रयत्नशील असतात.क्रेडिट कार्डाची सुरुवात नक्की कधी झाली? याबद्दल अनेक मतमतांतरे असली ज्याला क्रेडिट कार्ड म्हणता येईल अशा चार्ज प्लेट्स अमेरिकेत १९२८ साली अस्तित्वात आल्या. #म#मराठी