#Thread | पुणे महापालिकेच्या वतीनं आपण उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणार !
पुणे शहराबाबत मुंबई उच्च न्यायालयात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जुनी सादर करण्यात आली असावी. पूर्वीसारखी परिस्थिती पुण्यात आता नाही. म्हणूनच या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये संभ्रम आणि...
(१/८)
भीती निर्माण होऊ नये, या उद्देशाने मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. तसेच पुण्यात आणखी कडक लॉकडाऊन लावण्याची आवश्यकता नसल्याचीही आपली भूमिका आहे.
पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी जी उच्च न्यायालयात सादर करण्यात आली आहे.
(२/८)
ती सध्याची असू शकत नाही. कारण गेल्या दोन आठवड्यात परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. राज्य सरकारकडून सध्या आकडेवारीत घोळ सुरू आहे. त्यांच्याकडून जी आकडे जाहीर केली जात आहे. यामध्ये प्रचंड विसंगती दिसून येत आहे. मात्र मागील पंधरा दिवसात पुणे शहरात चांगली परिस्थिती पाहण्यास
(३/८)
मिळत असून सक्रिय रुग्णांची संख्या जवळपास १६ हजारांनी कमी झाली आहे. तर मृत्यूदरदेखील तुलनेने खाली आला आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या माध्यमातून पुण्यात ७ ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येत आहेत.
पुणे शहरातील रुग्णसंख्या आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने, अनेक उपाययोजना केल्या जात आहे.
(४/८)
मात्र त्याच दरम्यान पुण्यात १ लाख आणि मुंबईत ५३ हजारांच्या आसपास रुग्णसंख्या असल्याचे पुढे आले आहे. ही आकडेवारी जिल्ह्याची असेल, असे मला वाटते. पुणे शहरात जवळपास ३९ हजार सक्रीय रुग्ण आहे. हीच संख्या १५ दिवसांपूर्वी ५५ हजारांच्या पुढे होती.
(५/८)
ही संख्या निर्बंध आणि उपाययोजना यामुळेच आटोक्यात आली आहे. तर शहर, पिंपरी चिंचवड, ग्रामीण अशी मिळून लाखभर संख्या दाखविण्यात आली असावी.
पुणे शहराची परिस्थिती नियंत्रणात असून आता सर्व माहिती घेऊन मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले जाणार आहे.
(६/८)
तसेच कालपासून पुन्हा कडक लॉक डाऊन लागणार अशी चर्चा सुरू झाली. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याने, आम्ही न्यायालयात आमची बाजू मांडू आणि सध्या शहरात अत्यावश्यक सेवा सुरू आहे. यामुळे आणखी लॉकडाऊन लावण्याची आवश्यकता नाही.
(७/८)
पुणे शहरात १८ एप्रिल, २०२१ रोजी एक्टिव्ह कोरोनाबाधितांची संख्या ५६ हजार ०३६ इतकी होती, जी ६ मेपर्यंत ३९ हजार ५८२ पर्यंत खाली आली आहे. याचाच अर्थ एक्टिव्ह रुग्णसंख्येत तब्बल १७ हजार ०५४ इतकी घट झाली आहे.
(८/८)
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
अवघ्या दोन आठवड्यात साकारला 'ऑक्सिजन जनरेटिंग प्लान्ट' !
रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोनारुग्णांची संख्या आणि ऑक्सिजनचा विस्कळीत पुरवठा लक्षात घेता आपण अवघ्या दोन आठवड्यात 'ऑक्सिजन जनरेटिंग प्लान्ट' दळवी हॉस्पिटलमध्ये साकारला असून ऑक्सिजन निर्मितीलाही सुरुवात झाली आहे.
प्रस्ताव ते प्रत्यक्ष ऑक्सिजननिर्मिती अवघ्या १५ दिवसात शक्य केले आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण माझ्या हस्ते करण्यात आले.
ऑक्सिजन मागणीच्या प्रमाणात ऑक्सिजनची निर्मिती आणि पुरवठा होत नाही. महापालिकेच्या दळवी हॉस्पिटलमध्ये १३० ऑक्सिजन बेड्स आहेत.
सद्यस्थितीत या हॉस्पिटलमध्ये २२०० किलो प्रती दिनप्रमाणे ऑक्सिजनचा वापर आहे. सद्यस्थितीत ऑक्सिजनची कमतरता निर्माण झालेली असल्याने ऑक्सिजन जनरेटिंग प्लान्टसारखी पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता निर्माण झालेली होती, म्हणूनच आपण अवघ्या दोन आठवड्यात हा प्रकल्प प्रत्यक्षात साकारला आहे.
शास्त्रज्ञांनी पुण्यात केलेली रक्तनमुन्यांच्या ताज्या अभ्यासानुसार सार्स कोव्ही-२ विरुद्ध IgG अँटिबॉडी म्हणजे प्रतिपिंड मोठ्या प्रमाणात आढळली आहेत. अभ्यासासाठी निवडलेल्या विविध ५ प्रकारच्या निवासस्थानात राहणाऱ्या व्यक्तींमध्ये प्रतिपिंडाचे प्रमाण ३६.१ ते ६४.४ पर्यंत दिसत आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था, ट्रान्सलेशन स्वास्थ्य आणि तंत्रज्ञान संस्था, फरिदाबाद आणि ख्रिश्चन वैद्यकीय महाविद्यालय, वेल्लोर यांच्या वतीनं हे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
अभ्यासाच्या आराखड्यानुसार १ हजार ६६४ व्यक्तींचे रक्तनमुने गोळ्या करण्यात आले होते. हा अभ्यास २० जुलै ते ५ ऑगस्टदरम्यान करण्यात आला आहे. सदर चाचणीत विषाणूच्या स्पाईक प्रोटिनच्या रिसेष्टर-बाईडिंग डोमेनला ओळखणारी प्रतिपिंडे शोधण्याची प्रक्रिया केली गेली.
राज्य सरकारने महापालिकेला आर्थिक मदत द्यावी आणि वैद्यकीय सेवा वेगाने उभ्या करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली !
कोरोना संकटाच्या काळात गेली साडेचार महिने आपल्या महापालिकेने २५० कोटींपेक्षा जास्त खर्च करत सर्व यंत्रणा सक्षमपणे चालविली, आजवर कोणतीही आर्थिक अडचण येऊ दिली नाही.
परंतु आता राज्य शासनाने पुणे महापालिकेला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आज राज्याचे उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks दादा यांच्याकडे केली. पुणे शहरात नव्याने तीन जम्बो आयसोलेशन सेंटर उभे करण्यात येणार आहेत. यामध्ये तिन्ही सेंटरमध्ये ऑक्सिजन व आयसीयू बेड्स उभे करण्यात येणार आहेत.
COEP आणि SSPMS ग्राउंड येथे हे नियोजन असून पुढील वीस दिवसात पीएमआरडीएच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे. यासाठी एकूण ३०० कोटी रुपयांचा निधी लागणार आहे त्यात राज्य शासन ५०% पुणे महानगरपालिका २५% पिंपरी चिंचवड महानगरपालिका १२.५% आणि पीएमआरडीए १२.५% असा हिस्सा उचलणार आहेत.
कोरोनाचं गडद होणारे संकट आणि पुण्याची ऐतिहासिक परंपरा असणाऱ्या गणेशोत्सवानिमित्त महत्वाची बैठक माझ्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. उत्सवाचे स्वरूप, सार्वजनिक मंडळे आणि घरगुती बाप्पा याबाबत विविध मुद्द्यावर चर्चा झाली.
(१/६) @threadreaderapp
या बैठकीला उपमहापौर सरस्वतीताई शेंडगे, सभागृह नेते धीरज घाटे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार, आरपीआय गटनेत्या सुनिताताई वाडेकर, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलीस उपायुक्त सपना गोरे यांच्यासह महापालिकेतील अधिकारी उपस्थित होते.(२/६)
या विषयावर पुढे दिलेले मुद्दे मांडून त्यावर निर्णय घेण्यात आले आहेत. यावर अंतिम शिक्कामोर्तब लवकरच केलं जाईल.
- यंदाच्या वर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी प्राणप्रतिष्ठापनेची आणि विसर्जन मिरवणूक काढू नये.
- मंडळांनी मंडपाच्या ठिकाणीच मूर्तीचे विसर्जन करावे.
(३/६)
Outside Containment Zone मध्ये दुकाने सुरु करताना घ्यावयाची दक्षता
■ व्यवसायधारकाने दुकानाची वेळ निश्चित केल्याप्रमाणे म्हणजे सकाळी ०९.०० ते सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत ठेवावी.
■ व्यवसायधारक आणि काम करणारे हे प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेरील भागात राहणारे असणे आवश्यक आहे.
■ दुकानदारांनी कामगारांना फोटोसह ओळखपत्र द्यावे.
■ दुकानामध्ये काम करताना दोन कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे.
■ दुकानात काम करण्याच्या सर्व व्यक्तींनी मास्क आणि हातमोजे (Hand gloves) वापरावे.
■ दुकानात काम करण्याचा कर्मचा-यांना कोणतीही आजाराची लक्षणे दिसल्यास तात्काळ मनपा दवाखान्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊन त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करावी.
■ कर्मचाऱ्यांना हात वेळोवेळी स्वच्छ धुण्यासाठी सावण/मॅनिटायझरची व्यवस्था करावी व आवश्यक ती सुविधा उपलब्ध करून द्यावी
पुणे शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेत आगामी गणेशोत्सव साधेपणानं साजरा करण्याचा निर्णय गणेशोत्सव मंडळांनी घेतला आहे. या संवेदनशील आणि समाजाभिमुख निर्णयाबद्दल सर्व मंडळांचे पुणेकरांच्या वतीनं मनःपूर्वक धन्यवाद !
मी स्वतःदेखील सर्वात आधी गणेश मंडळाचा कार्यकर्ता. गणेशोत्सव कार्यकर्त्यांसाठी नेमका काय असतो? हे शब्दांत सांगणे कठीण आहे. वर्षभर आतुरतेने उत्सवाची वाट पाहत असताना उत्सव जसजसा जवळ येतो, तसतसा अंगात वेगळाच उत्साह अंगात संचारतो.
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मंडळानी घेतलेला निर्णय अत्यंत जड अंतःकरणाने घेतला असणार, यात अजिबातही शंका नाही. मात्र व्यापक सामाजिक हिताचा विचार करून घेतलेला हा निर्णय कार्यकर्त्यांच्या संवेदनशील मनाची साक्ष देणारा आहे.