काल या झाकणझुल्याला ‘Quote’ करुन उत्तर दिलं नाही म्हणून आज काही झाकणझुले बांगड्या फोडतायेत.

102nd Constitutional Amendment च्या मागे लपून #महाविनाशआघाडी चा अकार्यक्षमपणा लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न चालू आहे.

पण प्रत्येक वेळेला केंद्रावर जबाबदारी ढकलून पळ काढता येत नाही.

१/९
१०२ वी घटना दुरुस्तीचं विधेयक ११ एप्रिल, २०१७ रोजी राज्य सभेने एका ‘Select Committee’ कडे पाठलेलं.

भुपेंद्र यादव (भाजप) या कमिटी चे अध्यक्ष होते.

महाराष्ट्राचे हुसैन दलवाई (कॉंग्रेस), प्रफुल पटेल (राष्ट्रवादी) आणि अनिल देसाई (शिवसेना) हे पण या कमिटीचे सदस्य होते.

२/९
पुढे ८ ॲागस्ट, २०१८ ला राज्य सभेत ह्या विधेयकला १५६ सांसदांनी मंजूरी दिली.

कॉंग्रेस व इतर विरोधी पक्षांच्या पाठिंब्याशिवाय १०२ वी घटनादुरुस्ती करणे शक्य नव्हते, याचेही भान आज कॉंग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी बाळगले पाहिजे.

३/९
एवढंच नाही तर मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ज्येष्ठ कॉंग्रेस नेते आणि माजी न्याय मंत्री विरप्पा मोइली यांनी देखील महाराष्ट्र राज्य सरकारलाच दोष दिला.

कॉंग्रेसच्याच नेत्याने #महाविनाशआघाडी ला घरचा आहेर देऊन पुढे काय करता येईल हे सांगितलं.

४/९
विरप्पा मोइली यांनी हे पण नमूद केलं कि पुढे केंद्र सरकार तेव्हाच काही तरी करु शकेल जेव्हा राज्य सरकार पुढाकार घेईल.

त्यामुळे महाराष्ट्र राज्य सरकारने सगळं केंद्र सरकारवर ढकलणं बंद करावं.

आता प्रिंटर खराब होणे, अहवालाचा अनुवाद न करणे आदि बालिशपणा राज्य सरकारने थांबवावा.

५/९
#मराठा_आरक्षण - या वर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर भाजप नेते गणेश सिंह काय म्हणाले ते वाचा.

एवढंच नाही तर मार्च मधे भुपेंद्र यादव (२०१७ च्या सिलेक्ट कमिटी चे अध्यक्ष) यांनी १०२ व्या घटनादुरुस्ती चं केलेलं interpretation राज्यांच्या बाजूचंच होतं.

६/९
केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात केलेल्या युक्तिवादाचे राज्य सरकारचे वकील समर्थन करतात आणि बाहेर माध्यमांसमोर राज्य सरकारचे मंत्री मात्र केंद्र सरकारला दोषी ठरवतात.

हा दुतोंडीपणा अजून किती दिवस चालणारे🤷🏻‍♂️

७/९
३ दिवस झाले तरी आधारवड #मराठा_आरक्षण या बद्दल काही बोलायला तयार नाहीत.

पण हॉटेल आणि बार मालकांसाठी मात्र शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना भलं-मोठं पत्र लिहीलं.

असो, जाळीदार टोपी अभिमानाने मिरवणाऱ्या पवारांची मराठा आरक्षणाबाबत भूमिका सर्वश्रुत आहेच.

८/९
काल एका स्पेस मधे @marathikedar ने एक प्रश्न काय विचारला तर हे सगळे झाकणझुले सैर-भैर झाले.

गेल्या २०-३० वर्षांचं सोडा, २०१९ मधे फडणवीसांनी केलेला कायदा जर मान्य नव्हता तर गेल्या १.५ वर्षात त्यात बदल का नाही केला या #महाविनाशआघाडी ने?

का वसुली मधून वेळ नाही मिळाला यांना🤷🏻‍♂️

९/९

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Devashish Kulkarni

Devashish Kulkarni Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @HearMeRoar21

11 Apr
हैंदव धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची हत्या ही ‘मनुस्मृतिच्या कायद्याची अम्मलबजावणी होती’ - satyashodhak.com

हा विकृत इतिहास अनेक B-ग्रेडी बाजारु विचारवंत पसरवत असतात.

पण सत्य काय आहे? शंभूराजेंची हत्या कोणी आणि का केली हे जाणून घेऊयात ‘मआसिर-ए-आलमगिरी’ मधून.

१/४
मआसिर-ए-आलमगिरी औरंगजेबाच्या शेवटच्या सचिव व लाडका शिष्य (इनायतुल्लाह खान कश्मीरी) याच्या सांगण्यावरुन मुहम्मद साकी मुस्तैद खान ने १७१० मध्ये पूर्ण केला.

मआसिर-ए-आलमगिरी च्या ३२व्या अध्यायात पृ.१९४ ते १९६ वर धर्मवीर शंभूराजे आणि कविकलश यांच्या अमानूष हत्येचा उल्लेख आहे.

२/४
धर्मवीर शंभूराजे आणि छंदोगामत्य कविकलश यांना कशा प्रकारे हाल करुन आणि कोणाच्या सांगण्यावरुन मारलं गेले हे साफ नमूद केलेलं आहे.

एवढंच नाही तर ‘का मारलं गेलं’ हे पण नमूद केलेलं आहे.

आता समकालीन मआसिर-ए-आलमगिरी वर विश्वास ठेवायचा का विकृत इतिहासावर, हे ज्याने-त्याने ठरवावे.

३/४
Read 4 tweets
10 Apr
प्रति #महाराष्ट्रद्रोही_ठाकरेसरकार व सर्व #PaaltuPatrakaar

दि.५ व ६ एप्रिल, हे २ दिवस मी माझ्या आजोबांना घेऊन बेड साठी अख्खं पुणे पालथं घातलेलं. असंख्य लोकांना फोन केले.

पण पुण्यात कुठेच बेड नाही मिळाला. PMC ने फोन करुन ३ प्रायव्हेट हॅास्पिटल्स ची नावं सांगितली.

१/५
हॅास्पिटल ला फोनवर पहिलेच ‘बिल किती होईल’ हे विचारा, असं पण सांगितलं.

हे ऐकूनंच आम्ही फोन नाही केला.

स्वामीकृपेमुळे आजोबा स्टेबल आहेत व होम आयसोलेशन मधेच रिकव्हर होतायेत.

पण असे कित्येक लोकं आहेत ज्यांना बेड ची गरज असून देखील बेड मिळत नाहीयेत.

२/५
का? कारण महाराष्ट्र सरकार ने गेल्या वर्षी उघडलेली कित्येक Covid Care Centres बंद केली.

‘Preventive’ वॅक्सिनसाठी बोंबा मारताना तुम्ही ‘Curative’ #Remdesivir बद्दल का बोलत नाही आहात?

संघाच्या ग्रुप वर रोज बेड व Remdesivir साठी मेसेजेस येत असतात.

३/५
Read 5 tweets
4 Apr
सर्वप्रथम, ‘छत्रपती शिवाजी महाराज सनातन हिंदु धर्माचे पालन करत होते’ हे त्रिवार सत्य मान्य केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.

या वेळेला तर तुम्ही कहरंच केलात. रायगडाच्या वाताहतीसाठी पेशव्यांसोबत पुण्यश्लोक शाहूछत्रपतींना पण दोषी ठरवलत🤦🏻‍♂️

पुन्हा एकदा सत्य काय आहे ते बघूयात.

१/११
१७७३, १७८६-८७, १७९६-९७ या साली रायगडावर उत्सव असो, सिंहासनासाठी तख्त पुजारी नेमणे असो, सिंहासनाची डागडूची असो, नगारखान्याची व्यवस्था असो -

हे सगळं असून पण तुम्ही पुण्यश्लोक शाहू महाराज आणि पेशव्यांना रायगडाच्या वाताहती साठी कसं दोषी ठरवता, हे तुम्हालाच ठाऊक🤷🏻‍♂️

२/११
एवढंच नाही तर, जेम्स डगलस ने ‘Book of Bombay’ मधे ‘दुसऱ्या बाजीरावाची बायको १८१८ मधे रायगडावर राहत होती’ हे नमूद केलेलं आहे.

यावरुन एक गोष्ट स्पष्ट होते कि एप्रिल १८१८ पर्यंत रायगडची अवस्था ‘चांगली’ होती.

मग वाताहात कशामुळे झाली?

याचं उत्तर खूप सोप्पं आहे.

३/११
Read 11 tweets
3 Apr
#Thread:

इतिहास संशोधनातला एक महत्वाचा नियम असा आहे की इतिहासकार - मग तो कितीही मोठा असो - त्याची किंमत केवढी? तर त्याने दिलेल्या पुराव्या एवढी!

कादंबऱ्यांमधून हास्यासपद संदर्भ देणाऱ्या श्री.पाटील यांना आज कळेल की ‘पुरावे गोळा करायला बरेच दिवस लागलेले’ बरे असतात.

१/२३
श्री.पाटील यांचा हा संदर्भ किती हास्यासपद आहे ते बघा:

🔸जेम्स डगलस ने त्याच्या Book of Bombay च्या पृ.४३३ वर शिवछत्रपतींच्या समाधीचं वर्णन केलय व समाधीच्या अवस्थेसाठी मुख्यत: सातारकर व कोल्हापूर छत्रपतींसह त्यांच्या पेशव्यांना दोषी ठरवलय.

“No man now cares for Seevajee”.

२/२३
🔸इंग्रजांच्या हाती रायगड ‘मे १८१८’ मध्ये आला, १८१६ मध्ये नाही.

आणि तुमच्या माहिती करिता जेम्स डगलस चे ‘Book of Bombay’ हे प्रथम १८८२ मध्ये प्रकाशित झालं.

तुम्ही १८१६ मध्ये हे वृत्तांत कसं प्रकाशित करवलं हे तुम्हालाच ठाऊक.

असो.

३/२३
Read 16 tweets
2 Apr
रडायची सवय तुम्हाला असेल मला नाही!

जसं सरदेसाईंनी शिवसमर्थांबद्दल केलेल्या ‘त्या’ दाव्याला समकालीन पुरावा नाही तसंच ‘शिवछत्रपतींनी रायगडावर मशीद बांधली’ या दाव्याला पण समकालीन पुरावा नाही.

मी कधीही कुठल्याही ट्वीट/थ्रेड मधे ‘शिवसमर्थ भेट १६४९ मधे झाली’ हा दावा केलेला नाही.

१/४
तुमच्या खास मित्राला पण उत्तर देताना शिवसमर्थ भेटी बद्दल मी केलेला हा उल्लेख👇🏼 नीट वाचा.

आणि १६७० नंतर शिवसमर्थ संबंध जोडायला अनेक ‘समकालीन पत्र’ उपलब्ध आहेत.

त्यासाठी कुठल्या ही कादंबरी चा आधार घेण्याची गरज नाही.

२/४ Image
केळूसकरांचं पुस्तक वाचून तुम्हे ज्या प्रकारे त्यांचं म्हणणं मांडता ना त्यालाच ‘Selective Interpretation’ म्हणतात.

कारण केळूसकरांनी केलेल्या या👇🏼दाव्यांना ‘समकालीन पुरावे आहेत. पण पुरावे असून देखील केळूसकरांचं हे👇🏼मत तुम्ही मान्य करणार नाही.

असो.

३/४ ImageImageImageImage
Read 4 tweets
28 Mar
नमस्कार पाटील,

थ्रेडची सुरुवातंच खोटं बोलून केल्याबद्दल तुमचं अभिनंदन. पेशव्यांना दोषी ठरवल्याने ४ लाईक्स जास्तं मिळाले असतील.

🔸१७३३ नंतर रायगड पेशव्यांच्या देखरेखीत आला. पेशवेकालीन रायगड कसा होता ते पाहूयात👇🏼

सिंहसनासाठी तख्त-पुजारी नेमणारे समाधीकडे दुर्लक्ष करतील का🤷🏻‍♂️

१/२२
आता शिवछत्रपतींच्या समाधीची अवस्था बिकट का झाली ते पाहूयात.

१८१८ मधे ले.कर्नल प्रॅाथर या इंग्रज अधिकाऱ्याने रायगडचा ताबा मिळवला. इंग्रजांनी तोफांचा वापर करुन किल्ल्याचं बरंच नुकसान केलेलं.

१८१८ मधेच प्रॅाथर ने महाराजांच्या समाधी चा उल्लेख केलाय.

२/२२
आता ज्या अर्थी एका इंग्रजाला समाधी ओळखता आली किंवा त्याला ज्याने कोणी ओळख पटवून दिली, त्या अर्थी समाधी सुस्थितीतंच असेल.

पुढे इंग्रजांनी रायगडावर जाण्यास बंदी घातलेली. १८८३ पर्यंत रायगडावर कोणी प्रवासी चढून गेल्याचे आढळत नाही.

१८१८ ते १८८३- हा काळ झाडं उगवायला पुरेसा आहे.

३/२२
Read 23 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(