कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांसाठी विशेष टास्क फोर्सची स्थापना !

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना पुणे महानगरपालिका सक्षमपणे करत असून तज्ञांची मते लक्षात घेता तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आपण सज्जता ठेवण्यास प्राधान्य देत आहोत. Image
याचाच एक भाग म्हणून लहान मुलांच्या कोरोना उपचारांसाठी आणि त्यांच्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विशेष टास्क फोर्सची स्थापना केली आहे.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर पुणे शहरातील बालरोग तज्ञांची महत्वाची बैठक ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. Image
यात तज्ञांची सर्वांगीण मते जाणून घेत लहान मुलांसाठी विशेष टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय घेतला. बैठकीत ५३ बालरोग तज्ञ सहभागी झाले होते. यावेळी महापौर कार्यालयातून माझ्या सोबत उपमहापौर सुनीता वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, Image
विरोधीपक्ष नेत्या दीपाली धुमाळ, आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्यासह नगसेवक आणि अधिकारी उपस्थित होते.

पुण्यात आता कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचे चित्र आहे. मात्र असे सकारात्मक चित्र असले, तरी कोणतीही गाफीलताआपण ठेवणार नाहीत. Image
तसेच देशभरात तिसऱ्याला लाटेसंदर्भात तज्ञांची विविध मते समोर येत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवरच आपण लहान मुलांच्या कोरोना उपचारांसाठी आणि लहान मुलांमधील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विशेष भर देत आहोत.
याचा पहिला टप्पा म्हणजे पुणे महानगरपालिका येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात अद्ययावत सुविधांचे चाईल्ड कोविड केअर रुग्णालय सुरू करत आहे. तसेच दुर्दैवाने लहान मुलांमध्ये संसर्ग वाढला, तर आपली पूर्णपणे तयारी असावी. या दृष्टिकोनातून टास्क फोर्स विशेष जबाबदारी भूमिका निभावणार आहे.

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Murlidhar Mohol

Murlidhar Mohol Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @mohol_murlidhar

13 May
लसीकरणाची माहिती आता घरबसल्या !

पुणे शहरात नागरिकांना लसीकरण केंद्रावर गेल्यावर सध्या मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहण्यास मिळते. त्या पार्श्वभूमीवर पुणेकर नागरिकांना उद्या कोणत्या केंद्रावर किती डोस मिळणार, ही माहिती घरबसल्या मिळणार आहे. ImageImageImageImage
त्यासाठी संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले असून पुणेकरांना लसीकरणासंदर्भातील सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

लसीकरणासाठी आवश्यक असणारी सर्व माहिती आता punevaccination.in या संकेतस्थळावर मिळणार असून याचे लोकार्पण आज माझ्या हस्ते करण्यात आले.
पुणे महानगरपालिका आणि एमसीसीआयए यांच्या माध्यमातून या डॅशबोर्डची निर्मिती करण्यात आली आहे.

यावेळी स्थायी समिती अध्यक्ष श्री. हेमंतजी रासने, सभागृह नेते श्री. गणेशजी बिडकर, विरोधी पक्षनेत्या दिपालीताई धुमाळ, आयुक्त श्री. विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल उपस्थित होते.
Read 5 tweets
7 May
#Thread | पुणे महापालिकेच्या वतीनं आपण उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणार !

पुणे शहराबाबत मुंबई उच्च न्यायालयात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जुनी सादर करण्यात आली असावी. पूर्वीसारखी परिस्थिती पुण्यात आता नाही. म्हणूनच या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये संभ्रम आणि...
(१/८)
भीती निर्माण होऊ नये, या उद्देशाने मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. तसेच पुण्यात आणखी कडक लॉकडाऊन लावण्याची आवश्यकता नसल्याचीही आपली भूमिका आहे.

पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी जी उच्च न्यायालयात सादर करण्यात आली आहे.
(२/८)
ती सध्याची असू शकत नाही. कारण गेल्या दोन आठवड्यात परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. राज्य सरकारकडून सध्या आकडेवारीत घोळ सुरू आहे. त्यांच्याकडून जी आकडे जाहीर केली जात आहे. यामध्ये प्रचंड विसंगती दिसून येत आहे. मात्र मागील पंधरा दिवसात पुणे शहरात चांगली परिस्थिती पाहण्यास
(३/८)
Read 8 tweets
5 May
अवघ्या दोन आठवड्यात साकारला 'ऑक्सिजन जनरेटिंग प्लान्ट' !

रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोनारुग्णांची संख्या आणि ऑक्सिजनचा विस्कळीत पुरवठा लक्षात घेता आपण अवघ्या दोन आठवड्यात 'ऑक्सिजन जनरेटिंग प्लान्ट' दळवी हॉस्पिटलमध्ये साकारला असून ऑक्सिजन निर्मितीलाही सुरुवात झाली आहे. ImageImageImageImage
प्रस्ताव ते प्रत्यक्ष ऑक्सिजननिर्मिती अवघ्या १५ दिवसात शक्य केले आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण माझ्या हस्ते करण्यात आले.

ऑक्सिजन मागणीच्या प्रमाणात ऑक्सिजनची निर्मिती आणि पुरवठा होत नाही. महापालिकेच्या दळवी हॉस्पिटलमध्ये १३० ऑक्सिजन बेड्स आहेत.
सद्यस्थितीत या हॉस्पिटलमध्ये २२०० किलो प्रती दिनप्रमाणे ऑक्सिजनचा वापर आहे. सद्यस्थितीत ऑक्सिजनची कमतरता निर्माण झालेली असल्याने ऑक्सिजन जनरेटिंग प्लान्टसारखी पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता निर्माण झालेली होती, म्हणूनच आपण अवघ्या दोन आठवड्यात हा प्रकल्प प्रत्यक्षात साकारला आहे.
Read 5 tweets
17 Aug 20
शास्त्रज्ञांनी पुण्यात केलेली रक्तनमुन्यांच्या ताज्या अभ्यासानुसार सार्स कोव्ही-२ विरुद्ध IgG अँटिबॉडी म्हणजे प्रतिपिंड मोठ्या प्रमाणात आढळली आहेत. अभ्यासासाठी निवडलेल्या विविध ५ प्रकारच्या निवासस्थानात राहणाऱ्या व्यक्तींमध्ये प्रतिपिंडाचे प्रमाण ३६.१ ते ६४.४ पर्यंत दिसत आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था, ट्रान्सलेशन स्वास्थ्य आणि तंत्रज्ञान संस्था, फरिदाबाद आणि ख्रिश्चन वैद्यकीय महाविद्यालय, वेल्लोर यांच्या वतीनं हे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
अभ्यासाच्या आराखड्यानुसार १ हजार ६६४ व्यक्तींचे रक्तनमुने गोळ्या करण्यात आले होते. हा अभ्यास २० जुलै ते ५ ऑगस्टदरम्यान करण्यात आला आहे. सदर चाचणीत विषाणूच्या स्पाईक प्रोटिनच्या रिसेष्टर-बाईडिंग डोमेनला ओळखणारी प्रतिपिंडे शोधण्याची प्रक्रिया केली गेली.
Read 5 tweets
27 Jul 20
राज्य सरकारने महापालिकेला आर्थिक मदत द्यावी आणि वैद्यकीय सेवा वेगाने उभ्या करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली !

कोरोना संकटाच्या काळात गेली साडेचार महिने आपल्या महापालिकेने २५० कोटींपेक्षा जास्त खर्च करत सर्व यंत्रणा सक्षमपणे चालविली, आजवर कोणतीही आर्थिक अडचण येऊ दिली नाही.
परंतु आता राज्य शासनाने पुणे महापालिकेला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आज राज्याचे उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks दादा यांच्याकडे केली. पुणे शहरात नव्याने तीन जम्बो आयसोलेशन सेंटर उभे करण्यात येणार आहेत. यामध्ये तिन्ही सेंटरमध्ये ऑक्सिजन व आयसीयू बेड्स उभे करण्यात येणार आहेत.
COEP आणि SSPMS ग्राउंड येथे हे नियोजन असून पुढील वीस दिवसात पीएमआरडीएच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे. यासाठी एकूण ३०० कोटी रुपयांचा निधी लागणार आहे त्यात राज्य शासन ५०% पुणे महानगरपालिका २५% पिंपरी चिंचवड महानगरपालिका १२.५% आणि पीएमआरडीए १२.५% असा हिस्सा उचलणार आहेत.
Read 7 tweets
23 Jul 20
पुणे शहरातील गणेशोत्सवाचं नियोजन !

कोरोनाचं गडद होणारे संकट आणि पुण्याची ऐतिहासिक परंपरा असणाऱ्या गणेशोत्सवानिमित्त महत्वाची बैठक माझ्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. उत्सवाचे स्वरूप, सार्वजनिक मंडळे आणि घरगुती बाप्पा याबाबत विविध मुद्द्यावर चर्चा झाली.
(१/६) @threadreaderapp
या बैठकीला उपमहापौर सरस्वतीताई शेंडगे, सभागृह नेते धीरज घाटे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार, आरपीआय गटनेत्या सुनिताताई वाडेकर, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलीस उपायुक्त सपना गोरे यांच्यासह महापालिकेतील अधिकारी उपस्थित होते.(२/६)
या विषयावर पुढे दिलेले मुद्दे मांडून त्यावर निर्णय घेण्यात आले आहेत. यावर अंतिम शिक्कामोर्तब लवकरच केलं जाईल.

- यंदाच्या वर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी प्राणप्रतिष्ठापनेची आणि विसर्जन मिरवणूक काढू नये.
- मंडळांनी मंडपाच्या ठिकाणीच मूर्तीचे विसर्जन करावे.
(३/६)
Read 6 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(