गरमागरम भज्यांना कुरकुरीतपणा आणणारे अमृत म्हणजे #खाद्यतेल..
पण गेल्या ६ महिन्यात याच खाद्यतेलांच्या किंमती ४० ते ५० % वाढल्या आहेत.
परंतु अनेकांना याच कारणच माहिती नसल्याने ते सवयीप्रमाणे केंद्र सरकारला दोषी धरत आहेत.
याविषयावर सर्वांनाच माहिती व्हावी म्हणूनच हा लेखन प्रपंच ~
जानेवारी २०२१ ची आकडेवारी पाहिली तर जून २०२० पासून खाद्यतेलांच्या किंमती जवळपास ४० ते ५० टक्क्यांनी वाढलेल्या आपल्याला दिसून येतील.
यातील १५ टक्के वाढ एकट्या जानेवारी महिन्यात झाली आहे.
Solvent Extractor's Association of India चे अध्यक्ष अतुल चतुर्वेदी यांनी जानेवारी मध्ये सांगितलेलं की, या वाढलेल्या किमती एप्रिल मे अखेरपर्यंत राहतील आणि त्यानंतर हळू हळू कमी होतील.
💰 किंमती का वाढल्या?
आपल्या देशात पाम, सोयाबीन आणि सूर्यफुल या ३ तेलांचा सर्वाधिक वापर होतो.
➡️ पाम तेल -
जगाला पाम तेलाचा जवळपास ८०% पुरवठा मलेशिया व इंडोनेशियातर्फे केला जातो.
मलेशियाने कश्मीरबाबत पाकिस्तानला पाठिंबा दिल्यानंतर भारत मलेशिया संबंध बरेच ताणले गेले होते. त्यावेळी आपण पाम तेल आयात करायचं बंद केलं होत. मात्र २०२० मध्ये पुन्हा आयात करण्यास सुरुवात केली.
मात्र कोरोनामुळे तिथले ही पाम तेलाचे उत्पादन कमी झाले आहे.
मात्र चीन कोरोनातुन सावरत असल्याने चीनची तेलाची मागणी देखील वाढली आहे.
गेल्या सहा महिन्यात चीनने पाम तेलाची आयात ३१% वाढवली आहे.
जानेवारी २०२० च्या तुलनेत जानेवारी २१ मध्ये चीनचे खाद्यतेलाची मागणी ४८% वाढली आहे.
उत्पादन कमी असताना चीनने आयात वाढवल्याने त्याचा प्रभाव तेलाच्या किंमतीवरही पडला.
➡️ सोयाबीन तेल -
जगभरात ब्राझील आणि अर्जेंटिना हे दोन प्रमुख देश आहेत जे सोयाबीनचे प्रमुख उत्पादक आहेत.
मात्र तिथल्या दुष्काळामुळे आणि कोरोनामुळे गेल्या १० वर्षात सोयाबीनचे सर्वात कमी उत्पादन आले.
➡️ सूर्यफुल तेल -
रशिया आणि युक्रेन सूर्यफुलाच्या बियांचे मुख्य निर्यातदार आहेत. भारतही यांच्याकडूनच खरेदी करत असतो.
मात्र या दोन्ही देशात मिळून सूर्य फुलाच्या बियांचे उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा जवळपास ३० लाख टन कमी झाले आहे.
ज्यामुळे यांच्या किंमती ही वाढल्या.
भारत जवळपास सुमारे ६५% तेल इतर देशांमधून आयात करतो. त्यामुळे जगाच्या पाठीवर घडलेल्या गोष्टींचा प्रभाव भारतावर पडणे निश्चित आहे.
भारतात खूप आधीपासून खाद्य तेलांवर आयात कर वसूल गेला जातो. पाम तेलावर तो ३७.५% होता.
नोव्हेंबरमध्ये केंद्र सरकारने त्यात १० टक्के कपात करून २७.५% केला.
मात्र ज्या देशांमधून आपण आयात करतो तिथे किंमत वाढल्याने हा आपल्याला हा बदल दिसून नाही आला.
याव्यतिरिक्त पाम तेलावर १७.५% तर सोयाबीन आणि सूर्यफुल तेलावर २०% कृषी सेस आकारला जातो.
मात्र सरकार हा कृषी सेस देखील कमी करण्याच्या विचारात आहे.
येत्या महिनाभरात सरकारने आयात केलेलं खाद्यतेल बाजारात येईल, तेव्हा तेलाच्या किंमती निश्चितच कमी होतील.
माहिती नसताना उगाच केंद्र सरकारला दोष देण्यापेक्षा आधी माहिती घेत चला.
क्यूँ की पढेगा इंडिया, तभी तो आगे बढेगा इंडिया 🇮🇳
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
जयेश कुलकर्णी, नंदुरबार येथे ११ वीत शिकणारा एक स्वयंसेवक...
आई सात वर्षापूर्वीच गेली तेव्हापासून जयेश आणि त्याची बहीण नंदुरबारला मामाकडेच राहतात तर वडील जवळच एका लहान गावात राहायचे.
काही दिवसांपूर्वी वडिलांना कोरोनाने ग्रासलं.
दुखणं बळावल्याने हॉस्पिटलला दाखल कराव लागलं, त्यातून रेमिडीसिवरचा तुटवडा..
खूप फिरला इंजेक्शनसाठी , सर्वजण प्रयत्न करत होते, एका स्थानिक नगरसेवकांच्या (श्री. कळवणकर) माध्यमातुन इंजेक्शन उपलब्ध झाले, परंतु उशीर झाला. त्याच रात्री जयेशच्या वडिलांना शासकीय रुग्णालयात हलवावं लागलं.
आणि नंतर त्यात त्यांचा दुर्दैवी अंत झाला....
दरम्यान ज्या नगरसेवकांनी इंजेक्शन उपलब्ध करून दिले होते. त्यांच्याकडे दाराशी पहाटेपासून एक जोडपं बसलं होत, त्यांच्या मुलासाठी इंजेक्शन मिळेल का या आशेवर...
#पेमा_खांडू हे नाव खूपच कमी लोकांना माहिती होत. अर्थात चमकोगिरीच्या या काळात जमिनीवर काम करणारे नेहमीच दुर्लक्षित राहतात.
पण काल त्यांनी विजयनगरला भेट दिली आणि अनेकजणांना त्यांची ओळख झाली.
पेमा खांडू अरुणाचल प्रदेशातील विजयनगरला by road भेट देणारे पहिलेच मुख्यमंत्री...
आता तुम्ही म्हणाल, राज्याच्या मुख्यमंत्र्यांने राज्यातीलच एखाद्या गावाला भेट दिली तर त्याच एवढं काय कौतुक?
कौतुक यासाठीच की आजपर्यंत या भागाला कुठल्याच मुख्यमंत्र्यांने रस्त्याने प्रवास करत भेट दिली नव्हती, इतके खराब रस्ते आहेत. रस्ते कसले मातीचे ढिगारेच ते...
मियाओ ते विजयनगर असा १५७ किमीचा प्रवास करताना, कधी गाडी तर कधी पायी असा पूर्ण करताना त्यांना तब्बल दोन दिवस लागले.
एका ठिकाणी तर पेमा खांडू स्वतः गाडीच स्टिअरिंग हातात घेत गाडी खड्ड्यातून बाहेर काढताना दिसले.
राहुल गांधींनी नुकतीच संघ विचारांनी प्रेरित #विद्याभारती च्या शाळांची तुलना पाकिस्तानातील कट्टरपंथी मदरशांसोबत करत, बौद्धिक दिवाळखोरीच पुन्हा एकदा प्रदर्शन केलं आहे.
ज्यांना माहिती नाही #विद्याभारती काय आहे त्यांच्यासाठी -
➡️ शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठी अशासकीय शिक्षण संस्था
➡️ संपूर्ण भारतात सुमारे १८,००० प्राथमिक शाळा, विद्यालये आणि महाविद्यालये कार्यरत.
➡️ संलग्न विद्यालयाची संख्या जोडल्यास हाच आकडा २३,००० पर्यंत जातो.
➡️ शिक्षक संख्या - १,४७,६३४
➡️ विद्यार्थी संख्या (२०१९-२०) - सुमारे ३५ लाख
➡️ उद्देश - देशभक्तीने ओतप्रोत भरलेली युवा पिढी तयार करणे.
➡️ विद्याभारतीच्या शाळांमध्ये शारीरिक शिक्षा, योग शिक्षा, नैतिक व आध्यात्मिक शिक्षा, संस्कृत भाषा ई. विषयांवर विशेष लक्ष दिले जाते.
पिझ्झा म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर येत एकदम महागडे रेस्टॉरंट, त्यांचा झगमगाट आणि त्याच भरमसाठ बिल...
पण पिझ्झाचा जन्म कसा झाला? याबाबत आपल्याला फार कमी माहिती असेल...
एकवेळ गरीबांच्या पोटाची भूक भागवणारा पिझ्झा आता श्रीमंत झालाय त्यावर एक छोटासा थ्रेड -
युरोप मध्ये नेपल्स नावाचं एक बंदर होत. खलाशी, हमाल यांच्या वर्दळीने हे बंदर कायम गजबजलेलं असायचं. इथे विश्रांती घ्यायलाही कुणाला वेळ नसायचा मग निवांत बसून भरपेट जेवण करणे तर फार दूरची गोष्ट..
पण म्हणतात ना गरज ही शोधाची जननी असते, आणि याच गरजेचं भांडवल करून एक शक्कल बाजारात आली.
एका खानावळ वाल्याने एका रोटी वर कांदा टोमॅटोची फोडणी आणि मासळी घालून वरून भरपूर चीज टाकून एक चमचमीत आणि भूक भागेल अशी डिश तयार केली ती म्हणजे पिझ्झा...
अगदी उभ्याने पटकन खाता येईल असा हा प्रकार तिथल्या गरीब मजूर लोकांनी उचलून धरला.