बरेच लोक केनियाने पाठवलेल्या १२ टन धान्याची थट्टा करीत आहेत. केनियाला सोशल मीडियावर "भिकारी, गरीब" इत्यादी म्हटले जात आहे. तर एक छोटीशी कथा ऐका..

तुम्ही अमेरिका, मॅनहॅटन, वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि ओसामा बिन लादेन ही सर्व नावे ऐकली असतीलच.
बहुतेक लोकांनी जे ऐकले नसेल, ते म्हणजे 'केनिया आणि टांझानियाच्या सीमेवर पडणारे 'इनोसाईन' गाव आणि येथील स्थानिक जमात "मसाई"!

अमेरिकेवर झालेल्या ९/११ च्या हल्ल्याची बातमी मसाई लोकांपर्यंत पोहोचायला कित्येक महिने लागले. आपल्या जवळच्या गावात राहणारी आणि
स्टॅनफोर्ड विद्यापीठात वैद्यकीय शिक्षण घेणारी विद्यार्थिनी किमेली नाओमा सुट्टीवर जेव्हा केनियाला परत आली, तेव्हा तिने स्थानिक मसाई लोकांना ९/११ च्या हल्ल्याविषयी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेली घटना सांगितली.

एखादी इमारत इतकी उंच असू शकते की ती पडली तर तिच्याखाली दबून इतकी
माणसे मरू शकतात हे सर्व झोपडीत राहणाऱ्या त्या मसाई लोकांसाठी अविश्वसनीय होते. परंतु तरीही त्यांना अमेरिकी लोकांबद्दल दुःख वाटले आणि त्याच वैद्यकीय विद्यार्थिनीच्या माध्यमातून केनियाची राजधानी नैरोबीमधील अमेरिकन दूतावासाचे उपप्रमुख विल्यम ब्रॅंगिक यांना एक पत्र पाठवण्यात आले.
त्यांनी ते पत्र वाचले. विल्यम ब्रॅंगिक प्रथम विमानात चढले. काही काळ हवाई प्रवास आणि मग तिथून मसाई जमातीच्या गावाला जाण्यासाठी अनेक मैलांचा मोडक्यातोडक्या वाटेने प्रवास करत ते तेथे पोहोचले.

गावात पोहोचल्यावर, मसाई लोक एकत्र जमले आणि त्यांनी सोबत १४ गायी घेऊन ते अमेरिकन
दूतावासाच्या उपप्रमुखांकडे पोहोचले. मसाईसच्या एका वडिल माणसाने गाईचा दोर त्या उपप्रमुखांच्या हातात देऊन एका फलकाकडे निर्देश केले. त्या फलकावर काय लिहिले होते ते तुम्हाला माहिती आहे?

google.com/amp/s/www.wire…
त्यावर लिहिले होते -
"या दु:खाच्या घटनेत अमेरिकेच्या लोकांना मदत करण्यासाठी आम्ही या गायी दान करीत आहोत".

होय, ते पत्र वाचल्यानंतरच, जगातील सर्वात सामर्थ्यवान आणि संपन्न देशाच्या राजदूताने चौदा गायींचे दान गोळा करण्यासाठी शेकडो मैलांचा प्रवास पार केला होता.
पण पुन्हा प्रश्न उद्भवला तो गायींच्या वाहतुकीची अडचण व कायदेशीर बंधन ! या दोन्हीमुळे त्यांनी गायी नेण्यात असमर्थता दर्शवली परंतु त्या सर्व गाई विकून त्यातून येणाऱ्या रकमेतुन एक दागिना किंवा आभूषण खरेदी करून त्यास मसाई लोकांच्या कृतज्ञते बद्दल ९/११ च्या मेमोरियल म्युझियममध्ये
ठेवण्यात येईल असा प्रस्ताव ठेवण्यात आला.

जेव्हा ही गोष्ट अमेरिकेतील नागरिकांपर्यंत पोचली, तर मग काय घडले हे तुम्हाला माहिती आहे?

त्यांनी आभूषणांच्या जागी गायी स्वीकारण्याचा आग्रह धरला. मग ऑनलाईन याचिकांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या की त्यांनी गाय ठेऊन घ्याव्या, आभूषणे ठेवू नयेत.
मग अधिकारी वर्गांना ईमेल पाठवल्या गेल्या, राजकारण्यांशी चर्चा केली गेली आणि लाखो अमेरिकन लोकांनी या अभूतपूर्व प्रेमाबद्दल मसाई जमातीचे आणि केनियाच्या जनतेचे आभार मानले आणि त्यांचे अभिनंदन केले.

***
कृपया १२ टन धान्याकडे पाहू नका ते स्वीकारा. ते तुलनेने कमी असेलही कदाचित, परंतु दान नव्हे, दान देणाऱ्याच्या हृदयाकडे पहा, त्याच्या भावना पहा. लहान लहान खड्यांकडे पाहू नका, ते लहान खड़े उचलून रामसेतु निर्माणकार्याला हातभार लावणाऱ्या खारीची श्रद्धा पाहा. google.com/amp/s/www.time…
#सुदाम्याचे_पोहे #दानशूरकेनिया

राजीव शुक्ला यांच्या मूळ हिंदीतील लेखाचा जमेल तसा अनुवाद

------

मित्रवर्य Rahul Suryakant Boke यांची पोस्ट ☝🏾

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Vishal Shinde

Vishal Shinde Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @VishalShinde_

5 Jun
कनवाळू 'केनिया' कडून आलेला वानोळा ...

चहा, कॉफी, भुईमूग अशी केनियात पिकलेल्या १२टन खाद्यपदार्थांची भेट केनियाने भारताला देऊन करोना संकटात आपला मैत्रभाव व्यक्त केला आहे. मुंबईतील कोविड फ्रंटलाईन फायटर्सना मुख्यतः ही अन्नाची पॅकेट्स देण्याची इच्छा त्या देशाच्या भारतातील
उच्चायुक्तांनी व्यक्त केली आहे.

चहा, कॉफी, भुईमूग यांची भारतात वानवा आहे असे नाही. आपण जे देतोय ते अन्नपदार्थ भारतासाठी काही फार मोठे अप्रूप नसणार याची केनियाला कल्पना नाही, असेही नाही. पण थेट आपल्या शिवारातील वानोळा देण्यामागे जी " संकट काळात आम्ही सोबत आहोत " ही भावना या
लहानशा देशाने दाखवली आहे त्याला खरी दानत म्हणतात !

केनियातील माणसे आपण विडिओत पाहतो. काटक शरिराची व कणखर मनाची. तिथल्या वैविध्यपूर्ण निसर्ग व प्राण्यांशी एकरूप झालेली. चित्र विचित्र पोशाखाची. पर्यटकांशी देहबोलीतून हितगुज करणारी. निखळ, निर्व्याज मनाची.
Read 4 tweets
2 Jan
#अजिंक्य विजय

हिरोला गुंडांनी बेदम मारले आहे... तो जमिनीवर अगदी मरणोन्मुख होऊन पडला आहे.. व्हिलनला वाटते तो मेलाच... आणि अचानक कशाने तरी प्रेरित होऊन तो उभा राहतो आणि सगळ्या गुंडांना मारतो- हे पाहणे आपल्या भारतीयांना जाम आवडते. भारताने दुसऱ्या कसोटीत मिळवलेला विजय यापेक्षा

1
काही वेगळा नव्हता. पण हा विजय केवळ क्रिकेटप्रेमींनी साजरा करावा असाच नाही, तर सगळ्यांनी काही लाईफ लेसन्स घेऊन जावे असा आहे..

त्याआधी तुम्हाला थोडी पार्श्वभूमी समजून घ्यावी लागेल. ह्या जानेवारीमध्ये विरुष्काच्या प्रेमाला गोड फळ येणार हे आधीच डिक्लेअर झाले होते. जानेवारीतच भारत
2
महत्वाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यालाही येणार होता. म्हणजे पहिल्या कसोटीनंतर विराट पितृत्व रजेला जाणार त्यानंतर उपकप्तान अजिंक्य रहाणे कडे नेतृत्वाची धुरा जाणार हे आधी माहित होतेच. बहुतेकांनी याकडे थोडे नाक मुरडूनच पहिले. म्हणजे ठीक आहे की तो कसोटी संघाचा उपकप्तान आहे,

3
Read 28 tweets
2 Jan
सुशिक्षित कोण आणि अशिक्षित कोण ? या प्रश्नाचा एक नवा वेध घेणे गरजेचे आहे. सध्याची सुशिक्षित लोकांची व्याख्या त्याच्या शिक्षण नावाच्या रचनेशी जोडलेली आहे. अर्थात जो शिकलाय तो सुशिक्षित आणि नाही शिकला तो अशिक्षित . इथे एक प्रश्न जाणीवपूर्वक उभा करायला हवा की,
खरोखरीच शिक्षण घेतलेले " सुशिक्षित " आहेत का ? शिक्षण म्हणजे नेमके काय ? चार पुस्तके आणि शाळा नावाची रचना मनुष्याला सुशिक्षित बनविण्यासाठी पुरेशी आहे का ? सदसदविवेकबुध्दी शाबूत राखून या तीन प्रश्नांची उत्तरे शोधल्यास काही नकारार्थी उत्तर हाती येऊ शकतात. शिक्षण घेतलेल्या
बहुतांशी व्यक्तीचे सामाजिक वर्तन हे अत्यंत मागास दर्जाचे असते. याची उदाहरणे नुसते डोळे उघडून सर्वत्र फिरवले तरी ठायीठायी दिसतील. भ्रष्टाचार , व्यसनासक्त ,जातीयता अंधश्रध्दा अशा बरेच बाबतीत सुशिक्षित मंडळी मागे नाहीत तर पुढेच आहेत हे नाकारता येत नाही .
Read 5 tweets
13 Dec 20
शेतकरी आंदोलन करताहेत हा प्रॉब्लेम नाहीये,

शेतकरी सरकार प्रत्यक्ष चालवणाऱ्या दृश्य असलेल्या अदृश्य हातांचा बहिष्कार करायला सांगताहेत आणि कृती करताहेत हा खरा प्रॉब्लेम आहे.

कधीही कुठेही या दोन उद्योग समूहांचा उल्लेख आला की भक्त मंडळी, आयटीसेल, भाजपचे लोक का चिडतात आणि
तुटून पडतात त्यामागे हेच उघड गुपित आहे.

सगळ्यांना पक्के ठाऊक आहे,

महामहिम फक्त परदेश दौरे आणि चमकोगिरी करण्यापूरते आणि संघाचा धार्मिक अजेंडा राबवायला आहेत.

सरकारची आर्थिक, औद्योगिक धोरण ठरवणारे दुसरेच आहेत.

म्हणूनच खऱ्या मालकांची नाव घेतली की भक्त चवताळून जातात.
आणि हीच दुखरी नस शेतकऱ्यांनी दिल्लीत दाबलीय,

म्हणूनच आंदोलन चिरडण्याचा पहिला टप्पा सुरू झालाय,

पियुष गोयल, दानवे वगैरे उगाच बोलत नाहीयेत,
आंदोलनाच्या खर्चावर, लंगर वगैरेवर पोस्ट याचसाठी पडायला लागल्यात,
Read 4 tweets
13 Dec 20
दिल्ली बॉर्डरवर शेतकऱ्यांना लंगर, रोटी मशिन्स, दूध तूप भाजीपाला यांना पैसे कोण देतंय म्हणून प्रश्न विचारणाऱ्या लोकांना ,

नोटबंदी मध्ये अचानक भाजपची सगळ्या देशभरात टोलेजंग ऑफिसेस कशी उभी राहिली याचे प्रश्न पडले कधी ?
काकाजी दहा लाखाचा सूट कुठून घालत्यात आणि तैवानी मश्रुम कुठून आणतात याचे प्रश्न पडलेत कधी ?

ठोक भावात कानडी, एमपी मधले आमदार खासदार खरेदी करायला पैशे कुठून येतात याचे प्रश्न पडलेत कधी ?

पीएम केअर फंडात आलेले पैसे कुठं गेले याचे प्रश्न पडलेत कधी ?
सरकारी कंपन्या विकून, रेल्वे,विमानतळ, सगळं विकून आलेले पैसे कुठं गेलेत याचे प्रश्न पडलेत कधी ?

रिझर्व्ह बँकेकडून घेतलेले पावणे दोन लाख कोटी कुठं खर्चले याचे प्रश्न पडलेत कधी ?

हजारो कोटी रुपयांच्या जाहिराती दर निवडणुकीत भाजप करतय त्याचे पैसे कुठून येतात हे प्रश्न पडलेत कधी ?
Read 5 tweets
29 Aug 20
शेठ जसे सत्तेत आले तस मालकांनी देशातील कोणकोणत्या सरकारी संस्था,कंपन्या यांना विकून टाकले,किंवा त्या कंपन्यांत असणारी सरकारी गुंतवणूक काढून घेतली...यावर एक नजर टाकूयात.

2014-15

1. नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड.
0.29% सरकारी हिस्सा विकण्यात आला.
2. SAIL (Steel Authotiry of india ltd.)
5% सरकारी हिस्सा विकण्यात आला.

3. NALCO (National Aluminium Company Ltd.)
0.13 % सरकारी हिस्सा विकण्यात आला.

4. MMTC (Minerals and Metals trading Company)
0.073% सरकारी हिस्सेदारी विकण्यात आली.
5. CIL (Coal India ltd.)
10% सरकारी हिस्सेदारी विकण्यात आली.

6. NTPC (National thermal power corporation)
7. HCL (Hindustan Copper Ltd.)

दोघांची प्रत्येकी 0.05℅ सरकारी हिस्सेदारी विकण्यात आली.
Read 16 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(