लसीकरण सुरक्षित असल्याचे #AFMC च्या अभ्यासातून दिसून आले आहे.
15 लाख डॉक्टर आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांचा अभ्यास
लसीकरणानंतर संसर्गात 93% घट झाल्याचे अभ्यासातून दिसून आले.
#Delta लाटेदरम्यान लसीकरण प्रभावी असल्याचे सिद्ध झाले, ही अतिशय आनंदाची बाब-डॉ पॉल
बालकांचे लसीकरण!
#covaxine वर रुग्णालय चाचणी सुरु आहे. रुग्णालय चाचणीचा तपशील आणि त्यावर तज्ज्ञांची मते जाणून घेतल्यानंतर बालकांच्या लसीकरणाविषयी निर्णय घेण्यात येईल-@MoHFW_INDIA
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 5 वाजता #TokyoOlympics स्पर्धेत सहभागी होणाऱ्या क्रीडापटूंच्या चमूशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत.
माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि माध्यमांसाठी आचार संहिता) नियम 2021 च्या नुसार अधिसूचित करण्यात आलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेच्या तिसऱ्या भागाबद्दल माहिती देणाऱ्या वेबिनारचे पत्र सूचना कार्यालयाकडून आयोजन.
थोड्याच वेळात सुरुवात.
Digital Media Ethics Code वेबिनारला थोड्याच वेळात सुरुवात.
@MIB_India चे सहसचिव विक्रम सहाय करणार मार्गदर्शन.
Digital Media Ethics Code वेबिनार
संवाद-संप्रेषण ही मानवी मुलभूत आवश्यकता आहे. लोकशाहीत जनमताला घडवण्यात माध्यमांची भूमिका फार महत्त्वाची आहे. राज्यघटनेने भाषण स्वातंत्र्य दिले आहे तर माध्यम स्वातंत्र्य कलम 19 (1)(a) आहे.- मनीष देसाई, महासंचालक