सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत हर्षोल्हासाचा दिवस आहे. या वर्षी आपण स्वातंत्र्याच्या 75 च्या निमित्तानं, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत.
आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या संघर्षामुळे आपलं स्वातंत्र्याचं स्वप्न साकार झालं होतं. त्या सर्वांनी, त्याग आणि बलिदान यांची अनोखी उदाहरणं सर्वांसमोर ठेवली. त्यांच्या शौर्य आणि पराक्रमाच्या जोरावरच आज आपण सर्वजण स्वातंत्र्याचा मोकळा श्वास घेत आहोत: राष्ट्रपती
भारताचं वैशिष्ट्य असं होतं की गांधीजींच्या नेतृत्वात आपली स्वातंत्र्य चळवळ, सत्य आणि अहिंसेच्या सिद्धांतावर आधारलेली होती.
गांधीजी आणि इतर सर्व राष्ट्रीय नेत्यांनी भारताला वसाहतवादी शासनाच्या जोखडातून मुक्त करण्याचा मार्गासोबतच राष्ट्राच्या पुनर्निर्माणाची रूपरेषाही मांडली.
आपल्या प्रजासत्ताकाच्या या 75 वर्षांच्या वाटचालीवर जेव्हा आपण नजर टाकतो तेव्हा या गोष्टीचा अभिमान वाटतो की आपण प्रगतीच्या मार्गावर खूप मोठा पल्ला गाठला आहे: राष्ट्रपती रामनाथ कोविंद
गांधीजींनी आपल्याला शिकवलंय की चुकीच्या दिशेनं वेगात पावलं टाकण्यापेक्षा, योग्य दिशेनं हळूहळू का होईना पण जपून पावलं पुढे टाकायला हवीत. अनेक परंपरांनी समृद्ध अशा भारताच्या सर्वात मोठ्या आणि चैतन्यपूर्ण लोकशाहीच्या अद्वितीय यशाकडे जागतिक समुदाय आदरानं पाहतो : राष्ट्रपती
नुकत्याच झालेल्या #Tokyo2020 मध्ये आपल्या खेळाडूंनी शानदार कामगिरीनं देशाचा मान वाढवला आहे. भारतानं ऑलिंपिक मधल्या आपल्या सहभागाच्या 121 वर्षांमध्ये सर्वाधिक पदकं जिंकण्याचा इतिहास या खेपेस रचला आहे : राष्ट्रपती
मुलींनी अनेक अडचणींवर मात करत खेळाच्या मैदानात जागतिक दर्जाचं प्रभुत्व मिळवलं आहे. जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात, महिलांचा सहभाग आणि यशात, महत्त्वपूर्ण बदल होत आहेत : राष्ट्रपती
मुलींच्या यशात मला भविष्यातल्या विकसित भारताची झलक दिसते आहे. मी प्रत्येक माता-पित्यांना विनंती करतो की अशा होतकरु मुलींच्या कुटुंबांकडून काही शिकत, आपापल्या मुलींनाही प्रगतीच्या वाटा खुल्या कराव्या : राष्ट्रपती
गेल्यावर्षी सर्वांच्या असामान्य प्रयत्नांच्या जोरावर आपण संसर्गाच्या प्रसारावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी ठरलो होतो. आपल्या वैज्ञानिकांनी खूप कमी वेळात लस तयार करण्याचं कठीण काम केलं : राष्ट्रपती
सध्या लसच आपल्या सर्वांसाठी, विज्ञानानं उपलब्ध करून दिलेलं, सर्वात सोपं आणि सर्वोत्तम सुरक्षाकवच आहे. आपल्या देशात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेत आतापर्यंत 50 कोटीं पेक्षा जास्त देशवासीयांचं लसीकरण झालं आहे-राष्ट्रपती रामनाथ कोविंद
मी सर्व देशवासियांना आग्रह करतो की त्यांनी उपलब्ध व्यवस्था आणि नियमांनुसार, लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावं आणि लसीकरणासाठी दुसऱ्यांनाही उद्युक्त करावं--राष्ट्रपती रामनाथ कोविंद
सरकारनं, मे & जूनमध्ये 80 कोटी लोकांना अन्नधान्य उपलब्ध करून दिलं. आता हा मदतीचा कालावधी दिवाळीपर्यंत वाढवला आहे. याशिवाय कोविडच्या प्रभावामुळे मेटाकुटीला आलेल्या व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी 6 लाख 28 हजार कोटी रुपयांच्या प्रोत्साहन पॅकेजची घोषणा केली आहे: राष्ट्रपती
#PMKisan सह, आपल्या शेतकरी बंधू-भगिनीं साठी विशेष योजना राबवण्यावर भर दिला जात आहे,
हे सर्व प्रयत्न आत्मनिर्भर म्हणजे स्वावलंबी भारताच्या संकल्पनेनुसारच आहेत : राष्ट्रपती रामनाथ कोविंद
70 हजार कोटी रुपयांच्या क्रेडिट लिंक्ड सबसिडी म्हणजेच कर्जसहाय्य योजनेमुळे आपलं स्वतःचं घर असण्याचं स्वप्नं आता साकार होत आहे : राष्ट्रपती रामनाथ कोविंद
जम्मू-काश्मीरमध्ये नवजागृती दिसून येत आहे.
मी जम्मू-काश्मीरच्या नागरिकांना, विशेष करुन युवावर्गाला, या संधीचा लाभ उठवण्याची आणि लोकशाही संस्थांच्या माध्यमातून आपल्या इच्छापूर्तीसाठी कामाला लागण्याची विनंती करतो : राष्ट्रपती रामनाथ कोविंद
संपूर्ण देशासाठी मोठ्या अभिमानाची बाब आहे की आपलं लोकशाहीचं हे मंदिर येत्या काळात, लवकरच एका नव्या वास्तूत स्थापन होणार आहे. ही नवी वास्तू आपली रीत आणि धोरण व्यक्त करेल : राष्ट्रपती रामनाथ कोविंद
स्वातंत्र्याच्या 75 व्या वाढदिवशी, या नव्या वास्तूचं उद्घाटन म्हणजे, जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीच्या विकास प्रवासाचा एक ऐतिहासिक आरंभ बिंदू मानला जाईल: राष्ट्रपती रामनाथ कोविंद
गगनयान मोहिमेचं या योजनांमध्ये एक विशेष महत्त्व आहे. या मोहिमेअंतर्गत भारतीय वायुदलाचे काही वैमानिक, परदेशात प्रशिक्षण घेत आहेत. ते जेव्हा अंतराळात उड्डाण करतील, तेव्हा भारत, मानवयुक्त अंतराळ मोहीम यशस्वी करणारा जगातला चौथा देश ठरेल : राष्ट्रपती
आपल्याला पूर्ण जाणीव आहे की स्वातंत्र्यासाठी प्राणांची बाजी लावलेल्या स्वातंत्र्यसैनिकांची स्वप्नं साकारण्याच्या दिशेनं खूप पुढे जायचं आहे. ही स्वप्नं आपल्या राज्यघटनेत, न्याय-स्वातंत्र्य-समता आणि बंधुत्व या चार अर्थपूर्ण शब्दांद्वारे स्पष्टपणे जतन केली आहेत: राष्ट्रपती
आपल्यासाठी अभिमानाची बाब ही आहे की भारतानं पॅरिस हवामानबदल कराराचं फक्त पालनच केलेलं नाही, तर हवामानबदलाच्या सुरक्षिततेसाठी निश्चित केलेल्या बांधिलकीत सुद्धा जास्तीत जास्त योगदान देत आहे. तरीही मानव जातीला जागतिक पातळीवर आपल्या रीतीभाती बदलण्याची आवश्यकता आहे: राष्ट्रपती
कोरोनाच्या संकटाचा सामना करताना लाखो लोकांनी स्वतःची पर्वा न करता, माणुसकीच्या दृष्टीनं निस्वार्थ भावनेनं दुसऱ्यांच्या आरोग्यरक्षणासाठी, इतरांचे जीव वाचवण्यासाठी मोठी जोखीम उचलली. अशा सर्व कोविड योद्ध्यांना आपले प्राणही गमवावे लागले. मी त्यांच्या स्मृतींना वंदन करतो: राष्ट्रपती
युद्ध स्मारकात एक आदर्श वाक्य कोरलेलं आहे- मेरा हर काम,देश के नाम. माझं प्रत्येक काम देशाच्या नावे. हे आदर्श वाक्य आपण सर्व देशवासियांनी, एक मंत्र म्हणून आत्मसात केलं पाहिजे आणि राष्ट्राच्या विकासासाठी संपूर्ण निष्ठा, तसच समर्पण भावनेनं काम केलं पाहिजे: राष्ट्रपती
मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला अभिनंदन करतो. हा वर्धापन दिन साजरा करत असताना, साहजिकच माझ्या अंत:करणात, डोळ्यांसमोर, स्वातंत्र्याच्या 2047 या शताब्दी वर्षातल्या, बलवान-समृद्ध आणि शांततापूर्ण भारताचं चित्रं तरळत आहे: राष्ट्रपती
मी सदिच्छा व्यक्त करतो कि आपले सर्व देशबांधव कोविड महासाथीच्या या प्रकोपातून मुक्त होवोत आणि सुख-समृद्धीच्या मार्गावर पुढे जात राहोत!
पुन्हा एकदा आपल्या सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा: राष्ट्रपती