लग्नानंतर प्रथमच माहेरी आलेल्या मुलीचे माहेरपण आठवडाभर चालले. सगळा आठवडा तिला हवं ते करण्यात सरला.
परत सासरी जातांना वडिलांनी तिला एक सुगंधी अगरबत्ती पुडा दिला. "जेव्हा सकाळी पुजेला बसशील तेव्हा ही अगरबत्ती लाव बेटा", असं आठवणीने सांगितले.
आई म्हणाली "असं अगरबत्ती देतं का कुणी, ती प्रथमच माहेरपण करून सासरी जाते आहे, काहीतरी मोठं द्यायला हवे होते "
तसं वडिलांनी खिशात हात घातला अन् असतील तेवढे पैसे तिच्या हातात दिले.
सासरी पोहचल्यावर सासुने सुनेच्या आईने दिलेल्या सगळ्या वस्तु बघितल्या. बाबांनी दिलेला अगरबत्ती पुडा बघुन नाक मुरडले.
सकाळी मुलीने अगरबत्तीचा पुडा उघडला. आत एक चिठ्ठी होती.
"बेटा ही अगरबत्ती स्वतः जळते, पण संपूर्ण घराला सुगंधी करून जाते.
एवढंच नाही तर आजुबाजुचा परिसर ही दरवळुन टाकते. तू काही वेळा नवऱ्यावर रुसशील, कधी सासु-सासऱ्यांवर नाराज होशील, कधीतरी नणंद किंवा जावेचं बोलणं ऐकून घ्यावं लागेल, तर कधी शेजाऱ्यांच्या वर्तनावर खट्टू होशील, तेव्हा माझी भेट लक्षात ठेव. स्वतः जळतांना
अगरबत्ती जसं संपुर्ण घर आणि परिसर सुंगधी बनवते, तशी तू सासरला बनव..."
मुलगी चिठ्ठी वाचुन रडू लागली. सासू धावतच जवळ आली. नवरा, सासरे देवघरात डोकावले.
ती फक्त रडत होती.
"अगं ! हात पोळला का?" नवऱ्याने विचारले.
"काय झालं ते तरी सांग." सासरे म्हणाले.
सासू आजुबाजुचे सामानात काही आहे का ते बघु लागली.
तेव्हा ती वळणदार अक्षरातील चिठ्ठी नजरेला पडली. ती वाचून तिने सुनेला मिठीत घेतले. चिठ्ठी स्वतःच्या नवऱ्याच्या हातात दिली. सासरे चष्मा नसल्याने मुलाला म्हणाले , बघ काय आहे.
सारे कळल्यावर संपूर्ण घर स्तब्ध झाले.
"अरे, ही चिठ्ठी फ्रेम कर, ही माझ्या मुलीला मिळालेली सर्वात महागडी भेट आहे. देवालयाच्या बाजुलाच याची फ्रेम लाव." सासू म्हणाली.
अन् त्यानंतर ती फ्रेम सातत्याने दरवळत राहीली, पुडा संपला तरीही.....
यालाच म्हणतात संस्कार...
कोणी हा लेख लिहीला माहीत नाही, पण खरंच लिहणाऱ्याला माझा सलाम🙏
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
पैसा नाही कमवला तर पुढच्या पिढीकडे एक गुंठाही जमीन शिल्लक राहणार नाही...
टप्पा १:- १९५० ते १९७५
या कालावधीत मराठी माणसाकडे गावाकडे भरपूर जमीन होती.
सरासरी प्रत्येक कुटुंब २०-३० एकर जमिनीचे मालक...
मोठे वाडे...
दांडगा रुबाब...
निसर्गावर चालणारी शेती...
अगदी १० वी-१२ वी शिकलेले सुद्धा शिक्षक, मिलिटरी भरती, पोलीस भरती झाले. तसेच स्पर्धा परीक्षेत सहज यश मिळावायचे.
अनेक पदवीधर PSI, Dy. SP, तहसीलदार त्या काळात झाले.
नाही जरी नोकरी लागली तर आहे की 20-30 एकर शेती...
उत्तम शेती, दुय्य्म नोकरी, तृतीय व्यापार अशी म्हण होती.
हा काळ म्हणजे मराठी माणूस राजा होता.
टप्पा २:- १९७५ ते १९९५
देश उद्योग व आधुनिकतेकडे जाऊ लागला, १९७४ च्या दुष्काळापासून निसर्गाने झटका द्यायला सुरुवात केली.
शेतीची विभागणी सुरु झाली, २० एकराचे मालक ५ एकरावर आले.
बाहेरील राज्यातील कामगारांचे मुंबई शहरात शिरकाव सुरु झाले.
कृष्ण अंधारात जन्माला. ह्याचा प्रवास जसा गूढ आहे, तशी ह्याची शिकवणही गूढ आहे. ती नीट समजून घ्यावी लागते. कृष्णाला समजावून घ्यायचं तर जरा सावध राहायला हवं. त्याला सोप्या भाषेत समजावून सांगत आहेत निरेन आपटे!!
एक बाप मुलाला म्हणाला, " आज मी तुला जीवनातील फार मोठा धडा शिकवणार आहे. चल, भिंतीवर चढ. "
मुलगा भिंतीवर चढला.
बाप म्हणाला, " आता खाली उडी मार. मी आज तुला मोठा धडा शिकवत आहे."
मुलगा घाबरला. दहा फूट खाली उडी मारायची हिंमत होत नव्हती.
बाप म्हणाला, " मार उडी. काळजी करू नकोस,
मी तुला झेलून घेईन."
मुलाने डोळे बंद केले आणि उडी मारली. बाप बाजूला निघून गेला. मुलगा धाडकन खाली आदळला. जोरात आपटला. बापाने मुलाला सांगितलं, माझ्यावर विश्वास ठेवून उडी मारायची चूक केलीस. म्हणून पडलास. डोळे उघडे ठेवून, तुझ्या बळावर उडी मारली असती तर काही झालं नसतं.
गेले चार पाच दिवस समाज माध्यमातून एक विषय जोरदार चर्चेत आहे.आलिया भट नामक सिनेअभिनेत्री ने एका जाहिरातीत कन्यादान करण्याऐवजी कन्यामान करा असा अनाहुत सल्ला हिंदुंना दिला.वरवर पाहता एखाद्याला वाटेल की कन्येचा मान करायला सांगतेय यात काही चुकीचं नाही.परंतु त्या आधी ती
कन्यादाना ऐवजी हे करायला सांगतेय ते १००%चुकीचे आहे.कसे ते आपण नीट पाहिले पाहिजे.
सनातन वैदिक हिंदु धर्मात काही संकल्पना मांडल्या आहेत.दान हि देखील एक उदात्त संकल्पना आहे.सत्पात्री व्यक्तीलाच दान दिले पाहिजे असा शास्त्राचा दंडक आहे.योग्य काळी,योग्य वेळी एखादि जबाबदारी योग्य
व्यक्ती कडे सुपूर्द करणे हे दानात अभिप्रेत आहे.दान हे निर्जीव वस्तुचे होते हा एक गोड गैरसमज आहे.शास्त्रानुसार गोप्रदान,महिषीदान,मेषदान, भूदान अशी अनेक सजीवांची दाने देखील सांगीतली आहेत.त्यामुळे हा मुद्दा आपसुकच बाजूला होतो.
दुसरा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे.शास्त्रानुसार कौमार्य
काल प्रसिध्द हिंदुत्वनिष्ठ लेखक भागवत व रामायणाचे अभ्यासक डॉ.सच्चिदानंद शेवडे व गणकप्रवर सिध्दांतिज्योतिषरत्न डॉ.गौरव देशपांडे या दोन मान्यवरांशी चर्चा करुनच आज हा विषय मांडत आहे.
परवा पासुन चार पाच महिलांनी दुरध्वनीद्वारे माझ्याशी संपर्क केला व
एक विचारणा केली. गुरुजी नवरात्रात प्रत्येक दिवशी विविध रंगी साड्या नेसाव्यात व देवीची नवग्रहांची कृपा प्राप्त करुन घ्यावी असे मेसेज सोशल मिडिया द्वारे प्रसारीत होत आहेत, हे सत्य आहे का?
काही महिलांनी तर नऊ दिवस कोणत्या मँचिंग बांगड्या, कानातले, गऴ्यातले अलंकार हवेत व कोणते
दागिने घालावेत व त्यांनी देवीची कशी कृपा होते याचेही मेसेज आपणास आले आहेत असे सांगीतले. धर्मशास्त्रात असे काही दिले आहे का? हे विचारले.
गरबा व दांडिया खेऴ हाच देवीला आवडतो व तो खेऴलात कि "लक्ष्मी प्राप्त "होईल अशाही चर्चा होताहेत.