३ महिन्यांनी वर्ष संपणार.
२०२२ च्या सुरुवातीला नव्याने संकल्प वगैरे घेतले जातील.
यावेळी उलटा गेम खेळता येऊ शकतो.
अर्थात, जीवनाबद्दल सिरीयस असणाऱ्या लोकांनाच.
१+
२०२२ सुरु व्हायच्या आत कायकाय साध्य करता येऊ शकतं हे आत्ताच ठरवता येऊ शकतं. पेनडायरी हातात घेऊन माईलस्टोन्स आखता येऊ शकतात.
टार्गेट्स भव्य असणारेत. उण्यापुऱ्या ३ महिन्यांत हर्क्युलिस होता येत नसतंच. पण हर्क्युलिस होण्याकडे वाटचाल सुरु होऊन एक पल्ला नक्कीच गाठता येऊ शकतो.
२+
कोणत्या सेलिब्रिटीच्या घरात नेमकं काय घडलंय, कोणत्या राजकीय पक्षात कोणतं नवं वादळ उभारलंय, बिग बॉस मध्ये काय होतंय - मोदी ठाकरे सध्या काय करताहेत (आणि जोडीला उकडीचे की तळलेले!) या सर्व गदारोळात पर्सनल डेव्हलपमेंट -
संपत्तीसंचय, अयोग्य, वाचन, स्किल अॅक्विझिशन -
३+
हा प्रांतच दुर्लक्षित रहातो.
पुढच्या ३ महिन्यांत आपलं लक्ष आणि लक्ष्य बदलू शकतो आपण.
आपली समस्या ही आहे की आरश्यासमोर उभं राहून स्वतःशी गप्पा मारल्याच जात नाहीत आपल्याकडून.
४+
हवं तसं जगण्यासाठी, २४ तास आनंदात जाण्यासाठी काही स्पेसिफिक स्किलसेट हवे आहेत याची जाणीवच होत नाही आपल्याला.
कशी होईल?
२४ तास आनंदात जगायचंय म्हणजे नेमकं काय - याची नोंद कुठाय आपल्याकडे?
कधी बसलोच नाही हा विचार करायला!
५+
पांढऱ्या केसांची वाढती संख्या आणि अधिकाधिक जटिल होत जाणाऱ्या चेहऱ्यावरील सुरकुत्यांवर झटकन नजर फिरवून "काहीतरी करायला हवं" चा विचार फ्रॅक्शन ऑफ अ सेकंद येऊन जातो, तो तितक्या पुरताच.
६+
बँक बॅलन्स हवं तितकं नाहीये याची जाणीव भुंग्यासारखी असते. पण तो भुंगा मेंदूत रुतून थेट कृतीतून बाहेर येत नाही.
३१ डिसेम्बरच्या आत बदलू शकतो आपण हे.
एका ठराविक मर्यादित टप्प्यापर्यंत या समस्या सोडवूच शकतो.
फोकस मिळवू शकतो.
७+
आरोग्य कमावणे.
संपत्ती निर्मिती करणे.
विविध कौशल्यं आत्मसात करणे.
बास - धिस शुड बी द टार्गेट.
२०२१ संपायच्या आत या मार्गावर जोरदार घोडदौड सुरु व्हायला हवी.
८+
हा वीक-एन्ड प्लॅनिंग आणि एग्झिक्युशनची सुरुवात करण्यासाठी...!
सिंह दरबारातली एकेक प्रकरणं संपवत होता. या दोघांचं प्रकरण समोर आलं.
"महाराज, गवत निळं आहे ना?" गाढवाने किंकाळत विचारलं.
"हो, गवत निळं आहे." सिंह म्हणाला.
"महाराज! हा वाघ माझं ऐकतच नाहीये! गवत हिरवं आहे असं रेटून बोलतोय! त्यामुळे मी माझं मानसिक स्वास्थ्य हरवून बसलोय...
२+
माझी बदनामी झालीये...याला कठोरात कठोर शिक्षा द्या महाराज!" गाढव वदलं.
"बरोबर आहे. वाघाला उद्या सकाळपासून पुढील ५ वर्षे कुणाशीही नं बोलण्याची - पूर्ण मौनात राहण्याची - शिक्षा फर्मावण्यात येत आहे!" सिंहाने गर्जून निर्वाळा दिला, दरबार पुढील प्रकरणाकडे सरकला.
"थिंक पॉझिटिव्ह" ही "सक्सेस टिप्स"च्या यादीतील सर्वात कॉमन टिप. आत्मविश्वास असला की यश मिळतंच! - असं सांगितलं जातं.
वास्तवात यश मिळवण्यासाठी "पात्रता" हा मूलभूत निकष असतो.
१+
स्वतःत क्षमता असूनही पुढे जाण्याची भीती वाटत असेल तर सकारात्मक विचार महत्वाचा. ही स्टेप टू किंवा थ्री किंवा फोर झाली. स्टेप वन किंवा स्टेप झिरो नव्हे!
फक्त स्वतःवर विश्वास आहे म्हणून परीक्षेत मार्क्स मिळत नाहीत.
सेंच्युरी मारता येत नाही.
धंदा यशस्वी करता येत नाही.
२+
त्यासाठी क्षमता विकसित कराव्या लागतात. प्लॅन आखावा अन काटेकोरपणे पाळावा लागतो.
त्यासाठी ऊर्जा मिळावी म्हणून किंवा हे सगळं करूनही पुढे जाण्यास कचरत असाल - तर मग सकारात्मक विचार इंधन म्हणून वापरायला हवा.
मोदींना कमी लेखण्यासाठी व्यूहान व्हायरसच्या नव्या म्युटेशनला “भारतीय” ओळख चिकटवण्याचा प्लॅन आखणारा पक्ष या देशाचं भलं करू शकतो – किंबहुना भाजप वा संघ वा मोदींना पर्याय ठरू शकतो – हे अजूनही ज्यांना वाटतं – त्यांची बेसिक समज एकतर उथळ आहे किंवा त्यांना देशाशी घेणं देणं नाहीये.
२+
“आपल्याला अनुकूल असणारे हॉस्पिटल्स मॅनेज करा - बेड बळकावून ठेवा – आपल्या शिफारसी शिवाय कुणालाच मिळू देऊ नका - म्हणजे सरकार रोष वाढेल” असलं नीच राजकारण करण्याचा कट रचणारा पक्ष देशहित नावाची गोष्ट इवलीशीसुद्धा मानू शकतो – असं ज्याना वाटतं ते एकतर बिनडोक आहेत किंवा लबाड.
कोव्हिड संकट विद्यार्थ्यांचं प्रचंड नुकसान करत आहे. विशेषतः ९वी ते १२वीच्या. परिचयातील काही पालकांशी यावर बोलणं झालं, हातात काहीच नसताना फक्त काळजी करण्यापेक्षा हे दिवस अगदीच वाया जाणार नाहीत यासाठी मला जे सुचतं ते बहुतेकांना सांगितलं. तेच इथे मांडायचा प्रयत्न करतोय.
१+
हे सगळं मांडताना गृहीतक हे आहे की सध्या या ४ ही वर्गातील मुलं अभ्यासात बिझी असतीलच पण शाळा कॉलेज नसल्याने त्यांच्याकडे बऱ्यापैकी वेळ आहे. शिवाय त्यांना करिअरबद्दल अनिश्चितता सतावते आहे. आणि ही अवस्था पुढील ६ महिने तरी कायम असेल.
२+
१ - आपल्याकडे प्रचंड वानवा असलेली फायनान्शियल लिटरसी कमवून घ्या. पैसा काय चीज आहे समजून घ्या. मार्केट कसं फिरतं जाणून घ्या.
येत्या ६ महिन्यांत रिच डॅड पुअर डॅड किमान ३ वेळा वाचून काढा. मित्रांचा ग्रुप करून त्यातील प्रिन्सिपल्स समजून घ्या.