पैश्याने पैसा बनतो हे वाक्य सर्वांना माहितीये. पण त्या तत्वावर चालण्याची मानसिकता सिस्टिमॅटिकली डेव्हलप होत नाही.
आपण नोकरी करत असतो - ठराविक पगार मिळत असतो - तो वाढावा असं वाटत असतं - त्यासाठी अॅन्यूअल अप्रेजल किंवा नोकरी बदलणे हे २ पर्याय माहिती असतात - पण -
१+
अप्रेजल असो वा स्विच, कोणत्याही पर्यायातून मॅग्झिमम आऊटपुट मिळण्यासाठी पैसा खर्च करून करिअर ग्रोथ करण्याचा विचार कितीसा करतो आपण?!
प्रमोशन मिळवण्यासाठी माझ्यात कोणत्या स्किल्स हव्यात, त्या डेव्हलप करायला काय लागेल - इतकंच नाही, मला माझं अपियरन्स सुधारावं लागेल का?
२+
चकचकीत रहावं लागेल का? बाकी सगळं सोडा - फक्त चटकदार इंग्रजी येत नाही म्हणून मी अडकलोय - मग इंग्रजी शिकायला जरा पैसे खर्च करावेत का?
हा विचारच करत नाही आपण.
एमबीएत कॉलेजात आलेल्या पहिल्याच कंपनीत जॉब मिळाला. छान पॅकेज होतं.
३+
त्या जॉबमधे माझा रोल आमच्याच कंपनीसाठी ईमेल मार्केटिंग करण्याचा होता. म्हणजे मोठी टीम होती, त्यात मी ईमेल मार्केटिंगचं एक अंग बघायचो.
तिथे ईमेल मार्केटिंग नावाची चीज खोलात कळाली.
त्यातून डिजिटल मार्केटिंग म्हणजे काहीतरी जब्राट आहे हे जाणवलं.
४+
सुरुवातीला समोर आहे ते शिकण्यातच बरेच महिने गेले. मग रिसर्च केला, चाचपडत राहिलो. एकदा बॉसशी वन-ऑन-वन घेतलं. त्याला विचारलं कोर्स वगैरे करू का. हा गडी नको म्हणाला...ऑन जॉब शिकत रहा म्हणाला. त्याचा सल्ला त्याच्या दृष्टीने योग्यच होता. पण मला रहावलं नाही.
५+
२०,००० मोजून अंधेरीला वीकेंड क्लास लावला.
३ महिने, दर रविवारी - डोंबिवली ते अंधेरी करायचो. सोमवार ते शुक्रवार नोकरी, रविवारी हा क्लास.
फळ?
कोर्सचा दुसरा महिना संपायच्या आत ८०% जास्त सॅलरी असलेला जॉब मिळाला.
प्रोफाईल एकदम सुधारली.
पैश्याने पैसा बनला. शिवाय -
६+
करिअरला कायमस्वरूपी दिशा मिळाली ती वेगळीच!
तेव्हापासून आजपर्यंत सतत काही ना काही शिकत आलोय. काही प्रयोग जमले, काही फसले. पण प्रयोग कधीच थांबवले नाही.
हे सगळं सुचण्यामागचं कारण - काल एका छोट्या कंपनीच्या २ डायरेक्टर्ससमोर ४ तास बसलो होतो.
७+
त्यांचा रेव्हेन्यू - प्रॉफिट मार्जिन वगैरे समजून घेतलं आणि डिजिटल मार्केटिंगचा प्लॅन आखून दिला.
दोघे अस्सल आंत्रप्रेन्युअर आहेत - त्यामुळे पैश्याने पैसा बनवायचं परफेक्ट कळतंय त्यांना. त्यांनी ६ महिन्यांसाठी बजेट उभारायची तयारी चालवली आहे. २ आठवड्यात काम सुरु करू आम्ही.
८+
पण हे असं १० मिटिंग्जमध्ये १ दा घडतं.
मराठी व्यावसायिकांना मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग म्हणजे वर्ड ऑफ माऊथ वर अवलंबून रहाणे आणि मोफत सोशल मीडिया पोस्ट्स करत रहाणे बस्स...हे सोडून वेगळं काही करावंच वाटत नाही. थेट ऑफलाईन सेल्स आणि डीटेल्ड मार्केटिंग प्लॅन -
९+
यातला फरकही मान्य करवत नाही.
मग रेव्हेन्यू कसा वाढेल? प्रॉफिट मार्जिन कसं बदलता येईल? १० प्रोडक्टस असतील तर त्यातले कॅश काऊ कोणते, बिनकामाचे कोणते - हे कळण्यासाठी भरपूर डेटा कसा मिळेल?
पैश्याने पैसा कसा बनेल?!
१०+
मराठी माणसात उद्योजकता नं रुजण्यामागे १०० कारणं असतील.
मराठी माणूस मजबूत श्रीमंत होऊ नं शकण्यामागे १००० कारणं असतील.
त्यांचं मूळ कुठेतरी हाच पैश्याने पैसा बनवण्याचा अॅटिट्यूड नसल्याकडे असावं असं वाटतं.
११+
मराठी सोशल मीडियातील चर्चा विश्वात ही उणीव अधिकच जोरकसपणे जाणवते.
३ महिन्यांनी वर्ष संपणार.
२०२२ च्या सुरुवातीला नव्याने संकल्प वगैरे घेतले जातील.
यावेळी उलटा गेम खेळता येऊ शकतो.
अर्थात, जीवनाबद्दल सिरीयस असणाऱ्या लोकांनाच.
१+
२०२२ सुरु व्हायच्या आत कायकाय साध्य करता येऊ शकतं हे आत्ताच ठरवता येऊ शकतं. पेनडायरी हातात घेऊन माईलस्टोन्स आखता येऊ शकतात.
टार्गेट्स भव्य असणारेत. उण्यापुऱ्या ३ महिन्यांत हर्क्युलिस होता येत नसतंच. पण हर्क्युलिस होण्याकडे वाटचाल सुरु होऊन एक पल्ला नक्कीच गाठता येऊ शकतो.
२+
कोणत्या सेलिब्रिटीच्या घरात नेमकं काय घडलंय, कोणत्या राजकीय पक्षात कोणतं नवं वादळ उभारलंय, बिग बॉस मध्ये काय होतंय - मोदी ठाकरे सध्या काय करताहेत (आणि जोडीला उकडीचे की तळलेले!) या सर्व गदारोळात पर्सनल डेव्हलपमेंट -
सिंह दरबारातली एकेक प्रकरणं संपवत होता. या दोघांचं प्रकरण समोर आलं.
"महाराज, गवत निळं आहे ना?" गाढवाने किंकाळत विचारलं.
"हो, गवत निळं आहे." सिंह म्हणाला.
"महाराज! हा वाघ माझं ऐकतच नाहीये! गवत हिरवं आहे असं रेटून बोलतोय! त्यामुळे मी माझं मानसिक स्वास्थ्य हरवून बसलोय...
२+
माझी बदनामी झालीये...याला कठोरात कठोर शिक्षा द्या महाराज!" गाढव वदलं.
"बरोबर आहे. वाघाला उद्या सकाळपासून पुढील ५ वर्षे कुणाशीही नं बोलण्याची - पूर्ण मौनात राहण्याची - शिक्षा फर्मावण्यात येत आहे!" सिंहाने गर्जून निर्वाळा दिला, दरबार पुढील प्रकरणाकडे सरकला.
"थिंक पॉझिटिव्ह" ही "सक्सेस टिप्स"च्या यादीतील सर्वात कॉमन टिप. आत्मविश्वास असला की यश मिळतंच! - असं सांगितलं जातं.
वास्तवात यश मिळवण्यासाठी "पात्रता" हा मूलभूत निकष असतो.
१+
स्वतःत क्षमता असूनही पुढे जाण्याची भीती वाटत असेल तर सकारात्मक विचार महत्वाचा. ही स्टेप टू किंवा थ्री किंवा फोर झाली. स्टेप वन किंवा स्टेप झिरो नव्हे!
फक्त स्वतःवर विश्वास आहे म्हणून परीक्षेत मार्क्स मिळत नाहीत.
सेंच्युरी मारता येत नाही.
धंदा यशस्वी करता येत नाही.
२+
त्यासाठी क्षमता विकसित कराव्या लागतात. प्लॅन आखावा अन काटेकोरपणे पाळावा लागतो.
त्यासाठी ऊर्जा मिळावी म्हणून किंवा हे सगळं करूनही पुढे जाण्यास कचरत असाल - तर मग सकारात्मक विचार इंधन म्हणून वापरायला हवा.
मोदींना कमी लेखण्यासाठी व्यूहान व्हायरसच्या नव्या म्युटेशनला “भारतीय” ओळख चिकटवण्याचा प्लॅन आखणारा पक्ष या देशाचं भलं करू शकतो – किंबहुना भाजप वा संघ वा मोदींना पर्याय ठरू शकतो – हे अजूनही ज्यांना वाटतं – त्यांची बेसिक समज एकतर उथळ आहे किंवा त्यांना देशाशी घेणं देणं नाहीये.
२+
“आपल्याला अनुकूल असणारे हॉस्पिटल्स मॅनेज करा - बेड बळकावून ठेवा – आपल्या शिफारसी शिवाय कुणालाच मिळू देऊ नका - म्हणजे सरकार रोष वाढेल” असलं नीच राजकारण करण्याचा कट रचणारा पक्ष देशहित नावाची गोष्ट इवलीशीसुद्धा मानू शकतो – असं ज्याना वाटतं ते एकतर बिनडोक आहेत किंवा लबाड.