काम संपल्यावर संध्याकाळी वाचायला पुस्तकं आणावीत म्हणून सिडनी मधल्या एका जगप्रसिद्ध वाचनालयात गेलो होतो. नवीन आलेल्या पुस्तकांविषयी ग्रंथपालासोबत गप्पा मारताना त्यांना विचारले
1/9👇
आंतरराष्ट्रीय विभागात वाचण्यासारखे काय आहे?
तर त्यांनी ३-४ ग्रीक आणि इतर युरोपीय पुस्तकांविषयी सांगितले आणि मग म्हणाले,
भारतातल्या एका महान राजाविषयी नुकतेच एक पुस्तक आम्ही आमच्या संग्रहात समाविष्ट केले आहे - “द ग्रेटेस्ट किंग शिवाजी”.
मी जागेवर उडीच मारली!👇2/9
आणि गप्पा आवरत्या घेऊन दुसऱ्या मजल्यावरच्या आंतरराष्ट्रीय पुस्तकांच्या विभागाकडे वळलो.
तिथे हाती लागलं हे हिंदी भाषेतलं डॉ. हेमंतराजे गायकवाड लिखित "शिवाजी महाराज द ग्रेटेस्ट" हे अनोखं पुस्तक..
तुकाराम महाराज म्हणतात तसं 'आनंदाचे डोही आनंद तरंग' अशीच अवस्था झाली माझी..
👇 3/9
मी कितीतरी वेळ विश्वास नसल्यासारखा पुस्तक छातीशी धरून उभा होतो..तो क्षण कायमचा माझ्या मनावर कोरण्यासाठी.
कालच्या आंतरराष्ट्रीय पर्वत दिनाचे औचित्य साधून हे पुस्तक वाचायला सुरवात केली..
पुस्तकाचा हा फोटो काढला आहे तो ऑस्ट्रेलिया मधल्या ब्लू माऊंटन्स ह्या पर्वत रांगांमध्ये!👇4/9
जेव्हा केव्हा गड-किल्ल्यांची आणि सह्याद्रीची आठवण येते तेव्हा मी ह्या पर्वताला जाऊन भेट देतो..
का माहिती नाही, पण मला जावळीमध्ये किंवा वेस्टर्न घाटात असल्याचा अनुभव येतो इथे आलो की..
पर्वतांची उंची आणि विस्तृतपण ह्यांमुळे आकाशाची निळाई ह्या पर्वतरांगांमध्ये उतरते..
5/9👇
आणि ते त्या निळ्याभोर आकाशाचे जमिनीवर पडलेले प्रतिबिंब दिसते, आणि म्हणूनच त्याचा नाव आहे 'निळ्या पर्वतरांगा'..
सह्याद्रीपासून दूर कुठेतरी उभ्या असलेल्या ह्या पर्वतरांगा म्हणजे सह्याद्रीच्या नातलग वाटतात..
सह्याद्रीला सातासमुद्रापलीकडून बघायचा माझा एक प्रयत्न, दुसरे काय! 6/9👇
..आणि ह्या पुस्तकाची सुरुवात पण काही महत्वपूर्ण वाक्यांनी केली आहे,
'आपला देश जर जुलमी राजवटीच्या गुलामगिरीखाली नसता आणि जर का शिवाजी महाराज युरोपातल्या कुठल्या देशात जर जन्मले असते तर त्यांची कार्याची महती-स्तुती-परिणामकारकता आकाशाला भिडली असती
7/9👇
आणि संपूर्ण विश्वाने त्यांचा जयजयकार केला असता..
आणि कदाचित संपूर्ण जगाने हे मान्य केलं असतं की शिवाजी महाराजांनी अंधकारात बुडालेल्या साम्राज्याला आणि जनतेला लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून टाकलं'..
आता कधी एकदा पुस्तक संपवतो असं झालं आहे मला..📖! 8/9👇
तळटीप - मी सिडनी मधल्या ह्या ग्रंथालयातून निघताना इंग्रजी आणि मराठीमध्ये महाराजांवर अनेक पुस्तके आहेत आणि ते मागविण्यासाठी ग्रंथालयाला मदत करायची ग्रंथपालासोबत बोलणी करून आलोय.🙏
शिवाजी महाराजांसमोर अस्मानी, सुलतानी, जीवघेणी अशी सगळी संकटे आली पण महाराज सर्वाना पुरून उरले..
असच एक अस्मानी संकट म्हणजे,
“अफजल खान” - ती भेट आणि अफजल खानाचा वध आजही अंगावर काटा आणतो..
1/8👇
पण बऱ्याचदा आपण महाराजांविषयी वाचतो ते त्यांच्या आयुष्यातल्या घटना समजावून घेण्यासाठी आणि मग त्यांचा शत्रू कोण होता हे थोडंसं दुर्लक्षित होतं..
#
तसाच हा पूर्ण माहित नसणारा अफजल खान..
खालचे संदर्भ ह्या खानाचा परिचय करून देऊ शकतात..👇
2/8
१. विजापूर मधील अफजलपूर मध्ये एक अफजल खानाच्या स्तुतीवर शिलालेख आहे -
मार्गदर्शक नसल्यामुळे आयुष्यातील तीन वर्ष वाया घालवीले असे त्यांना वाटले.. खुप रडले..
परंतु याच बीएससी फीजीक्सने त्यांचे जीवन घडविले!
नंतर एयरोनाॅटीकल ईंजीनीयर ची पदवी घेतली, त्यावर्षी संपुर्ण भारतातुन केवळ आठ मुलं ही पदवी घेऊ शकले !.. त्यात डॉ कलाम टॉपर होते!
2/7
त्याकाळी फक्त 'एअर ईंडीया' हीच पायलटच्या जागा भरायची.
त्यावर्षी त्यांना सात जागा भरायच्या होत्या.. अर्ज आठ! डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम टॉपर..ईंटरव्यु होऊन सीलेक्शन झाले!
डॉ. कलाम सोडुन सर्व उमेदवारांना नौकरी मिळाली..
डॉ. कलाम यांची "ऊंची" कमी आहे, या कारणामुळे त्यांना नाकारले.
3/7