कोणत्याही पुरानात किंवा इतिहासात नसलेला मात्र शेकडो वर्षाची परंपरा असलेला एक सण म्हणजे येळवस म्हणजे वेळाआमावस्या...
हा सण हिरवाईचा अपूर्व सोहळा... 2 जानेवारी रोजी अख्ख्या लातूर जिल्ह्यातील शेतात भरेल, यावेळी कोरोनाचे संकट आहे, त्यामुळे प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना जाहीर
केल्या आहेत, त्या सांभाळून वेळाआमावस्या साजरी होईल. त्या विषयी महाराष्ट्राला समजावे म्हणून हा लेख प्रपंच...!!
कसा असतो सोहळा…!!
वेळाआमावस्या चार दिवस अगोदर साधनाची जमवा-जमव सुरु होते. त्यात तुरीच्या शेंगा, चवळी,भुईमूग हा सगळा रानमेवा जमा होतो...
वेळाआमावस्या पहाटे घराघरात चूल पेटते... बेसनपिठात कालवून चिंच आणि अंबिवलेल्या ताकाच्या पाण्यात वर उल्लेखलेले उकडलेले पदार्थासह शिजवलेली भाजी... म्हणजे भज्जी... ही भज्जी म्हणजे अफलातून भाजी, मी आजपर्यंत राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरलो, वेगवेगळे पदार्थ खाले पण भज्जीसारखी अफलातून चव
कशाला म्हणजे कशाला नाही ...
या डीशची तुलना कोणतेही पंचतारंकित हॉटेलही करु शकणार नाही.... या बरोबर दिले जाणारे अंबील म्हणजे तर राज दरबारी असलेले सगळे पेय फिके पडावेत असे...
चार दिवसाचे ताक ज्वारीच्या पिठात अंबवून जिरा फोडणी दिलेल हे पेय जे तांब्यावर तांबे रिचवले तरी प्यायची इच्छा
होते ते अंबिल ( काही जणांचे तोंडही सुजतात दुस-या दिवशी जादाचा डोस झाल्यामुळे ). भल्या थोरल्या भाकरी...गव्हाची खीर एका शेतात २० ते २५ लोक जेवतील एवढा स्वयंपाक वाजत गाजत घरातून डोक्यावरुन शेतावर निघतो. एका शेतात खाल्लेली येळवस दुसऱ्या शेतात जाऊन खाण्यासाठी ते जिरावं म्हणून प्रत्येक
कोपीच्या पुढे झोका बांधला जातो...!!
काय आहे परंपरा
भारतीय व्दिपकल्पात सिंधु संस्कृती पासून नदीचे जल पुजन करण्याची परंपरा चालत आलेली आहे. गंगा ,यमुना , गोदावरी , सरस्वती ,नर्मदा ,सिंधु आणि कावेरी या त्या सात नद्या ( सप्त सिंधु ) भारतीय लोक परंपरेत अतिशय पवित्र समजल्या जातात.
त्यामागे त्यांच्या प्रती असलेली कृतज्ञता होती. त्याच सप्तसिंदु मातृका म्हणून पुजण्याची परंपरा सुरु झाली. पुढे पिण्याच्या पाण्याच्या विहिरी खोदल्यानंतर त्यातले जल हे या सप्त सिंधुचे प्रतिक म्हणून पुजल्या जावू लागले. विहरीच्या जवळ प्रतिकात्मक सात दगड पुजण्याची परंपरा आहे तीला लातूर
जिल्ह्यात आसरा म्हणून ओळखले जाते.
आसरा म्हणजे तुच आमची राखण करणारी, सहारा देणारी ,पाणी पाजणारी. याच आसराची पुजा वेळा आमवस्येच्या दिवशी प्रत्येक शेतात मस्त ज्वारीच्या कडब्याच्या पेड्यांची कोप करुन भक्ती भावाने केली जाते. सकाळी पूजाकरुन आणि हा सगळा सुग्रास भोजनाचा भोज चढवून मोठी
पंगत बसते.....
जेवण करताना आपण किती खातोय याचे भान राहत नाही. प्रत्येकाच्या कोपीला जावून भज्जीचा अस्वाद घेण्याचा आग्रह होतो, तो टाळता येत नाही, पोटाला तडन लागते. जेवणाच्या पात्रावरुन उठून झोक्यावर जावून झोका खेळायचे खालेले जिरवण्याचा प्रयत्न करायचा
.... १२ बलुतेदार ,आठरा आलुतेदार यांनाही आग्रहाने हा हे सगळे खावू घातले जाते. संध्याकाळी ज्वारीच्या पेंडीचा टेंबा करुन रब्बीचा गहू, हरभरा याच्या वावराला तो पेटवून रान ओवाळून काढायचे, आणि तोच टेंबा मिरवत जावून गावातील मंदिराच्या समोर टाकायचा मोठी आग करुन ती शमली की तीच्या राखेतून
विस्तव असतानाच ती ठोकरुन घरी जायचे.
असा मनमोहक सण आहे. त्यानंतर घरातले कर्ते पुरुष माळेगावच्या खंडोबाच्या जत्रेला निघून जायचे..... ही जत्रा देशभरात वेगवेगळ्या कारणासाठी प्रसिद्ध आहे. मोठा घोड्याचा बाजार ( माजी मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख यांच्या सह अनेकांचे दैवत ),
गाढवांचा बाजार , सगळ्या भटक्या जमातींची पंचायत यावेळी इथे भरते.देशभरातले तृतीयपंथी दर्शनाला येतात (तृतीयपंथांचे माळेगाव अशीही ओळख ) ,तमाशाचे मोठ मोठे फड..... यामुळे या जत्रेला पुरुष मंडळीच्या दृष्टीने ख-या अर्थाने चांगभलं (या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा होणार नाही )....
असा हा सण आणि त्याची परंपरा आहे आजही मोठे हौसेनी सांभाळली जाते... कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी काळजी घेऊन आणि गर्दी करु नये म्हणून प्रशासनाने आवाहन केले आहे... प्रशासनाने घालून दिलेले नियम पाळून ही वेळाआमावस्या साजरा करतील...!!
समजा,
तुम्ही SBI बँकेकडून 50 रुपयांच कर्ज घेतले आहे तुमच्या एका कंपनी साठी.ते काय तुम्हाला फेडन शक्य होत नाहीये.ही रक्कम फेडण्यासाठी तुम्ही मग बँकेला एक प्रस्ताव देता की, "दर वर्षी 4 रुपयाप्रमाने मी ही रक्कम 2035 पर्यंत फेडेन.! बँक तयार असते.
पण एक सरकारी संस्था या प्रस्तावाला केराची टोपली दाखवते.आणि तुमच्याच एका प्रतिस्पर्धी व्यक्तीचा प्रस्ताव ती स्वीकारते.
प्रतिस्पर्धी व्यक्तीचा प्रस्ताव असतो की,"आम्ही 50 रुपये कर्ज फेडनार नाही.मात्र आम्ही 50 रुपये कर्ज घेतलेल्या व्यक्तीची कंपनी 5 रुपयाला खरेदी करू.ते ही हे 5 रुपये
तीन टप्प्यात देवू..!"या प्रस्तावाला मगाची सरकारी संस्था हसत खेळत मान्यता देते आणि प्रतिस्पर्धी व्यक्ती, 5 रुपयापैकी 2 रुपये संबंधित बँकेकडे जमा करते..! आणि तुमच्या कंपनीचा ताबा त्या प्रतिस्पर्धी व्यक्तीकडे जातो..!
#MahaPlasma
सध्या कोरोनाच्या तीव्र महामारीत आपण पाहतो आहे की अनेक रुग्णांचे नातेवाईक आपल्या रुग्णाला प्लाझ्मा मिळावा यासाठी आवाहन करताना दिसतात. सोशल माध्यमांवर आवाहन करण्यात बराच वेळ जातो.
हा वेळ टाळता यावा व प्लाझ्मादान करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या लोकांची यादी आपल्याला एका क्लिकवर मिळावी यासाठी मराठी ट्विटर #MahaPlasma हा उपक्रम राबवत आहे. कोरोनातून बरे झाल्यापैकी जे कुणी प्लाझ्मादान करण्यास इच्छुक असतील त्यांनी सोबत दिलेला फॉर्म भरून द्यावा आणि
ज्यांना कुणाला प्लाझ्मा लागत असेल त्यांनी दात्यासाठी ट्विटरवरील @MahaPlasma या हँडलला मेंशन करून ट्विट करावे किंवा मेसेज करावा. आपल्या परिसरातील उपलब्ध असलेल्या दात्यांची माहिती आपल्याला दिली जाईल. तसेच हा फॉर्म जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून प्लाझ्मादान
रोहित सर्दाना गेल्यानंतर शेठने ट्विट केले.त्यांना श्रद्धांजली वगैरे वाहून झाली.
आता फक्त माहितीसाठी सांगतो,
- देशात शेकडो डॉक्टर्स Covid मुळे दगावले आहेत.
- शेकडोच्या संख्येने मेडिकल स्टाफने आपला जीव गमावला आहे.
- देशभरात किती सफाई कर्मचाऱ्यांनी आपला जीव गमावला याचा अधिकृत आकडा देखील नाही.
- 300 च्या वर शेतकरी बांधवांनी शेतकरी आंदोलनात आपल्या प्राणाची आहुती दिली.
- 150 च्या वर ग्राउंड वरील पत्रकार covid चे बळी ठरले आहेत.
- देशभरात लाखो मृत्यू याच Covid मुळे झालेले आहेत.
यांच्याबद्दल शेठ कुठे काय बोलले का..?
थोडक्यात जे तुमच्या आमच्यासाठी झटत होते,ते आपल्यासाठी फ्रंटलाईन वर्कर होते.तर रोहित हा शेठ आणि त्यांच्या "सिस्टम" साठी राबणारा "फ्रंटलाईन वर्कर" होता..!