बराक ओबामांची अकरा मिनिटं आणि मोदींची वीस मिनिटं...
पंतप्रधान मोदींच्या पुलावरील वीस मिनिटाच्या जाममुळं गोदी मीडिया पिसाळला होता. अगदी राष्ट्रपती भवन ते सर्वोच्च न्यायालयही धुंडाळून झाले. २०१० मध्ये जगाचा महासत्तेचे प्रमुख तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा मुंबईत आले होते.
मुंबईच्या झेवियर महाविद्यालयात कृषी प्रदर्शन (USDA-ICAR) करार आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद असा कार्यक्रम होता. कृषी पत्रकार या नात्याने अमेरिकन कॉन्सुलेटने हा कार्यक्रम कव्हर करण्याची संधी मिळाली. बराक ओबामा ताज हॉटेल थांबले होते. माझे कार्यालय फोर्ट विभागात होते.
अमेरिकन सुरक्षा यंत्रणांनी पूर्ण फोर्ट आणि नरिमन पॉईंट विभागाची नाकेबंदी केली होती. सोबतीला मुंबई पोलिसांची यंत्रणा होती.
सेंट झेवियर येथे ओबामा यांच्या भेटीच्या एक दिवस अगोदर अमेरिकन सुरक्षा यंत्रणा आणि मुंबई पोलीस यांच्यात खटका उडाला होता.
ओबामांच्या भेटीच्या एक दिवस आधी अमेरिकन सुरक्षा एजंटांनी सेंट झेवियर्सच्या इमारतीत त्यांचे मेटल डिटेक्टर्स बसवले. याला बंदोबस्त प्रभारी मुंबई डीसीपी के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी जोरदार आक्षेप घेतला.
त्यांनी अमेरीकी सुरक्षा अधिकाऱ्यांना ते काढून टाकण्यास लावले आणि त्याजागी मुंबई पोलिसांचे डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर्स बसवले.
ओबामांच्या प्रत्यक्ष भेटीच्या दिवशी म्हणजे ७ नोव्हेंबर २०१० रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास प्रसन्ना यांना सेंट झेवियर्स जवळील इमारतींच्या टॉवर्सवर...
अमेरिकन बंदूकधारी दिसले. ही तैनाती पूर्णपणे प्रोटोकॉलचे उल्लंघन करणारी होती आणि पूर्वनियोजित सुरक्षा रणनीतीच्या विरुद्ध होती. प्रसन्ना यांनी यावर आक्षेप घेतला आणि त्यांना खाली उतरण्यास सांगितले.
याला नकार देताच प्रसन्ना यांनी त्यांच्यावर थेट पिस्तूल रोखत अमेरिकन सुरक्षा कर्मचाऱ्यांना परिसर सोडण्यास सांगितले.अमेरिकनांनीही प्रसन्ना यांच्यावर शस्त्रे रोखली. ही माहिती मिळताच मुंबईचे पोलीस आयुक्त संजीव दयाळ सेंट झेवियर्सला धावले.
दरम्यान, राष्ट्राध्यक्ष ओबामा सेंट झेवियर्सला जाण्यासाठी वाहनात बसले होते; परंतु प्रसन्ना आणि दयाल यांनी ओबामांच्या वाहन ताफ्यास निघण्याची परवानगी दिली नाही. दयाल यांनी वरिष्ठ यूएस सुरक्षा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.
अनिच्छेने परंतु नियमावर बोट ठेवल्याने प्रसन्ना यांचे म्हणणे त्यांना मान्य करावे लागले. प्रसन्ना यांनी अक्षरशः क्यूआरटीच्या सशस्त्र कर्मचाऱ्यांची तुकडी सोबत घेऊन सर्व अमेरिकन सुरक्षा कर्मचाऱ्यांना खाली उतरवले व नंतरच ओबामांच्या कन्वहॉयला निघण्याची परवानगी दिली.
हे सर्व होईपर्यंत ओबामा ११ मिनिटे कारमध्येच बसून होते आणि यूएस सुरक्षा कर्मचारी हातात बंदूक आणि ट्रिगरवर बोटे ठेऊन कारभोवती सुरक्षा कडे करून उभे होते.
या प्रकाराची फार काही वाच्यता मिडीयात झाली नाही.
दुसऱ्या दिवशी झेवियर्स मधील विद्यार्थ्यांचा ऊर्जामय संवाद आणि US-INDIA कृषी करार त्याचबरोबर मिशेल ओबामा यांचे विविध मुंबईतील कार्यक्रमांचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बातम्यांमध्ये कव्हरेज होते.
ओबामांनी इगो आणि राजकारण केलं नाही. सिस्टीम प्रमाणे अंतर्गत चौकशी झाली.
अमेरिकन लोकांनी त्यांचे कर्मचारी आउटर कॉर्डन सुरक्षेसाठी तैनात केले, तर आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये भारत त्यांच्या देशात व्हीआयपीचे संरक्षण करण्यास असमर्थ आहे, असा संदेश जाईल. नियमानुसार बाह्य कॉर्डन सुरक्षा व्यवस्थापन राज्य पोलिसांची जबाबदारी आहे.
मुंबई पोलीस आयुक्तांना, के. एम. मल्लीकार्जुन यांनी दिलेला हा खुलासा फार बोलका होता.
यावेळी राज्याचे गृहमंत्री होते दिवंगत आर आर पाटील. स्कॉटलंड यार्डची तुलना होणारी मुंबई पोलीस आज दहा वर्षानंतर 'परमवीर सिंह' युगात येऊन पोचली आहे.
वीस मिनिटाच्या जामचे कारण सांगत देशाच्या प्रमुखांचा जीव धोक्यात जात आहे.
माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या मौनी बाबा या टीकेवरील एक उत्तर आठवते. ''History will remember me"
#थिल्लरपणा जास्त काळ टिकत नाही आणि त्याची नोंद इतिहासात तरी होत नाही.
जय हो...
शहिद शिवराम हरी राजगुरु ...
काही न माहित असलेल्या गोष्टी ...
पंजाबातील लोकांच्या जागृतीमुळे आपल्याला भगतसिंहांबद्दल त्रोटक तरी माहिती असते. परंतू 'राजगुरु' मराठी असूनही आपल्याला त्यांची माहिती चार वाक्यांपलीकडे सांगता येणार नाही. ही काय दर्जाची उपेक्षा म्हणायची?
मूळचा खेड (राजगुरुनगर) येथील असलेला हा तरुण स्वकर्तृत्वाने काशीस संस्कृतचा पंडित बनला होता. ते इतके निष्णांत होते की, संस्कृतमधून सहज संभाषण करीत असत.
कुस्तीत त्यांचा हात धरणारा कुणीच नव्हता. नेमबाजीत ते शब्दवेधी होते.
एवढेच नव्हे तर उताणे झोपून पाठीमागे असलेले लक्ष्यही ते बाणाने सहज उडवित (कधी प्रयत्न करा मग कळेल ही गोष्ट किती अवघड आहे ते!).
स्वत:स कणखर बनविण्यासाठी रात्रीतून धावत-धावत १५-२० मैलांवरील स्मशानात जात, तेथील विहिरीत पोहत आणि तशीच दौड करीत पुन्हा येऊन झोपत, इतका त्यांचा दम होता.
कोल इंडिया लिमिटेड हि कंपनी भारत सरकारचा उपक्रम म्हणून १९७५ साली सुरु झाली. त्या वर्षी बहुदा इंदिरा गांधी प्रधानमंत्री असाव्यात.
भारतातल्या ८२ टक्के कोळशाचे उत्पादन कोल इंडिया करते. कोल इंडिया मध्ये जवळपास २७२००० कर्मचारी कार्यरत आहेत, पैकी १८००० अधिकारी वर्गाचे आहेत.
२०१० मध्ये कोल इंडियाचा आयपीओ आला ज्याला अपेक्षेपेक्षा १४ पट जास्ती लोकांनी प्रतिसाद दिला. २०११ मध्ये तत्कालीन सरकारने कोल इंडियाला ‘ महारत्न ‘ कंपनीचा दर्जा दिला. या काळात डॉ.मनमोहन सिंग प्रधानमंत्री असावेत बहुदा.
ऑक्टोबर २०१५ मध्ये कोल इंडियाचे बाजारमूल्य २.११ लाख कोटी होते.
जे भारतातल्या मौल्यवान कंपन्यात आठव्या क्रमांकावर होते आणि त्यावेळी कोल इंडियाचे बाजारमूल्य रिलायन्स पेक्षा जास्त होते.
२०१२ मध्ये कोल इंडिया फोर्ब्सच्या ५०० कंपन्याच्या यादीत ३७७ क्रमांकावर होती आणि २०१२ मध्ये भारतातल्या फोर्च्युन इंडिया ५०० लिस्टमध्ये नवव्या.
साधा सर्दी खोकला झाला की आलं, तुळस काढा घ्यायचो,
पोट दुखल की ओवा चावत जायचो.
ताप आला की डोक्यावर पाण्याची पट्टी ठेवायचो.
ना टेस्ट, ना स्पेशालिस्टच झंझट,
ना हॉस्पिटलच्या एडमिशन मध्ये अडकत होतो.
निरोगी आयुष्य जगत होतो!
साला मी अडाणी होतो
तेच बर होत ... ☺️
राम राम ला राम राम,
सलाम वालेकुम ला, वाले कुम अस सलाम
आणि जय भीम ला जय भीम नेच प्रेमाने उत्तर देत होतो
ना धर्म कळत होता
ना जात कळत होती
माणूस म्हणून जगत होतो ...
वयाची बरीच वर्ष चाळीतच गेली. आता आम्ही फ्लॅटमध्ये कोंडलेल्या अवस्थेत राहतो. कोणताही सण असू दे, सर्वांचे दरवाजे बंद म्हणजे बंद!
असो ... तर, चाळीची मज्जाच और होती. एका मजल्यावर १४ खोल्या, दोन मजल्यांची चाळ. समोरासमोर ७ खोल्या, पुढे गॅलरी, मध्ये (open common) पॅसेज. सकाळी सूर्य उगवायच्या आधीच सगळ्यांचे दरवाजे उघडायचे ते रात्री अकरा-बारा वाजताच बंद व्हायचे.
कोणीही कोणाच्याही घरात बिनदिक्कत ये-जा करायचं. इतर जाती-धर्माची कुटुंब असूनही शाकाहारी-मासाहारी असा भेदभाव नव्हता. घरातील पदार्थ, जिन्नस या घरातून त्या घरात बिनदिक्कत फिरायचे. कसलाही विधिनिषेध किंवा औपचारिकपणा नव्हता. बऱ्यापैकी एकोपा जपून होती सर्व कुटुंब!