सुपर मार्केटमध्ये वाइन विकायला ठेवली म्हणून काही प्रत्येक दारू न पिणारा माणूस वाइन प्यायला सुरू करणार नाही. हातभट्टी, देशी, फेनी, व्हिस्की, स्कॉच, रम, जिन, ब्रँडी, व्होडका, टकीला, श्यांपेन वगैरे वेगळ्या प्रकारची दारू पिणारे लोकही इतर सगळ्या दारू सोडून ...
फक्त वाइन प्यायला सुरू करणार नाहीयेत.
वाइन ही आजकाल उच्चभ्रू आणि रईस (जमिनी विकून श्रीमंत झालेल्या अडाणी लोकांना वगळून) लोकांमध्ये इज्जतीने पिली जाणारी गोष्ट आहे. २००० रुपयांची वाइन पिवून कुठल्या रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुराने बायकोला मारहाण केल्याचे माझ्या तरी ऐकिवात नाही.
ख्रिस्ती धर्मात वाइन हे सर्वमान्य आणि दैवी पेय आहे. येशू ख्रिस्ताने एका लग्नात वाइन कमी पडली म्हणून पाण्याला वाइनमध्ये बदलण्याचा चमत्कार केला. आजही जगभरातल्या चर्चमध्ये प्रार्थनासभेत प्रसादासारखी बुचभर वाइन प्यायला दिली जाते.
हिंदू धर्मात तर सुरा (दारू) प्राशन करणारे ते सुर (देव) असा एक समज आहे.
सुपर मार्केटमध्ये वाइन मिळाली म्हणून महाराष्ट्रचा मद्यराष्ट्र व्हावा हे म्हणजे ग्रँट रोडला वेश्यावस्ती झाली म्हणून अख्खी मुंबई वेश्यागमन करायला लागली इतके हास्यास्पद मत आहे.
तुमच्या गावात पोलीस चौकी आहे म्हणून तुम्ही कायदे, वाहतुकीचे सिग्नल मोडायचे सोडले का? एवढे सोज्वळ आहात का तुम्ही? आणि भेंडी जर तुम्ही एवढे सोज्वळ आहात तर तुमच्यासमोर वाइन ठेवली म्हणून तुम्ही दारुडे बनणे शक्य आहे?
प्रॉब्लेम दारुमध्ये नाहीये... प्रॉब्लेम इथल्या पुरुषसत्ताक मानसिकतेत, जातीयवादी आणि कट्टर धर्माभिमानी संस्कारात आहे. हुंड्यासाठी सुनेला पेटविणाऱ्या सासू दारू पीत नसतात आणि गावात एखाद्या दलित स्त्रीची नग्न धिंड काढताना खानदानी घरातले पुरुष आणि स्त्रिया दारू न पिता ...
त्या कृतीला प्रेक्षक बनून मूकसंमती देतात. दारूला बदनाम करण्यापेक्षा स्वतःच्या मेंदूत भरलेला पुरुषी अहंकार, जातीय माज आणि धार्मिक विद्वेष बाजूला काढून फेका.
दारू पिणाऱ्या जिनाने विरोधक म्हणून गांधींना गोळी मारली नाही, दारू न पिणाऱ्या नथुरामने मारली.
आमचे भीमसेन जोशी दारू पिऊन संतांची भजने स्वर्गीय आवाजात आणि भावात म्हणायचे. एवढं कळलं तरी पुरेसे आहे.
बराक ओबामांची अकरा मिनिटं आणि मोदींची वीस मिनिटं...
पंतप्रधान मोदींच्या पुलावरील वीस मिनिटाच्या जाममुळं गोदी मीडिया पिसाळला होता. अगदी राष्ट्रपती भवन ते सर्वोच्च न्यायालयही धुंडाळून झाले. २०१० मध्ये जगाचा महासत्तेचे प्रमुख तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा मुंबईत आले होते.
मुंबईच्या झेवियर महाविद्यालयात कृषी प्रदर्शन (USDA-ICAR) करार आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद असा कार्यक्रम होता. कृषी पत्रकार या नात्याने अमेरिकन कॉन्सुलेटने हा कार्यक्रम कव्हर करण्याची संधी मिळाली. बराक ओबामा ताज हॉटेल थांबले होते. माझे कार्यालय फोर्ट विभागात होते.
अमेरिकन सुरक्षा यंत्रणांनी पूर्ण फोर्ट आणि नरिमन पॉईंट विभागाची नाकेबंदी केली होती. सोबतीला मुंबई पोलिसांची यंत्रणा होती.
सेंट झेवियर येथे ओबामा यांच्या भेटीच्या एक दिवस अगोदर अमेरिकन सुरक्षा यंत्रणा आणि मुंबई पोलीस यांच्यात खटका उडाला होता.
शहिद शिवराम हरी राजगुरु ...
काही न माहित असलेल्या गोष्टी ...
पंजाबातील लोकांच्या जागृतीमुळे आपल्याला भगतसिंहांबद्दल त्रोटक तरी माहिती असते. परंतू 'राजगुरु' मराठी असूनही आपल्याला त्यांची माहिती चार वाक्यांपलीकडे सांगता येणार नाही. ही काय दर्जाची उपेक्षा म्हणायची?
मूळचा खेड (राजगुरुनगर) येथील असलेला हा तरुण स्वकर्तृत्वाने काशीस संस्कृतचा पंडित बनला होता. ते इतके निष्णांत होते की, संस्कृतमधून सहज संभाषण करीत असत.
कुस्तीत त्यांचा हात धरणारा कुणीच नव्हता. नेमबाजीत ते शब्दवेधी होते.
एवढेच नव्हे तर उताणे झोपून पाठीमागे असलेले लक्ष्यही ते बाणाने सहज उडवित (कधी प्रयत्न करा मग कळेल ही गोष्ट किती अवघड आहे ते!).
स्वत:स कणखर बनविण्यासाठी रात्रीतून धावत-धावत १५-२० मैलांवरील स्मशानात जात, तेथील विहिरीत पोहत आणि तशीच दौड करीत पुन्हा येऊन झोपत, इतका त्यांचा दम होता.
कोल इंडिया लिमिटेड हि कंपनी भारत सरकारचा उपक्रम म्हणून १९७५ साली सुरु झाली. त्या वर्षी बहुदा इंदिरा गांधी प्रधानमंत्री असाव्यात.
भारतातल्या ८२ टक्के कोळशाचे उत्पादन कोल इंडिया करते. कोल इंडिया मध्ये जवळपास २७२००० कर्मचारी कार्यरत आहेत, पैकी १८००० अधिकारी वर्गाचे आहेत.
२०१० मध्ये कोल इंडियाचा आयपीओ आला ज्याला अपेक्षेपेक्षा १४ पट जास्ती लोकांनी प्रतिसाद दिला. २०११ मध्ये तत्कालीन सरकारने कोल इंडियाला ‘ महारत्न ‘ कंपनीचा दर्जा दिला. या काळात डॉ.मनमोहन सिंग प्रधानमंत्री असावेत बहुदा.
ऑक्टोबर २०१५ मध्ये कोल इंडियाचे बाजारमूल्य २.११ लाख कोटी होते.
जे भारतातल्या मौल्यवान कंपन्यात आठव्या क्रमांकावर होते आणि त्यावेळी कोल इंडियाचे बाजारमूल्य रिलायन्स पेक्षा जास्त होते.
२०१२ मध्ये कोल इंडिया फोर्ब्सच्या ५०० कंपन्याच्या यादीत ३७७ क्रमांकावर होती आणि २०१२ मध्ये भारतातल्या फोर्च्युन इंडिया ५०० लिस्टमध्ये नवव्या.
साधा सर्दी खोकला झाला की आलं, तुळस काढा घ्यायचो,
पोट दुखल की ओवा चावत जायचो.
ताप आला की डोक्यावर पाण्याची पट्टी ठेवायचो.
ना टेस्ट, ना स्पेशालिस्टच झंझट,
ना हॉस्पिटलच्या एडमिशन मध्ये अडकत होतो.
निरोगी आयुष्य जगत होतो!
साला मी अडाणी होतो
तेच बर होत ... ☺️
राम राम ला राम राम,
सलाम वालेकुम ला, वाले कुम अस सलाम
आणि जय भीम ला जय भीम नेच प्रेमाने उत्तर देत होतो
ना धर्म कळत होता
ना जात कळत होती
माणूस म्हणून जगत होतो ...
वयाची बरीच वर्ष चाळीतच गेली. आता आम्ही फ्लॅटमध्ये कोंडलेल्या अवस्थेत राहतो. कोणताही सण असू दे, सर्वांचे दरवाजे बंद म्हणजे बंद!
असो ... तर, चाळीची मज्जाच और होती. एका मजल्यावर १४ खोल्या, दोन मजल्यांची चाळ. समोरासमोर ७ खोल्या, पुढे गॅलरी, मध्ये (open common) पॅसेज. सकाळी सूर्य उगवायच्या आधीच सगळ्यांचे दरवाजे उघडायचे ते रात्री अकरा-बारा वाजताच बंद व्हायचे.
कोणीही कोणाच्याही घरात बिनदिक्कत ये-जा करायचं. इतर जाती-धर्माची कुटुंब असूनही शाकाहारी-मासाहारी असा भेदभाव नव्हता. घरातील पदार्थ, जिन्नस या घरातून त्या घरात बिनदिक्कत फिरायचे. कसलाही विधिनिषेध किंवा औपचारिकपणा नव्हता. बऱ्यापैकी एकोपा जपून होती सर्व कुटुंब!