शाहरुखने लताजींच्या पार्थिवावर दुआ करताना फुंकर मारली याचा विपर्यास करून भाजपच्या हरयाणाच्या पदाधिकाऱ्याने हा पुन्हा थुंकला का म्हणून अकलेचे तारे तोडले. त्याच्या ट्विटला हजारोंनी लाइक आहेत. कमेंट्समध्ये पण आपल्या सहिष्णू बांधवांनी आपलं आपल्या देशातील १५ कोटी नागरिकांवर किती
प्रेम आहे हे दाखवून दिलंय. हा प्रकार केवळ शाहरुखबद्दलचा द्वेष नाहीये तर त्याच्या निमित्ताने इतर मुस्लिमांना सतत जाणीव करून देणं की तुम्ही या देशात नकोसे आहात हा त्यामागचा उद्देश आहे. कर्नाटकमध्ये हिजाबच्या निमित्ताने जे सुरू आहे तोही हाच प्रकार आहे. प्रिन्सिपॉलने ऐन परीक्षांच्या
वेळी मुलींची अडवणूक करणं, मुलींच्या निदर्शनाला प्रत्युत्तर म्हणून हिंदू मुला-मुलींनी भगवी उपरणी घालून येणं हे समाजात खोलवर रुजलेल्या किडीचं निदर्शक आहे. २०१४ मध्ये मोदी निवडून आले तेव्हा आम्ही विकासाला मत दिलं, भ्रष्टाचाराच्या विरोधात मत दिलं असं किमान तोंडदेखलं तरी लोक म्हणायचे.
आता मुस्लिमद्वेष सहजभाव झाला आहे. २८ पैकी १५ राज्यात मुस्लिम मंत्रीच नाही. १० मध्ये केवळ एक. म्हणजे आपण त्यांना सत्तेत सहभाग नाकारतो आहोत आणि जे पक्ष उमेदवारी देतील त्या पक्षांना मतदारसुद्धा नाकारत आहेत. हा द्वेष अगदी भाजपच्या कट्टर विरोधी पक्षांच्या मतदारांतदेखील आहे. रोज या
गोष्टीवर कसं बोलायचं असा प्रश्न असतो. पण नाही बोललं तर conscience झोपू देत नाही. आमच्या आई वडीलसुद्धा हिंदू होते. पण असा द्वेष त्यांनी आम्हाला शिकवला नाही. मी माझ्या मुलांना शिकवत नाही. या देशावर तुमचं प्रेम असेल तर तुम्हीही शिकवू नका. भारत जेवढा तुमचा माझा आहे तितकाच शाहरुखचा,
आरिफाचा, जोसेफचा, सुखविंदरचा आहे आणि तो तसाच राहील हे पाहणं ही जबाबदारी बहुसंख्य समाज म्हणून हिंदूंची आहे. उद्या जर या देशात यादवी माजली तर त्याला जबाबदार तुम्ही आम्ही असू. कारण आपण या द्वेषाच्या राजकारणाला एकतर सक्रिय किंवा गप्प राहून पाठिंबा देतो आहोत .
... आणि हो, आपल्या मुस्लिम मित्र मैत्रिणीबरोबरचा संवाद वाढवा. चालीरीती समजून घ्या. फक्त बिर्याणी, शीर कुर्मा मागायला जाऊ नका.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
@PriyankaPulla यांच्या थ्रेड चा स्वैर अनुवाद करतोय. काही शब्दांचा अर्थ जरी कळला तरी नेमका मराठी शब्द माहीत नसल्याने ते तसेच राहतील त्याबद्दल क्षमस्व.(१)
करोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजलेला असताना पाच राज्यातल्या अनेक हॉस्पिटल्समधल्या रुग्णांची स्थिती गंभीर होऊ लागली. त्यांना कॅडीलाच्या एका विशिष्ट बॅचची रेमदेसिविर इंजेक्शन्स दिली गेली होती. (२)
ताप, थंडी वाजणे, रक्तातला ऑक्सिजन अचानक कमी होणे ही त्यांची प्रमुख लक्षणं होती. यातील पहिली दोन लक्षणं उद्भवली याचं संभाव्य कारण औषधात भेसळ होणं (दुधात पाणी टाकतात तशी नव्हे पण contamination होणं). यामुळे sterility (निर्जंतुकीकरण) आणि endotoxins प्रभावित होऊ शकतात. (३)
#जागतिक_वडापाव_दिन च्या निमित्ताने: साधारण २००१ मध्ये माझ्या त्यावेळच्या संपादकांनी मला एक अनोखी assignment दिली. मुंबईत वडापाव पहिल्यांदा कुणी बनवला त्याची स्टोरी पाहिजे. हवा तितका वेळ घे, पण मला ही स्टोरी हवीय. मग माझी शोधाशोध सुरू झाली. आज जितका सोशल मीडिया आहे आणि इंटरनेट
Archives आहेत तसं त्याकाळी नव्हतं. सगळी शोधाशोध पायपीट करून करावी लागे. मुंबईचा फिरस्ता असलेले दिवंगत प्रमोद नवलकर तेव्हा संपर्कात होते. त्यांचा मराठी कॉलम मी इंग्रजीत भाषांतरित करत असे. त्यांनी गिरगावातल्या एका वडापाव विक्रेत्याचा पत्ता दिला. जाऊन भेटलो तेव्हा हे काही पहिले
विक्रेते नाहीत याची खात्री झाली. अशी बरीच शोधाशोध महिनाभर केली. एके दिवशी मुंबईचे आणखी एक माहितगार आणि सिंहासन मधलं दिगु टिपणीस हे पात्र ज्यांच्यावर बेतलं आहे असं म्हटलं जाई त्या दिनू रणदिवे यांच्याशी बोलणं झालं. ते पटकन म्हणाले अरे आपला वैद्य होता ना, त्याने बनवला होता वडापाव.
#PegasusSnoopgate हा काही मोदींना धक्का देणारा राजकीय मुद्दा होऊ शकत नाही असं बऱ्याच जणांना वाटतं. हा मुद्दा लोकांना कनेक्ट होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. यापेक्षा ढासळलेली अर्थव्यवस्था, लोकांचे बुडालेले रोजगार, कोविडची ढिसाळ हाताळणी यावर बोलायला हवं असं ते सांगतात. ठीक आहे.
अर्थव्यवस्थेत जी घसरण झालीय ती जवळजवळ चार वर्षांपासून आहे. रोजगार जाण्याचं प्रमाण ढासळत्या अर्थव्यवस्थेला समांतर आहे. मोदी सरकारने कोविड कसा हाताळला आहे हे गेली दीड वर्ष आपण पाहतो आहोत आणि सर्वसामान्य लोकांनी वेगवेगळ्या प्रमाणात ते भोगलंदेखील आहे. #PegasusSnoopgate हा केवळ
विरोधकांवर बेकायदेशीररित्या पाळत ठेवण्याचा मुद्दा नाहीये. याचा थेट परिणाम भारताच्या सुरक्षिततेवर होणार आहे. आपले धोरणकर्ते, आपले न्यायाधीश, आपले विरोधी पक्ष यांचा डाटा नेमका कुणाकुणाला मिळू शकेल याची माहितीदेखील आपल्याला नाहीय. ३५ वर्षापूर्वी बोफोर्स घोटाळा बाहेर आला तेव्हा
@BeingSalman2802 इथे प्रयत्न करतोय. Via @ShivamShankarS जेव्हा तुम्ही #Pegasus#spyproject संबंधी बातम्या वाचाल, तेव्हा एकेका लायसेन्सची किंमत ५० ते ५५ कोटी रुपये असते आणि एक लायसेन्स फक्त ५० फोनवर वापरता येतं हे लक्षात ठेवा. हे सॉफ्टवेअर सगळा डाटा गोळा करते - कॉल्स, मेसेजेस,
की स्ट्रोक्स, कॅमेरा आणि microphone हॅक करून चालू करणं... सगळा access मिळतो. याचा अर्थ हे सगळं manually पिंजून काढत बसावं लागतं. त्यासाठी मोठी टीम लागते. मास surveillance मध्ये की वर्ड्स टार्गेट केले जातात आणि म्हणून automated system वापरली जाते. हे त्याच्या पलीकडे आहे.
यातून एक महत्त्वाचा प्रश्न उद्भवतो ज्याचं उत्तर लगेच मिळणार नाही....कोण आहेत हे लोक जे snooping करताहेत? सरकार करतंय हे माहीत आहे पण सरकारमधून कोण? केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत हे असू शकतं, पण कुणीतरी पाठपुरावा करायला हवा...नक्की कोण? या सॉफ्टवेअरचा ब्लॅकमेलसाठी गैरवापर
काल @Gaju3112 यांनी म्हटलं होतं की #Pegasus चा उपयोग खाजगी यंत्रणादेखील करू शकतात आणि मग ते कुठवरही पोचू शकते. हे रुपेश कुमार सिंह, झारखंडमध्ये हिंदी पत्रकारिता करतात. Pegasus मार्फत यांच्या फोनमध्ये spyware टाकण्यात आलं. का? त्यांनी एका आदिवासीच्या नकली एन्काऊंटर बद्दल लिहिलं.
फादर स्वामी, ज्यांचा नुकताच तुरुंगात मृत्यू झाला, ते देखील आदिवासींच्या हक्कासाठी लढणारे कार्यकर्ते होते. त्यांच्या कम्प्युटरवर देखील malware टाकण्यात आलं आणि त्यामार्फत त्यांना भीमा कोरेगाव खटल्यात अडकवण्यात आलं असा त्यांच्या वकिलाचा आरोप होता. झारखंडसारख्या छोट्या राज्यातले हे
पत्रकार, कार्यकर्ते एवढ्या मोठ्या निशाण्यावर का असतात? कारण भल्या मोठ्या मल्टी नॅशनल कंपन्यांच्या हजारो कोटींच्या मोठ्या प्रकल्पांमधून आदिवासींची कशी पिळवणूक होते आहे याकडे ते लक्ष वेधतात. #Pegasus बद्दल तुम्ही आम्ही आवाज उठवायला हवा तो यासाठी. जे चोरी करतील त्यांच्यावरच पाळत
चीन सीमेच्या आत घुसला आणि आपले सैनिक मारले गेले, राफेलच्या मागचं सत्य इथल्या न्यायव्यवस्थेने गाडून टाकलं. दोन्ही गोष्टी राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या होत्या, पण आपल्या मतदारांना सोयरसुतक नाही. याच मतदारांना बोफोर्स भ्रष्टाचाराचं प्रतीक वाटतं.
ज्या राम मंदिराच्या नावाने मते मागितली जातात, त्या राम मंदिराच्या जमीन खरेदीसाठी अत्यंत संशयास्पद व्यवहार होतात, पण आपल्या मतदारांना अजूनही भाजप हाच हिंदू हितरक्षक पक्ष वाटतो. आपल्या आस्थेचा असा दुरुपयोग त्यांना कसा पचतो?
करोनाच्या काळात लाखो मृत्यू झालेत आणि आणखी किती बळी पडत राहतील हे माहीत नाही. जगभरात झाला नसेल इतका गोंधळ लसीकरणाच्या बाबतीत घातला गेलाय. पण घरात सुतक आलेल्या आपल्या मतदारांना मोदीजी आजही विक्रमवीर वाटतात.