हेलेन बार्था एमेली ऊर्फ लेनी रायफेनस्टाहल (Riefenstahl) ही जर्मन अभिनेत्री व दिग्दर्शिका हिटलरसाठी प्रचारकी सिनेमे बनवत असे. नाझी पक्षाच्या १९३४ मधील न्यूरेमबर्ग येथील सोहळ्यावरील Triumph of the Will या सिनेमानंतर ती हिटलरची आवडती चित्रकर्मी झाली. #हिटलरनामा
१/७
+👇
यानंतर लेनीचा हिटलरच्या विश्वासू अशा अंतर्गत गोटात समावेश झाला. लेनीची Olympia ही फिल्म विशेष गाजली. यातील जेसी ओवेन्सची १०० मीटर मधील अंतिम रेषेजवळील झेप आजही उत्कृष्ट चित्रफ्रेम म्हणून ओळखली जाते आणि याच क्षणामुळे जेसीच्या विक्रमाला चार चाँद लागले होते. #हिटलरनामा
२/७
+👇
नाझी प्रचारक मंत्रालयाकडून लेनीला अशा चित्रपटांसाठी भरभक्कम निधी मिळत असे आणि या चित्रपटांचा प्रचार खुद्द हिटलर करत असल्याने तिचे चित्रपट भरपूर गल्ला जमविण्यात यशस्वी होत असत. अशा या प्रचारकी चित्रपट मिळकतीतील हिस्सा लेनीने कधीही नाझी पक्षाला दिला नाही. #हिटलरनामा
+👇
३/७
या कारणामुळे शिवाय हिटलरबरोबरील लेनीच्या मैत्रीमुळे देखील गोबेल्स तिचा दुस्वास करत असे. परंतु हिटलरच्या खास मर्जीतील असल्याने प्रचारकी चित्रपटांतून लेनीची कमाई तुफान सुरु होती. महायुद्ध संपल्यानंतर मित्रराष्ट्रांकडून तिला अटक करण्यात आली होती. #हिटलरनामा
+👇
४/७
या अटकेतील चौकशीत लेनीकडे होलोकास्टबद्दल विचारणा करण्यात आली. परंतु तिने याबाबत कानावर हात ठेवले. खरंतर होलोकाॅस्ट मधील कित्येक लोकांनी तिच्या सिनेमात ज्युनियर कलाकार म्हणून काम केल्यानंतर पुन्हा त्यांना तिथेच नेऊन सोडण्यात येत असे. #हिटलरनामा
+👇
५/७
अर्थात मित्रराष्ट्रांच्या चौकशीत ही गोष्ट पुराव्याअभावी सिध्द होऊ शकली नाही आणि लेनीची निर्दोष सुटका झाली. लेनी १०१ वर्षांचं ऐषारामी आयुष्य जगली आणि वेळोवेळी माध्यमांशी बोलताना, आपण व्यक्तीशः हिटलरला ओळखत नसल्याचं ठासून सांगितलं होतं. #हिटलरनामा
+👇
६/७
नंतरच्या काळात हिटलर या शतकातील क्रूरकर्मा होता, हे सांगायला ती नेहमी पुढे असे. हिटलरच्या शुध्द आर्यन रक्त संकल्पनेवर विश्वास ठेवणार्या जर्मनांनी त्याच्यावर शब्दशः जीव ओवाळून टाकला होता आणि लेनीसारख्या संधीसाधूंनी हिटलर मरताच आपलं पारडं बदललं. #हिटलरनामा
७/७
समाप्त
--- दुर्गा
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
गोदी पत्रकारांना कोरोनाग्रस्तांसाठी मदत मागताना युथ काँग्रेसचे अध्यक्ष आठवतात. त्या अमुक एक व्यक्तीला तातडीने मदत देखील मिळते. काल निवडणूक निकालानंतर हेच लबाड टोळकं काँग्रेसला ऑक्सिजनची गरज आहे म्हणून हसत होतं. आज पुन्हा हात पसरायला मोकळे!
+👇
२. कृतघ्नपणा
भाजप भिवानीकडून काँग्रेसच्या दिपेंदर हुड्डांकडे ऑक्सिजनची मागणी केली जाते. मागणी पूर्ण झाल्यावर भाजप भिवानीकडून आभाराचं ट्विट सुध्दा केलं जातं. नंतर काही वेळातच मागणीपासून आभारापर्यंतची सर्व ट्विट डिलिट करण्याचा कृतघ्नपणा करण्यात येतो.
+👇
३. फुसका बार
फिलीपीन्स, न्यूझिलंडच्या वकिलातीतून युथ काँग्रेसकडे ऑक्सिजन सिलिंडरची मागणी केली जाते. ती पूर्ण होताच, समोरुन युथ काँग्रेस अध्यक्ष व राहुल गांधींचे आभार मानले जातात. थोडक्यात, जगातील सगळ्यात मोठा पक्ष म्हणवून घेणारे सत्ताधीश याक्षणी फुसका बार ठरलेत.
२०१६ च्या नोटबंदीपासून लोक जे रांगेत उभे आहेत, त्या रांगेचं दुष्टचक्र काही केल्या संपतच नाहीए. आता तर आपापल्या आप्त स्वकीयांच्या मृतदेहांचे टोकन घेऊन लोक रांगेत तिष्ठत उभे आहेत. न जाणो, तिथे लागणारा वेळ पाहता, एखादा चहावाला स्टाॅल लावून त्या ठिकाणी आपला धंदाही सुरु करेल.
+👇
१
कोरोना काळात मुलांच्या शिक्षणाचे बारा वाजलेत. स्पर्धा परीक्षा रखडल्यात. होतकरू मुलांची सरकारी नोकरीतील वयं उलटून चाललीत. अनेक सरकारी उपक्रमांचं खाजगीकरण झाल्याने किंवा होऊ घातल्याने, मुदती आधीच निवृत्तीचं प्रमाण वाढलंय. यातल्या अनेकांची मुलं उच्चशिक्षण घेत आहेत.
+👇
२
यातील काही मुलांचे घरात फक्त वडिलंच सरकारी नोकरीत असतील, तर मग त्यांचं शिक्षण व नोकरी अधांतरी लटकत राहणार. खाजगी नोकरदारांना तर या कोरोना महामारीने पार भुईसपाट करुन टाकलंय. यातील कोणाच्या नोकर्या गेल्यात, तर कोणाची अर्ध्या पगारावरच बोळवण केली जातेय.
+👇
३
विषयः अर्धसैनिक दल (Paramilitary Forces) आणि चकमकी
पुलवामा असो, दंतेवाडा, बस्तर वा सुखमा याठिकाणी चकमकीत धारातिर्थी पडतात ते फक्त अर्धसैनिक दलाचे जवान! मग देशभरात एक प्रचंड दुःखाची लाट येते आणि हा हा म्हणता ओसरते. मग पुढील घटना घडेपर्यंत सगळीकडे शांतता!
१
+👇
अर्धसैनिक दलात अत्यंत तुटपुंजं वेतन असतं. म्हणून सामान्यतः यात भरती होणारे तरुण हे शेतकरी, कष्टकरी समाजातील असतात. अर्धसैनिक दल म्हणजे लष्कर नव्हे. त्यामुळे एखाद्या लष्करी सैनिकाला मिळणारा पगार आणि एका अर्धसैनिक दलातील जवानाचं वेतन यात जमीनआस्मानाचं अंतर असतं.
२
+👇
अर्धसैनिक दलातील जवानांचं प्रशिक्षण व कामगिरी, लष्करी जवानांच्या तोडीस तोड असते. तरीही अर्धसैनिक दलातील जवान पगाराची ठराविक रक्कम वगळता इतर भत्ते, सुविधा,निवृत्ती वेतन या लाभांपासून कायमच वंचित असतात/आहेत.
३
+👇
लोकसभेच्या वेळी राज ठाकरे "लाव रे तो व्हिडिओ" माध्यमातून सगळ्यांच्या गळ्यातील ताईत बनले होते. तेव्हा कोणी विचार तरी केला होता का, की पुढे जाऊन शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस मिळून सत्ता स्थापन करतील. त्याकाळात राज व साहेबांच्या मैत्रीची पारायणं केली जात.
+👇
१
त्यावेळी राष्ट्रवादी व काँग्रेसच्या समर्थकांनी राज ठाकरेंना डोक्यावर घेऊन नाचायचं तेवढं बाकी ठेवलं होतं. पुढे राज ठाकरे भाजपच्या बाजूला झुकले, तर त्याचा एवढा गवगवा, इतका रागराग का केला गेला वा अजूनही केला जातोय. राज ठाकरेंना आपलं राजकारण करु द्यात की👍 अडचण काय आहे.
+👇
२
राज ठाकरेंच्या राजकारणाचं पुढे काय होईल, न होईल, हे त्यांचं ते बघतील की, तुम्ही का उगं अंगाची लाही लाही करुन घेत आहात. तसंही बाहेर निसर्ग आग ओकतोय, तेवढं पुरेसं नाही का? तुमचे नेते जर खरोखरीच पावरबाज असतील, तर फिकर नाॅट! तुम्हाला इतकं तणतणायची काही गरज नाही. बरोबर ना?
+👇
३
शासनातील भ्रष्टाचार हे हिमनगाच्या टोकासारखे असतात. किंचीतश्या टोकाच्या दर्शनाने जनता हक्काबक्का होते, असा गरीब बापड्या राजकारण्यांचा समज असतो. लोणचं जसं मुरतं, तसा भ्रष्टाचार खोलपर्यंत मुरलेला आहे, हे चलाख जनता चांगलंच जाणते.
+👇
१/१४
आता या गोष्टी पासून कोणी अनभिज्ञ असेल, तर समजा त्याचे दुधाचे दात अजूनही पडलेले नाहीत. लोक एकतर खरंच दुधखुळे असतील किंवा राजकारण्यांनी लोकांबद्दल तसा समज करुन घेतला असावा. कालचा अख्खा दिवस, वेगवेगळ्या राजकारण्यांनी भ्रष्टाचारावर चर्वितचर्वण करण्यात घालवला.
+👇
२/१४
अबब! काय ते खंडणीचे आकडे आणि त्या पैशांच्या राशी कोणासमोर ओतल्या जाणार म्हणून गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुफान गदारोळ! म्हणजे असलं अब्रमण्यम राजकीय इतिहासात पहिल्यांदाच घडतंय की काय? असं वाटण्याजोगी स्थिती! थोडक्यात, ऐतिहासिक घटनाच जणू!
शेतकरी आंदोलनाला दोन महिने होतील. या दोन महिन्यांत शेतकर्यांचा संयम कौतुकास्पद! सरकार, गोदी मिडीया, भाजप आयटी सेल, व्हाॅटस् अप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून शेतकरी आंदोलनाविरोधात सगळ्या प्रकारची गरळ ओकून झाली.
१/१९
+👇
अशा परिस्थितीतही शेतकरी आपल्या निर्णयाबाबत ठाम राहिले. सरकारच्या साम, दाम, दंड, भेदाविरोधात उभं राहणं, कधीच सोपं नव्हतं. म्हणूनच शेतकर्यांचं विशेष अभिनंदन!शेतकरी आंदोलन...
Divert & Rule,
Divide & Rule,
Defame & Rule
असं तीन प्रकारे तोडण्याचा यत्न झाला.
२/१९
+👇
Divert & Rule : सरकारमधील नेते व प्रवक्ते यांनी शेतकर्यांना पाकिस्तानी, खलिस्तानी, चायनीज एजंट, तुकडे तुकडे गँग, अर्बन नक्सल या आणि अशा अनेक उपाध्या देऊन आंदोलन बदनाम करण्याचं कुंभांड रचलं गेलं. परंतु शेतकरी याला पुरुन उरले आणि आंदोलन अधिक तेजाने तळपू लागलं.
३/१९
+👇