नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंग हि प्रथा कधी सुरु झाली ? ह्या बद्दल नवरात्री सनाशी संबंध आहे का ?
महाराष्ट्र टाईम्स वाले पानपानभर फोटो छापतात या दिवसांत. लोक खास फोटो काढून या पेपरकडे पाठवतात व तो छापून आला का पाहायला दुसऱ्या दिवशी पेपर खरेदी करतात.
अगदी याच साठी महाराष्ट्र टाईम्स ने ही खेळी खेळली होती. लोकसत्ता चा खप जास्त होतोय नी मटाचा कमी म्हणून खप वाढवण्यासाठी काय करावे यावर विचार करताना 2003 मधे ही कल्पना सुचली. स्त्रियांना टार्गेट करुन तो वाचकवर्ग वाढवायचा. झालं, रंग ठरले.
ते जास्त आपलेसे, नवरात्रीत समरसणारे म्हणून वाटावे म्हणून दिवसाशी निगडीत देवी घेऊन तिचा रंग त्या दिवसासाठी निश्चित करण्यात आला. मग काय, पसरले नवरंग मुंबईवर. इतके की मटाशिवाय इतरांनाही त्यात भाग घ्यावा लागला. मुंबई बरोबरच राज्यात इतर ठिकाणीही हे क्रेज पसरलं.
अगदी “साडी घातली म्हणून भारताची नाडी ओळखता येत नाही” म्हणणाऱ्या सिंगलहड्डीपासून ते जर्सी गाय, कॉंग्रेसकी विधवा म्हणणाऱ्या छप्पन इंची गाढवापर्यंत सर्वांनी त्यांच्यावर कुत्सित टीका केली आहे...
पण जिच्या मांडीवर गोळ्यांनी चाळण झालेल्या सासूने जीव सोडला.. जिच्या नवऱ्याच्या शरीराचे अवशेष प्लास्टिकच्या बॅग मध्ये भरावे लागले, ती स्त्री राजकारणात येते.. उत्तरेतल्या परदा संस्कृतीतल्या तथाकथीत मर्दांना आपल्या राजकीय हुशारीच्या जोरावर लगाम घालते,
नागपुरातले चड्डीधारक मापात ठेवते, आपल्याला विदेशी म्हणून पक्ष सोडून गेलेल्याना पुन्हा आपल्याच आघाडीत येण्यासाठी तिष्ठत ठेवून, केंद्रात सहाव्या क्रमांकाचं मंत्रिपद देते .. आणि त्यावर कडी म्हणजे अनेकांनी ज्या पदाची सहा दशकं स्वप्न पाहिली ते पंतप्रधानपद नाकारते..
🚩३१ जुलै १६५७🚩
छत्रपती श्री शिवरायांनी "दंडाराजपुरी" हिंदवी स्वराज्यात दाखल केले.
🚩३१ जुलै १६५७🚩
मुघलांनी विजापूरच्या आदिलशहाच्या ताब्यात असलेला "कल्याणी किल्ला" जिंकून घेतला.
🚩३१ जुलै १६५७🚩
छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी ३१ जुलै १६५७ रोजी निळोपंत रघुनाथ बल्लाळ कोरडे यांच्याबरोबर आरमार व फौज देऊन जंजिरा काबीज करण्यासाठी पाठवले.
🚩३१ जुलै १६५८🚩
औरंगजेब मुघल सम्राटच्या तख्तावर बसला.
🚩३१ जुलै १६७७🚩
दक्षिण दिग्विजय मोहीम
छत्रपती श्री शिवराय दक्षिणेतील "तुंदुमगुती" ला आले, तिथून त्यांनी "वृद्धाचलम" ला शिवशंकराचे दर्शन घेतले
🚩३१ जुलै १६८१🚩
औरंगजेबाने अजमिरहून आजमशहास शहजादा अकबर याच्यावर रवाना केले.
🚩३० जुलै १६७७🚩
"दक्षिण दीग्विजय मोहीम"छत्रपती शिवरायांनी "नागोजी भोसले" यांस सालाना १२५ होन मंजूर करून "उटकुर" चा हवालदार नेमले.
🚩३० जुलै १६८२🚩
कारवारकर इंग्रजांनी सुरतकर इंग्रजांना पाठविलेल्या पत्राची नोंद!
"मोगल बादशहा औरंगजेब छत्रपती संभाजी महाराजांविरुद्ध इतका चिडला आहे की, त्याने आपल्या डोक्याची पगडी (किमॉश) खाली उतरली आणि शपथ घेतली की, छत्रपती संभाजी महाराजांना मारल्याशिवाय किंवा राज्यांतून हाकलून
दिल्याशिवाय मी ती डोक्यावर घालणार नाही. अशी प्रतिज्ञा केली आहे. औरंगजेब बादशहाला दक्षिणेत येऊन एक ते दीड वर्ष झाले. प्रचंड सेनादल, भक्कम दारुगोळा, कसलेले सेनानी, अमाप पैसा पणाला लावणाऱ्या औरंगजेब बादशहाला डोक्यावरचे "किमॉश " खाली टाकावयास लावून बोडके व्हावे लागले.