२९ नोव्हेंबर १६०७ रोजी रॉबर्ट आणि कॅथरीन यांच्या घरात चौथ्यांदा पाळणा हलतो आणि जन्म होतो जॉनचा. त्याची जन्मभूमी ही इंग्लंड मधली. १६२५ पर्यंत तो त्याच देशात वाढतो, शिक्षण घेतो. १६२५ मध्ये इंग्लंड मध्ये आलेल्या प्लेगच्या साथीने त्याचे
सारे कुटुंब उध्वस्त होते. घरातील एक एक मंडळी प्लेगला बळी पडू लागतात. त्यामुळे जॉनला त्याची आई इंग्लंड सोडण्याचा आग्रह करते. इच्छा नसताना जॉन इंग्लंड सोडतो आणि अमेरिका गाठतो. जॉनला वाचनाची आवड असते. शिक्षणाचे महत्त्व त्याला ठाऊक असते.
२/१०
त्यामुळे अमेरिकेत चर्च मध्ये फादर म्हणून वावरत असताना तो ज्ञानाचा प्रसार करत राहतो. त्या काळी जवळपास ४०० ग्रंथ आणि पुस्तकांचा संग्रह त्याने केलेला असतो. जॉनचं दुर्दैव असं की १६२५ मधील इंग्लंड मधील प्लेग प्रमाणे १६३८ दरम्यान अमेरिकेत टीबी फोफावतो.
३/१०
आणि वयाच्या अवघ्या एकतीसाव्या वर्षी १४ सप्टेंबर १६३८ रोजी टीबीच्या आजाराने त्यास इहलोकाचा निरोप घ्यावा लागतो.
इथे एक बाब लक्षात घ्या. हा काळ आपल्याकडे छत्रपती उदयाचा आहे. दुर्दैवाने हिंदवी स्वराज्य निर्माण करणाऱ्या त्या महापुरुषाच्या तारखेबद्दल
४/१०
आजही गोंधळ आणि वाद दोन्ही सुरूच आहेत. त्यातून निष्पत्ती शून्य. आजच्या या उदाहरणातून त्या व्यवस्थेत व्यवस्थितपणा आणि मोठेपणा दोन्ही जाणून घेऊ आपण. असो, पून्हा विषयाकडे येतो.
तर मृत्यूसमयी हा गृहस्थ आपली अर्धी संपत्ती आणि सर्व ग्रंथसंपदा चर्चला देऊ करतो. देताना सांगतो,
५/१०
'या पैशांने आणि पुस्तकांनी एक शाळा सुरू करा.' यातील विशेष बाब म्हणजे चर्चचे व्यवस्थापकीय मंडळ (ट्रस्ट म्हणा) तसे करते आणि एका विद्यापीठाची पायाभरणी केली जाते. त्यावेळी जॉनने पेरलेल्या आणि चर्चने वाढवलेल्या त्या ज्ञानरुपी रोपट्याचे आज वटवृक्ष झालंय.
६/१०
हा वटवृक्ष अमेरिकेच्या २०९ एकरात पसरला आहे. जगातील पहिल्या दहा विद्यापीठात या वटवृक्षाचे नाव अगदी आदराने घेतले जाते. त्या वटवृक्षाचे नाव हार्वर्ड विद्यापीठ'. ज्याच्या प्रेरणेने (यात फक्त जॉन मज अपेक्षित नाही) हे वटवृक्ष जन्मास आले त्याचे नाव 'जॉन रॉबर्ट हार्वर्ड'!
७/१०
आज हे का सांगतोय? त्यास कारण आहे केरळच्या डॉ. कुरेला विठ्ठलचर्या यांची ज्ञानदानाची निष्ठा. या निष्ठेपायी त्यांनी आपली सर्व संपत्ती वाहिली. या भारतवर्षात काल, आज आणि उद्या असे अनेक डॉ. कुरेला विठ्ठलचर्या होते, आहेत आणि असतील. फक्त आपलं अडतं कुठे सांगू?
८/१०
आपल्याकडे काय नाहीये माहीत आहे? व्यवस्था! अशी व्यवस्था ज्यास आपल्या जबाबदारीची जाणीव आणि कर्तव्याची चाड आहे... 'आम्ही होतो थोर, इतिहासाच्या पानी' ही आमची अभिमानी वृत्ती काही जाणार नाही. त्यासही आजच्या थ्रेड निमित्ताने नमन.
९/१०
असो, मी थ्रेडच्या शेवटी जे #प्रश्न उपस्थित करतो ते अनेकांना पटत नाही. त्यांना आपल्या (भारतीय) व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह खपवून घेता येत नाहीत. इतरांचं कौतुक ऐकवत नाही. पण सत्य हे औषधांप्रमाणे कटू असतं. ज्यास आजारातून बरे व्हायचे आहे त्याने ते प्राशन करावे!
हा फोटो आहे १ मे २००११चा. काहींना याची पार्श्वभूमी माहीत असेल काहीं नसेल. यात देशाचे अध्यक्ष असा क्षण बघताहेत जो जगाच्या दृष्टीने महत्वाचा आहे... पुढे याविषयी येईल.
'कुठेही जायचं असेल तर फोटोग्राफर हवाच', हा आपल्या पंतप्रधानांचा अट्टाहास आता देशाच्या समोर आहे. म्हणजे भक्तांच्या टोळीने कितीही नाकारण्याचा प्रयत्न केला तरी पंतप्रधान फोटोग्राफीसाठी आतुर असतात हे काही ते नाकारू शकणार नाहीत.
२/७
मोठाल्या सभेपासून ते थेट मंदिराच्या भेटीपर्यंत फोटोग्राफरचा लवाजमा बाळगणारे आपले पंतप्रधान हे कोणत्याही स्थळी उठून दिसतील अशी सारी व्यवस्था असते. या व्यवस्थेच्या आड कोणी येणार असेल तर त्यास सर्रास बाजूला सारले जाते. पण मला प्रश्न पडतो तो म्हणजे, हे का? कशासाठी?
पाणी हे कायम पवित्रच असते. त्याचे पावित्र्य नाकारांऱ्यांनी आपल्या बुद्धीला लागलेला गंज आधी काढायला हवा. आज 'बाटलीतील पाणी' (बिस्लरी) आणि 'नळाचे पाणी' या दोहोंची शुद्धता आपण वैज्ञानिक निकषावर घासून पाहणार आहोत.
मागील धाग्यात पाण्याचे 'शिळेपण' आणि त्याचे 'खराब होणे' दोन्हीबद्दल लिहिलं आहेच. त्यामुळे पाणी नळाद्वारे येणारं असो, वा आपण विकत घेतलेल्या बाटलीतील असो दोन्ही पाणी ताजचं असतं. पण दोन्ही बाबी आपल्या आरोग्यावर आणि पर्यावरणावर वेगवेगळा परिणाम करतात.
मागील काही दशकांपासून आपल्या अंगी एक सवय जडली आहे. 'जुगाड'! कोणत्याही परिस्थितीत याचा वापर केला जातो. यामुळे आपल्याला कामाचा 'दर्जा' काय असावा हेच कळत नाही. पर्यायी दर्जेदार कामे करण्याकडे दुर्लक्ष होते. हेच आज देशातील रस्त्यांच्या बाबती घडतंय. १/७
भारतीय खड्यांनी आपल्याला दिलेला सतर्कतेचा इशारा आपण काही दिवसांपूर्वी माझ्या थ्रेड मध्ये वाचला असेल. आज या खड्यांची खरडपट्टी काढुया.
खड्यांचा प्रश्न जगातील अनेक देशांत आहे. निकृष्ट रस्ते हा काही एकट्या भारताचा प्रश्न नाही. पण २/७
जगात बहुदा फक्त भारतीय रस्त्यात तलाव पाहण्याची सोय असावी. भारतीय रस्त्यात खड्डे असतात की खड्ड्यात रस्ते हे सहजासहजी कोणीही सांगू शकत नाही एवढं महात्मा आपण यात प्राप्त केलंय.
देशातील करोना मुळे मंदावलेला गुन्हेगारीचा आकडा पुन्हा पूर्वपदावर येतो आहे. भारतातील हा आकडा मंदावण्याचे एकमेव कारण म्हणजे देशाची टाळेबंदी हे होते. पण जगात असे अनेक देश आहेत जिथे गुन्हेगारांची संख्याच कमी होतेय. १/१०
गुन्हेगारांची संख्या कमी होण्यामागे तिथे गुन्हेगारास केले जाणारे कठोर शासन हे कारण नव्हते. उलट तुरुंगात यांना मिळणारी वागणूक सर्वसामान्य नागरीकांनाप्रमाणेच होती. मग तरीही तिथे गुन्हेगारी मानसिकता कमी होण्याची कारण काय असावे?
माणुसकी जपणाऱ्या अशाच काही तुरुंगाच्या यादीतील २/१०
एक नाव जर्मनीचे आहे. भारतात ज्या सुविधा एका गरीब मध्यमवर्गीयाला घाम गाळून मिळत नाहीत त्या तिथल्या तुरुंगात गुन्हेगारांना मिळतात. तरीही तिथले तुरुंग आज निम्म्याहून अधिक रिकामे आहेत.
काही दिवसांपूर्वीचीच घटना. तामिळनाडू मधील पोलिसांनी पोलीस कोठडीत ३/१०
एखादी गोष्ट सरकारने फुकट किंवा कमी पैशात उपलब्ध करून द्यावी हीच आपली मानसिकता झालीये. या मानसिकतेला अनेक कारणे जबाबदार आहेत. मुळात सरकारचे काम जनतेचे पोट भरणे आहे का? की जनतेला स्वतःचे पोट भरण्यास सक्षम बनवणे हे सरकारचे काम आहे? १/८
सध्या मुंबईत कार्यरत असणारी घाटकोपर ते वर्सोवा या मेट्रोच्या मार्गाची लांबी आहे अवघी ११.४ किमी. त्यासाठी ₹४०/प्रति व्यक्ती एवढा कमाल दर आकाराला जातो. तरीदेखील यातून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढतच राहिली. तर दुसरीकडे मुंबई लोकल एवढ्याच अंतराच्या प्रवासासाठी ₹५ घेते. २/८
मेट्रो महागडी असूनही दररोज यातून साडेचार लाखांहून अधिक लोक प्रवास कसे करतात? याचे चालक आहेत 'मुंबई मेट्रो प्रायव्हेट लिमिटेड'. याने लोकांचे किती आर्थिक नुकसान झाले?
इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनने एक अब्ज डॉलरचे (७,६०० कोटी रुपये) १० ते ३० वर्षांसाठीचे बॉण्ड विक्रीस ३/८
आज देशातील रेशनिंग पद्धतीवर थोडं परखड बोलणार आहे. माझे काही प्रश्न देखील आहेत. त्यामुळे थ्रेडवर व्यक्त होण्याआधी त्यांची उत्तरे जरूर शोधावी.
आजवर आपण अनेक मागण्या केल्यात. आरक्षणापासून ते संरक्षणापर्यंत केलेल्या मागण्यांची यादी काढली तर ती फारच लांबलचक होईल. १/१२
त्यातील किती पूर्ण झाल्या किती अपूर्ण राहिल्या तो मुद्दा सध्या बाजूला ठेवू. पण बऱ्याचदा आपण चुकीची मागणी करत राहिलो हे आपल्याला मान्य करावेच लागेल. याच चुकीच्या मागणीच्या शेगडीवर अनेक राजकारणी आपल्या राजकीय पोळ्या अविरत शेकत राहिले. २/१२
‘रेशिंग’ या शब्दाचा भारतीय अर्थ आहे, ‘कमी किमतीत (गरिबांसाठी) सरकार कडून वस्तु, खाद्य पदार्थ मिळणे.’ अमेरिकन शब्दकोशात याचा अर्थ काहीसा असा आहे, ”a limited amount (of something) that one person is allowed to have, especially when there is not much of it available.” ३/१२