२४ जानेवारीला हिंडेनबर्गने #AdaniGroup च्या विरोधात एक रिसर्च रिपोर्ट पब्लिश केला आणि या ग्रुपमधील स्टॉक्सच्या प्राईज धडाधड कोसळल्या. हा रिपोर्ट पब्लिश होऊन आता एक महिना उलटून गेला आहे. या एका महिन्यात घडलेल्या घडामोडींचा थोडक्यात गोषवारा. #Thread#HindenburgReport#म#मराठी 1/n
२४ जानेवारीला या अमेरिकन कंपनीने आपला रिसर्च रिपोर्ट पब्लिश करत अदानी ग्रुप दहा वर्षांपासून 'स्टॉक मॅनिप्युलेशन आणि अकाऊंटिंग फ्रॉड' करत असल्याचा दावा केला. #LIC ची #AdaniGroup मध्ये ३०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक असल्यामुळे तेही यात ओढले गेले. #Thread#HindenburgReport
2/n
२६ जानेवारीपर्यंत अदानी ग्रुपमधील कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात विकले गेले आणि ब्लूमबर्गनुसार त्यांनी १०० बिलियन डॉलरहून अधिक मार्केट व्हॅल्यू गमावली. त्यानंतरदेखील अदानी ग्रुपची संपत्ती घटतच राहिली आणि त्यांचा FPO फक्त १ टक्के सबस्क्राईब झाला. #Thread#HindenburgReport
3/n
२९ जानेवारीला हिंडेनबर्गच्या दाव्यांना उत्तर देण्यासाठी अदानी ग्रुपने ४१३ पानांचे स्टेटमेंट इशू केले. ३० जानेवारीला अबू धाबी मधील एका कंपनीने #AdaniEnterprises च्या FPO मध्ये ३८१ मिलियन डॉलर इन्व्हेस्ट केले. त्यामुळे #FPO १०० % सबस्क्राईब झाला. #Thread#HindenburgReport
4/n
१ फेब्रुवारीला क्रेडिट स्विस प्रायव्हेट बँकेने मार्जिन लोन्ससाठी कोलॅटरल म्हणून अदानी ग्रुपचे बॉन्ड्स स्वीकारणे बंद केले. २ फेब्रुवारीला आपल्या इन्वेस्टर्सचे पैसे वाचवण्याचे कारण सांगत अदानी एन्टरप्राइझेसने आपला FPO रद्द केला. #Thread#HindenburgReport
5/n
त्यानंतर #RBI ने बँकांना त्यांच्या अदानी ग्रुपमधील एक्सपोजर डिटेल्स देण्याचे आदेश दिले. त्यानंतर अदानी-हिंडेनबर्ग वाद संसदेत जाऊन पोहोचला आणि या प्रकरणाच्या चौकशीसाठी Joint Parliamentary Committee तयार करण्याची विरोधकांनी मागणी केली. #Thread#HindenburgReport#म#मराठी
6/n
९ फेब्रुवारीला #msci ने अदानी ग्रुपमधील कंपन्यांचे ऍडजस्टेड फ्री फ्लोट मार्केट कॅपिटल काढले. १० तारखेला हिंडेनबर्गच्या रिसर्च रिपोर्टची चौकशी करण्यासाठी सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्ट तयार झाले. #Thread#HindenburgReport#म#मराठी
7/n
१३ फेब्रुवारीला ब्लूमबर्गने पुढील आर्थिक वर्षासाठी अदानी ग्रुपचे रिव्हेन्यू ग्रोथ टार्गेट १५-२० % इतके राहणार असल्याचे सांगितले, जे सुरुवातीला ४० % इतके होते. १४ तारखेला अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणावर सुप्रीम कोर्ट कमिटी तयार करण्यास केंद्राने मंजुरी दिली. #adanihindenburg
8/n
सप्टेंबर २०२२ मध्ये २९० बिलियन डॉलरपर्यंत गेलेले अदानी ग्रुपचे मार्केट कॅपिटल २० फेब्रुवारीला १०० बिलियन डॉलरच्या आत आले. हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर हे मार्केट कॅपिटल जवळपास १३५ बिलियन डॉलरने कमी झाले आहे. #Thread#HindenburgReport#म#मराठी
9/n
डिसेंबर २०२२ मध्ये अदानी ग्रुपच्या शेअर्समधील गुंतवणुकीवर #LIC चा ५०,००० कोटी रुपये इतका नफा होता. परंतु स्टॉक्स कोसळल्यामुळे आता LIC ने हा सर्व नफा गमावला असून त्यांची इन्व्हेस्टमेंट आता ऍट द कॉस्ट म्हणजे जवळपास ३०,००० कोटी रुपये इतकी राहिली आहे. #Thread#HindenburgReport
10/n
फ्लेक्सीकॅप म्युच्युअल फंड म्हणजे काय?
फ्लेक्सीकॅप फंड ही एक ओपन एंडेड डायनामिक इक्विटी स्कीम असते. ही स्कीम आपली गुंतवणूक लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप स्टॉक्स मध्ये करते. #म#मराठी
सेबीच्या नियमानुसार या फंडांना आपली कमीत कमी ६५% टक्के गुंतवणूक ही इक्विटी आणि इक्विटी रिलेटेड इन्स्ट्रुमेंट मध्ये करणे बंधनकारक असते. भारतामध्ये सध्या एकूण 33 फ्लेक्सीकॅप स्कीम्स आहेत.#म#मराठी
या फंडामध्ये गुंतवणुकीचे फायदे काय?
फ्लेक्सीकॅप फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे फंड मॅनेजरला गुंतवणूक करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य असते. लार्ज कॅप, मिडकॅप किंवा स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये आपली गुंतवणूक कशी विभागावी? #म#मराठी
'मन' आणि 'नियमांत' ट्रेडरचा मित्र 'नियम' असले पाहिजेत. थ्रेड...
जेव्हा एखादा ट्रेडर सकाळी १ लाख रुपये लॉस करतो व परत सायंकाळी ते रिकव्हर करतो, तेव्हा तो १०० टक्के आनंदी होतो. टेक्नीकली त्याने त्या दिवशी शुन्य रुपये कमावलेले असतात. #म#मराठी#Thread
1/n
जेव्हा एखादा ट्रेडर सकाळी १ लाख रुपये प्रॉफिट कमावतो व त्याच दुपारी १ लाख रुपये लॉस करतो तेव्हा मात्र तो २५० टक्के दु:खी होतो. टेक्नीकली त्याने या दिवशीही शुन्य रुपये कमावलेले असतात. #म#मराठी#Thread
2/n
थोडक्यात काय तर प्रॉफिट व लॉस जरी सेम असला तरी माणूस प्रॉफिटच्या वेळी जेवढा आनंदी होतो, त्याच्या कित्येक पट जास्त दु:खी तो लॉस झाल्यावर होतो. #म#मराठी#Thread
3/n
ट्रेडिंग करत असताना बऱ्याच वेळा रिस्क रिवॉर्ड रेशो ही टर्म आपल्या कानावर पडते. आपण ट्रेड घेताना किती रिस्क घेतोय आणि ती रिस्क घेतल्यावर त्यावर आपल्याला मिळणारा रिवॉर्ड किती आहे? याचा हा रेशो असतो. या रेशोबद्दल थोडक्यात माहिती देणारा हा थ्रेड.#Thread#म#मराठी@in_tradingview
1/n
सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा रिस्क रिवॉर्ड रेशो १:२ असतो तेव्हा तुम्ही घेत असलेल्या प्रत्येक एक रुपयाच्या रिस्कवर तुम्हाला दोन रुपये रिवॉर्ड मिळू शकतो. हाच रेशो १:५ असेल तर तुम्ही घेत असलेल्या प्रत्येक एक रुपया रिस्कवर तुम्हाला पाच रुपये रिवॉर्ड मिळू शकतो. #म#मराठी
2/n
बऱ्याच नवीन ट्रेडर्सला तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशो कमीत कमी १:२ असला पाहिजे असे सांगितले जाते. पण यामध्ये खरोखर तथ्य आहे का? हे आपण एका उदाहरणावरून समजून घेऊया. #Thread#म#मराठी#RiskManagement
3/n
जम्मू काश्मीरमध्ये लिथियमचे मोठे साठे सापडल्याच्या बातमीमुळे भारतीयांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. पण या साठ्यांमधून प्रत्यक्षात #Lithium प्रॉडक्शन सुरू होण्यासाठी किती काळ लागू शकेल? हे लिथियमचे मायनिंग धोकादायक असू शकते का?याबाबत थोडीशी माहिती #Thread#म#मराठी 1/n
कुठल्याही मायनिंग प्रक्रियेमुळे सामाजिक,भौगोलिक, नैसर्गिक आणि परिसरातील नागरिकांवर शारिरीक परिणाम होतात. लिथियमच्या या मायनिंगमुळे सॉईल डिग्रेडेशन, पाण्याचे शॉर्टेज, परिसरातील बायोडायव्हर्सिटीवर आणि सबंध इकोसिस्टीमवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. #LithiumInIndia#मराठी
2/n
याशिवाय लिथियमच्या प्रॉडक्शनसाठी मोठ्या प्रमाणात पाणी आणि वीज लागते. उदाहरण द्यायचे झाले तर एक टन लिथियम बनवण्यासाठी जवळपास 22 लाख लिटर पाणी आणि 300 किलोवॉट अवर विजेची गरज असते. ही वीज पारंपारिक स्त्रोतांपासूनच बनवलेली असल्यामुळे डाय-ऑक्साइड उत्सर्जित होते. #Thread#मराठी
3/n
#IPO : सीलमॅटिक इंडिया (Sealmatic India Limited) या कंपनीचा IPO १७ ते २१ फेब्रुवारीपर्यंत सब्स्क्रिप्शनसाठी खुला झाला आहे. BSE च्या डेटानुसार काल पहिल्याच दिवशी हा IPO जवळपास ४५ टक्के सबस्क्राईब झाला आहे. या IPO ची इशू साईझ ५६.२४ कोटी रुपये इतकी आहे. #म#मराठी#Thread 1/n
IPO चा प्राईज बँड २२०-२२५ रुपये प्रति शेअर इतका आहे. सब्स्क्रिप्शनसाठी कंपनीने ६०० शेअर्सचा लॉट निश्चित केला आहे. त्यामुळे एका लॉटची किंमत जवळपास १,३५,००० रुपये इतकी असणार आहे. यामध्ये रिटेल इन्व्हेस्टर फक्त एकाच लॉटसाठी बोली लावू शकतात. #म#मराठी#Thread#IPO
2/n
#IPO मधील २५ लाख शेअर्सपैकी १८.५ लाख फ्रेश इशू आहेत तर ६.५ लाख शेअर्स ऑफर फॉर सेल(OFS) आहेत. यातील ४० टक्के शेअर्स क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल इन्वेस्टर्स, १८ टक्के शेअर्स नॉन-इन्स्टिट्यूशनल इन्वेस्टर्स तर ४२ टक्के शेअर्स रिटेल इन्वेस्टर्ससाठी राखीव आहेत. #म#मराठी#Thread
3/n
#important: आयआरबी इंफ्रास्ट्रक्चर व डेव्हलपर्स कंपनीचा स्टॉक्स स्प्लिट होणार आहे. या स्टॉक्सची स्प्लिट रेकॉर्ड डेट २२ फेब्रुवारी आहे. कंपनी इंजीनिअरिंग व कंस्ट्रक्शन सेक्टरमध्ये काम करते. #IRB#Thread#म#मराठी
1/n
शेअर होल्डरने स्टॉक्स स्प्लिटला पोस्टल बॅलेटने ९९.९९ टक्केंच्या आवाजी मतादानाने मंजूरी दिली. याबद्दल कंपनीने स्टॉक्स एक्सचेंजला ६ फेब्रुवारी रोजी माहिती दिली होती. हा स्टॉक १०:१ असा स्प्लिट होणार आहे. #IRB#Thread#म#मराठी
2/n
१०:१ या स्टॉक स्प्लिट रेशोप्रमाणे कंपनीच्या प्रत्येक शेअर होल्डरला प्रत्येकी एका शेअर मागे १० शेअर मिळणार आहेत. शेअरची फेस व्हॅल्यू देखील यामुळे १० वरुन १ रुपयांवर येणार आहे. #IRB#Thread#म#मराठी
3/n